अलीकडे काय पाहिलंत? - ३१

आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.
---

american history X पाहिला. एडवर्ड नॉर्टन काय भारी आहे राव!
विचारांना चालना देणारा सिनेमा. आपल्याकडे एवढं भारी, गुंतागुंतीचं काही बनावं असं वाटतं.

field_vote: 
0
No votes yet

एडवर्ड नॉर्टन काय भारी आहे राव! >> एकच चित्रपट पाहिला आहे त्याचा. Red Dragon. दोघे (एडवर्ड आणि चित्रपट) आवडले. आणि वोल्डीतर आपल्याला आधीपासूनच आवडतो Biggrin

===
विकांताला Eyes wide shut पाहिला. आवडला. असे संथ चित्रपट आवडतात बहुतेक मला (कळतात कितपत माहित नाही ;)). Blow up देखील आवडला होता.

आता हि लिंक आणि त्यातले प्रतिसादपण वाचतेय. Spoilers आहेत https://vigilantcitizen.com/moviesandtv/the-hidden-and-not-so-hidden-mes...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

समाजवाद आणि नंतर
Cuba - nostalgia and change | DW Documentary
42:26
Link:https://youtube.com/watch?v=zA6TWnquOYo

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या मी नेटफ्लिक्सवर 'द राउंड प्लॅनेट' ही बीबीसीची सीरीज बघतो आहे. सिनेमॅटोग्राफी, निसर्ग, प्राणी वगैरे सगळं छानच आहे. पण त्या सगळ्याला खाऊन टाकते ती म्हणजे कॉमेंट्री. निसर्गपटांना अगदी ठाशीव कंटाळवाणी कॉमेंट्री असते. तोच तो संथ माहितीपूर्ण आवाज, तेच ते नवेनवे फॅक्ट्स, त्याच त्या भक्ष्य-भक्षकांच्या, आई-पोरांच्या गोष्टी, आणि मानव कसा निसर्गाचा नायनाट करतो आहे टाइप मल्लिनाथ्या (पूर्वी खूप अंगावर येतील अशा असायच्या, आजकाल ते थोडं कमी झालेलं आहे.)

राउंड प्लॅनेटला चक्क विनोदी कॉमेंट्री आहे. विनोदी म्हणजे सातमजली, खो खो हसू नाही. तर खास ब्रिटिश कोरडा आणि कधीकधी काळा होणारा विनोद. अत्यंत मनोरंजक. नेटफ्लिक्स असेल तर फक्त पाच मिनिटं पाहा, नाही तुम्हाला चटक लागली तर मिशी उतरवून देईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिशी उतरवू नका. आमच्या dwtv च्या चित्रफिती आणि कॅामेंन्ट्रीज पाल्हाळीक नसतातच. सूचक विनोदी आणि उपहास असतो. छोटीछोटी वाक्ये आणि मध्ये अंतर.
इजिप्त,ट्युनिशिया आणि टुर्कस्तानच्या पर्यटनाविषयी
The impact of terrorism on tourism | DW Documentary
42:26
Link:https://youtube.com/watch?v=fyYo6quHZss
हीसुद्धा छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अ लिटल डेथ - अ क्युट मुव्ही, अबाऊट सेक्स.
सिनेमा छःआन आहे. वेगळाच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आबा, मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस पाहिला का? मला आवडला. प्वायरो मस्तं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

प्वायरो मस्तं आहे.
सहमत, पण त्याच्या मिशा, जुन्या पॉयरो सारख्या टोकदार नाहीत, त्यामुळे जरा चुकल्या-चुकल्यासारखे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच लता
बाकी साऱ्या लापता|

बादवे, पॉयरो नव्हे. (प्वायरोही नव्हे.) प्वारो.

(नशीब पॉयरॉट नाही म्हणालात.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

प्वारो >> पवारओ म्हणलं तर चालेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

तुमची मर्जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

मी ट्रेलर पाहिला, आणि त्यातला प्वारो त्याच्या मिशांमुळे, आकारामुळे आणि घनदाट केसांमुळे बेल्जियन डॆंडी न वाटता आर्मीमधला रिटायर्ड कॆप्टन वगैरे वाटतो. खरा जमलेला प्वारो एकच - 'अगाथा क्रिस्तीज प्वारो'मधला डेव्हिड सूशेने साकारलेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही, पण पिल्याण आहे लौकरच पाहायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

विकांताला अवतार बघितला. बरा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

कोको पाहिला. नितांतसुंदर चित्रपट. अतिशय गोळीबंद कथा, जबरदस्त ग्राफिक्स. म्युझिकल या प्रकारात मोडला जातो की नाही कल्पना नाही पण खुप सुंदर गाणी आहेत या चित्रपटात. मेक्सिकन लोकपरंपरा, श्रद्धा- अंधश्रद्धा, तिथली लोकगीतं यांचा कसला परिणामकारक वापर केलाय कथेत. आणि यातली कोको कसली गोड आहे! तिला आणि नायकाला आवाज देणाऱ्यांचे विशेष कौतुक. मी पाहिलेल्या ॲनिमेशन चित्रपटातला सर्वश्रेष्ठ आहे हा. विस्मरण- मरण,आपली परकी माणसं, त्यांच्या अपेक्षा, ध्येय आणि जबाबदाऱ्या यांतील द्वंद्व या सर्वांवर अतिशय गोड पद्धतीने भाष्य करणारा चित्रपट लहानग्यांना नक्की दाखवा. विशेषकरून त्यांच्या आजी- आजोबांबरोबर पाह्यला चित्रपट तर अधिक चांङले होईल.
रडगाणं: आपल्याकडे हे असले कधी होणार? नक्की काय कमी आहे आपल्याकडे? लोककथा नाहीत, संगीतकार नाहीत? पैसा नाही? तंत्र नाही? नक्की काय चुकतंय आपलं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तुम्ही मागच्या वर्षाचा कुबो पाहिला आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही.
मध्यवर्ती कल्पना समान आहे का दोघांत? (A young boy named Kubo must locate a magical suit of armour worn by his late father in order to defeat a vengeful spirit from the past. ह्याच्यावरून वाटतेय तसे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

बराच काळ पेंडिंग राहिलेला 'कोर्ट' हा चित्रपट netflix वर पाहिला आणि अतिशय आवडला. खरं तर या चित्रपटाबद्दल कंटाळवाणा, कॅमेरा अजिबात हलत नाही , ameature दिग्दर्शन असे अनेक आरोप ऐकले होते. खरं तर त्यामुळेच पाहिला नव्हता. पण पाहताना दिग्दर्शन खूप आवडलं. गोष्ट साधी आहे पण दिग्दर्शनामुळे अतिशय फरक पडतो. कॅमेरा स्थिर ठेवणे ही मुद्दाम केलेली गोष्ट आहे कारण त्यामुळे दृश्यात एक आवश्यक तटस्थता आली आहे. प्रत्येक सीन मुख्य घटनेच्या आधी चालू झाला आहे आणि घटना घडून गेल्यावर काही मिनिटे तसाच ठेवून मग बदलला आहे. यातूनही त्या त्या जागेची परिस्थिती अचूकपणे दिसते. हा कोर्टरूम ड्रामा नाही तर समाजावर केलेले भाष्य आहे जे उत्तम आहे . फक्त काही सीन मध्ये अतिरेक वाटतो. म्हणजे समजलं पुढे चला वगैरे. अनावश्यक रिपीटेशन खूप आहे. कोर्टात्ल्या लोकांना खाजगी आयुष्य असू नये का त्यांनी सतत केसचाच विचार करत राहावा का असं ही वाटतं. पण एकंदरीत चित्रपट आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आत्ताच घरी दोन मुस्लिम महिला बुरख्यात आल्या. हळदीकुंकू- करंडा घेऊन. उद्या त्यांच्या घरच्या लग्नाची जाति पूजा आहे त्याचं निमंत्रण दिलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे म्हणजे काय सगळं ? कुंकू करंडा म्हणजे काय ? जाती पूजा म्हणजे काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगाथा नाही जमत. युट्यबवर आहे ओरिएंट. त्याकाळी त्या कादंबय्रा वाचल्या जात असाव्यात दूरच्या प्रवासात,थंडीत घरात वेळ घालवण्यासाठी. लाकडं तरी किती फोडणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोणावळा,वाई इथे आहेत हे मुसलमान. हिंदू इस्लाम दोन्ही थोडेथोडे चालीरिती मिसळ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द गुड वाईफ पाहून संपवली... शेवट चे काही एपिसोड फार पळवल्यासारखी वाटली.
मेंटालिस्ट पाहतेय.. सिझन १ एपिसोड ७...
आता, गुन्हेगार कोण याचा विचार प्लॉट उघडला की आधीच करायला सुरू होते... मज्जा येतीये

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याच सदरात रेको वाचून पाहू लागलो आणि टोटली खिळवून ठेवले आहे या मालिकेने. आता सहाव्या सीझन चे शेवटचे भाग बघत आहे. ते "सेव्हियर्स" बरोबर पहिल्यांदा झटापट होते तेव्हाचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वॉकिंग डेड ऑटाफे आहे. ह्या सिरीअलने बिंज वॉचिंग मला खरंतर शिकवलं. म्हणून आठवा सीझन पूर्ण होईपर्यंत मी तो डाऊनलोड करायचं कटाक्षाने टाळतो आहे. जीओटीपेक्षा ह्या सिरीजने 'प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य' वगैरे का गाजवलं नाही हाही एक मूलभूत प्रश्न.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माणूस म्हणून बोल साला जीव काढून देईन.
- लक्ष्मी शैला

जेफ्री डीन मॉर्गन........ आय ॲम ऑब्सेस्स्ड...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुठे आहे ही? नेट्फ्लिक्स का प्राइम? युरोपात दिसते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही सिरीज तिसऱ्यांदा पाहून संपवली. दिड वर्षांतून एकदातरी पाहणं होतंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेयर केक नावाचा सिनेमा पाहिला. डॅनियल क्रेग आणि इतर सहकलाकारांनी मस्त काम केले आहे. कितीही आपटलीत तरी तुमची मारली जाणार असेल तर तुम्ही वाचू शकत नाही असा मौलिक संदेश हा सिनेमा देतो.

शिवाय 'कोलॅटरल ब्यूटी' नावाचा अत्यंत भिकार सिनेमा पाहिला. विल स्मिथ, एडवर्ड नॉर्टन, केट विन्स्लेट, कीअरा नाईटली, हेलन मिरेन इ. सर्वांना वाया घालवलंय. शेवटपर्यंत कळत नाही की लोकांचा नक्की प्रॉबलेम काय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0