Making of photo and status : ३. ए सागर कि लहरों!

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://www.aisiakshare.com/node/6241

'फेसाळणार्या लाटा, करी गुदगुल्या पदस्पर्शुनी!!!
माझी मीच राहीना, ऊठे तरंग हृदयी हर्षुनी!!!'
गोव्याच्या समुद्रकिनारी मायलेकी लाटांशी खेळताना.

Making of photo and status :
समुद्र! नुसतं नांव काढलं तरी मनात गोड खळबळ न माजणारी व्यक्ती निराळीच. आपण पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या समुद्राच्या कित्येक सुखद आठवणी आपल्या मनात कोरल्या गेलेल्या असतात. त्या सर्व उचंबळून वर येऊ लागतात. त्या समुद्राच्या किनाऱ्यावर एकामागोमाग येऊन खळकन फुटणाऱ्या लाटा. तो खाऱ्या पाण्याचा अथांग सागर. मनमोहक वाळू आणि शंखशिंपल्यांचा समुद्रकिनारा. किनाऱ्यावरची ओळीने उभी असणारी उंच उंच झाडे. आपल्या सभोवताली घोंगावणारा खारा वारा. लांब दूरवर समुद्राला स्पर्शणारे विस्तीर्ण निळे आकाश. आणि समुद्रात बुडी मारू पहाणारा सुर्यास्ताचा लालबुंद सूर्य. ही सर्व दृश्ये आपल्या मनात रुंजी घालू लागतात. आणि आपसूकच आपली पावले समुद्राकडे धाव घेऊ पहातात. मग कधी मित्रमंडळींबरोबर, तर कधी आपल्या कुटुंबाबरोबर आपण समुदकिनाऱ्याची सहल काढू पहातो.

गोव्याला सुंदर सुंदर समुद्रकिनारे आहेत. आणि प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य आहे. वरील फोटो मीसुद्धा एकेवेळी माझ्या कुटुंबाबरोबर गोव्याला समुद्रकिनारी सहलीकरिता गेलेलो असताना काढलेला आहे. आपण समुद्रकिनारी फिरतो आहोत, आणि आपण आपल्या पायाचा पाण्याला स्पर्श करणार नाही, असे होणे नाही. मी आणि मायलेकी समुद्राच्या किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटा पाहून मोहून गेलो होतो. बदलण्यास कपडे आणले नव्हते, निदान गुढघ्याभर पाण्यात तरी जाऊ म्हणून चपला काढून हातात घेतल्या आणि आम्ही तिघे पाण्यात शिरलो.

लाटांचा थंडगार स्पर्श पायांना झाल्याबरोबर अंगात एक गोड शिरशिरी उठली. पाण्याने आमच्या पायांना वेढा टाकला. लाटा पायांना स्पर्शून परत जाताना आमच्या पावलांखालची वाळू सरसर काढून घेत होत्या. त्याने आमच्या पावलांना गोड गुदगुल्या होत होत्या. मागे गेलेल्या लाटा पुन्हा पुन्हा आमच्याकडे झेपावत होत्या. लाटा आणि पायाखाली सरकणार्या वाळूचा हा खेळ निरंतर चालू होता. मायलेकी भावविभोर होऊ लागल्या. आणि आपसूकच त्यांचे मन गाऊ लागले. 'फेसाळणार्या लाटा, करी गुदगुल्या पदस्पर्शुनी!!! माझी मीच राहीना, ऊठे तरंग हृदयी हर्षुनी!!!'

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हो ना, समुद्र म्हणले की अंगावर अशा शिरशिऱ्या येता ना की जशा श्रावणाच्या आगमनाने भारद्वाजाच्या अंगावरची पिसे अन पिसे थरथरतात. भारद्वाजाचा तो तांबडा, तपकीरी गर्द वेल्वेटी कोट, रस्त्यावर ओतण्यासाठी वितळवलेल्या डांबराचा काळेपणा फिक्का पडावा इतकी काळीभोर चोच आठवत राहाते. अगदी सेम त्याच कॉम्बीनेशनचे ट्युनिक घातलेली प्रियंका चोप्रा काय दिसते. अलगद तिच्या ट्युनिकवरुन नजर जाते तिच्या समुद्राची गूढता अन निळाई भरुन राहिलेल्या डोळ्यांकडे. बेवॉच मध्ये असतोच समुद्र तिच्यासोबत. समंदरमे नहाके औरभी नमकीन होतात लोक्स. मग ही गोड शिरशिरी अन समुद्राचा खारेपणा मिळून बनते ब्रिटानिया फिफ्टी फिफ्टी. थोडा नमकीन, थोडा मीठा. आयुष्याचे असेच असते ना थोडेसे? मनाच्या वाळूवर कोरले गेलेले सारेच कायम राहाते असे नव्हे. आठवणींच्या शंखशिंपल्यात साठवून ठेवता येते असेही नाही. काळाच्या लाटांसोबत वाहून जाते, काही उरते, ते असे शब्दरुप घेऊन सांडत जाते. मावळतीचा सूर्य कसा सांडत जातो त्याचे दिवसभराचे तेज. तापलेल्या लोखंडासारखा तो लालबुंद गोळा हळूहळू उतरत जातो त्या गर्द निळ्याशार पाण्यात. भावसर्द झालेले हृदय ना काही बोलते ना काही गाते. ते ट्युनिक, तो भारद्वाज, ती प्रियंका, तो सूर्य, ते बेवॉच अन शेवटी साऱ्यांना व्यापून उरणारा तो समुद्र.
आह्ह्ह्ह, सारेच कसे बघणीय, वाचनीय, प्रेक्षणीय, हसणीय, रडणीय, खेळणीय, चालणीय. एकूण काय समुद्रच आला की दवणीय,

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भावतरलतेचा आरक्त जर्दा वाचून मन शिंतोडा शिंतोडा झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

गदगदलो. गडगडलो.
फारा दिवसांनी अंमळ हळवा झालो.
(जमलं ब्वाॅ यमकायला!)

सादर दंडवत, अभ्याशेठ!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

और आपके भावसमंदर को. आपल्या भावांच्या मारियाना गर्तेत आणखी काय मौक्तिके दडली असतील. उधळून द्या अशीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

अभ्या तुमच्या स्वभावाला इतकी मनस्वी, हळवी, स्वप्नाळू, आणि कोमल बाजू आहे याची कल्पना नव्हती. आपल्या तरल भाववृत्तीचा अविष्कार मनास स्पर्शून गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मझा आ ग्या. आता परत कधी परफॉर्मन्स?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss

मेलो खपलो वारलो चाबूक सगळे एकदमच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आयुष्याचे असेच असते ना थोडेसे? मनाच्या वाळूवर कोरले गेलेले सारेच कायम राहाते असे नव्हे. आठवणींच्या शंखशिंपल्यात साठवून ठेवता येते असेही नाही. काळाच्या लाटांसोबत वाहून जाते, काही उरते, ते असे शब्दरुप घेऊन सांडत जाते. >>> अगदी ! अगदी !! वाक्य फारच आवडले.

@ अभ्या, प्रतीक्रीयेकरिता धन्यवाद. आपले शब्दांवरचे प्रभुत्व पाहून मी खूपच प्रभावित झालोय.आपण माझे वंदन स्वीकारावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

कसचं कसचं? प्रभुत्व कुठले?
उगी समुद्रातल्या लाटासोबत वाहात आलेली वाळू हाताच्या मुठीत पकडण्यासारखे आहे ते. रेतीचे कण कुणी नगावर मोजतात काय? ब्रासवर आलेल्या रेतीच्या ढिगाऱ्याकडे पाहून कुठे पर्वताची जाणीव होते का? आपल्या शब्दसमुद्रापुढे आमची बकेट फारच तोकडी आहे हो. वंदन कसले करता. मीच शरण आलोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहाहा , अभ्याशेठ , तुम्ही तर साक्षात शब्दप्रभू आहात . किती यथार्थ चित्रण केलेत तुमच्या तरल भावना विश्वाचे ? तुम्ही आणि दवणे सर मला गुरुस्थानी आहात .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लै भारी सिंक्वेरीयमची. त्यानेच एवढी टरकली (फाटली मुद्दाम टाळलं, इथले लोक्स लै डेंजर फाटक्यात लगेच...). त्यामुळं पॅरासिलिंगचा बघुनच आनंद लुटला. पोहता येत नसणं म्हणजे घोर पाप अशी अपराधी भावना मनात घेउन फिरलो आठवडाभर. लाइफ जॅकेट हाताने आवळून धरणारे माझ्यासकट अनेक जण होते. उगीच मासा आला, साप आला, शार्क आला असे कैक प्रश्न मनात येउन त्या पाण्यातही अंगाचं पाणीपाणी झाल्त त्या बनाना रायडिंगच्या वेळी.
पहिल्यांदाच समुद्राच्या पाण्यात मनसोक्त डुंबल्यावर रात्री झोपतानाही पाण्यानं शरीर हिंदाळल्याचा भास होत रहातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

प्रत्येकाचे समुद्राविषयीचे अनुभव अविस्मरणीय होऊन रहातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

चारपाच बकेट पाणी ओतून घेतल्याशिवाय ती खारी शिरशिरी काही जात नाही.
सचिन आणि अभ्या, समजून घेत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ अचरटबाबा, धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...पाणी ओतण्यातून काही वेगळेच संकेत डोळ्यांसमोर चमकून गेले. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या वाळूवर किल्ले बनवले तर चालतील ना?

मुंबईत राहाणाय्रांना समुद्र जवळच. पण पाण्याचे आकर्षण लगेच गेले. वाळूत खेळायची मजा फार वाटायची. गर्दी वाढत चालली तसे आणि वय वाढल्याने तेही गेले. श्रीवर्धन ,रेवदंडा,बोर्डी,अर्नाळा हे किनारे बरे होते त्यांचीही वाट लागली. बोटींच्या तेलाने वाळू काळी झाली किंवा संध्याकाळी भयानक डास. सकाळी नऊ ते पाच प्रचंड ऊन.

बाकी अशा ठिकाणी बरोबर कोण आहे यावरच आनंदाचे बांध फुटतात. ( अभ्या ,यमकाची मालगाडी कुठे साइडींगला अडकली वाटतं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूळ लेख वाचलाच नाही, सगळा दोष ब्रासवर रेती घेऊन सँड कॅसल बनवणाऱ्या अभ्याचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यांचं मन शेवटच्या ओळी नाही गायलं ना? आज ब्लू है पानी पानी पानी गायलं ना? खोऽट्टारडे कुठचे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss

@ १४टॅन, त्यांचं मन शेवटच्या ओळी नाही गायलं ना? >>> हा! हा!! हा!! तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय! लेखाचा क्लायमॅक्स थोडासा चुकलेलाच आहे. त्यांनी मनात काय गायले असावे हे मला कसे कळणार? वास्तविक त्या भावना माझ्या मनात उठल्या होत्या. पण मीच फोटो काढत असल्यामुळे फोटोत मी न येता, त्या दोघीच दिसत होत्या. त्यामुळे त्या ओळी मला त्यांच्या तोंडी घालाव्या लागल्या. मेकिंग लिहिताना मलाही थोडेसे चुकल्यासारखेच होत होते. माफी असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

आपलच बरोबर आहे म्हणून घोडं दामटायच. मेरे मनको भाया टैप लिखाण असावं. लोकापवाद लै लै नानाप्रकारचे असतात. कुणाकुणासाठी बदलत राहणार. मुळात लिहीताना जी भावना, तिव्रता असते, त्यात नंतर सद्सद्विवेकुबुद्धीने घातलेलं मॅनिपुलेशन नकोच.
भाड मे जाव म्हणायचं. हं कधीकधी रोष पत्कारावा लागेल एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

तर दुनियेला फाट्यावर मारायचं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही पकडे हो उदयबाबू. कधीकधी तुम्हाला जे लिखान जवळचं वाटत त्याच्यावर बरेचजण दवणीयतेचा वरवंटा फिरवताना दिसतात. असो, आपापली आवडनिवड असतेच. असायलाच हवी पण लादालादी नको. आवडेल तेच करायचं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

@ टूच्चेश, आधार दिल्याबद्दल धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढील भाग उद्या रविवारी सकाळी ९ वाजता टाकतोय. आपणां सर्वांस आग्रहाचे निमंत्रण आहे. पाहण्या आणि वाचण्यासाठी नक्की या. आणि आपली प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका बरं का!!! :स्मित:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1