प्रशासनानाला पर्याय सेनादले!!

तर आपले प्रशासन नालायक आहे हे मानून परळ पुलाचे काम लष्करी अभियांत्रिकी विभागाकडे सोपवले.
याविषयी माझी काही वैयक्तिक मते.

*युद्ध पातळी वर कामे फक्त सेनादले च करू शकतात.

*जर उद्या मुंबईत महापूर आला तर गटार दुरुस्तीचे कामही बिनदिक्कत पणे लष्कराला देऊ.(लढाई होत नाही.लष्कराला दुसरे काम नाही, आणि प्रशासन(सां बा वि. मनपा रेल्वे ई) इतरकाम करण्यात व्यस्त आहेत.

*जे लोक या निर्णयच स्वागत करताहेत तेच उद्या लष्करावर टीका करतील जर, येन तेन कारणाने पूल कमी दर्जाचा निघाला म्हणून. त्यात अभियंता ची चुकी असो नसो

*फक्त राष्ट्रीय सुरक्षा, आपत्कालीन परिस्थिती काळात लष्कराला पाचारण करावे असा संकेत आहे. पूल बांधण्यासाठी इतर हि पर्याय आहेत.

*ज्या अँगल ने लष्कराला मुलकी प्रशासनासाठी पर्याय म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं आहे त्याच अँगल ने जर भ्रष्ट सरकार ला पाडण्यासाठी लष्करने बंड केले तरी चालेल का?(भारतात असा इतिहास नाही पण शेजारी आहे).

लेखक अंतर्गत सुरक्षा व सेनादले विषयी तज्ञ नसून तुमच्यासारखा एक सामान्य brainwash झालेला नागरिक आहेm>

field_vote: 
0
No votes yet

बाकी काही नाही, पण प्रशासनाला नाना म्हटल्यामुळे मौज वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

(प्रशासनाचे)

शत्रू देखील म्हणती, एक तेवढे नाना
बाकी सब करिती .... दनाना
तनन तनन धीम तनन देरेना
एक तेचि नाना

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नानानेही फेरीवाला प्रकर्णात त्यांच्या बाजुने उडी घेतली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाचा विषयाला धरून- कोणत्याही पुलाचे अथवा वस्तुचे एक सहनशिलता माप असतेच. सैन्यदलाने बांधले म्हणजे अगदी शेवटचे असे नसतेच. सैन्य, हलकी वाहने, रणगाडे जाण्यासाठी वेगळीच भक्कमता अपेक्षित असते. सैन्यदलाला एक कवायत म्हणूनही काम दिले नसेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस काही नाही.अजून किती तरी ब्रिटीश कालीन पूल जिवंत आहेत बघा. फरक एवढाच आहे कि लष्कर काम करेल तेव्हा टाळूवरचे लोणी खाणारे उपाशी राहतील बस्स!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लश्करातल्या खरेदीवर भ्रष्टाचारांचे किस्से भारतात नाहीतच. ते उगाच विरोधी पक्षांची आरडाओरड असते. हिंदुजा/बोफोर्स प्रकर्णात मिळणारे कमिशन हे अधिकृत होते असा निर्णय झाला ना? ती देशसेवाच होती. म्हणजे त्यात कुणी पैसे खाल्ले नाहीत. चला सैन्यदलास काम दिले की खाबुगिरी नसते हा मुद्दा मान्य. सैन्यदलाचे काम भक्कम होते हा दुसरा मुद्दा असेल.

तिसरा मुद्दा - कोणताही रेल्वेचा दादर / इतर भक्कम रूंद पूल घ्या. जर का कोणी बॅामची ओरड केली तर चेंगराचेंगरी/ धावपळ होणार नाही का? जिथे गर्दी क्षमतेबाहेर होते तिथे धोका असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नुसते प्रशासन नालायक नाही. आपण सगळेही आहोत. कारण, आपल्यातलीच माणसे प्रशासनात आहेत, मग ते राज्यकर्ते असोत वा प्रशासकीय खोगीरभरती. आणि लष्कराने बांधला तरी त्यावर फेरीवाले गर्दी करणारच, कारण, अन्नासाठी धडपड करणे, हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे-इति नाना!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

आपल्याबद्दल आदर आहे. पुढील दोन चार ओळी निव्वळ ह्या प्रतिसादापुरत्याच आहेत.
तुम्ही जे लिहिलत ते सतत ऐकवलं जाणारं आर्ग्युमेण्ट आहे. त्यात व्हिक्टिम ब्लेमिंग आहे. बळी गेलेल्याची लायकी बळी जायचीच असल्याची भूमिका आहे. कुठंही जालिय चर्चा, वाद-विवाद प्रोग्राम्स ,टॉक शो, टिव्हिवरचे कंठाळी कारेक्रम ह्या सगळ्यात हा मुद्दा डोकावत असतो. मागे ऐसीकर ऋषिकेश ह्याची सही सुद्धा ह्याच छापाची होती. .... ह्यात एक निगरगट्टपणा आहे. नकळतपणे आलेला मठ्ठपणा आणि खुनशी बेमुर्वत, बेजबाबदार मुजोरी आहे.
एखाद्या गावात बर्रेच चोर आहेत असं समजू. त्या गावाची प्रसिद्धीच पंचक्रोशित "चोरांचं गाव" अशी आहे. पण म्हणून ते आख्खं गाव पेटवलं कुणी ...
त्यातल्या सर्वच रहिवाशांसमवेत.....तर "बरं झालं मेले चोर" असं म्हणता येतं का?
.
"आपण सगळेच चोर आहोत" असं जेव्हा एखादा माणुस म्हणतो, तेव्हा त्यात दोन क्लॉजेस असतात --
१. मी चोर आहे (ही त्यानं त्याच्या पापाची दिलेली कबुली आहे)
२. तुम्ही हरेकजण...प्रत्येकजण चोर आहात.(हा त्याचा शुद्ध तर्क, अंदाज असतो. त्याला हरेकाबद्दल हरेक माहिती कुठाय? खुशाल आपलं त्यानं ते ठोकून दिलेलं असतं.)
बहुसंख्य चोर दरोडेखोर सतत हे इतकं ऐकवत असतात की हळूहळू कित्येक सज्जनही ते खरं माणु लागतात. आणि "आपण सगळेच चोर आहोत" असं म्हणु लागतात.
.
तुम्ही दिशाभूल झालेले सज्जन असण्याची फार शक्यता आहे.
.
"आपण सारेच जबाबदार आहोत" असं म्हणताना त्या सगळ्यात मी नाही. प्लीझ. मला वगळा.... इतर सगळे असतील जबाबदार. आणि हे नेहमीच ऱ्हेटोरिक बंद करा. अदिती, रा घा , चिं ज , अनु राव , अजो , बॅट्या , गब्बर , अबापट ,नंदन, अचरट, शुचि ह्यांनी अजुन नाकारलेलं नाहिये. त्यामुळे ते असू शकतील जबाबदार. मला ठाउक नाही. तुम्ही स्वत: आहात; हे तुम्हीच मान्य केलत. मी नाहिये.
.
प्रतिसाद नेमका मला लिहिता आला नाहिये. परतून अधिक नीट लिहितोय मला काय म्हणायचय ते.
.
आप्पा भाउ अण्णा दादा वगैरे पदव्या घेतलेले कुर्ता पायजामा घालून सामान्यांना ठेचून ठोकून काढणारे भडवे लोकंही "तुम्हीच निवडुन दिलत. तुम्हीच जिम्मेदार " म्हणतात; आणि अनिर्बंध बडावत, शोषत राहतात. समोरच्याला पार हतबल करतात. इतकं की सतो समोरच्यावर रागवायच्या ऐवजी स्वत:वरच रागावतो स्वत:वर होणाऱ्या अन्यायाबद्दल. ही शुद्ध दिशाभूल आहे. "तुम्हीच आम्हाला निवडुन देता" हे चूक आहे.
तसं असेल तर ज्यांनी ज्यांनी त्या व्यक्तिला मत टाकलय त्याच्या घरी जाउन ह्यानं त्यांचं शोषण करावं. मी ज्याला मत टाकलं नाही, त्यानं माझं शोषान करु नये. मी त्याला निवडुन दिलेलं नाहिये.
.
पुन्हा सांगतो --प्रतिसाद नेमका मला लिहिता आला नाहिये. परतून अधिक नीट लिहितोय मला काय म्हणायचय ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबाच्या प्रतिसादाच्या गाभ्याला तीव्र विरोध नोंदवतो. व्हिक्टीम ला ब्लेम कधीच करायचं नाही हे सुद्धा चूक आहे.

नदीशेजारी जे घर बांधतात त्यांचे घर जर नदीला आलेल्या पूरात वाहून गेले तर त्यांना ब्लेम करायचे नाही ???? का बरं ?????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नदीवरून आठवलं. महाड-रायगड मधील जो पूल वाहून गेलेला तो सरकारी विभागनीच बांधला. विक्रमी कमी वेळेत. गडकरी-मुख्यमंत्री गेलेले उद्घाटन करयला! बघू परळ उद्घाटन करायला कोण येतंय ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण सारे अर्जुन - हातात गांडीव धनुष्य असून महावीर असून कधीकधी घाबरतो,हातपाय कापू लागतात.*१ अन्याया/लबाडीविरुद्ध आवाज उठवत नाही असंच काही नसतं. शंभरातल्या आपणच सारे गुन्हेगार या विचाराने चाललेल्या एखाद्यांत कधी मी नाही तसा असा आवाज करायची इच्छा होते आणि तो उभा राहतो.
माझंच एक उदाहरण आहे पण मनोबाचा मुद्दा इथे प्रतिसादापुरताच आहे म्हणून अवांत लिहित नाही.

*१ या रोगावर अर्जुनारिष्ट नावाचे औषध आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"आपण सगळेच असे आहोत" म्हण्णं चीड आणणारं आहे.
पुढील संवाद त्याच सुरात वाचा --
.
समजा एखाद्या शहरात चोरांचा,दरोडेखोरांचा प्रचंड सुळसुळाट झालाय. लोक कावलेत, वैतागलेत.
तेव्हा पोलिसांकडे गेल्यावर तक्रारदाराला हे ऐकवण्यात येतं --
"आपण चोरी करणं थांबवुया, जग खुप सुंदर बनेल्"
"आपण सारेच चोर आहोत बरे"
किंवा चुकून दरोडेखोरास धरलच, तर तो म्हणतो --
"कोण चोर नाही ह्या जगात? मी काय वेगळं करतोय."
अरे??? "जग सुंदर बनेल " म्हंजे काय? मी चोरी केली नाही, तरी माझ्या घरात चोरी होणार नाही, ह्याची ग्यारण्टी देता का?
बेधडक ब्लँकेट / स्वीपिंग स्टेटमेण्ट कसं काय देता "सगळेच चोर आहेत्" म्हणून.
खुप खुप जण असतील चोर. पण मी नाहिये. चोर नसलेले नक्की किती लोक आहेत, अगदि थोडे आहेत का भरपूर आहेत, मला नक्की ठाउक नाही. पण मी नक्कीच भल्या माणसांपैकी आहे.
.
इतर गुन्ह्यांच्या संदर्भात असेच काही संवाद --
एखाद्या हुंडाबळी गेलेल्या स्त्रीच्या घरच्यांना...तिच्या बहिणीला किंवा भावाला जर पुढील संवाद ऐकावा लागला, हुंड्यासाठी बळी घेणाऱ्यांकडून तर?

"आपण बायकोला मारणं थांबवुया, जग खुप सुंदर होइल."
"तुम्ही तुमच्या बायकोला मारणं थांबवा. सगळं ऑपॉप नीट होइल. तुमची गेलेली मुलगी/बहिण ऑपॉप जिवंत होइल!"
"आपण सारेच बायकांना मारतो. जिवंत जाळतो. त्यात काय एवढं?"
.

" गुन्हे/भ्रष्टाचार थांबवायचा नामी उपाय! गुन्हे न करणं "
आँ? आय शप्पथ हो. ढेकुण मारायला घाबरतो मी. सर्व कायदे पाळतो. ते पाळण्याच्या नादात अगदि चमत्कारिक वाटेल असं वागतो. इतकं असुन माझ्या घरी डाका पडला, तर तुम्ही हेच्च म्हण्णार "आपण सगळेच गुन्हे करणं थांबवु. गुन्हे होणारच नैत."
एक उदाहरण घेउ. एका शहरातल्या काही लोकांनी कधीच चोरी दरोडेखोरी केलेली नाही. काही जण असेही आहेत की पुर्वी करत आता त्यांनी थांबवलय.
पण काही लोक गुन्हे करणंथांबवत नाहित. ते इतरांना सतत त्रास देतात. आणी गुन्हेगार स्वत: तोच डायलॉग ऐकवतात.("आपण सारेच....")
किंवा अगदि पोलिस, जुडिशिअरी वगैरे यंत्रणा ... ज्यांनी हे सगळं आवरायला हवं.... त्या यंत्रणाही हेच ऐकवतात.
"आपण सारे..."
ओ हेलो हेलो. तुम्ही भडवे असाल, बलात्कारी असाल, चोर दरोडेखोर असाल. मला ठौक नाही."आपण सारेच आहोत" असं म्हणत ब्लँकेट/स्वीपिंग स्टॅटमेण्ट देउ नकात प्लीझ. यंत्रणेतली माणसं तुमच्यासारखी असतिल. माझ्यासारखी नाहित. अन्यथा यंत्रणा ह्यापेक्षा बर्रीच चांगली असली असती.
.
.
अजून एक उदाहरण --
"सिगारेट फुंकणं थांबवलत तर जगातल्या कोणत्याही धुराचा तुम्हाला त्रास होणार नाही!"
अर्रे? मी फुकत नाहिये. पण बाजुचे लोक फुंकताहेत. त्याचा त्रास होतोय. मी शंखही करायचा नाहिये का?
मुळात हे जे काय चाल्लय ते चुकीचं आहे, हेच मुळात अमान्य केलं जातय का?
समोरच्याला निश्क्रिय ,प्रतिकारविहीन व्हिक्टिम/बळी करण्याचा एक जबरदस्त उपाय आहे असली तर्कटं.
आणि मग स्वत: कित्येक व्हिक्टिमच इतर अनेक व्हिक्टिमचा/बळींचा बुद्धीभ्रम करतात.
जे होतय तेच स्वाबहविक आहे असं ठसवतात.(आणि नकळतपणे तेच न्याय्य आहे असं ठसवलं जातं)
.
.
अजून एक नेहमीच्या चर्चेतलं उदाहरण घेउ सोशल फोरम्सवर किंवा इतरत्र गप्पा होत असताना येणारं --
"पथारीवाल्यांकडून काही पुस्तक/कपडे घेउ नका, हाच उपाय. पोलिसांची गरजच काय्"
अरे?? आय शप्पथ हो. मी खर्र्च पुस्तकं/वस्तू घेत नाही हो तिथुन.
पण लोकं घेतात. आणि त्यांच्या घेण्यामुळे फुटपाथ शिल्लक उरत नाही.
माझा कित्येकदा बळी जातो. अपघात होतो. तोंड फुटतं. फ्रॅक्चर होतं. मुकामार बसतो.
आणि वर हे ऐकावं लागतं --"आपण्च आहोत जबाबदार. आपणच त्यांच्याकडून वस्तु घेतो."
नाही हो. मी नाही घेत त्यांच्याकडून.
.
मी दारु पीत नाही. दारु पिउन गाडी चालवत नाही. पण मला येउन कुणी धडकुन ठेचुन चिरडुन निघुन जतो तेव्हाही हेच मुजोर तर्कटं मांडले जातात
"आपण दारु पिउन , झिंगुन गाडी चालवणं बंद करुत. आपण सारेच जिम्मेदार आहोत"
नाही हो. मी नाहिये जिम्मेदार. तुम्ही तुमच्यावरुन इतरांना ओळखू नकात. तुम्हि जिम्मेदार असाल. मी नाहिये.
.
"टपरीवरुन पोहे-उपमा घेउ नका. हाच जी एस टी भरण्याचा उपाय!"
पुन्हा तेच. मी फुटपाथवरुन नाहि घेत पदार्थ. तुम्ही घेता. तुमच्यामुळे प्रॉब्लेम आहे.
.
.
"शांततेच्या मार्गाला लागलेल्या देशाला लष्कराची गरजच काय ? तुम्ही हल्ला केला नाहित तर तुमच्यावर हल्ला कोण करणार ? "
येडा झाला का? ह्यावर कै बोलायची तरी गरज आहे का?
.
भारतातली परिस्थिती भयंकर आहे.(पहिलेपासुनच होती. २०१४ पूर्वीही होती. ) लोकशाहीच्या नावाखाली झुंडशाही सुरु आहे. एखाद्या गोष्टीला झुंडिचं समर्थन असलं की "लोकांची मागणी" आहे असं म्हटलं जातं. आणि "लोकांची मागणी" म्हटलं की ती "न्याय्य्" आहे की नै हे कुणी बघत नै. पुन्हा बुद्धीभेद अक्रणार्यांचे स्लीपर सेल समोरच्याला अगदिच गलितगात्र करुन टाकतात त्याच्या इच्छाशक्तीवर, विवेकावर नामी,हुकमी हल्ला करतात "आपण सारेच असे आहोत. आपणच निवडून दिलय" वगैरे म्हणतात. नाही. मी निवडून दिलेलं नाही. मी बऱ्यापैकी नेक माणूस असलेल्या अरुण भाटिया आणि तत्सम सत्प्रवृत्त आणि पूर्वी चांगली कामगिरी दाखवलेल्या लोकांना निवडुन द्यायचा अयशस्वी प्रयत्न करतो दरवेळी. आता अरुण भाटिया कोण , ते माहित नसेल तर सोडुन द्या. त्यामुळे निवडुन देणाऱ्यात मी नाही."लोकांनी निवडून दिलय" ह्याचा अर्थ "लोकातल्या एका सब सेट नं निवडुन दिअल्य्" हे तुम्ही विसरताय. आणि ह्याहून मुख्य म्हंजे ह्यांना मीच निवडून दिलय असं ग्रुहित धरलं तरी त्यांना अनिर्बंध अधिकार नाहित. हवं तिथं वरवंटा फिरवण्याचा ह्यांना अधिकार नाही. झुंडी घेउन तो साध्य केला जातो. ह्यांना आवरणारी यंत्रणा कोलमडुन पडलेली असते. आणि त्या स्थितीला योग्य ठरवणारे लोक असलं कैतरी चमत्कारिक नैतिक अधिष्ठान देउ बघतात "आपल्यातुनच हे लोक येतात" असं म्हणत.

.
.
होय. धुरामुळे, स्मोकिंगमुळे माझा जीव चालला आहे. पण हे अनिर्बंध पॅसिव्ह स्मोकिंग मुळे होतय. तुम्हि सर्वत्र सिगारेट फुंकणारी टोळकी आहत. तुमच्यामुळं माझा जीव जातोय. माझ्या स्मोकिंग्मुळं नाही तुमच्या गाड्या ह्या प्रदुषणाच्या नॉर्म्सचे पालन करत नाहित. त्यामुळे माझा जीव जातोय.
"सगळ्यंची चुक़ आहे. सगळ्यांचा जीव जातोय" असं म्हण्णं चुक आहे.
"काही लोकांच्या चुकीमुळं सगळ्यांचा जीव जातोय्" हे सत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"काही लोकांच्या चुकीमुळं सगळ्यांचा जीव जातोय्" हे सत्य आहे.

तुझा टायपॉ झालाय मनोबा, हे वाक्य असे पाहिजे.

बहुसंख्य ( जवळजवळ सगळ्या )लोकांच्या चुकांमुळे त्याच बहुसंख्य लोकांमधील काही लोकांचा जीव जातोय.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मान्य. ( पण "काही" बऱ्यापैकी भले लोक आहेत त्यांची वाट लागतेय म्हणून शंख करतोय. )
परफेक्ट दुरुस्ती सुचवलेली आहेस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण "काही" बऱ्यापैकी भले लोक आहेत त्यांची वाट लागतेय म्हणून शंख करतोय.

तुला अशी खात्री आहे का मनोबा की जे त्या पुलावर मेले त्यातले काही लोकतरी "बऱ्यापैकी" भले होते. भले म्हणजे अश्या ( ह्या स्पेसिफिक नाही तर एकुणात ) प्रकारच्या दुर्व्यवस्थेला दुरुनही जबाबदार नसणारे?
त्यातल्या किती लोकांनी उमेदवाराचे चारित्र्य बघुन मतदान केले होते? त्यातले किती लोक ऑफिसमधे नेमुन दिलेले काम इमानदारीने करतात? दुर्घटनेतल्या किती लोकांनी रस्त्यावरच्या फेरीवाल्याकडुन भाज्या आणि वडापाव घेण्याचे निग्रहाने टाळले होते? असे अनेक प्रश्न...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यातल्या किती लोकांनी उमेदवाराचे चारित्र्य बघुन मतदान केले होते?

हे तुझ्या आवडत्या हाम्रिकेत सुद्धा होत नाही हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुणात्मक खुप फरक आहे गब्बु. दुसरे म्हणजे हाम्रिकेत सरकार किती गुंतलेले आहे अश्या गोष्टीत?

दुसरे म्हणजे

समज जर हाम्रिकेत पण होत नसेल तर तिथेही माणसे मरतीलच ( किंवा मरतातच आहेत ).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी त्या दिवशी ठाणे स्टेशनवर पुलावर मोबाइलचा चार्जर घेतला. तो घेऊन मी पुढे गेलो.
.
.
.
.
.
..
.
.
..
.
.
.
.
पुढे दोन तीन फेरीवाले काय काय विकत बसले होते. माझं टाळकंच फिरलं. मी म्हणालो "हे फेरीवाले इथे बसून प्रवाशांना अडचण करतात ते या अधिकाऱ्यांना दिसत नाही काय? हप्ते खातात भ*वे !!"

वैसे वो चार्जर १५० रुपयेमें मिला. दुकान से लेता तो कम से कम २५० रुपये लग जाते. १०० रुपये बच गये. दुकान वाले लुटतात साले !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे सगळे Tragedy of the commons च्या आसपास जातेय का ?

का मला बिनपिये चढलिये ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस काही नसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

मी वाटच पाहात होतो पहिल्यांदा कोण हे म्हणतंय याची....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी च्या अकाउंट वरून कॉमेंट केली असती तरी चालले असतं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेवढ्यासाठी लॅपटाॅप कुठे सुरू करणार! म्हणून लष्करी लगबगीनं फोनवरून प्रतिसाद देऊन टाकला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपण या देशांत घडणाऱ्या अनेक घटनांना अप्रत्यक्षपणे जबाबदार असतो. २०१४ साली काहीतरी बदल घडेल या आशेवर आपण (म्हणजे बहुसंख्यांनी) भाजपाला निवडून दिले. आता परिणाम बघितल्यावर, नुसती त्यांच्यावर टीका करुन आपला दोष कसा कमी होतो ? अशा लोकांना आपणच निवडून दिले आहे. आणि तुमच्या टीकेमुळे ते सुधारतील अशी शक्यता नाही. कारण ते जे करतात ते बरोबरच आहे असा त्यांचा दृढ समज आहे. बरं, पुढच्या निवडणुकीत यांना धडा शिकवला आणि पाडलं, तरी जे कोण दुसरे येतील तेही शोषण करणारेच असतील. आता एखाद्या देशात, कुणालाही निवडून दिले तरी अच्छे दिन येणार नसतील, तर त्यातले बहुसंख्य लोकच त्याला जबाबदार आहेत, असे का म्हणू नये ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

उपाय सुचवतो. No representation without taxation - ची घटना दुरुस्ती आणावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राहावलं नाही, पण उंदीर मारणं वगैरे ममव विनोद आठवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरकार एक पूल बांधू शकत नाही म्हणून तो लष्कर कडे दिला.
देश चालवू शकली नाही तर तोपण लष्कराला द्या.
तसेही देशभक्ती म्हणजे बंदूकवाले असे समीकरण आहे. भारतीयांच्या रक्तात.
कमिशन शिवाय सरकारी काम आणि देशसेवा यात काही संबध नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखक अंतर्गत सुरक्षा व सेनादले विषयी तज्ञ नसून तुमच्यासारखा एक सामान्य brainwash झालेला नागरिक आहेm>

हे एक नंबर हो भकु.
नाही तर अश्या लेखाच्या खाली काय वाट्टेल ते लिहिलेलं असतं. मागे नाही का त्या कुणी तरी 'लेखक विवेकवादी अभ्यासक आहेत' का काय तरी असलंच ठोकून दिलं होतं इथेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

जातभाईचा लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0