मला कळलेला पुरुष

मला कळलेला पुरूष ...

माणूस कितीही शिकला ,ज्ञानाची कक्षा कितीही रूंदावली आणि विज्ञानानं अफाट प्रगती केली असली तरी स्वतः ला माणूस म्हणून घ्यायला आपण लायक आहोत का ? स्त्री किंवा पुरूष म्हणून जन्माला येणे प्रकृती पण विचाराला प्रगतशील करताना उडणारी ताराबळ ही विकृती.सुरक्षततेची 'चिलखतं' इथंच येते वाट्याला ..
आपल्या समाजमान्य ह्या देशात पुरूषालाच सर्वश्रेष्ट स्थान दिले आहे .आपल्या डोळ्यावर हजारो वर्षाच्या परंपरांचा चष्मा असतो.हा चष्मा म्हणजे एवढा दैनदिन सवयीचा अविभाज्य भाग होतो.तो काढून बाजुला सरसावतो म्हटलं तरी डोळ्यासमोर अंधारी व मेंदूला झिणझिण्या येतात .आणि तोच चष्मा चढवत परत माणूस आपल्या वाटेने चालता होतो .ती वाट चुकीची जरी असली तरी समाजमान्य असते माणूसही त्या वाटेने भरकटत जातो .
बाईपणाच हळव सादरिकरण आणि पुरुषपणाचा रूबाब ह्याची सळमिसळीत बेरीज केली तर स्त्री च्या वाट्याला टांगलेली बंधनाची सीमारेखा ओलांडत मला कळलेला पुरूष सांगन जरा अवघडच आहे .
एखादी घटना म्हणा की घटक त्या कडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोण वेगळा असू शकतो .बहुतेक स्त्रीया म्हणतील सर्व पुरूष सारखे असतात .ह्याचा प्रतिशोध घेण्याचा मी प्रयत्न केला.हाताची पाचही बोटे सारखी नसतात .तसेच सर्व पुरूष सारखे असने अशक्य आहे सर्वाचा स्वभाव दोष भिन्न असू शकतो कारण व्यक्ती तितक्या प्रकृति भिन्न भिन्न असतात .
एकदा काय झाले लोकलचा प्रवास करीत असताना दोन भिन्नरूपी पुरूषी स्वभाव मला एकाच घटनेत कळून गेले .रात्रीची वेळ आठ वाजले होते .बाहेर भयाण काळोख रातकिड्याची वरदळ रेल्वेच्या डब्ब्यात मात्र कचाड गर्दी उभ रहायला जागा नको .कुठेतरी एका शिटवर जागा मिळाली दाटुनचेपून बसता आले .डब्ब्यात एका माणसाने बसल्या ठिकाणावरून उठवून आपल्या बायकोला दाराजवळ नेले.आणि जोरजोराने तिच्यावर ओरडने चालू केले .त्या बाईजवळ नुकतच जन्मलेलं आठ दहा दिवसाच तान्हुलं बाळ होतं तो तिचा पती त्या बाळाला हिसकावून घेत होता आणि ती त्याच्याकडे बाळाला देण्यास नकार देत होती .जोर जबरदस्तीने त्या मुलीला तिच्या बाबाने आईजवळून ओढले .सर्व लोक डब्ब्यातले तमाशा बघत होते .मी बाजुच्या मैत्रीनीला म्हटलं सर्व पुरूष सारखेच असतात गं .समोर बसलेल्या तरूणाना ते ऐकायला गेले .त्या मुलीचे बाबा तिला डब्ब्याच्या बाहेर आईजवळून हिसकावत फेकणारच तर माझ्या समोर बसलेले दोन तरुन उठले आणि त्या माणसाच्या जवळ जाऊन त्याच्या दोन कानफटात हानल्या आणि त्या मुलीला त्याच्या जवळून सोडवत तिच्या आईच्या स्वाधीन दिले.मग त्या पुरूषाने ही त्या त्या तरूणाची गच्छी पकडली आणि मुलाच्या थोबाडीत मारली .रात्रीच्या भयाण शांततेत रेल्वेच्या डब्ब्यात ते वातावरण म्हणजे तेव्हा वाटायला लागलं की अजून हे भांडण रोद्र रूप धारण करणार हे सर्व डोळ्यादेखत घडत होते .तो माणूस तेवढ्या लोकांमध्ये बायकोला शिव्या द्याला लागला . खिशातून दारूची बोटलं काढली आणि ती बोटल तोंडाला लावत म्हणाला .दोन्ही मुलीनंतर तिसरी मुलगी नको .मी ह्या कारटीले जिवतं ठेवणार नाही पेटवून टाकतो .तो चिडून भांडण करू लागला .त्या तरूणालाही शिव्या शाप घालू लागला .तो तरूण त्या माणसाला समजवतो तर तो त्यांच्यावर हात उगाळतो .बायकोला म्हणतो मला तुला आता नादंवायचे नाही तु माझ्या घरी पाय नको ठेऊ शिव्या देत तिथून एक गाव येते तो मधातच उतरतो .ती बाईमात्र मुलीला ह्रदयाशी कवटाळून त्या तरूणाचे पाय पकडून रडू लागते ....हे विदारक सत्य जेवढं वास्तविक आणि सत्य असलं तरी तेवढचं भयाण वाटतं .दोन पुरूष त्या दिवशी मला नक्कीच कळून गेले हा प्रसंग आजही माझ्या डोळ्या समोर आवासून उभा राहातो .एक पुरूष पोटच्या मुलीला रेल्वेच्या डब्ब्या बाहेर फेकायला निघालेला आणि दुसरा ज्याचा त्यांच्या सोबत तिळमात्र ही संबंध नाही .तरी एका तान्हुल्या स्त्री जीवाला वाचविणारा ज्याच्या मुळे खुप मोठा अनर्थ तर ठळला पण त्या मुलीला जीवनदान ही मिळाले .
कधी कधी अनेक स्त्रीया नवर्याच्या बाबतीत दुश्ने लादून मोकळ्या होतात .त्यांच्या अब्रूची लत्करे वेशीवर टांगून समाजात पुरूषाला बदनाम करतात ते किती नालायक आहेत हे सांगतात .स्त्री जवळ अश्रु नावाच एक शस्त्र आहे ती आपल्या ह्या शस्त्राने घायाळ करते .पुरूषाला रडतादेखील येत नाही .कायदाही स्त्रीच्याच बाजूने .
मला मात्र पुरूषाचे जेवढे वाईट त्या पेक्षा जास्त चांगलेही अनुभव आले .कुठल्याही प्रवासाला निघताना तुम्ही आपल्याच शहरात सात च्या नंतर घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तर एक जोखिम स्विकारून स्वतंत्र पणे चालताना मनात भिती असतेच त्या वाटेवर झडप घालणार्यांची टोळी शिकारीचा शोध घेत चवताळलेली पिसाट मनोवृत्ती रस्त्याच्या कडेने कुठेतरी शोध घेत असते ही भीती जरी मनात असली तरी वास्तविकता आहे .कारण दिल्ली पासून गल्ली पर्यत हेच वावटळ आहे ह्याला नाकरताही येत नाही .जीवनाच्या प्रवासात वावरताना वाईटवृत्तीच्या काटेरी कुपंनात जेवढी पुरूषाची वाघनखे रूतंतात तेवढीच प्रेमाची ऊब ही मिळते .फक्त मनात एक गोष्ट सारखी सलत असते की स्त्रीने प्रत्येकच पुरूषाला सारखे कधीच समजू नये .कारण जसे तिने अनेक नाते स्वच्छंद रितीने स्वीकारले तसेच पुरूषानेही .पतीचा प्रेमळ स्पर्श ,घरात रूबाब दाखवणारा धाकात ठेवणारा पण सतत आपुलकीने बहीणीला जीव लावणारा तो भाऊच असतो .वडीलाची तर मुलीवर आतोनात माया .भाच्ची ला मुलीसारखा जपणारा मामा ,काका,चांदोमामाच्या गोष्टी सांगणारे आजोबा आता काही पुरूषांनी ह्या नात्याला कंलकीत केले म्हणून सर्वच पुरुष सारखे झाले असे मला नाही वाटतं ...
मला कळलेला पुरुष एका अभिमान शुन्य आणि भावनासंपन्न जगात वावरतो .त्यांच्या मनात स्त्री बद्दल आदर आहे मातेचे ह्रदयात प्रत्येक स्त्री बद्दल स्थान आहे .तो मनुवादी विचाराचा धिक्कार करतो .फुले ,शाहू,डॉ.बाबासाहेब आबेंडकर ह्याच्या विचाराला जपणारा पुरूष मानुसकीच्या गर्दीत मी रेंगाळताना पाहिला .
एकटी स्त्री जायदाद म्हणून नाही जिम्मेदारी म्हणून तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोण ह्या पुरूषी स्वभावात ही आहे .गळून पडलेल्या पिकल्या पानासारखी वासना त्यांच्या मनातून लुप्त झालेली आहे .पुरुषी स्वभावाचा एक अनोखा असा प्रसंग आजही पुरूषा बद्दलचे फसवे मत इतराचे नाहीसे करतो ...
जवळ जवळ चार वाजले होते तरी काळोख मध्य रात्री सारखा पसरलेला . कॉलेजचे पावसाळ्यातले दिवस होते .वाहानाचा काही ठाव ठिकाना नव्हता एक वँन समोर येऊन उभी राहीली मी जरा भावून गेली .कॉलेज चे प्रेन्सिपल दिसले ते म्हणाले बेटा तुला कुठे जायचे आहे बर्डीला जायचे असेल तर बस्स .खुप मुसळधार पाऊस आहे .मी म्हटल," सर थँक्यु मला बर्डीच्या मागेच उतरायचे आहे" . वँन मध्ये मागच्या शिटवर एकटीच बसली मी.छान वाटले मनाला कॉलेजच्या विद्यार्थियांबद्दल सरांना एवढी तरी आपुलकी आहे नाही तर कुठे आजकाल वँन मध्ये बसुन जाणारे प्रन्सिपल स्टुडन्ट कडे बघन पण अशक्य जाते त्यांना सरांबद्दलचा आदर आणखीच वाढला मनात . एक रेडियो मध्ये वाजत असणारी गझल माझ्या कानी पडत राहिली .
अज्ञात तीर्थयात्रा ..
आभाळ गुढ वरती..
मागे वळून बघाला..
डोळे तुडूंब भरती..
काही खरे न येथे..
हि रात्र सत्य आहे..
बाजार बाहुल्यांचा..
आभास फक्त आहे..
आभास फक्त आहे..
ही गझल मी मन एकटवत ऐकत होती .कधी हॉस्टेल आले कळलेच नाही .मी सरांना गाडी थांबवायला सांगितली .उतरून रस्त्याने चालू लागली तरी ती गझल मनातून जाईना .आणि तेव्हा ही एक पुरूषी स्वभाव मला कळून गेलेला ..
मनाला कळले भाव माझ्या
मिटलेल्या क्षणभुंगूर पापण्याचे...
मी चालत गेले वाटेने त्या ठस्से उमटवतं
पावलाचे .. कळून गेले मर्म मला तेव्हा
जगण्याचे न कधी संपत राहिलेल्या
स्त्रीने लाछंन लावलेल्या पुरूषी स्वभावाचे...
जाणले तेव्हा मी नसतो हो वाईटपणा सर्वाच्या ठायी
असंख्य अगणिक विचारात दडलेले असते बंध आदरभावाचे.....

- कोमल प्रकाश मानकर
(विजय कॉलनी)सिंन्दी रेल्वे .जि.वर्धा
ईमेल -Mankar123komal@gmail.com

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एकाच वेळी इतके धागे टाकू नयेत ही नम्र विनंती.
- व्यवस्थापन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओके क्षमा असावी.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोमलतै, तुमचे काहि काही धागे कोरे आहेत. त्यात मजकुर भरा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुठे मजकुर भरायचा नाही समजले मला ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किणार्यालगतच्या कातरवेळी भरा असं म्हणायचं असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुठे मजकुर भरायचा नाही समजले मला ...

कुठे मजकूर भरायचा नाही, हे समजणे महत्त्वाचे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हान तेजायला .... जबरदस्त. थेट, काळजातलं, मर्मभेदी लेखन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कित्तीतरी दिवसांनी कोणीतरी पुर्षांना चांगल म्हटलयं ! पुरुष जन्म सफल हो गया !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हहहहहहहहहहहहाहहहहाहा .......पुरूषात काय एवढं वाईटपण आहे समजत नाही निदान त्यातला चांगुलपणा तरी ओळखावा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागे एकदा पांडगांवकर म्हणाले होते,
सकाळभर रेडिओ सिलोन गाणी शिंकरत होता.
गाण्याची एवढी समज असताना, ते असं म्हणाल्याने मी चक्रावलो आणि मला त्यांच्यातल्या एका वेगळ्याच पुरुषाचे दर्शन झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती

प्रतिसाद खुप छान दिला माणसतली हिच दुवे माणुसकी जपून ठेवते बरं का !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फुलष्टॉपच्या आधी स्पेस देणे आणि नंतर न देणे........ ही शैली पूर्वी कुठेतरी पाहिली आहे (मिसळपाववर)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.