Skip to main content

जरी अज्ञात देशाचा

जरी अज्ञात देशाचा
किनारा गाठला होता
तरी वारा शिडामधला
जरा खंतावला होता

दूरवरचे दिवे तिथले
झळाळून पेटले होते
तरी अंधार हटवादी
जरा रेंगाळला होता

वितळत्या चंद्रबिंबाने
दशदिशा भारल्या होत्या
तरी त्या चांदरातीचा
कवडसा गोठला होता