गहन हे मर्म दु:खाचे

जगण्याच्या निबिड अरण्यी
शोधणे कठिण किती असते
मी मला गवसण्या आधी
वैफल्य विकटसे हसते

गहन हे मर्म दु:खाचे
उमगणे कठिण किती असते
तोडुनिया सर्व पहारे
ते फितुर अश्रुना होते

उफराटे गणित विषाचे
समजणे कठिण किती असते
मरण्यास पुरे इवलेसे
जगण्यास कितीही कमी पडते

field_vote: 
0
No votes yet