यलो ऑकर ची स्वप्ने :

पानगळ सुरु झालीय
नोव्हेंबर मधली
सेकंदागणिक कोसळतायत
हजारो स्वप्नं
गवताच्या अगणित हिरव्या
छटांमध्ये
रानावनांत , जंगलात
शहरातल्या पार्कात
पडीक घरांच्या अवतीभवती
धांदल नुसती
अविरत
एकेक पान पाहावं
अगदी जवळून ,
गाढ , सुगंधी झोपेतल्या
खुशबूदार स्वप्नासारखं
पहिल्या धारेच्या
प्रशियन ब्लू चे शिंतोडे
सूर्याने जाळून टाकलेले
कच्चे खाऊन टाकलेले रंग
व्हर्मीलॉन रेड पासून बर्न्ट सिएना
पर्यंत च्या सर्व रंगश्रुती
अलगद ऐकाव्यात
पान गळून पडताना
किणकिणतात या श्रुती
काही तुटक जिवंततेच्या हिरव्या खुणा
छोट्या, मोठ्या ,
नुकत्याच मेलेल्या ,
मरून कुजलेल्या
पानांचा साचत जातोय थर
करड्या मातीची
किंचित थरथर
आसमंतच झालाय यलो ऑकर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

यलो ऑकर? अच्छःआ रंगाचे नाव आहे.
कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0