योगा फॉर सेल

मुक्त अन् निधर्मी
श्वासावर त्यांनी
त्यांचे ब्रँडनेम्स
कोरून
सुरु केलं
मार्केटिंग,
अन्
भरू लागल्या शाळा
'श्वास घेण्याच्या'

नागड्या शिक्षकांच्या
महागड्या टुशन्स,
In म्हटल्यावर श्वास आंत,
Out म्हटल्यावर श्वास बाहेर,
कोर्स संपला
(फी जमा)

वायफळ
कॉक्रोच कवायती
'क्रिया' झाल्या
अन् 'योग'
जुळून आला

'नॉर्मल' श्वासाला
(अॅबनॉर्मली)
हिंसक करून
रविशंकर गुरुजींनी
स्पिरीचुअल मार्केटिंगचं
'सुदर्शन' फिरवलं,
अन् जगण्याचेही
वर्ग सुरु झाले
अगदी 'बेसिक'
पासून 'अॅडव्हान्स' पर्यंत

मिस्टिक गेटअप
मधल्या जग्गी दादांनी
(स्वयं नामांकित)
सदगुरू बनून
इनर-इंजिनियरिंगची
ब्रँच काढली
अन् योगाला
भलतीच
दिशा (ईशा)
दिली

ब्रह्मचारी पतंजलीला
रामदेव मास्तरांनी
उत्पादनक्षम
बनवून 'उद्योगी'
केलं,
अन् 'योगविद्या'
प्रसाराआड
किराणा भुसार झाली

अवघडून गुंडाळलेल्या
कुंडलिनीचा
(काल्पनिक) गुंता
'सहज' पणे
सोडवून निर्मला बाई
'देवी' झाल्या

रजनीश मास्तरांनी
श्वासाला 'सक्रिय'
करून मनाला
(थकल्यानंतर)
'निष्क्रिय' करण्याची
'डायनॅमिक'
पद्धती शोधून काढली
अन् शिक्षकांच्या
रांगेतून उठून थेट
'रॉल्स रॉयस' वाले
(रईस)भगवान झाले

महेश गुरुजींनी तर
वेगळीच शक्कल
लढवली
श्वासांच्या माळरानात
'मंत्र' बीज
पेरून 'TM'ची
शेती फुलवली,
अन् महेश
'महर्षी' झाले

ब्रह्मविद्या साधक संघाचे
मास्तर तर
श्वासातून सुविचाराचे
धडे देऊ लागले
अन्
पॉसिटीव्ह अॅटीटूड
आल्यामुळे विद्यार्थी
नापास असूनही
स्वतःला पास समजू
लागले

आता श्वास
गुदमरायला
लागलेत,
बाजारू
अध्यात्माच्या
कैदेतून
मुक्त होण्यासाठी
तडफडतायेत,
आक्रोश करतायेत,
पण त्यांचा आक्रोशही
यांनी शांत केलाय
'समाधी'चं दिव्य
नांव देऊन!!!

- पंकज पाटील

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अत्यंत उशीरा कळलेले सत्य -
Only things worth chasing are goals, certainly not people.
अध्यात्मिक गुरुंच्या मागे लागू नेयेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0