आजची पुरूषप्रधानता स्त्री स्वातंत्र्याला कारणीभुत

लग्न न करणारी स्त्री जेव्हा लग्ननावाच्या बेगडीत अडकते तेव्हा तिथून सुरूवात होते तिच्या अस्तित्त्वाची स्त्रीपणाची जाणीव होते पुरुषी अंहकाराची आणि मायेच्या माणसाची ...

भारतासारख्या पुरूषप्रधान देशात खरचं आजही स्त्रीला स्वातंत्र्य मिळाल का ? मिळाल तर आजही स्त्रीला भारतात देवीच रूप मानल्या जाते दुर्गा उत्त्सव साजरी करणारी ही पुरुष मंडळी मग लग्नात स्त्रीला का स्वत:च्या पाया पडू देते स्त्रीची जागा पुरूषाच्या चरणावर का ? कारण ती तर खांद्याला खांदा लावून पुरूषासारखी काम करते .घर सांभाळून नोकरी करणार्या ही स्त्रिया आहेत ह्या समाजात .चुल सांभाळून मुल सांभाळा तरी तिजोरीची चांबी ही पुरुषाच्याच हाती असतेना .मनुस्मृती सारख्या ग्रंथ पुराणातुन स्त्रीचे स्वातंत्र्य बांधल्या गेले आहे ..मनुने तर स्त्रीला चक्क शुद्रात मोडले . इतकेच नाही तर स्त्रीने स्वत:चे विचार ही मांडायचे नाही .
बाल्या वा युवत्या वा
वृध्दया वापि योषिता !
न स्वातंत्र्येन कर्तव्य किंचित्कार्य गुन्हेण्यपि ।
स्त्रीने लहानपणी पिण्याच्या छत्राखाली रहावे ,तरूणपणी पतीच्या म्हातरपणी मुलाच्या स्वतंत्रपणे आणि स्वतंत्र्यवृतीने तिने कधी जगचू नये का?? तिचे स्वातंत्र्यच तिच्या पासून हिरावून घेतले एका खोट्या पुराण ग्रंथच्या चालीरितीत इथल्या पुरुषाने स्वतः ला झोकून दिले काय ?

पुरूषी वर्चस्व प्रस्थापित राखून ठेवण्यासाठी आज ही तिला मोठ्या मंदिरात गेली तर दुरून पाया लागा लागते .अरे म्हणते देवाला स्त्री चालत नाही मंदिरातला देव तुम्हाला हे सांगायला येतो का ?स्त्रीच्या सावलीचा ही देवाला विटाळ तर निसर्गाने स्त्रीची उत्पत्ति केलीच कशाला ? आज ही शनी मंदिरात स्त्रीला प्रवेश नाही भारतात राष्ट्रपति च्या खुर्चीवर बसणारी स्त्री शिक्षण मंत्री ही ती आणि मंदिराचा गाभारा तिच्यासाठी नाही म्हणजे हे स्त्री ने ठरवले का की पुरुषानी तिच्यावर बंधने लादली .नऊ महिने उदरात वाढलेला गर्भातल मुल पवित्र वाटते आणि मासिक त्रासातून जाणार्या तिचा संवेदनाचा विचार न करता ती स्त्री ह्या समाजाला अपवित्र वाटते आजही चार दिवस अलग बस म्हणारा समाज ह्या देशात कमी नाही .ही बंधने ही त्या पुरातन काळा पासुन पुरूष स्त्रीवर लादत जातो मुकट्याने ती ह्या बंधनात अडकून पडलेली आहे ..
एका पुरूषाचे शिक्षण हे बहुधा त्याचे एकट्याचे शिक्षण ठरवले जाऊ शकते पण एका स्त्रीचे शिक्षण हे भावी पिढीचे शिक्षण असते . आज सांगा कोणत्या कायद्यात संविधानात असे कुठे लिहून ठेवले आहे का स्त्रीने मंगळसुत्र घालाच ? मंगळसुत्र घातल म्हणजे नवरा जीवतं आहे नाही तर तो नाही असे होईल का ?लग्न झाल्यावर तुम्ही कायद्याने पती पत्नी बनताच न लग्न मग पुरुषाचेही होते पण त्याला अशी कुठलीच बंधने नाही .काळ्या मण्याचा धागा स्त्री रिवाज म्हणून कमी आणि बंधन म्हणून जास्त घालते .एक दिवस कपाळाला टिकली नाही लावली लग्न झालेल्या स्त्रीने तर सासू इतराची कुजबुज सुरू होते .आणि नवरा मेला तर विधवा स्त्रीने साधी टिकली जरी लावली तर हाच समाज असतो ना तिच्याकडे तुच्छेतेच्या नजरेने बघणारा म्हणजे समाजाणेच तिच्यावर ही बंधने लादायची आणि समाजानेच ती हिरावून घ्यायची .वेद्, पुराण,ऋग्वेद,मनुस्मृती ह्या विचाराणा आजही पुरुष मंडळी सहमती देतात घरातल्या स्त्रीचा विचार नसतो पण त्याच्या मस्तकातून वेद पुराण जात नाही ...आणि म्हणतात देवाला स्त्रीची सावली चालत नाही .?
त्याची कारणे ....
नारी मग ती पुत्री, पत्नी, माता किंवा कन्या, युवा, व्रुद्धा कोणत्याही स्वरुपात असो ती कधीच स्वतंत्र रहायला नको .असे स्मृतीत सांगितले आहे ते काही मुद्दे .
पति पत्नीचा केव्हाही त्याग करू शकतो, तिला गहाण ठेवू शकतो विकु शकतो, परंतु स्त्रीला या प्रकारचा कोणताही अधिकार नाही. कोणत्याही स्थिती मध्ये,विवाहानंतर, पत्नी सदैव पत्नीच रहात असते.संपत्ती आणि मिळकतीवर अधिकार किंवा दावा करण्याचा अधिकार नाही, शूद्रांच्या स्त्रियासुद्धा "दास" आहेत, स्त्रीला संपति ठेवण्याचा अधिकार नाही,
स्त्रीच्या संपतिचा मालक तिचा पति, पूत्र, किवा पिता असेल.
ढोर, गवार, शूद्र आणि नारी, हे सर्व ताडन करण्या योग्य आहेत,
म्हणजे स्त्रीयांना ढोरा सारखे मारता येऊ शकते.
-असत्य ज्या प्रकारे अपवित्र असते, त्याच प्रकारे स्त्रियां सुद्धा अपवित्र असतात, शिकायचा, शिकवायचा, वेद-मंत्र म्हणायचा व उपनयन करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही .....
स्त्रियां शेवटी नरकातच जाणा-या असल्यामुळे त्यांना यज्ञ कार्य किंवा दैनिक अग्निहोत्र सुद्धा करण्याचा अधिकार नाही.
(यामुळे म्हटल्या जाते-"नर्काचे द्वार")
यज्ञ कार्य करणा-या किंवा वेद मंत्र बोलणा-या स्त्रियांच्या हातचे भोजन ब्राह्मणांनी वर्ज मानावे, स्त्रियांनी केलेले सर्व यज्ञ कार्य अशुभ असल्याने देवांना स्वीकार्य नाहीत.
मनुस्मृती प्रमाणे, स्त्री पुरुषांना मोहित करणारी असते.
स्त्री पुरुषांना दास बनवून पदभ्रष्ट करणारी असते.
स्त्री एकांताचा दुरुपयोग करणारी असते.
स्त्री संभोगाप्रिय असते त्यासाठी ती वय किंवा कुरुपता सुद्धा बघत नसते.
स्त्री चंचल आणि हृदयहीन, पति शी एकनिष्ठ न राहणारी असते
.स्त्री केवळ शैया, आभुषण आणि वस्त्र यावरच प्रेम करणारी, वासनायुक्त, बेईमान,
इर्षाखोर, दुराचारी असते .
सुखी संसारासाठी स्त्रीयांसोबत कसे रहावे या साठी हा मनु सांगतो-
स्त्रीयांनी जीवनभर आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करायला पाहिजे चाहिए.
पति दुराचारी असो, इतर स्त्रीवर आसक्त असो,दुर्गुणांचे भांडार असो, नंपुसंक असो, कसाही असला तरीही स्त्री ने पतिव्रता होऊन देवा सारखी त्याची पूजाच करायला पाहिजे
पण त्याहीपेक्षा ज्या मराठी साहित्यात असे म्हटले जाते की एका क्षणाची पत्नी ही अनंत काळाची माता असते.
ह्याच अशा विचाराना आजही पुरूष थारा देतो कुणालाही स्त्री बद्दलचे असे फसवे मत एखाद्या स्त्रीला राग येणारे आणि विरोधाभास दर्शविणारे आहे ....चाली रूडी पासून पुरुषाने तिला बंधनात ठेवले ...स्त्री दिवसा आदीशक्तीच रूप नारी असते आणि रात्र होताच पुरूषी शक्तीचा प्रयोग चालतो ...पण स्त्रीने निमूट पणे सर्व का सहन करत बसायचे ..चांगल काय वाईट काय हे स्त्रीनेही समाजाला समजावून सांगायला पाहिजे लग्नात एकादिवसाच्या झालेल्या नवर्याच्या पाया पडायच्या कारण तो मरेपर्यत तुमचा नवरा असतो मग आर्त व्यक्तित्मत्व कसं ही असो नवरायाच्या पाया पडणे खरचं जर का शास्त्रीय कारण समजल्या जात असेल तर त्यालाच पुजत रहायला हवे लग्न होऊन दारू पिऊन मारणारा निघो मग तो ह्या असल्या चालीरिती समाजातुन बंद का नाही होतं ? पाया पडायच्याच आहे तर मुलीनो जे तुम्हाला शिकवतात लहानच मोठ करतात त्या आई वडिलाच्या पाया पडा आणि ह्या फेकलेल्या पुरातन विचाराचा विरोध करा ....नाहीतर तुमच्या स्वतंत्र्याला पुरुषप्रधानते सोबत तुम्ही ही कारणीभुत असाल...

व्यवस्थापकीय टिप्पणी - प्रतिसादांमध्ये मूळ लेखाचा मजकूर असेल, असं गृहित धरून तो मजकूर लेखाच्या जागी चिकटवला आहे.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

हे चांगदेवाचे पत्र आहे का ऐसीवरच्या द्न्यानेश्वरांसाठी ??

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी3
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांनी रुमाल टाकून ठेवला असेल कदाचित

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

काय रूमाल टाकून ठेवला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बस मध्ये नाही का रुमाल टाकून जागा पकडतो तसा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

कुत्र्यानं खाल्ला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद पकाऊ असला तरी कुत्रे क्यूट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख वाचून प्रतिसाद देतात की टाईप पास समजून डोक्यातले किडे खातात असं वाटतं आणि तुम्ही म्हणता तरी कुत्रे क्यूट आहे ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...कुत्रे खरोखरच क्यूट आहे हो!

असो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. लेखावर तुमचा अधिकार आहे, येणाऱ्या प्रतिसादांवर नाही. मा कर्म फलहेतुर्भुः मा ते संगोस्त्वकर्मणि. (बऱ्यावाईट) प्रतिसादांच्या अपेक्षेने लेख लिहू नका, पण म्हणून लेख लिहायचे थांबू नका.

..........

, संस्कृतच्या माताभगिनींस विनयभंगाप्रीत्यर्थ जाहीर क्षमायाचना.

1,$s/लिह्/पाड्/g

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख वाचून प्रतिसाद देतात की...

लेख लिहिलाच नाही, तर वाचायचा कसा?

टाईप पास समजून...

टाईप पास म्हणजे काय?

डोक्यातले किडे खातात

१. त्यांच्या डोक्यात किडे आहेत की नाहीत हे तुम्हांस कसे ठाऊक? की नुसत्या स्पेक्युलेशनच्या आधारे ठोकून दिलेत?
२. त्या शाकाहारी नसतील कशावरून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख लिहिलाच नाही, तर वाचायचा कसा?

कशावरून? व्यवस्थापक लेखिकेवर खार खाणारे असतील आणि लेख त्यांनी खरंच खाऊन टाकला असेल तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तिर्री मांजर खार, खारी खात नाही. मी डाएटवर आहे.

खुलासा संपला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खार म्हणजे लोणच्याचा खार किंवा पापडखार असेल.

शिवाय खारच तिर्रीला खाऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

...चट्टेरीपट्टेरी पैजामा आहे का हो? (आणि, असल्यास, त्यात नाडी आहे काय?)

नाही म्हणजे, 'ऐसी'वर अलीकडेच एक नवीन फतवा निघाला आहे, म्हणून विचारले. (अधिक धोक्याचा इशारा.)

- (समदुःखी/को-अॅक्यूज़्ड) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हण्याचा उद्देश तसा नाही पण कधीकधी बोली भाषा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती भिन्न भिन्न असतात त्यांना वाचन करणे दुर पण कोणी तरी म्हटलं रूमाल टाकला म्हणजे नेमक माणूस चुकला कुठे समजेना असो ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही नाऊमेद होऊ नका. (लेखाची शीर्षके का होईना) लिहीत रहा.
मग जमलं तर लेखसुद्धा लिहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज, आख्खं ऐसी कोमात गेल्यासारखं वाटताय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती

गुन्हेगाराचा न्यायवेवस्थेवर विश्वास का नसणार बरे .....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज, आख्खं ऐसी कोमात गेल्यासारखं वाटताय!

येथे, 'कोमा' हे 'कोमल'चे डिमिन्यूटिव (उदा.) म्हणून वापरण्यात आले आहे काय?

(असल्यास, वरील वाक्य हे महाअश्लील आहे, एवढेच जाताजाता हळूच आणि अतिनम्रपणे सुचवू इच्छितो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

कोणीही काहीही बोललो त्यांच्या टिकेने कुणावर परिणाम होत नाही ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोमल ताई यांचं स्पिरिट आवडलं !!! एवढे सगळे लिहिताहेत तरी ना उमेद न होता त्या टक्कर देत आहेत . टिकणार त्या ऐसीवर !!! अभिनंदन हो कोमल ताई आणि स्वागत !!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद ....अबापट
आपले आभारी आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाटलं होतं, लेखात आता फारसं काही सांगण्यासारखं नसेल. तंतोतंत खरं ठरलं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीवर पुरुषप्रधानता नाही पर्यायाने ती ज्याला कारणीभूत आहे ते स्त्रीस्वातंत्र्यही ऐसीवर नाही म्हणून "हिरवा चारा खाणारा घोडा" या सुप्रसिध्द चित्रासारखा हा लेख आहे. Pardon

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा वा वा.. ऐसी वर रिकामा धागा पाहून आनंद जाहला!! BiggrinBiggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिथे त्या दिवंगत मकबूल फिदा हुसेनसाहेबांनी (ईमृशांदे) भिंतभर कोरा कागद काय चिकटवलानीत, तर त्याचे 'अय्या कित्ती कित्ती गोग्गोड पेंटिंग' म्हणून कोण मारे कौतुक झालेनीत. आणि इथे???

खऱ्याची दुनिया राहिली नाही, हेच खरे!

(अवांतर: शेवटचे वाक्य हे वदतो व्याघात:चे उदाहरण मानता यावे काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नैओ.. रिकाम्या धाग्यावर 'कित्ती गोग्गोड पेंटिंग' कौतुक नै झाले. मौजमजा फारच मनावर घेतली नि मी सगळी चित्रं काढून टाकलीन.
ईथे नुसतंच शीर्षक दिसतंय नि धाग्याचा पत्ता नै.
फरक है!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख मोठा होता म्हणून कदाचित लेख टाईप करूनही दिसत नाही आहे ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 :-आजची पुरुषप्रधानता स्त्री स्वातंत्र्याला कारणीभुत

   लग्न न करणारी स्त्री जेव्हा लग्ननावाच्या बेगडीत अडकते तेव्हा तिथून सुरूवात होते तिच्या अस्तित्त्वाची स्त्रीपणाची जाणीव होते पुरुषी अंहकाराची आणि मायेच्या माणसाची ...

भारतासारख्या पुरूषप्रधान देशात खरचं आजही स्त्रीला स्वातंत्र्य मिळाल का ? मिळाल तर आजही स्त्रीला भारतात देवीच रूप मानल्या जाते दुर्गा उत्त्सव साजरी करणारी ही पुरुष मंडळी मग लग्नात स्त्रीला का स्वत:च्या पाया पडू देते स्त्रीची जागा पुरूषाच्या चरणावर का ? कारण ती तर खांद्याला खांदा लावून पुरूषासारखी काम करते .घर सांभाळून नोकरी करणार्या ही स्त्रिया आहेत ह्या समाजात .चुल सांभाळून मुल सांभाळा तरी तिजोरीची चांबी ही पुरुषाच्याच हाती असतेना .मनुस्मृती सारख्या ग्रंथ पुराणातुन स्त्रीचे स्वातंत्र्य बांधल्या गेले आहे ..मनुने तर स्त्रीला चक्क शुद्रात मोडले . इतकेच नाही तर स्त्रीने स्वत:चे विचार ही मांडायचे नाही .
बाल्या वा युवत्या वा 
वृध्दया वापि योषिता !
न स्वातंत्र्येन कर्तव्य किंचित्कार्य गुन्हेण्यपि ।
स्त्रीने लहानपणी पिण्याच्या छत्राखाली रहावे ,तरूणपणी पतीच्या म्हातरपणी मुलाच्या स्वतंत्रपणे आणि स्वतंत्र्यवृतीने तिने कधी जगचू नये का?? तिचे स्वातंत्र्यच तिच्या पासून हिरावून घेतले एका खोट्या पुराण ग्रंथच्या चालीरितीत इथल्या पुरुषाने स्वतः ला झोकून दिले काय ? 

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोमल मानकर लिहितात:

मनुने तर स्त्रीला चक्क शुद्रात मोडले . इतकेच नाही तर स्त्रीने स्वत:चे विचार ही मांडायचे नाही .
बाल्या वा युवत्या वा
वृध्दया वापि योषिता !
न स्वातंत्र्येन कर्तव्य किंचित्कार्य गुन्हेण्यपि ।
स्त्रीने लहानपणी पिण्याच्या छत्राखाली रहावे ,तरूणपणी पतीच्या म्हातरपणी मुलाच्या स्वतंत्रपणे आणि स्वतंत्र्यवृतीने तिने कधी जगचू नये का??

कोमलताई, मैत्रीच्या भूमिकेतून हे पुढचे लिहिले आहे.

ही वरची 'विद्वत्ता' तुम्ही कोठून copy-paste केली? असे दुसऱ्या कोठून उचलवारी करून विद्वत्तेचे सोंग आणता येणार नाही. हा मनूचा श्लोक असा आहे:

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने |
पुत्रो रक्षति वार्धक्ये न स्त्री: स्वातन्त्र्यमर्हति || मनुस्मृति ९.३
कुमारवयात पिता, तरुण वयात पति आणि वार्धक्यात पुत्र (स्त्रीचे) रक्षण करतो. स्त्रीला स्वातन्त्र्याची आवश्यकता/गरज नाही - ती स्वातन्त्र्याला योग्य नाही.
(असे वेगवेगळे अर्थ अशासाठी दाखविले आहेत की 'अर्हति' ह्याचे चपखल आणि सर्वांना पटेल असे भाषान्तर करता येत नाही,)

मनुस्मृति जालावर अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. ती पाहूनच त्यातील अवतरण उद्धृत करणे योग्य आहे. नाहीतर आपला मुद्दा मांडण्यासाठी अर्धशिक्षित लोकांपासून काहीतरी उचलायचे आणि आपला अभिनिवेशपूर्ण लेख सजवायचा हे योग्य नाही. असे केल्यामुळे तुमच्यावर उथळपणाचा आरोप येतो आणि चेष्टा-टिंगळटवाळी ह्यांना सामोरे जावे लागते आणि 'उथळ पाण्याला खळखळ फार' हा आरोप केला जातो.

पटले तर बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परंतु आता पर्यत मनुचा तुम्ही सांगितलेला नाही हाच लेख वाचण्यात आला आहे ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>अर्हति' ह्याचे चपखल आणि सर्वांना पटेल असे भाषान्तर करता येत नाही,)

का हो? अर्हति म्हणजे डिझर्व असा अर्थ चपखल आहे. किंवा क्वालिफाइड असाही अर्थ घेऊ शकतो.

अर्हता प्राप्त केली आहे.- ॲक्वायर्ड द क्वालिफिकेशन
स्वीकारार्ह/आक्षेपार्ह- डिझर्व्हज टु बी ॲक्सेप्टेड/कंडेम्ड

पण आवश्यकता नाही असा अर्थ नक्कीच होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

का हो? अर्हति म्हणजे डिझर्व असा अर्थ चपखल आहे. किंवा क्वालिफाइड असाही अर्थ घेऊ शकतो.
अर्हता प्राप्त केली आहे.- ॲक्वायर्ड द क्वालिफिकेशन
स्वीकारार्ह/आक्षेपार्ह- डिझर्व्हज टु बी ॲक्सेप्टेड/कंडेम्ड

हा ॲनॅलिटिकल मुद्दा झाला.

क्वालिफाईड असणे म्हंजे काही निकष असणे व त्या निकषांच्या चाचणीतून पार जाणे.

पण निकष कोणते, कसे, काय, केव्हा, कुठे, कोणाचे, कोणासाठी असावेत ह्याबद्दल अतिमहाप्रचंड वाद आहेत. व काकाश्रींना ते अभिप्रेत असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्हति चा डिझर्व हाच चपखल अर्थ आहे. क्वालिफाइड हा दुय्यम अर्थ म्हणून मी दिला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अर्हति चा डिझर्व हाच चपखल अर्थ आहे. क्वालिफाइड हा दुय्यम अर्थ म्हणून मी दिला आहे.

डिझर्व्ह तर डिझर्व.

पण डिझर्व या शब्दाच्या मागे निकष अभिप्रेत आहेतच की.

कोणत्याही निकषांविना डिझर्व्ह म्हंजे परफेक्ट समानता झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्हति या शब्दाला मिंग्लिश मधे 'अर्नति' हा प्रतिशब्द होऊ शकेल का ?
to deserve or to earn या अर्थी ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती

पुरूषी वर्चस्व प्रस्थापित राखून ठेवण्यासाठी आज ही तिला मोठ्या मंदिरात गेली तर दुरून पाया लागा लागते .अरे म्हणते देवाला स्त्री चालत नाही मंदिरातला देव तुम्हाला हे सांगायला येतो का ?स्त्रीच्या सावलीचा ही देवाला विटाळ तर निसर्गाने स्त्रीची उत्पत्ति केलीच कशाला ? आज ही शनी मंदिरात स्त्रीला प्रवेश नाही भारतात राष्ट्रपति च्या खुर्चीवर बसणारी स्त्री शिक्षण मंत्री ही ती आणि मंदिराचा गाभारा तिच्यासाठी नाही म्हणजे हे स्त्री ने ठरवले का की पुरुषानी तिच्यावर बंधने लादली .नऊ महिने उदरात वाढलेला गर्भातल मुल पवित्र वाटते आणि मासिक त्रासातून जाणार्या तिचा संवेदनाचा विचार न करता ती स्त्री ह्या समाजाला अपवित्र  वाटते आजही चार दिवस अलग बस म्हणारा समाज ह्या देशात कमी नाही .ही बंधने ही त्या पुरातन काळा पासुन पुरूष स्त्रीवर लादत जातो मुकट्याने ती ह्या बंधनात अडकून पडलेली आहे ..
   एका पुरूषाचे शिक्षण हे बहुधा त्याचे एकट्याचे शिक्षण ठरवले जाऊ शकते पण एका स्त्रीचे शिक्षण हे भावी पिढीचे शिक्षण असते . आज सांगा कोणत्या कायद्यात संविधानात असे कुठे लिहून ठेवले आहे का स्त्रीने मंगळसुत्र घालाच ? मंगळसुत्र घातल म्हणजे नवरा जीवतं आहे नाही तर तो नाही असे होईल का ?लग्न झाल्यावर तुम्ही कायद्याने पती पत्नी बनताच न लग्न मग पुरुषाचेही होते पण त्याला अशी कुठलीच बंधने नाही .काळ्या मण्याचा धागा स्त्री रिवाज म्हणून कमी आणि बंधन म्हणून जास्त घालते .एक दिवस कपाळाला टिकली नाही लावली लग्न झालेल्या स्त्रीने तर सासू इतराची कुजबुज सुरू होते .आणि नवरा मेला तर विधवा स्त्रीने साधी टिकली जरी लावली तर हाच समाज असतो ना तिच्याकडे तुच्छेतेच्या नजरेने बघणारा म्हणजे समाजाणेच तिच्यावर ही बंधने लादायची आणि समाजानेच ती हिरावून घ्यायची .वेद्, पुराण,ऋग्वेद,मनुस्मृती ह्या विचाराणा आजही पुरुष मंडळी सहमती देतात घरातल्या स्त्रीचा विचार नसतो पण त्याच्या मस्तकातून वेद पुराण जात नाही ...आणि म्हणतात देवाला स्त्रीची सावली चालत नाही .?
त्याची कारणे ....
नारी मग ती पुत्री, पत्नी, माता किंवा कन्या, युवा, व्रुद्धा कोणत्याही स्वरुपात असो ती कधीच स्वतंत्र रहायला नको  .असे स्मृतीत सांगितले आहे ते काही मुद्दे .
पति पत्नीचा केव्हाही त्याग करू शकतो, तिला गहाण ठेवू शकतो विकु शकतो, परंतु स्त्रीला या प्रकारचा कोणताही अधिकार नाही. कोणत्याही स्थिती मध्ये,विवाहानंतर, पत्नी सदैव पत्नीच रहात असते.संपत्ती आणि मिळकतीवर अधिकार किंवा दावा करण्याचा अधिकार नाही, शूद्रांच्या स्त्रियासुद्धा "दास" आहेत, स्त्रीला संपति ठेवण्याचा अधिकार नाही,
स्त्रीच्या संपतिचा मालक तिचा पति, पूत्र, किवा पिता असेल. 
ढोर, गवार, शूद्र आणि नारी, हे सर्व ताडन करण्या योग्य आहेत,
म्हणजे स्त्रीयांना ढोरा सारखे मारता येऊ शकते.
-असत्य ज्या प्रकारे अपवित्र असते, त्याच प्रकारे स्त्रियां सुद्धा अपवित्र असतात, शिकायचा, शिकवायचा, वेद-मंत्र म्हणायचा व उपनयन करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही .....
स्त्रियां शेवटी नरकातच जाणा-या असल्यामुळे त्यांना यज्ञ कार्य किंवा दैनिक अग्निहोत्र सुद्धा करण्याचा अधिकार नाही.
(यामुळे म्हटल्या जाते-"नर्काचे द्वार") 
यज्ञ कार्य करणा-या किंवा वेद मंत्र बोलणा-या स्त्रियांच्या हातचे भोजन ब्राह्मणांनी वर्ज मानावे, स्त्रियांनी केलेले सर्व यज्ञ कार्य अशुभ असल्याने देवांना स्वीकार्य नाहीत.
मनुस्मृती प्रमाणे, स्त्री पुरुषांना मोहित करणारी असते.
स्त्री पुरुषांना दास बनवून पदभ्रष्ट करणारी असते. 
स्त्री एकांताचा दुरुपयोग करणारी असते.
स्त्री संभोगाप्रिय असते त्यासाठी ती वय किंवा कुरुपता सुद्धा बघत नसते.
स्त्री चंचल आणि हृदयहीन, पति शी एकनिष्ठ न राहणारी असते
.स्त्री केवळ शैया, आभुषण आणि वस्त्र यावरच प्रेम करणारी, वासनायुक्त, बेईमान,
इर्षाखोर, दुराचारी असते .
सुखी संसारासाठी स्त्रीयांसोबत कसे रहावे या साठी हा मनु सांगतो-
स्त्रीयांनी जीवनभर आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करायला पाहिजे चाहिए.
पति दुराचारी असो, इतर स्त्रीवर आसक्त असो,दुर्गुणांचे भांडार असो, नंपुसंक असो, कसाही असला तरीही स्त्री ने पतिव्रता होऊन देवा सारखी त्याची पूजाच करायला पाहिजे
पण त्याहीपेक्षा ज्या मराठी साहित्यात असे म्हटले जाते की एका क्षणाची पत्नी ही अनंत काळाची माता असते.
  ह्याच अशा विचाराना आजही पुरूष थारा देतो कुणालाही स्त्री बद्दलचे असे फसवे मत एखाद्या स्त्रीला राग येणारे आणि विरोधाभास दर्शविणारे आहे ....चाली रूडी पासून पुरुषाने तिला बंधनात ठेवले ...स्त्री दिवसा आदीशक्तीच रूप नारी असते आणि रात्र होताच पुरूषी शक्तीचा प्रयोग चालतो ...पण स्त्रीने निमूट पणे सर्व का सहन करत बसायचे ..चांगल काय वाईट काय हे स्त्रीनेही समाजाला समजावून सांगायला पाहिजे लग्नात एकादिवसाच्या झालेल्या नवर्याच्या पाया पडायच्या कारण तो मरेपर्यत तुमचा नवरा असतो मग आर्त व्यक्तित्मत्व कसं ही असो नवरायाच्या पाया पडणे खरचं जर का शास्त्रीय कारण समजल्या जात असेल तर त्यालाच पुजत रहायला हवे लग्न होऊन दारू पिऊन मारणारा निघो मग तो ह्या असल्या चालीरिती समाजातुन बंद का नाही होतं ? पाया पडायच्याच आहे तर मुलीनो जे तुम्हाला शिकवतात लहानच मोठ करतात त्या आई वडिलाच्या पाया पडा आणि ह्या फेकलेल्या पुरातन विचाराचा विरोध करा ....नाहीतर तुमच्या स्वतंत्र्याला पुरुषप्रधानते सोबत तुम्ही ही कारणीभुत असाल...
  
✍ कोमल प्रकाश मानकर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे लिहिण्याचा आपला उद्देश काय?- भावनांना वाट करून देणे की जागृती करणे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

मुळात कुठलाही उद्देश ठेवुन लिहावे का?
केवळ लिखाणाचे उमाळे आले म्हणुन लिहिले असे असु शकते कोमलतैंचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

....संविधानात असे कुठे लिहून ठेवले आहे का स्त्रीने मंगळसुत्र घालाच...
संविधानात लिहिले असेल तर गप गुमान घालाल? नुकताच कुठल्याश्या HIGH COURT ने निवाडा दिलाय की विवाहा अंतर्गत बलात्कार असे काही नसतेच.
तसे बघितले तर मनुस्मृती काय किंवा शरियत काय , त्या त्या काळाची संविधानेच होती.
आजचे पुरोगामी मनुस्मृती जाळतात. (शरिया जाळायची बिशाद नसते). उद्याच्या पुरोगाम्यांनी आजचे संविधान जाळावे अशी घटनाकारांची अपेक्षा आहे. अगदी HARD COPY ला काडी लाऊन नसेल पण संसदेत दुरुस्ती करून तरी.

तेंव्हा मनुस्मृती किंवा तत्सम ग्रंथांचा राग राग सोडा. ऐसी वर आपल्या मस्तीत जगणाऱ्या महिलांची मांदियाळी आहे त्यांच्याकडे पहा. मग अश्या ग्रंथांवर थुंकायची सुद्धा गरज वाटणार नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेंव्हा मनुस्मृती किंवा तत्सम ग्रंथांचा राग राग सोडा. ऐसी वर आपल्या मस्तीत जगणाऱ्या महिलांची मांदियाळी आहे त्यांच्याकडे पहा.

ऐसीवरच का .... इतरत्र सुद्धा आपल्या मस्तीत जगणारे जास्त पुरुषच आहेत. त्यातले काही पंतप्रधान आहेत. मस्तीत जगणाऱ्या महिला हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत. मस्तवालपणे जगणारे पुरुष लक्षावधी आहेत. सिरियसली.

त्यांच्याकडे पाहूया की !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांच्या कडे पाहूनच कोमल ताई दु:खी झाल्या असाव्यात. त्यावर अजून डागण्या नकोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कशाला संविधानात लिहिले म्हणून गप गुमान घालणार त्या काळ्या मण्याच्या मंगळसुत्रात असते तरी काय असे ?? जो समाज लग्नाच्या वेळी हे सर्व बहाल करतो तोच समाज नवरा मेल्यावर त्या महिलेने साधी टिकली जरी लावली तरी मागे नावबोटे ठेवतो .नवर्याला स्मशानात नेताना तर गळ्यातले मंगळसुत्र,जोडवी कुंकू मिटवल्या जातं .लग्नात तर मुलीला नवर्याच्या पायापडाव्या लागते .म्हणजे
तीचे स्थान पुरूषाच्या चरणावर असे का?
उद्याचे पुरोगामी का जाळतील घटना .आजचे पुरोगामी मनुस्मृती जाळतात कारण मनुस्मृतीने जातीचे विभाजन केले शुद्र उच्च नीच असे भेद केले माणसाला माणसापासून दुर केले .स्त्री स्वातंत्र्य बांधून ठेवले आणि हे कुणालाही न पटणारे आहे . संविधानात सर्वांना समान अधिकार आहे .ह्या जातीतील विशिष्ट स्त्रीयांना पुरूषाच्या संपतीवर समान हक्क आणि दुसर्या जाती धर्मातील नाही असे लिहून नाही .
ऐसी वर आपल्या मस्तीत जगणार्या महिलांची मंदियाळी आहे .त्यांच्याकडे पहा ...हो ना
पण ह्या अशा ग्रंथामुळेच महिला चुल आणि मुल सांभाळत होत्या .नशीब सावित्री फुल्यांमुळे त्या तुम्हा पुरूषांना ऐसीवर मस्तीत जगताना आज दिसत आहे हे तुम्ही नाकारू शकता का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संविधानात सर्वांना समान अधिकार आहे

कोमलमॅडम, तुम्हाला एक प्रश्न आहे -

आपल्या संविधानात "मूलभूत अधिकार" असा एक सेक्शन आहे. त्यात खालील वाक्य आहे -

Nothing in this article shall prevent the State from making any special provision for women and children.

प्रश्न हा आहे की हे वाक्य समानता निर्देशक आहे का ?
.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नशीब सावित्री फुल्यांमुळे त्या तुम्हा पुरूषांना ऐसीवर मस्तीत जगताना आज दिसत आहे हे तुम्ही नाकारू शकता का ?

कोमलतै, तुम्ही अशी जनरलाइझ्ड विधाने करु नका.

सावित्री फुले नसत्यातरी मी आणि माझ्या सारख्या अनेक स्त्रीया ऐसी वरती मस्तीत जगतानाच दिसल्या असत्या. सावित्री फुलेंचे आमच्या आयुष्यात किंवा मस्तीत जगण्यात काडिचे ही काँट्रिब्युशन नाही ( असलेच तर निगेटिव्ह असेल )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

सावित्री फुले नसत्यातरी मी आणि माझ्या सारख्या अनेक स्त्रीया ऐसी वरती मस्तीत जगतानाच दिसल्या असत्या. सावित्री फुलेंचे आमच्या आयुष्यात किंवा मस्तीत जगण्यात काडिचे ही काँट्रिब्युशन नाही

या निष्कर्षाप्रत कशा आलात तुम्ही, अनु राव ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सावित्री फुले नसत्या तरी आगरकर असते कर्वे असते किंवा आणखी कोणी असते असे बहुधा अनुराव यांना सुचवायचे आहे.

पण त्यांचे काँट्रिब्युशन निगेटिव आहे असे का म्हणतायत ते कळत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आगरकर,कर्वे यांनी मुलींसाठी पहिला शाळा कधी सुरू केली ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आगरकर कर्वे हे प्लेसहोल्डर आहेत. सावित्रीबाईंनी शाळा नसती काढली तर क्ष किंवा य यांनी काढली असती.

एकोणीसाव्या शतकात सावित्रीबाईंनी (पहिली) शाळा काढली हे कार्य थोरच. पण ती त्यांनी एकोणीसाव्या शतकात काढली नसती तर विसाव्या शतकाच्या अखेरीस अनु राव यांना शिकायला मिळाले नसते ही लिंक बरोबर नाही असं त्या म्हणत असाव्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कोमल मानकर विचारतात: "आगरकर,कर्वे यांनी मुलींसाठी पहिला शाळा कधी सुरू केली ?"

असले अडाणी प्रश्न विचारून आपले हसे करून घेण्याऐवजी प्रथम अधिक वाचन करून सामान्यज्ञान वाढवा, जेणेकरून तुमचे असामान्य अज्ञान कमी होईल. त्यानंतरच ex cathedra लेख पाडायला हाती घ्या,

आगरकर आणि कर्वे मुलींच्या शिक्षणासाठी ख्यातनाम नव्हते. आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये भाग घेऊन शिक्षणाचे कार्य केले. त्याबरोबरच ते सुधारणावादाचे मोठे पुरस्कर्ते होते. कर्वे ह्यांचे कार्य सर्वप्रथम विधवा स्त्रियांची दु:स्थिति निवारण्याचे कार्य हाती घेतले आणि त्यासाठी हिंगण्याला आश्रम काढून विधवांचे शिक्षण, त्यांचे पुनर्विवाह असे कार्य केले. कर्व्यांच्या संस्थेने नंतर गावोगावी मुलींच्या शाळाहि काढल्या पण ते कर्व्यांचे पहिले कार्य नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याहीपुढे, स्त्रियांसाठी सुधारकांनी ज्या गोष्टी केल्या, त्यात रधों कुठे येतात? तेही कर्वेच. त्यांनी शाळा चालवली नाही (समाजाची 'शाळा घेतली' म्हणता येईल). संततीनियमनासंदर्भात त्यांनी जे विचार मांडले ते आज 'अच्छे दिन'प्रेमी आणि बहुतेकांनाच सहन होणाऱ्यातले आहेत का!

कोमल, लिहिण्याआधी चिकार वाचा. आडवं-तिडवं वाचा. अगदी फ्लेक्सबोर्डांपासून पुरस्कारप्राप्त पुस्तकं आणि व्हॉट्सॅप फॉरवर्डपासून सापडतील ती सगळी वृत्तपत्रं वाचा. मग लिहायचं काय, याबद्दल विचार करा. त्यानंतर लिहा. आणि लिहिलेलं सगळं प्रकाशित करण्याची काहीही आवश्यकता नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असे नवोदितांना हतोत्साह करून काय साधते ब्रे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्राह्मणांमधे मुलींना शिकवण्याची पद्द्धत फुलेंच्या बऱ्याच आधीपासुन होती. शिक्षण म्हणजे त्याकाळी जे काही बेसिक असेल ते. मिशनऱि शाळा मुलिंसाठी पूर्वी पासुनच होत्या. बंगाल/मुंबई/दिल्ली मधे मुली शिकत होत्याच. आनंदीबाई जोशी शिकल्या ते काही फुलेंनी शाळा काढल्या म्हणुन नाही. ब्राह्मण मुलींचे शिक्षण काळानुरुप होतच होते, आणि काळानुरुप ते वाढणारच होते. कमीतकमी माझ्या बाबतित फुलेंचे काही काँट्रिब्युशन नाही..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्राह्मणांमधे मुलींना शिकवण्याची पद्द्धत फुलेंच्या बऱ्याच आधीपासुन होती. शिक्षण म्हणजे त्याकाळी जे काही बेसिक असेल ते.

याचा काही पुरावा आहे का ?

----

मिशनऱि शाळा मुलिंसाठी पूर्वी पासुनच होत्या.

सावीत्रीदेवींच्या आधीपासून ????

---

बंगाल/मुंबई/दिल्ली मधे मुली शिकत होत्याच.

पुरावा ?

---

आनंदीबाई जोशी शिकल्या ते काही फुलेंनी शाळा काढल्या म्हणुन नाही.

आनंदीबाई जोशींचा जन्म १८६५ चा. कल्याणमधे. त्यांचे पति आधी कल्याणमधे होते, नंतर अलिबाग ला गेले व नंतर कलकत्त्याला.
सावित्रीदेवींनी १८४८ मधे शाळा काढली. पुण्यात. त्यावरून वादंग पण झालं होतं.

१८४८ मधे काढलेल्या शाळेचा कोणताही परिणाम १८६५ नंतर दिसत नाही ??????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलींना घरातच वाचणे आणि लिहीणे शिकवले जायचे आणि थोडिफार आकडेमोड सुद्धा. तेंव्हाच्या शाळेत पण इतकेच शिकवायचे.

मिशनरी शाळा आधीपासुन अस्तीत्वात होत्या. बंगाल मधे मुली शिकत होत्या. तूच पुरावे शोध. मला खात्री आहे.
आनंदी बाईंचा जन्म कधी झाला ह्याचा काय संबंध? फुलेंनी शाळा काढली नसती तरी त्यांचे शिक्षण झाले च असते.

हे म्हणजे नाना नवले नी कॉलेज काढले म्हणुन पुण्यातली मुल इंजिनिअर व्हायला लागली असे म्हणण्या सारखे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आनंदी बाईंचा जन्म कधी झाला ह्याचा काय संबंध? फुलेंनी शाळा काढली नसती तरी त्यांचे शिक्षण झाले च असते.
हे म्हणजे नाना नवले नी कॉलेज काढले म्हणुन पुण्यातली मुल इंजिनिअर व्हायला लागली असे म्हणण्या सारखे आहे.

मी वर दिलेला प्रतिसाद हा सॉलिड आर्ग्युमेंट होते असे नाही.
पण सावित्रीदेवींच्या कार्याचा कोणताही परिणाम झाला नाही हे न पटण्याजोगे आहे.

This is even worse than imposing extra taxes on rich. You are directly denying incentives for good behavior.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण सावित्रीदेवींच्या कार्याचा कोणताही परिणाम झाला नाही हे न पटण्याजोगे आहे.

माझी कॉमेंट निट वाचलीस का?
माझी कॉमेंट फक्त ब्राह्मण मुलींबाबत होती. बाकी त्यांच्या "कार्या"चा काय परीणाम झाला ह्यात मला इंटरेस्ट नाही...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...त्यांच्याही बऱ्याच अगोदरच्या काळात, मिसेस आनंदीबाई रघुनाथराव भट या मारे विलायतेत जाऊन डॉक्टरकीची पदवी घेण्याइतक्या शिकल्या नसतीलही कदाचित, परंतु 'ध'चा 'मा' करता येण्याइतपत जुजबी लिहिण्यावाचण्यापुरते तर त्यांचे शिक्षण निश्चितच झाले असावे. (चूभूद्याघ्या.)

बाकी, आनंदीबाई जोशी अमेरिकेत जाऊन डॉक्टरकी शिकल्या खऱ्या, पण शिकून परत आल्यावर तुमच्या (नि आमच्यासुद्धा) त्याच ब्राह्मण समाजाने त्यांना जिवे मारलेनीत. (आधी वाळीत टाकले, आणि मग आजारी पडून मरू घातल्या होत्या, तेव्हा औषधसुद्धा द्यायला नकार दिलेनीत. हं, आता गब्बर म्हणेल, की बरोबरच आहे, प्रत्येक मर्चंटास एखाद्या गिऱ्हाइकास न विकण्याचा अधिकार असलाच पाहिजे म्हणून, पण गब्बरचे सोडा. तसाही इथे तो मुद्दा नाही.) मग मुद्दा असा आहे, की आनंदीबाई विलायतेत डॉक्टरकी शिकल्या, यात आपल्या बायकांना 'शिकवणाऱ्या'/शिकू 'देणाऱ्या' तुमच्या (नि आमच्यासुद्धा) त्या ब्राह्मण समाजाचे कसले कौतुक सांगता?

हं, सावित्रीबाईंच्या कार्याचा तुम्हाला व्यक्तिशः थेट फायदा झाला किंवा नाही, हा वेगळा मुद्दा असू शकतो, पण...

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूर्तिभंजक तोडेला है.
तुमची मतं खूप जबरदस्त, आणि आजकालच्या जगात फार धाडसीच अशी आहेत. कोमलताई वगैरे लोक त्यांचे विरोधक कुठेही असले तरी स्वत: मनुस्मृतीतून कधीच बाहेर पडणार नाहीत, इतकं मात्र नक्की आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

जय बजरंग बली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू तर लक्ष्मी चा भक्त ना गब्बु?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तू तर लक्ष्मी चा भक्त ना गब्बु?

आमचा बुद्धीभेद करायचा बेत आहे की धागा काश्मिर ला न्यायचा बेत आहे ???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसे काहीच नाही. फक्त निष्ठा बदलल्या आहेत का ते माहिती करुन घ्यायचे होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी लक्ष्मीभक्त नसून लक्ष्मीला गब्बरभक्त करण्याचा मानस आहे.

जब तक तेरे पैर चलेंगे इसकी सास चलेगी ....तेरे पैर रुके....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

स्त्रीने लहानपणी पिण्याच्या छत्राखाली रहावे

हे खरे वादळ !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती

मनुने तर स्त्रीला चक्क शुद्रात मोडले

चक्क शुद्रात म्हणजे???... शूद्र असणे कमीपणाचे आहे काय? समस्त मांग समाजातर्फे या वाक्याचा निषेध!! Sad

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो शुद्र असणे कमी पणाचे आहे कारण शुद्रांना वेद वाचता येत नाही .ब्राम्हणानावर शुद्रांची सावली पण पडायला नको असे मनुस्मृतीत आहे .शुद्र म्हणजे सर्वांत खालचा वर्गाचा ब्राम्हाचा तोंडातून ब्राम्हणाचा जन्म झाला आणि पायातून शुद्राचा असे मनू सांगतो मनु म्हणजे भृग ऋषी (सुमती भागर्व)ज्याने मनुस्मृती लिहिली ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

एक प्रश्ण पडला आहे, कि वेद हे वाचत असत कि पठण करित असत? जाणकारन्च्या उत्तराच्या प्रतिक्शेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग रेडा नेमका कोण? म्हशींचा नवरा की ब्राम्हण?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

कोमल ताई , तुम्ही हा प्रतिसाद सिरियसली लिहीला आहेत असे समजून हा प्रतिसाद देत आहे . हा शूद्रांबद्दल लिहिलेला विचार अत्यंत हिणकस आहे. कोण मनू , कसले वेद न वाचण्याचा अधिकार , कुठल्या जगात आणि कुठल्या शतकात जगत आहात आपण ? असल्या सरंजामशाही आणि पुराणमतवादी विचारांचा निषेध !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'डीडीएलजे इन नटशेल' दारू आणि दाण्यांबरोबर गिळता येईल; पण सरंजामशाही आणि पुराणमतवादी विचार निषेधार्हच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण सरंजामशाही आणि पुराणमतवादी विचार निषेधार्हच.

अदिती हे नाव पुराणातले आहे किंवा कसे ??
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते आमच्या शेजारच्या आजीला परलोकात जाऊन सांग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'न अर्हति' ह्याचे दोन अर्थ होतील. दोन्हीमध्ये ध्वनित नकार आहे पण एकापेक्षा दुसऱ्यामध्ये तो नकार जास्त कडक आहे.

एक अर्थ म्हणजे 'आवश्यकता नाही - does not need'. दुसरा 'पात्र नाही - does not deserve'. मनूकडे त्या काळच्या समाजाचे चित्रण करणारा म्हणून पाहिले तर पहिला अर्थ वापरला पाहिजे. मनूला धोपटायचे असेल आणि स्त्रियांवरील अन्यायाचा तो एकमेव author होता असे प्रतिपादन करायचे असेल तर दुसरा अर्थ वापरावा, पहिल्याकडे ढुंकूनहि पाहू नये.

मनूच्या काळात भारतीय समाज आजच्याइतका प्रगत आणि उदार नव्हता हे उघड आहे. हे दुष्ट-ब्राह्मणी इ,इ. दुर्गुणांनी युक्त भारतीय संस्कृतीतच होते असे नाही तर जगभर असेच स्त्रियांना अनुदार वाटणारे विचार समाजधुरीण स्त्रियांवर लादत होते. इस्लाममध्ये जित समजातील स्त्रिया आणि मुलांना गुलाम करून विकणे संमत होते. गुलामाच्या मालकाला आपल्या गुलाम स्त्रीचा लैंगिक वापर करण्याची पूर्ण मुभा होती. अनैतिक लैंगिक संबंध ठेवणार्‍या स्त्रीला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा होती. पैगंबरकालीन इस्लामचे राज्य जगावर लादू पाहणारे ISIS चे लोक हे आज प्रत्यक्षात आणून दाखवीत आहेत. मोझेसच्या कायद्याप्रमाणे अनैतिक लैंगिक संबंध ठेवणार्‍या स्त्रीला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा होती. मनूला स्त्रियांच्या नीच स्थितीचे कारण ठरवायचे असेल तर दुसरा अर्थ - does not deserve - वापरून ते करता येते.

पण मनूने अशाहि काही गोष्टी म्हणून ठेवल्या आहेत की तो स्त्रियांचा आदर करतांना दिसतो. उदाहरणार्थ पुढील दोन श्लोक वानगीदाखल पहा:

पितृभिर्भ्रातृभिश्चैता: पतिभिर्देवरैस्तथा ।
पूज्या भूषयितव्याश्च बहुकल्याणमीप्सुभि: ॥ ३.५४
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: ॥३.५५

स्वत:चे कल्याण इच्छिणार्‍या पिता, बन्धु, पति आणि देवर ह्यांनी त्यांना (स्त्रियांना) पूज्य मानावे आणि त्यांना भूषवावे. जेथे नारींची (स्त्रियांची) पूजा होते तेथे देवता आनन्दी असतात. जेथे अशी पूजा होत नाही तेथे सर्व कार्य निष्फल आहे.

तेव्हा ’न स्त्री: स्वातन्त्र्यमर्हति’मधील ’अर्हति’ चा 'does not need' असा अर्थ लावायचा असेल तर मनूच्या लेखनाकडे अधिक उदारपणे पाहता येते - तो केवळ समाजाची तत्कालीन स्थिति दाखवीत होता असे म्हणता येते.

अर्थात आजच्या विचाराने पाहिले तर स्त्रियांना हे सक्तीचे देवपण आणि देव्हार्‍यात बंद होणे मान्यच नाही तेहि ठीक आहे. फक्ता त्यासाठी येताजाता मनूला शिवीगाळ करण्याची गरज नाही इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या सगळ्यापलीकडेही, आजच्या परिस्थितीबद्दल हजारो वर्षं जुन्या कोणालातरी धोपटणं म्हणजे स्वतःची प्रतारणा करण्यासारखं वाटतं. आपण सज्ञान झाल्यावरही, आपल्या अपयशाचं खापर आई-वडलांवर फोडणं, किंवा वाडवडलांनी संपत्ती ठेवली नाही म्हणून आपण हलाखीत असण्याची तक्रार करणं, यासारखंच.

शिवाय, आजची सामाजिक परिस्थिती सगळी व्यवस्थित आहे; असंही सुचवलं जातं. ते तर आणखी घातक वाटतं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या सगळ्यापलीकडेही, आजच्या परिस्थितीबद्दल हजारो वर्षं जुन्या कोणालातरी धोपटणं म्हणजे स्वतःची प्रतारणा करण्यासारखं वाटतं. आपण सज्ञान झाल्यावरही, आपल्या अपयशाचं खापर आई-वडलांवर फोडणं, किंवा वाडवडलांनी संपत्ती ठेवली नाही म्हणून आपण हलाखीत असण्याची तक्रार करणं, यासारखंच.

जोरदार सहमती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजच्या परिस्थितीबद्दल हजारो वर्षं जुन्या कोणालातरी धोपटणं म्हणजे स्वतःची प्रतारणा करण्यासारखं वाटतं.

सहमत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

प्रत्येक वाक्याशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
उन्हातान्हात राहतो कूल, नाव माझं डेडपूल

धागा लेखिकेस अजून सीमा बुवा यांची ओळख झालेली दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सीमा बुवा

या वि आ बुवा यांच्या नातेवाईक आहेत काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

असू शकतील. (हे विश्वचि माझे घर....)

त्या फ्रेंच असल्याचे समजते. त्यांच्या स्पेलिंगात अजून बरीच अक्षरे आहेत पण फ्रेंचमध्ये बरीच अक्षरे गाळून उच्चार करण्याची पद्धत आहे असेही कळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लिहिण्याआधी चिकार वाचा. आडवं-तिडवं वाचा.

आणि त्यानंतर ऐसीवरच्या विचारवंतांना चावा, अगदी आडवं-तिडवं चावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती

त्यानंतर नाही त्याअगोदरच चावा. गरीब बिचारे नवोदित पाहून ऐसीवरचे प्रस्थापित लोक्स इतके का चेकाळलेत ते कळेना. इतकी एक्साईटमेंट? ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धागा १०० कडे दौडतो आहे म्हणजे त्यात काहीतरी provocative नक्कीच आहे.
एक गोष्ट स्पष्ट दिसते धागाकर्ती आणि बहुसंख्य प्रतिसादकर्ते हे वेगवेगळ्या जगातले आहेत. वेगळ्या wavelength वरही आहेत.
शुद्धलेखनाचा. मुद्दाच घेऊ. विदर्भातील मुले मराठी कमी हिंदी जास्त अश्या वातावरणात वाढतात सदाशिव पेठी प्रमाण भाषे चे संदर्भ वापरून त्यांच्या मराठीचे मूल्यमापन काहीसे अन्यायकारक वाटते.. टंकनाची सवय नसल्याने सुद्धा दोष राहू शकतात.. आजची पुण्या-मुंबईची मराठी प्रमाण मानली तर ज्ञानेश्वरांच्या भाषेत सुद्धा दोष निघू शकतात (फक्त राजा नागडा म्हणायचे आपल्याला धाडस नसते)
इतके असून धागाकर्तीची तळमळ जाणवत राहते. पुराण कालीन व्यक्ती निमित्ताला वापरून त्यांनी जे दु:ख मांडायचा प्रयत्न केलाय ते मुक्ती साठी धडपडणाऱ्या पहिल्या पिढी च्या मुलीचे आहे. ऐसी वरील बहुतेक सदस्य किमान दुसरया, कदाचित तिसऱ्या मुक्त पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा परिसर देखील अमेरिका किंवा असेच प्रगत राष्ट्र असण्याची शक्यता जास्त..
को. मा. ची real time स्थिती समजून घेण्याची इच्छा असेल तर ऐसी च्या सदस्यांना थोडा परकाया प्रवेश करणे आवश्यक आहे. ज्या अडचणी त्यांनी केवळ योग्य ठिकाणी जन्म घेतल्याने सहज पार केल्या किंबहुना त्या त्यांच्या साठी अस्तित्वातच नव्हत्या त्या आजही भारतात बहुसंख्य मुलीना कुजवत असतात.
नाहीतर याचा अर्थ काय लावाल? ....मंदिरे बांधण्या च्या मुद्द्या वर अजूनही भारतात निवडणुका लढवल्या जातात. कधी कधी जिंकल्या ही जातात. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करणाऱ्यांना क्रांतिकारक समजले जाते. पंतप्रधान रावण दहनाला उपस्थित राहतात मुख्यमंत्री सह पत्नी विठ्ठल पूजा करता. वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मंदिरे बांधण्या च्या मुद्द्या वर अजूनही भारतात निवडणुका लढवल्या जातात. कधी कधी जिंकल्या ही जातात.

मंदिराच्या मुद्द्यात कोणताही अप्रकट सेन्स असूच शकत नाही (किंवा असलाच तर लोकानुनयीच असतो व हिमनगाचा जो भाग दिसत नाही तो अस्तित्वात नसतोच) या गृहितकाला सलाम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संस्थळ मराठी आहे, तेव्हा किमान हिंदीत लिहिल्यासारखे विभक्तीप्रत्यय शब्दापासून लांब ठेवू नका, अशी विनंती. ही विनंतीच.

हेच वाक्य हिंदाळलेल्या पद्धतीनुसार, विभक्तीप्रत्यय तोडून लिहायचं असल्यास -
संस्थळ मराठी आहे, तेव्हा किमान हिंदी त लिहिल्या सारखे विभक्ती प्रत्यय शब्दा पासून लांब ठेवू नका, अशी विनंती. ही विनंतीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.