हे सारे कसे बदलेल??

अंधश्रद्धा नावाचे अविवेकी वादळ आचारविचाराचे जणू एक वादळ आज समाजात घोंघावतच आहे. जादूटोणा ,देवदेवस्की ,भूत ,भानामती अशी उघड स्वरूपातील अंधश्रद्धा देखील विज्ञान वा शिक्षणाच्या प्रभावाने कमी होताना दिसत नाही .महाराज ,साधू,बाबा,स्वामी ह्यांचा धंदा तर भलताच तेजीत चालताना दिसतो आहे .आपल्या भक्ताचे भौतिक समृद्धि ,पारलौकिक कल्याण ,आध्यात्मिक उन्नती ह्यात भर दिवसेंदिवस पडतोच आहे . नागरी सुविधेवर ह्याचा प्रचंड ताण पडतो श्रद्धेचा भाग समजून सर्वसाधारण लोक ही बुवाबाबाला भक्तीचे एकमेव द्वार त्याच्या चरणावर असते असे समजून त्यांना शरण जातात .
या सार्याविरूद्ध संघर्ष करताना दोन सल्ले सतत निदर्शनास येतात .एक म्हणजे की जागतिकीकरण व खाजगीकरण यांतून प्रचंड अस्थिरता निर्माण झाली .शिक्षण मिळेल ते मिळाले तर नोकरी मिळेल पण ती टिकेल ह्यांची शाश्वती रहालेली नाही .
ह्या अशा परिस्थितीत परस्पर मानवी संबंधही अमानवी झालेत .
आज धर्माच्या नावाने राजकरण करणार्यांच्या शक्तिंचा प्रभाव समाजावर वाढत चालला आहे .लोकांच्या धर्मभावनेचा कच्चा माल वापरून त्याद्वारे मतपेटीतून सत्तेचा पक्का माल या राजकारणी लोकांना बाहेर काढावयाचा आहे . यासाठी लोकांचा ही भावना नैतिकतेऐवजी धर्मांधतेकडे आकर्षित होत आहे . यासाठी ही बाबा लोकांनी कुठे कसर सोडली नाही महाराजांचे वाढते प्राबल्य ,कर्मकांडे ,धर्मसोहळे यांचा उसळतो जल्लोष वेळ खावू परिस्थित ही तेवढाच अंगीकारला आहे .
पूजाअर्चा ,व्रतवैकल्ये यांद्वारे वंचितांना व बहहुसंख्यकांना या देशात कोणतीतरी दैवी शक्ती ,चमत्काराने आपले रक्षण होईल असे वाटते . समाजात क्रांतिकारी स्वरूपाचे राजकीय ,सामाजिक ,आर्थिक बदल होत नाही तेव्हा पर्यत ही परिस्थिति बदलणे शक्य नाही पण हा बदल स्व : विचारातून होणे गरजेचे आहे .
वर्तमानपत्रात येणारे राशिभविष्य हे लोकांना चक्क वेड लावत असते लोक काही नाही पण सर्वात आधी वर्तमानपत्र हातात आल्यावर राशीभविष्य बघतात. स्युडो सायन्सला तर आजकाल जणू काही पंखच फुटलेले आहे .दैवी वास्तुशास्त्र ,फेंग शुई ,गर्भातील संस्कार अशा अनेक बाबीनी त्या क्षेत्रात आपला विळखा घातला आहे . धर्मातील कालबाह्य वर्ते वा रुढि ह्यांची देशात मोठी परंपरा आहे .वटसावित्री सारखी वर्ते शिकली सवरली ही स्त्री नवर्यांच्या अखंड आयुष्यासाठी वटाची पुजा अर्चना करते हे कितीपत योग्य असते . मार्गशीर्ष महिन्यातील वैभव महालक्ष्मी चे व्रत महानगरांपासून ते पार खेड्यापर्यत पसरले.
पर्यावरणाची ऐसी की तैसीतर होतेच पण ह्या व्रताविरोधात कोणीही ब्र उच्चारत नाही .विज्ञानयुगात अशा खुळचट चालीरिती पार पाडणार्यांबद्दल खंत वाटते . देव-दैवीचे फोटो चमत्कार करतात ही चुकीची मनोधारणाही खुप खोलवर रूतून बसलेली आहे .
गणेशविसर्जनाच्या वेळी पाण्यात न विरघळणारे तसेच गंभीर विषारी रासयनिक रंगानी रंगवलेले हजारो टन प्लँस्टर अॉफ पँरिस पाण्यात मिसळल्या जातात.
वृत्तपत्रांत वा विविध चँनेल्सवर जे सतत दाखविले जाते ,त्याला नकळत अधिमान्यता प्राप्त झालेली असते .धार्मिक सोहळे ,प्रचंड गर्दीच्या जत्रा यात्रा ह्या खपाऊ गोष्टीसोबत लक्षावधी लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. डोळसपणे कुणीही ह्यांचा विचार करीत नाही.
आधुनिक आध्यात्मिक बुवाबाजीने सर्वसामान्य जनतेला कसे लुबाडले हे शेवटी निदर्शनास आले ही आधी भक्त बनविने मग पर्मात्मा समजून आपल्या शरणावर भक्तांना जागा देणे .प्रचंड पैशाची लुट प्रचारासाठी स्वतः ची पुस्तके छापने आणिजनातही पाखडाला तेवढी बळी पडते आणि आसाराम ,रामरहिम अशा कितीतरी बलात्कारी बाबांना खतपाणी घालत देव नामाचा त्यांचा सानिध्य्यात राहून जयजयकार करतात. वैज्ञानिक दृष्टिकोण ,शोधक बुद्धि ,सामाजिक सुधारणा मानवतावादी विचार ह्या गोष्टी गेल्या मग खड्यात .
हे सारे कसे बदलेल .कृतीतून की विकृतीतून ??

.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुम्ही नक्की कधी टरफलं उचलणार ते एकदा सांगुन टाका जंतु. तुमच्या आसपास टरफलांचा ढिग जमला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा ना राव, आता पोकलान जेसीबी लावून उचलावी लागतील इतकी टरफले जमलेली आहेत. जन्ता माफ नै करेगी!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते पोकलेन ची पण लै गम्मत बॅट्या. हा एक्स्कॅव्हेटर खरेतर. हैड्रॉलिक आर्मवाला, रणागाड्यासारख्या पट्ट्यावर चालणारा. पण तसल्या सगळ्या मशीन्सना सर्रास पोकलेन म्हणले जाते. सगळ्या बुलडोझर्सना अन बॅकहोलोडर्सना कसे जेसीबी म्हनले जाते तसेच. हिताची पोकलेन असायचे आधी. नंतर टाटा हिताची झाले. आता नुसता ओरिजिनल पोकलेन दिसतही नाही. हिताची, एलएंडटी, सान्सुई, जेसीबी, अशा कंपन्यांच्या एक्स्कॅव्हेटर्सना सर्रास पोकलँड, पोक्लेम, फोकलँड या नावाने संबोधले जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी अभ्या, मी तर पोकलान हाच उच्चार ऐकत ल्हानाचा मोठा झालो (कसं भारी वाटतं नै लिहायला असं)....ते अगोदर जेसीबी आपल्याकडं म्हणत नव्हते तितके. पोकलान अन बुल्डोझर...कर्नाटकात जास्त ऐकले जेसीबीबिसीबी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्रद्धा .. सबुरी बाळगावी.. .
हा त्या शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक वैचारिक व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून सोडून द्यावे .
आणि मुळात शास्त्रज्ञ आणि विवेकवादी हे दोन्ही शब्द समानार्थी नाहीत . शास्त्रज्ञ हे एथिस्ट असायलाच पाहिजेत असे नाही आणि एथिस्ट हे शास्त्रज्ञ असायला पाहिजेत असे नाही .
( असले तर मला आवडेल पण मला वाटून काय होणार ? ते एक फक्त वैयक्तिक मत )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विज्ञानलेखकांच्या एका कार्यशाळेला काही कारणानं हजेरी लावावी लागली

का हो, विज्ञानलेखकांना मार्गदर्शन करणाऱ्यांवर एवढा का राग; तिथे चांगली कॉफी मिळत नाही का? हे कुसळ सोडून भलती मुसळं कसली पाहता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शिरडीला कारने जाणाऱ्या बऱ्याच भाविकांचा अपघात होतो आणि शिरडीच्या ऐवजी तिरडीवर जावे लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला काळा विनोद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याला काही अध्यात्मिक वगैरे कारण नसून आर्थिक आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे काय चाललय!
उगाच लेखिका म्हणेल मी सांगतेय काय अन पोकलेन काय!

# शिरडी आणि पुणेपंढरी विज्ञानवारी.
श्रद्धा/अंधश्रद्धा बदलेल का वाद चर्चा आहे. शिरडीच्या बाबाचे दर्शन हवे म्हणजे हवेच आहे लोकांना. खासगी वाहतूकवाले खोय्राने१ धंधा ओढताहेत तर सरकारी रेल्वेने का बरे मागे राहावे?
ते शिक्षक बांदा/सावंतवाडीहून पुण्याला आले असतील तर तिथून शिरडी जवळच म्हणायची.

*१ ( मिनि पोकलेन पुर्वी न्हाणीतले मोरीतले तुंबलेले काढायला वापरत ते छोटे फावडे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता लेखिका काय म्हणेल ते अस्यूम करून अचरटबाबा आपलेच घोडे दामटवू ऱ्हायले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरं ह्रायलं. आमचं काळं घोडं मागे घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर नवोदिताच्या प्रथम ( किंवा द्वितीय/ तृतीय ) पदार्पणातल्या धाग्याने प्रतिसादांचे शतक गाठावे ही गिनेस बुकात नोंद होण्याजोगी घटना आहे. सबब आनंदोत्सव ऊर्फ पार्टी बनती है.
हा प्रतिसाद ९९वा असावा बहुतेक.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर नवोदिताच्या प्रथम ( किंवा द्वितीय/ तृतीय ) पदार्पणातल्या धाग्याने प्रतिसादांचे शतक गाठावे ही गिनेस बुकात नोंद होण्याजोगी घटना आहे.

पैकी बहुतांश प्रतिसाद हे धाग्याच्या मूळ विषयाशी पूर्णतः असंबद्ध आहेत, ही बाब (गिनेस बुकात) विशेष उल्लेखनीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिसळपाव वर लोक्स गाण्याच्या भेंड्या खेळतात ! इकडे तर प्रतिसादांचा महाभोंडला चालू आहे ! एकंदरीत ऐसीकर प्रतिष्ठेला जागलेत तर Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इकडे तर प्रतिसादांचा महाभोंडला चालू आहे

खिरापत वाटल्याशिवाय तो थांबणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने