कवितेच्या अनुवादा संदर्भात एक प्रश्नावली तयार केली आहे. काव्यप्रेमी तसेच अनुवाद प्रेमी लोकांना विनंती आणि आवाहन !

बोलेसुआव लेशमीयान हा विसाव्या शतकातला एक फार मोठा पोलिश कवी. गूढ , निसर्ग प्रतिमांनी युक्त अशी त्याची कविता आहे. मराठी कवींशी तुलना करायची झाल्यास त्याची कविता कधी ग्रेस यांच्या कवितेजवळ जाते ; खासकरून मृत्यू सारखा विषय असेल तर , आणि निसर्ग आणि मनुष्य यांच्या अंतरसंबंधाचा शोध घेताना तिची जातकुळी (माझ्यामते ) किंचित आरती प्रभूंच्या कवितेकडे झुकते. आणि इथेच मला एक अनुवादक म्हणून असं वाटतं, किंवा म्हणायचं आहे, की मूळ कवितेची जातकुळी , तिची शब्दकळा समजून घेऊन ज्या भाषेत तिचा अनुवाद करायचा आहे, त्या भाषेत उपलब्ध असलेल्या शब्दकळे च्या जवळ जाता आलं तर कदाचित वाचकाला अनुवादित कविता 'आपली' वाटू शकेल. म्हणूनच अनुवादित कवितेचं ग्रहण वाचक नक्की कसा करतो हे बैजवार जाणून घेण्याची गरज आहे. या प्रश्नमाले चं स्वरूप उत्तरांचे नुसते पर्याय निवडा असं नाही. किंचित विस्ताराने उत्तरं लिहावी लागतील. त्याबद्दल क्षमस्व आणि अनेक आभार देखील.
Link to Questionnaire:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe0XbzsmyIX9K3Ai1b07eKplV4duV1s...

Link to Translation: https://we.tl/Sc473Rw7wG

सर्व ऐसीकरांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा !

धन्यवाद,
सर्वसंचारी
( संपादक मंडळ : ही प्रश्नावली कवितेच्या संदर्भात असल्यानेच केवळ कवितेच्या सेक्शन मध्ये टाकली आहे. इथे ती टाकणं योग्य नसेल तर दुसरा पर्याय सुचवावा )

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचायची कुठे? त्याशिवाय फॉर्म मधल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर...
(आली आली, pdf download होतेय)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो