Making of photo and status : ५. गगनभरारी! | ऐसीअक्षरे

Making of photo and status : ५. गगनभरारी!

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://www.aisiakshare.com/node/6241

तु नि:शंकपणे गगनात भरारी घे पिल्ला. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत..... गोव्याच्या समुद्रकिनार्यावर पॅरासेलींगचा आनंद लुटताना तरुणी.

Making of photo and status :
हा फोटो मी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर काढला होता. फोटोमध्ये आकाशात उंचावर पॅराशूटला लटकलेली दिसते ती माझी मुलगी आहे. खरं तर एका फोटोत सर्व गोष्टींचा अंतर्भाव व्हावा म्हणून मी तो थोडा एडिट केला आहे. डावीकडे समुदकिनारा आणि वाळूवर रमलेली माणसं, उजवीकडे अथांग समुद्र, वरती निळेभोर आकाश आणि त्यावर तरंगणारे कापसासारखे दिसणारे पांढरे ढग. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर दिसणारे पॅराशूट हा मूळ फोटो आहे. त्यामध्ये पॅराग्लायडिंगकरीता सुरक्षिततेची साधने मुलीच्या शरीराला बांधतानाचा दुसरा फोटो इन्सर्ट केला आहे. आणि मग मुलगी आकाशात किती उंचावर गेलेली आहे, हे सांगायला बाण वगैरे दाखवण्याचे त्यावर संस्कार केले आहेत.

पॅराशूटने माझी मुलगी आकाशात अंदाजे पंधरा माळेतरी उंचावर गेली होती. एकुलती एक असूनसुद्धा, धोका पत्करून आम्ही तिला उंच आकाशात विहारण्याचा आनंद लुटण्यास प्रोत्साहन दिले. त्यावरून मला वरील स्टेटस बनवावेसे वाटले, की माझ्या मुली! तू तुझ्या आयुष्यात मोठे होण्याकरिता कितीही मोठे धोके पत्कर. नवीन नवीन आव्हाने स्वीकार. मग भलेही त्यात अपयश आले तरी बेहत्तर, आम्ही आईबाप कायम तुझ्या पाठीशी उभे असणार आहोत याची आम्ही तुला खात्री देतो.

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी गेलो होतो तेंव्हा बघुनच भिती वाटली होती त्यामुळं मी लांबूनच राराम केला होता पॅरासिलिंगला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

@ MindsRiot, प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

"कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही." - व.पु.काळे

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ नंदन, छान वाक्य लिहिलंत. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0