Skip to main content

अशांत..

अशांत..

एक दिवस अचानक एकांतात, तिन्हीसांजेच्या वेळी, पेटून उठलो क्षणात.
हृदयातील धड धड थांबते का पाहायला, व्होट्स अप उघडून बसलो, फेसबूक लोगिन केले,
मन काही शांत होईना.
किती आणि कसे कसे विचार मनात येत होते आणि जात होते.
मित्र मैत्रिणींचे प्रोफाईल चालून झाले, मना काय हवय सापडत नव्हते.
शेवटी धडधडत्या हृदयानि पुस्तक घेऊन बसलो, तेही चालून झाले.
मग मात्र धीरच झाला नाही अजून काही करण्याचा.
तडक उठलो आणि निसर्गाला हक मारत घराबाहेर निघून गेलो,
उंच काळपट टेकड्या अंधारात गुडूप होत होत्या, जणू त्याही अस्तित्व गमावत होत्या.
सूर्य पण जणू मला सोडून जाण्याच्या मार्गावर निश्चयी होता.
मी तडक निघालो आणि टेकडी चढू लागलो. धाप लागत होती, पण लवकर जायचे होते.
एकीकडे चंद्र मला दिसत होता आणि जाणवत होते त्याचे माझ्या बरोबर असणे.
शांत शीतल मन मोहून टाकणारा, प्रकाशित पूर्ण गोलाकार, कोणाची तरी आठवण करून देणारा.
शेवटी सूर्य गेलाच लांबूनच वेडावून दाखवत दाखवत.
पण चंद्र होता पूर्ण माझा आणि माझ्याच साठी पूर्ण वेळ.
बरे वाटले कोणीतरी आहे आपल्या साठी पूर्णवेळ.
खूप अनुभवून घेतले त्याला, जणू परत मिळालाच नाही तर.
शेवटी कधीतरी मध्यरात्री जाग आली मला मन शांत-थंड झाल्यावर.