शिंजुकू इंसिडेंट-Shinjuku Incident

आचरटबाबांनी खफवर सिरीया/म्यानमार इ इ देशांतून दुसऱ्या देशात जाणारे निर्वासितांचा विषय काढला आणि दिवाळी अंकातील संकीर्ण सदरात मिलींद यांचं घानातल्या करीमची सातवी चूक हे ही वाचण्यात आलं होतं. म्हणून यावर आधारीत समीक्षा. निर्वासितांच्या आयुष्यावरचे अनेक चित्रपट अनेक देशांमध्ये आले. त्यातलाच एक चित्रपट हाँगकाँग मधला 'शिंजुकू इंसिडेंट'.
आपल्या निर्वासित मैत्रिणीला भेटण्यासाठी चीन मधुन जपानला गेलेला पुर्वाश्रमीचा ट्रॅक्टर मेकॅनिक नायक आणि त्याच्याबरोबर घडलेले प्रसंग ह्या भोवती सगळा चित्रपट आहे. एका पोलिसाची समुद्र तटावरती हत्या करुन हे निर्वासितांच टोळकं जपानमध्ये प्रवेश करतं. त्यामध्ये नायकही असतो. हातात पडेल ते काम करुन एकदाच मैत्रिणीला भेटायचं असा विचार करुन कचरा साफ करण्याचं काम करत असताना अचानक त्या ठिकाणी पोलिसांची धाड पडते. जो तो वाट दिसेल तिकडे पळत सुटतो. भुयारी गटरातुन पळून जाताना नायक त्यांचा पिच्छा करण्याच्या नादात गटारात वाहून जाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा जीव वाचवतो जो चित्रपटाच्या मध्यात व शेवटी त्याची मदत कराण्याचा प्रयत्न करतो. मैत्रीणीला तिथल्याच कुख्यात गुंडाच्या बायकोच्या रुपात बघून मात्र नायक निराश होउन अवैधरीत्या पैसे कमाउन तिथलेच कागदपत्र काढण्याचा विचार करतो. याचदरम्यान त्याचा सहकारी तिथल्या माफिया टोळीच्या हाती लागतो व त्यात त्याचा गमावतो.
त्याचा बदला घेण्यासाठी व तिथलाच एक माफिया बनण्यासाठी व नंतर त्याच्यावर उलटलेले त्याचे सहकारी. या सगळ्यामध्ये नायक जे काही करतो त्यासाठी चित्रपट पहायला हरकत नाही.
चित्रपटाचं आणखी एक वैशिष्टय असं की ऍक्शन व/वा कॉमेडी चित्रपटाचा बादशहा जॅकी चैन हा या क्राईम ड्रामा जेनरच्या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत आहे.

IMDb रेटिंग: ७.१/१०

टीप: तुम्हाला मी समीक्षा लिहीलेले व/वा इतर चित्रपटांचे हिंदी dubbed version हवे असल्यास व्यनी करणे. जेंव्हा घरी जाईल आणि मूड असेल तेंव्हा नक्कीच लिंक व्यनी करेल. 

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वेळ काढून मला लिंक पाठवा. हिंदी डबडं वर्जन पाठवा.
हो डबडं चं !

अवांतर : प्राईम व्हिडीओवर आहे काय हा चित्रपट ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या प्रवासात आहे, उद्या सकाळी नक्की पाठवेल. फक्त २४ तासच उपलब्ध राहतात या लिंका म्हणून शक्यतो त्याच्या आधीच उतरवून घ्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

व्यनी केलाय, बघा व कळवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

लिंक मिळाली पण डी.ओ.टी. ने ती ब्लॉक केली आहे असा मेसेज येतोय. तरीही धन्यवाद !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

opera mini वरून ट्राय करा. होऊन जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************