प्रवास...फिरणं...बोंबलत फिरणं...

मला प्रवास करायला खुप आवडतं. प्रवासाच्या माझ्या स्वतःच्याच काही ढोबळ व्याख्या आहेत. कामासाठी प्रवास म्हणजे प्रवास. पर्यटन वैगेरे साठी प्रवास म्हणजे फिरणं. टवाळक्या करत फिरणं किंवा रिकाम्या कामांसाठी भटकणं म्हजे बोंबलत फिरणं.
प्रवासात काही गोष्टी मला बघायला फार आवडतात. दुचाकी वरुन फिरताना महामंडळाची बस तिरपी-तिरपी चालताना अंगावर आल्यागत भासते. कारमधून फिरताना सरळ रस्त्यावरही काहीवेळेस असे चढ येतात की त्यानंतर कार आता उडी मारणार असं वाटतं. बस मध्ये बसून फिरताना आपली बस दुसऱ्या बसला ओव्हरटेक करुन गेल्यावर कोण आनंद होतो अन् दुसरी बस आपल्या बसला ओव्हरटेक केल्यावर काय गाडी चलवायलाय, आता बैलगाडी पण आपल्याला ओव्हरटेक करेल असं वाटतं. ट्रेन मधून फिरताना भिकारी वैताग देतात पण त्यापेक्षा जास्त वैताग तृतियपंथी देतात.

दुचाकी सोडून दुसऱ्या वाहनांत फिरताना मला खिडकीजवळची जागा फार आवडते. पण भरभर कानात शिरणाऱ्या वाऱ्याने डोकं उठतं त्यामुळे शक्यतो मी खिडकी बंदच ठेवतो. बसची खिडकी जर माझ्या व पुढच्या वा मागच्या सिटमध्ये कॉमन असेल व त्याने/तिने त्याच्याकडच्या खिडकीसाठी जास्त जागा मारली तर मी सगळी खिडकी त्याच्याबाजूला सगळी मोकळी करुन देतो. एशियाड मध्ये तर एक अस्पष्ट अशी स्पर्धा असते सिटच्या दांड्यावर हात ठेवण्याची ज्याने आधी ठेवला त्याने ठेवला. मला कधीच बस लागत नाही पण बसमधल्या कुणाला लागली तर उगीचच मळमळ व्हायला होतं.

मला कधीच बस/कार/ट्रेन मध्ये झोप येत नाही मग कितीही मोठा प्रवास असो. रात्री बसमध्ये ढाराढूर झोपणाऱ्यांचा मला हेवा वाटतो मग. बसमध्ये उगीचच मोबाईलवर मोठ्याने बोलणाऱ्याचा मोबाईल आदळ्यासरशी खिडकीतून बाहेर पडावा अशी माझी मनोमन खूप इच्छा असते. सनासुदिच्या काळात रुमाल टाकून जागा पकडणारे जर मला जागा मिळाली नाही तर खुप डोक्यात जातात. मग मी सरळ एक छान जागा बघून तिथल्या रुमालाने सिट चकाचक पुसून बसतो आणि भांडायच्या फुल्ल मूडमध्ये येतो. जिथून रुमाल टाकलास तिथून ये मग जागा सोडतो वैगेरे गोळ्या देउन कब्जा करतो. शिवनेरी मधून प्रवास करणं मला खूपच कंटाळवाणं वाटतं. कुणी कुणाला बोलत नाही, आदळे बसत नाहित आणि मी सोडून सगळे हूच्चभूभू सारखे भासायला चालू होतात.

बसमध्ये बायकोचा फोन आल्यावर व लवकर या असं फर्मान असल्यावर प्रत्येक स्टॉपवर जसजशी पुढच्या सिटवर जागा होत जाईल तसतसा मी पुढच्या सिटवर जाउन बसतो आणि लवकर पोहोचण्यासाठी माझ्याच्याने होणारा तेवढाच एक प्रामाणिक प्रयत्न करतो. बसमध्ये प्रवास करताना हेडफोन वर गाणे ऐकण्यासारखं दुसरं सुख नाही असं मला वाटतं. एकदा प्रवासात ब्लुटूथ हेडसेट डिस्चार्ज झाल्यामुळं मी वायर्ड हेडफोनलाच प्राधान्य देतो.

प्रवासात मला खुप कल्पना सुचत राहतात इतक्या की गाडी स्पीड व विचारांची स्पीड ह्यांच सिंक्रोनायझेशन कसं बरं मोजावं असा विचार येतो.
कार/जीप मध्ये प्रवास हा शक्यतो सहकुटूंबच असतो. माझ्या आवडीचे गाणे असलेला पेनड्राईव्ह न चुकता घेतलेला असतो. मला झोप न लागण्याच्या सवयीमुळे रात्री माझी रवानगी समोरच्या सिटवर गाडी चालकाबरोबर गप्पा मरायला असते.

मित्रांबरोबर दुचाकीवर दूरवर फिरताना शक्यतो मीच गाडी चालवण्याचा हट्ट करतो कारणं मागच्या सिटवर बसून ढोपराला मुंग्या येउन बधीरता आल्यागत वाटतं. मी माझ्या दुचाकीचे ०००० पासून ते ००२१,०१००, ७००, ७८६, १०००, ११११, २००० इ.इ. जवळपास मला टिपिकल वाटणाऱ्या सर्व रिडींगचे फोटो काढून जतन करून ठेवले आहेत व अजूनही चालू आहे. मी गेले आठ वर्ष म्हणजे दुचाकी घेतल्यापासून दोन्ही हात सोडून गाडी चालवता येते का ह्याची चाचपणी करतो पण दोन-तीन सेकंदाच्यावर अजूनही मला ते जमलेले नाही. समोरचा दुचाकीस्वार मान तिरपी करुन मोबाईलवर बोलत चाललेला असला की मी तो किर्रर्र होइपर्यंत हॉर्न वाजवत रहातो.

बस/कार/दुचाकी प्रवासात गाडी पंक्चर होणे, पेट्रोल संपणे, गाडी बंद पडणे रात्रीच्यावेळी अप्पर मारुन चालणे व ट्रेनच्या प्रवासात मोठ्ठीच क्रॉसिंग असणे ह्या गोष्टींचा मला फार्फार राग येतो.
कधीकधी सुट्टीच्या दिवशी कुठं जायचं हे निश्चीत नसताना गाडीवर टांग मारुन भटकत फिरणं मला खुप आवडतं. एकंदरीत मला कुठलाही प्रवास करायला खूप आवडतं.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मजा आहे तुमच्या प्रवासाची. प्रवासात भांडण काढायचेच नाही हे तुमच्या उलट. आपण बसलेली गाडी जनता अथवा प्रत्येक स्टेशनाला साइडिंगला पडणार या विचारानेच बसतो. पण तसं न झाल्याने फार आनंद होतो. पब्लिक ट्रानस्पोर्टच आवडतो. कार हायर करणे अजिबात आवडत नाही. खरी प्रायवसी आणि डोसक्याला कोणतीही चिंता नसते ट्रेन/बसमध्ये.
मला बस धार्जिणी आहे. जिथे जायचे असते तीच बस ( रिकामी) सुटण्याची तयारीत असते. ड्राइविंगची अजिबात आवड नसल्याने टु/फोर विलर घेण्याचा प्रश्नच पडला नाही.

लेखन आवडले.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिथे जायचे असते तीच बस ( रिकामी) सुटण्याची तयारीत असते

सो लकी. मला क्वचितच रिकामी बस पावते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

हे खरं तर वैतागातून लिहीलय. काहितरी लिहायचंय ह्याची उर्मी दाटून येते, हात शिवशिवतात. बसतोही लिहायला अन् सगळं ब्लँक होतं. मै हात पे हात धरे हुये बैठ जाता हूं। म्हणून ह्यावेळी जे आठवत गेलं ते लिहीत गेलो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

>म्हणून ह्यावेळी जे आठवत गेलं ते लिहीत गेलो.

माझ्या मते एकदा लिहून झालं की अजून थोडं रंगवण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या लेखनात एक गमतीदार तिरकस विचारांची झाक आहे. उदाहरणार्थ

>बसमध्ये बायकोचा फोन आल्यावर व लवकर या असं फर्मान असल्यावर प्रत्येक स्टॉपवर जसजशी पुढच्या सिटवर जागा होत जाईल तसतसा मी पुढच्या सिटवर जाउन बसतो आणि लवकर पोहोचण्यासाठी माझ्याच्याने होणारा तेवढाच एक प्रामाणिक प्रयत्न करतो.

अशा चक्रम दृष्टिकोनातून जर तुम्ही मांडलेल्या इतर गोष्टींबद्दवही लिहिलंत तर फारच उच्च दर्जाचं विनोदी लिखाण होईल. आत्ता थोडं घाईत लिहिल्यासारखं वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बसमध्ये उगीचच मोबाईलवर मोठ्याने बोलणाऱ्याचा मोबाईल आदळ्यासरशी खिडकीतून बाहेर पडावा अशी माझी मनोमन खूप इच्छा असते.

अत्यंत न्युइसन्स असतात हे लोक. काय म्हणजे रीतभातच नसते कोणाला आपला त्रास होतोय हे यांच्या मद्दड डोक्यात शिरत नाही की तसेच रेटुन वागणं चालू ठेवतात देव जाणे.
.

बसमध्ये बायकोचा फोन आल्यावर व लवकर या असं फर्मान असल्यावर प्रत्येक स्टॉपवर जसजशी पुढच्या सिटवर जागा होत जाईल तसतसा मी पुढच्या सिटवर जाउन बसतो आणि लवकर पोहोचण्यासाठी माझ्याच्याने होणारा तेवढाच एक प्रामाणिक प्रयत्न करतो.

खरच खूप हसले या वाक्यावर. Smile
.

मी तो किर्रर्र होइपर्यंत हॉर्न वाजवत रहातो.

ध्वनीप्रदूषण Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

ध्वनीप्रदूषण

अहो ह्यांना ते स्वतः आणि ते ज्यांच्याशी बोलत असतात हे सोडून काहिच कळत नसतं. भस्सकन कुठेही वळतात, समोरच्याला/मागच्याला बुचकाळ्यात टाकतात. एकदा तर असाच एक जण ट्रॅफिक हवालदाराला बघून सटकण्याच्या नादात माझ्या गाडीसमोरच पडला. त्याच्या चक्करमध्ये मी पडतापडता राहिलो. हे लोकं त्रस्त चेहरा करुन वा डर्टी लूक देउन मोबाईल ठेवतात तेंव्हा मला असुरी आनंद होतो. थोडक्यात ध्वनीप्रदूषण फॉर गुडनेस सेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

mp3 मोबाईल नव्याने बाजारात आले आणि सर्वांना परवडू लागले त्यावेळी बसमध्ये काही टिपिकल गाणी मोठ्याने लावून ऐकत बसणाऱ्यांची एक नवीन जमात उदयाला आलेली. एकावेळी चारचार मोबाईल बसमध्ये वाजत असायचे. शक्यतो मुद्दाम चावट गाणी लावली जायची. यांची फेव्हरेट गाणी आम्ही का म्हणून ऐकावीत हा प्रश्न अनेकदा पडला. "अरे इयरफोन टाकून ऐक ना बाबा " असं ओरडावसं वाटायचं.
माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीस ही सवय होती. त्याच्यासोबत बऱ्याचवेळा एसटीने प्रवास व्हायचा. पण आपला स्वभाव पडला भिडस्त त्यामुळे या माणसाला सांगणार कोण. एकदा असच बसमध्ये 'बघतोय रिक्षावाला' गाणं लावून स्वारी निवांत ऐकत बसलेली असताना शेजारच्या एका मुलीनं गाणं बंद करायला सांगून चांगलंच झापलं. नंतरनंतर मोठ्याने गाणी वाजवू नयेत असा बोर्डच एसटीमध्ये लावल्याने तो प्रकार जवळजवळ बंदच झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रवास करून तिथेकुठे पोहोचण्याची घाई न ठेवता प्रवास करण्यातली गम्मत घेत जाण्यात मजा वाटते. एक सरकता पडदा,नवनवीन कलाकार येतात जातात..
( शुचि'चा बसप्रवास लेख आठवला.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां ते मनात येणारे विचार सलगपणे मांडणारा लेख म्हणताय तुम्ही Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

लिंक द्या की हो मग अचरटबाबा किंवा शुचितै

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

एक मिनिट देते.
________
शोधते आहे.
तोवर माझ्या लेखाहून कितीतरी सरस तसाच संजोपरावांचा लेख वाचा.-
http://aisiakshare.com/node/977

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

हा माझा -
http://aisiakshare.com/node/3369

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

दोन्ही लेख खूपच सुंदर आहेत. एक सन्जोप रावांचा अन् दुसरा वामा१००० यांचा. मला तुमचा लेख पण वाचायला आवडेल (लिंक आली नाही बहुतेक). सन्जोपरावांचे शंभर मिनीटे अप्रतिम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

मारलात ना मोहोळाला दगड Blum 3
माझाच आय डि है त्यो वामा. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

चक्क शुचिमामींनी कबूल केले की

मारलात ना मोहोळाला दगड Blum 3
माझाच आय डि है त्यो वामा. Wink

उद्या रेकार्ड रहावे म्हणून. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तू अजुन उगाळ Wink
वा वा उगाळणे शब्द किती दिवसांनी वापरला. इथे च्यायला सहाणच नाही. जायफळ पूड मिळते खरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

हसावं का रडावं कळना बघा, आता ह्या माशा कुणाकुणाला चावत्यात हे बघणं रोचक ठरेल...rolf

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

ओ लेखक्

वामा म्हणजे शुचि, पण संजोप राव म्हणजे मी नव्हे ( आधीच क्लिअर करुन ठेवते )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन डू आयडी तर कळाले, छान लिहिलंय सन्जोप राव.
पण मी काय म्हणतो असू द्या कि कोण काय म्हणणारे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

हाहाहा तुम्ही खूप विनोदी आहात. खरच. Smile
अनुही वात्रट आहे!!! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

प्रवास करून तिथेकुठे पोहोचण्याची घाई न ठेवता प्रवास करण्यातली गम्मत घेत जाण्यात मजा वाटते.

या बात! अगदी थेट 'पब्लिक ट्रान्स्पोर्ट' मनोभूमिका. एकदा रेल्वे/बसमध्ये बसलं की नियोजित स्थळी कधी पोचणार हे आपल्या हाताबाहेर असतं. मग आपण अस्वस्थ होऊन काय होणार, असा विचार करून निवांतनेस आपोआप येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रेलवेतून एकदाच प्रवास केलेला.. दादर लोकमान्य ते केम्पागौडा बंगळूर, साईड लोवर. प्रत्येक स्थानकावर कोणीतरी बसायला जागा मागायचे.. समवयीन (मुलगी) मुलींशी गप्पा मारायला लय मजा आली. विमानात सर्व (मी सोडून) उच्चभ्रू मुली असतात. मग फ्री वायफाय वर hd मध्ये DL करायचं हा उद्योग..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साइड लोअर - उंची ५-३ च्या वर असल्यास फार त्रास होतो झोपताना. समोरच्या सिटांवर किरकिरी लहान मुलं असली तर तुमचे दुर्दैव. काही मुलं खरंच शांत असतात. उद्यान एक्सप्रेसमध्ये प्रत्येक स्टेशनवर रिझर्व डब्यात लोक घुसतात आणि सरकून बसा रेल्वे काय खरेदी केली काय असा वादही घालतात. प्रत्येक राज्यात काही ट्रेन्स लोकल असतात हे लक्षातच ठेवावे लागते. इगाच मनस्ताप करून घेण्यात अर्थ नसतो. साउथ सेंट्रलच्या ट्रेन्समध्येमात्र टिटिइ'च फार कडक असतात. रिझर्व डबा( सीटिंगवालाही) रिकामा असला तरी कुणा जेनरल टिकिटधारकाचे लाड करत नाहीत. पंधरा रु भरा अन बसा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0