स्वप्न

वस्त्र ढगांचे धुवून सागरी वाळत घालीन व्योमी
धग सूर्याची इस्त्रीसाठी येईल माझ्या कामी

कधि चंद्राचा घेउनी चेंडू खेळत बसेन गगनी
चांदणमेवा थोडा थोडा खाईन अधुनी मधुनी

प्रकाशवर्षांचे अंतर मी तोडिन प्रकाश वेगे
अंतरिक्ष लंघून संपता कशास येईन मागे?

सांग स्वप्न हे माझे कधितरी येईल का सत्यात?
ठाऊक नाही ? - रात्रंदिन मग झोपून पाहीन वाट Smile

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान आहे कविता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||

पण 'छोट्यांसाठी' असेल तर ती फारतर जे १९८०-२००० मध्ये 'छोटे' होते त्यांच्यासाठी आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

मला कविता फार आवडली. एकदम कलाटणीच दिलीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

वस्त्र ढगांचे धुवून सागरी वाळत घालीन
ह्यावरुन जुनी आठवण झाली. माझ्या एका भाचीने समुद्र कधीच पाहिला नव्हता. लहान असताना ती स्वत: गोष्टी रचून सांगायची, त्यांत एक नेहमीची गोष्ट म्हणजे,
एक बाई एकदा समुद्रावर धुणं धुवायला गेली होती.
आम्ही मुंबईकर या वाक्याला भरपूर हंसायचो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

छान कविता. लहानपणी मंगळावर जायची स्वप्ने पाहिलेली त्याची आठवण झाली. यत्ता पहिलीत असताना विचार केला की चौथी संपल्यावर जाऊ. चौथी संपल्यावर कळाले की आत्ता तरी कै होत नै मग म्हटले दहावीनंतर जाऊ. मग लक्षात आले की काही होणे नाही. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कविता मस्त..

कधि चंद्राचा घेउनी चेंडू खेळत बसेन गगनी

ह्यावरून तो मुपीवरचा महाप्रसिद्ध लेख आठवला..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

छोट्यांसाठी लिहिणं कठीण असतं.
व्योमीला सोपे करायला हवे.
मजेदार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. पुंबा, मुपीवरचा महाप्रसिद्ध लेख? लिंक देता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

बालकवींची कविता वाचून न आवरता आलेली काव्यवेणा इथे कविताबालक म्हणून प्रकट झाली आहे असे म्हणावे काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

वेगळीच कल्पनाशक्ती!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-वाचनस्तु
https://vachanastu.blogspot.in/
माझी वलय ही कादंबरी जरूर वाचा:
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/valay_nimish_sonar.pdf