वय वाढणं ... माझ्या बदलत गेलेल्या समजुती आणि दुभंग

आपल्यातला कोवळेपणा संपत चाललाय ही जाणीव त्रासदायक वाटते. म्हणजे एकीकडे आपण पूर्वी अगदिच भोळसट/मूर्ख होतो असं वाटायला लागतं. पण पुढच्या क्षणी तरीही "होतो तसेच बरे होतो" असंही वाटतं. चटकन कुणावर विश्वास टाकणं जमत नाही. काही चांगलं सहज होइल असंही वाटत नाही. एक विचित्र संशयी भाव मनात खोल रुतून बसतो. ज्या त्या गोष्टीकडे cynical नजरेनं पहायला शिकतो. शिवाय जिथं तिथं हिशेब लावणंही आलच. म्हंजे अगदि कुणाशी मस्त गप्पा मारत असलो तरी मधूनच वाटतं ....."ह्याला आपल्याकडं नेमकं काय काम असेल?" . चमत्कारिक अवस्था होते.
रेफ्युजी निर्वासित वगैरेंच्या बातम्या वाचण्यात ऐकण्यात येतात. मिलिन्द वगैरेंसारखे कुणी प्रत्यक्ष त्या मदतीत सहभाग घेतलेले लोकांचे थेट अनुभवही वाचण्यात येतात. पण प्रश्न पड्तो की युद्धग्रस्त/आपद्ग्रस्त भागात लोकं मरताहेत, त्यांना राहणं असह्य आहे वगैरे हे ठिके, ...पण नक्की त्यांना प्रगत देशात आणायला कोणती इंडस्ट्री इच्छुक असावी? कुणाचा फायदा असेल त्यांना आणून? कुणाचेही हितसंबंध असावेत? आप्द ग्रस्त भागातल्या लोकांचे हाल दाखवत, अगदि जखमी/मृत लहान मुलांचे फोटो दाखवत आपल्याला भावनिक करुन लोकमत कोण बनवू पहात असेल? लोकांची ने-आण करणारी कोणती यंत्रणा असेल? त्यात कुणाचे छुपे किंवा उघड लाभ असतील?
अमेरिकेत काही ख्हुप मोठ्या सेलिब्रिटिंना ...म्हंजे तिथले उद्योजक की निर्माते वगैरे होते त्यांना ....लैंगिक शोषणात धरलं म्हणतात. पण ही प्रकरणं ठसठशीत बाहेर आली म्हणजे ज्याचे हितसंबंध दुखावलेत असं कुणीतरी तुल्यबळ समोर असावा ; किंवा निदान पडद्याआडून काही करत असावा.
METOO हॅशटॅग लोकप्रिय होण्यात आणि तो अगदि गंभीरपणे घेतला जाण्यातही तसच वाटतं.
"लहान बालकाच्या हातातली खेळणी चोरायचा प्रयत्न करणाऱ्या चोराला त्या बालकानं चोप दिला" असा मथळा वाचला तर काय वाटेल? नक्की बालक कुणाच्या खांद्यावर चढून चोराला हाणतय? कदाचित कुणीतरी चोराला धरुन ठेवलय आणि बालकाला सांगितलय की दे फटके आता ह्या साल्याला.
ह्या अशा बातम्यांशी पूर्णत: असंबंधित पण कोवळेपणा हरवू लागण्याची जाणीव होण्याचं अजून एक उदाहरण म्हणजे राजू परुळेकरांचं लिखाण.
ते काहीतरी(च) सदर लिहायचे लोकप्रभेत. सात-आठ वर्षांपूर्वी. त्यावेळी मनसे नव्यानच निघाली होती. ह्यांना त्याचं फार कौतुक. त्यावर कित्ये लेख लिहिले. शिवाय तेंदुलकरवर एक लेख लिहिला. त्याला(किंवा त्याच्या निमित्ताने इतरांना/सिस्टिमला) लै शिव्या घातल्या. आणि लोकं जेव्हा त्याचा प्रतिवाद करु लागले, वाचकांची पत्रं वगैरे येउ लागली तेव्हा "सत्य असत्या मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता" ही तुकोबांची ओळ तोंडावर मारुन आपण फारच निस्पृह, निष्ठावान,सचोटिचे असल्याचं आणि अगदिच व्यासंगी वगैरे असल्याचं त्यांनी दाखवलं. नंतर नंतरचं त्यांचं वागणं बघून प्रश्न पडत गेले.
अगदि म्हणजे "ह्याच्यासारख्यालासुद्धा आपण शिरेसली घेत होतो" ही जाणीव तर अगदिच अल्ट्रा जब्राट होती.
कुणी अगदि आत्मविश्वासानं(अगदि पोकळ आत्मविश्वासानं का असेना) किंवा ठामपणानं बोललं की चटकन विश्वास ठेवी. किंवा कुणी आत्यंतिक दयाभावनेनं माझ्याबद्दल बोललं की गदगदून जाइ. बायबलमध्ये असं बोललं गेलेलं आहे. ("तू पापी आहेस, पण तुझ्या पापांसाठी एका भल्या माणसानं आपला जीव दिलाय" हे ऐकून अगदि कसंतरीच वाटायचं मला.) "एकवेळ सुईच्या छिद्रातून उंट जाउ शकेल. पण श्रीमंत कधी मृत्युनंतर स्वर्गात जाउ शकणार नाहित" हाही उपदेश मी गंभीरपणे ऐकत असे. म्हणजे... मला ऑलरेडी खात्रीनं चार पाच गोष्टी पटलेल्या असायच्या. पहिली म्हणजे स्वर्ग ....आहे. अगदि खरोखरच आहे. दुसरं म्हणजे मेल्यानंतर तिथं जाता येतं. तिसरं म्हणजे श्रीमंत असणं हाच एक गुन्हा आहे. तिसरं म्हणजे आपण श्रीमंत काय लागलिच...अगदि ताबडतोब होणारच आहोत(!). चौथं म्हनजेपण तसे झाल्यावर आपण फारकाळ श्रीमंत राहता कामा नये. सगळं काही दान करुन टाकू(!). आता श्रीमंत तर झालो नाहिच. पण जे काय पैसे कमावलेत त्यातून माझ्याकडून कवडीसुद्धा सुटत नाही. स्वर्ग-नरक वगैरेबद्दल...असो. अशीच काहीशी गत हदिस आणि कुराणातल्या काही ओळींबद्दल. बायबल आख्खं मराठीतुन वाचलेलं. कुराणच्या निवडक ओळी(की "सुरा" की "आयत" म्हणतात ती कडवी) ऐकण्यात - वाचण्यात आल्या. दर्गा घराजवळच होता. त्यातला प्रेषिताचा ठाम विश्वास पाहून (निव्वळ त्यामुळेच) त्यात काहीतरी तथ्य असेल अशी खात्रीच वाटायची.
आता अगदी खरोखरीच कुणी चांगल्या इराद्यानं वागू लागला तरी मला शंका येते. "हा इतका आत्मविश्वास का दाखवतोय" असं वाटतं.
आणि तो जर नम्र असेल तर विचारायलाच नको. "हा इतका नम्र का/कसा" असं वाटायला लागतं.
विश्वास टाकणं दिवसेंदिवस अवघड होतं. दुनिया सरासरीनं, थोड्या बहुत फरकानं आहे तशीच आहे. आपण संशयी होत चाललो आहोत (आणि काही बाबतीत निबर, निगरगट्ट) हे जाणवत राहतं.
अर्थात हे मी माझ्या एकट्यापुरतं बोलतोय. "समाजाचा विश्वास उडाला मागच्या दोनेक दशकात" सुरातलं बोलत नाहिये.
मी माझा/ एका व्यक्तीचा विश्वास असण्या नसण्याबद्दल बोलतोय.मी पूर्वी जसा होतो, तसे अजुनही अनेक जण सध्या आसपास असतील. बहुतांश माझ्या तेव्हाच्या वयाच्या आसपास असतील. त्यांची मोदी-केजरी किंवा अजुन कोणावर (अगदि अण्णांवरसुद्धा) श्रद्धा/विश्वास असेल.मला आज वाटतय तसच थोड्याफार फरकानं त्यातल्या कित्येकांना अजुन काही वर्षांनी वाटेल.
अर्थात सगळेच असे बदलत जाणारे नसतील. ते तसेच त्याच श्रद्धेवर कायम असतील. (अगदि मरेपर्यंत साधेपणा जपणारे कित्येक भाबडे समाजवादी अन गांधीवादी किंवा अगदि संघातले कार्यकर्ते लोक आपल्याला ठौक असतात, तसच काहिसं.) ते लोक कायम राहतील.तोवर नवीन कित्येक जण त्याच(नवखे असण्याच्या) अवस्थेत आलेले असतील. हे सिनिकल होणं (कदाचित) बुद्धी/अनुभव वाढण्याचं लक्षण असेलही. पण अस्थानी सिनिकल झाल्याची जेव्हा नंतर जाणिव होते तेव्हा कसंतरीच वाटलं. असं एकदोनदा माझ्यासोबत झालय.
पूर्वी शाळकरी समजुतीनुसार टिळक गांधी बोस ग्रेट्ट , थोर वाटत. समकालीन राजकारणाबद्दल कुणी बोलू लागलं की मात्र "हे सगळे राजकारणी चोर,पापी नीच" असच वाटे. आता सध्याचे राजकारणी पूर्वी वाटायचे (सरासरी माणसाहून) तितके जास्त वाईट वाटत नाहित. गांधी टिळक बोस भगत सिंग पूर्वी जितके जास्त सुपर ह्युमन आणि अतिरेकी निस्पृह वाटायचे , तितके आता वाटत नाहित. सगळ्याच देशांचे आपापले "फाउण्डिंग फादर्स" असू शकतात हे दिसतय.
टिळक हे तेव्हाचे बाळ ठाकरे होते असं वाटतं. बोस हुकूमशाही आणु बघत होते की काय असं वाटतं. भगत सिंगाला पुरेसा व्यावहारिक विचार करता आला नाही, असं वाटतं.
.
म्हणजे एकीकडे असं निबर,वात्तड होत जाणं आणि दुसरीकडे त्याची जाणिव असणं... ह्यानं मनाचा दुभंग होतोय.
असा दुभंग इतरही काही गोष्टिंतून होतोय. मला ह्यांच्यातले अन् त्यांच्यातले; दोन्ही बाजूकडचे कित्येक मुद्दे पटतात; त्यात मेरिट वाटते. हे विरोधाभासी आहे, हेही दिसते. सध्या जे गरिब आहेत त्यांचे भले व्हावे, त्यांनी उन्नत , प्रॉडक्टिव्ह व्हावे असे मला मनापसून वाटते. आणि ते तसे होत नाहित म्हणून त्यांचा राग येतो. इतके असूनही ते नवनवीन गरिबांना जन्माला घाल्तच असतात; लोड वाढवतात ह्याबद्दल अजूनच राग येतो. स्त्रियांचा त्यांच्या देहावर हक्क आहे हे मान्य आहे. पण त्यांनी गर्भपात करु नये , असंही मला वाटतं. (पण मुळात त्यांनी काय करायचं ह्याबद्दल आपण कशाला उपदेश करतोय हाही प्रश्न पडतो!) . रस्त्यावर/फुटपाथवर ठेला लावणार्‍याचं कौतुक वाटतं त्याची अर्थप्राप्ती करण्याची धडपड बघून. तो जिद्दीचा रोल मॉडेल वाटतो. पण त्यानं अतिक्रमण केलेलं आहे, जागा हडपली आहे, संभाव्य अपघाताला कारणीभूत होतोय म्हणून त्याचा पुढच्याच क्षणाला रागही येतो. त्याला फोडून काढावंसं वाटतं. मी जिचा द्वेष करतो करतो आणि जिचा आदर करतो; ती व्यक्ती एकच असू शकते. दोस्ती-यारी-नाती ह्या सगळ्यात मी विचित्र परिस्थितीत असतो. मला एकाचवेळी एकाचव्यक्तीबद्दल दोन टोकाच्या गोष्टीही वाटत असू शकतात.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा निबरपणा नाही. ही तर ' प्रगल्भता' . आणि कातडी जाड होतेय, संवेदना बोथट होतायत, ह्याची जाणीव होणे ही तर पराकोटीची प्रगल्भता! शिवाय तरुणपणीची मते प्रौढपणी बदलणे हे तर नेतेपणाचे लक्षण! आणि त्याची ' प्रांजळ' कबुली द्यायची असते. मग तर थोरच थोरपणा येतो!
अर्थात लेख आवडला.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"स्त्रियांचा त्यांच्या देहावर हक्क आहे हे मान्य आहे."

आणि

"(पण मुळात त्यांनी काय करायचं ह्याबद्दल आपण कशाला उपदेश करतोय हाही प्रश्न पडतो!)"

अशा दोन संतुलित वाटतील अशा वाक्यांमधे हळूच

"पण त्यांनी गर्भपात करु नये , असंही मला वाटतं."

असे मत टाकून देण्याला 'प्रगल्भ' होणे म्हणत नाहीत!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

स्त्रियांचा त्यांच्या देहावर हक्क आहे हे मान्य आहे. पण त्यांनी गर्भपात करु नये , असंही मला वाटतं. (पण मुळात त्यांनी काय करायचं ह्याबद्दल आपण कशाला उपदेश करतोय हाही प्रश्न पडतो!) .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

... ही प्रकरणं ठसठशीत बाहेर आली म्हणजे ज्याचे हितसंबंध दुखावलेत असं कुणीतरी तुल्यबळ समोर असावा

हार्वी वाइनस्टाइनवर आरोप करण्यापासून हे धरण फुटलं. त्याबद्दल सगळ्यात पहिला लेख रोनन फॅरोनं लिहिला. तो जिथे नोकरी करतो, त्या एनबीसीनं त्याला सापडलेल्या गोष्टी प्रसारित करायला नकार दिला म्हणून फॅरो न्यू यॉर्करकडे गेला. न्यू यॉर्करनं या विषयावरचे फॅरोचे सगळे लेख छापले. ते इथे बघता येतील.

रोनन फॅरोला या विषयात काय रस! तो तर स्त्री नाही. त्याच्याशी असं वर्तन झालेलं असण्याची शक्यता कमीच. मग त्याचा काय हेतू असेल? तर रोनन फॅरो हा मिया फॅरो आणि वुडी अॅलनचा मुलगा. त्याचं बापाबद्दल काय मत - "He's my father married to my sister. That makes me his son and his brother-in-law. That is such a moral transgression." (विकिपिडीयावरून)

(अवतरणचिन्हांशिवाय आलेली) प्रगल्भता काय, तर फॅरोला या विषयाबद्दल एवढी पोटतिडीक का वाटली! त्याचं आणि वाइनस्टाइनचं व्यक्तिगत पातळीवर काही वाकडं नसावं. पण सिनेजगतात मान-सन्मान असलेल्या दुसऱ्या एका 'बिग डॅडी'ला त्याच्या अनैतिक वर्तनाबद्दल उघडं करून, रोनन फॅरोला कदाचित थोडं समाधान मिळालं असेल; शांत वाटलं असेल. आपला नैतिक संताप त्यानं सकारात्मक पद्धतीनं वापरून घेतला असेल.

लोकांच्या हेतूंवर संशय घेणं सोपं आहे. त्यांची जडणघडण कशी झाली असेल याबद्दल आस्था, सहानुभूती दाखवणं कठीण आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(अवतरणचिन्हांशिवाय आलेली) प्रगल्भता काय, तर फॅरोला या विषयाबद्दल एवढी पोटतिडीक का वाटली! त्याचं आणि वाइनस्टाइनचं व्यक्तिगत पातळीवर काही वाकडं नसावं. पण सिनेजगतात मान-सन्मान असलेल्या दुसऱ्या एका 'बिग डॅडी'ला त्याच्या अनैतिक वर्तनाबद्दल उघडं करून, रोनन फॅरोला कदाचित थोडं समाधान मिळालं असेल; शांत वाटलं असेल. आपला नैतिक संताप त्यानं सकारात्मक पद्धतीनं वापरून घेतला असेल

. हम्म. बरोबरे.
.

लोकांच्या हेतूंवर संशय घेणं सोपं आहे. त्यांची जडणघडण कशी झाली असेल याबद्दल आस्था, सहानुभूती दाखवणं कठीण आहे.

वाटतेच की सहानुभूती. पण अधूनमधून संशय डोकावत राहतो. (हा आणि इतकाच पॉइण्ट आहे) सहानुभूती नाही, असं म्हणत नाही. (तसंही इतक्या मोठ्या केसमध्ये माझ्यासारख्याच्या वाटण्याला कोण विचारणार असंही वाटतं.) आणि एक मुद्दा हाही आहे की भल्या लोकांबद्दलही मधुनच संशयाची भावना डोक्यात येते. आणि नंतर "हे खरच चांगले लोक आहेत" हे पटल्यावर उगीच आपण ह्यांच्याकडे असं बघत होतो असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे भगवान! वूडी ऍलन पण!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

माणूस*१ कधी अगदी चेकाळतो. चांगल्या अथवा वाइट ठरवतो अशा कोणत्याही कामासाठी,विचारांसाठी. करून टाकतो,बोलून टाकतो लगेच.
*१- बाईसुद्धा.

तर काय सांगत होतो की त्यावेळी तो फार सम्यक विचार करायच्या मनस्थितीत नसतो. प्रत्येकवेळी अमुक एक दहा टक्के,तेच लोक समाजात भडकतात असे नाही. त्यांची जागा दुसरे कोणी घेतात. अतिसामान्यसुद्धा पेटल्यावर काही करून टाकतात. ते सतत करतही नसतील परंतू त्याच्या आयुष्यातली एक झळाळी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबा, आचरणात आणण्यासारखा असा कोणता एक विचार आहे की ज्याबद्दल तू गेली किमान तीन वर्षे ठाम आहेस ?

शक्यतो संक्षिप्त विस्कळीत नसलेले, नेमके उत्तर दे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विचार करावा लागेल. शोधावं लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समोरच्याचा राग न येता कींव येणे, यालाच प्रगल्भता म्हणतात का ?
विचारलं तरच मत देणे, याला प्रगल्भता म्हणतात का ?
आपल्या आधी दुसऱ्याचा विचार करणं, यालाच प्रगल्भता म्हणतात का ?
.
.
.
.
.
तसं असेल तर जगांत, प्रगल्भ लोक्स डायर मायनॉरिटी मधे आहेत.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

प्रगल्भ म्हंजे काय ठौक नै.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निरागसपणा हा माझ्या मते प्रचंड ओव्हररेटेड आहे. तू 'पाडस' कादंबरी वाचलेली आहेस का? त्यातला संदेश असा आहे की जग हे सुंदर आहे, पण त्याचबरोबर जगण्याची धडपड ही क्रूर आहे. त्या सौंदर्याचा अनुभव घेणं आणि त्याचबरोबर त्या जगण्यासाठी ज्या गोष्टी करायला लागणं, यात समन्वय साधायचा तर कुठेतरी त्या निरागसतेचा त्याग करायला लागतो. याचा अर्थ त्या सौंदर्याचा अनुभव घेणंच योग्य नाही असा नाही. मात्र जगण्यासाठी ज्या सार्वजनिक सत्याला सामोरं जावं लागतं त्यात हा निरागसपणा बाळगून चालत नाही.

अनेक लोकं हा निरागसपणा सोडत नाहीत. आलेले व्हॉट्सअॅप फॉरवर्ड 'हे खरंच आहे की या थापा आहेत?' असा प्रश्न स्वतःला न विचारता बिनधास्त पुढे पाठवतात, आणि त्यातूनच गैरविश्वास निर्माण होतात.

निरागसपणातून जग काळंपांढरं दिसतं. आपल्याला पूर्वीचे थोर थोर लोक हे खरोखरच देव होते असं वाटतं. मग त्यांचेही पाय मातीचेच आहेत, होते हे दिसलं की ते मान्य करण्याची तयारी नसते. त्यातून त्यांच्यावरची टीका सहन होत नाही, भावना दुखावल्या जातात. सर्वच आपापल्या गुणदोषांसकट माणसंच आहेत हे राखाडी चित्र स्वीकारण्याची तयारी दाखवणं म्हणजेच मोठं होणं. याबद्दल तक्रार का करा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निरागसपणा हा माझ्या मते प्रचंड ओव्हररेटेड आहे

.
हां. पॉइण्टे. पाडस वाचलेली नाही. वाचावी म्हणतोय. फार दिवसापासुन वाचायच्या यादीत आहे. इंटरेस्टींग दिसते आहे. ("रोचक" ह्या साध्या सोप्या मराठी शब्दाचा पार चोथा करणाऱ्या बॅटमॅनचा निषेध.)
वॉट्स ॲप हा अगदिच उघड/ढोबळ प्रकार आहे.
राखाडी चित्र स्वीकारण्याबद्दल तक्रार तितकीशी नाही. पण अधिक खटकणारी बाब म्हणजे कुणी खरच जेन्युइन/भला माणूस असला तरी सुरुवातीला मी संशयानच बघतोय, असं जाणवलं. म्हणजे भल्या लोकांवर उगीचच संशय घेणं. हे जेव्हा जाणवतं तेव्हा कसंतरीच होतं. (पण पुन्हा पुढच्या वेळेस कुणी आला पारखूनच घेतो.) जर काही विचित्र वाटत असलं तर विशेषकरुन हेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जे जे अपरिचित त्याजबद्दलचा संशय हा सर्व्हायव्हलकरिता अत्यावश्यक आहे. जी लहान बाळे इतकी निरागस म्हणतात तीही अपरिचित व्यक्तीकडे पटकन जात नाहीत, भोकाड पसरतात. सबब हा संशय इतक्या लहान वयापासूनच आपल्या अंगात भिनलेला असतो. ती एक सहजप्रेरणाच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी मनातलं.
स्वत:चा आणि जगाचा ' अपरिमित अपुरेपणा'(सौजन्य : चिंत्र्यंखा) मान्य करणं म्हणजे वयात येणं. हे एकदा मान्य केला की सगळं सोपं होतं. असं करणं म्हणजे जबाबदारी टाळणं नव्हे. उलट कबूल है कबूल है कबूल है म्हटलं की जबाबदारी वाढते आणि उचलावीच लागते. बळ असेल तर झुंज द्यावी. नाही तर निर्लेप मनाने ओझी वाहात राहावी किंवा बाजूला व्हावं. धुमसत राहू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Age of consent बाबतीत टिळकांचा स्टँड हॉरीबल होता.

https://en.m.wikipedia.org/wiki/Age_of_Consent_Act,_1891

The death of an 11-year-old Bengali girl Phoolmonee after being brutally raped by her 35-year-old husband Hari Mohan Maitee in 1889 served as a catalyst for its legislation.

Hari Mohan Maitee was acquitted on charges of rape, but found guilty on causing death inadvertently by a rash and negligent act. (या अशा केस आणि निकाल अजूनपण असतात; फक्त वय वेगळं असतं. नवरा/जोडीदारने बलात्कार+खून केलेला असतो. पण फक्त खुनाबद्दलच शिक्षा होते कारण लग्न केले की बलात्कारच्या आरोपापासून पूर्ण सुरक्षा मिळते total immunity)

आणि टिळकांचा स्टँड काय तर:

The Bill was opposed by many orthodox leaders who believed it as an interference in the Hindu religion. Bal Gangadhar Tilak opposed the age of consent. "We would not like that the government should have anything to do with regulating our social customs or ways of living, even supposing that the act of government will be a very beneficial and suitable measure," Tilak vigorously protest.
The Bill was also opposed by revivalist nationalists who were against any colonial interference.

हॉरिबल आहे हे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

खूप मोठा आहे तुमचा लेख.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नेते भ्रष्ट अन लोक बिच्चारे असं नसतं असं वाटतं. म्हणजे माणूस मुळातच स्वार्थी, बऱ्यापैकी दुष्ट, आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्यासाठी तळमळणारा ई. असा असतो. सिस्टीम मात्र अशी असली पाहिजे की प्रामाणिकपणाला प्रोत्साहन मिळावं अन भ्रष्टपणाला पायबंद बसला पाहिजे. सद रक्षण अन खल निग्रहण व्हावे. तश्या सिस्टीमची मागणी लोकांनी करायला हवी. त्यासाठी लोकांना स्वच्छ सिस्टीमचा फायदा, सगळ्यांनी भ्रष्टपणे वागण्यापेक्षा अधिक वाटायला हवा. त्यासाठी धुरीणांनी, चांगल्या विचारी व्यक्तिंनी लोकजागृती केली पाहिजे. आता परत हे नेते लोकांमधूनच आलेले, त्यांच्यात ही प्रेरणा कुठून यावी, तर राष्ट्रवाद, भूक, भय, दमन, पारतंत्र्य यांच्यापासून मुक्ति या ध्येयांमधून ती प्रेरणा आली(स्वातंत्र्यपुर्व भारताच्या राजकिय चौकटीचा विचार करता, अमेरिकेत ती संपत्तीच्या मालकीच्या संरक्षणाच्या मूल्यामुळे आली.). त्या प्रेरणेने त्यांनी लोकांना आपल्याबरोबर काहीतरी करण्यास उद्युक्त केले हे त्यांचे महाणपण अर्थात म्हणून हे राष्ट्रवादी नेते, धुरीण पूर्ण पुरूषोत्तम ठरत नाहीत पण गतानुगतिक सामान्यांपेक्षा निराळे, भव्य विचार करणारे म्हणून भारी ठरतात. एकदा हे समजूण घेतले की त्यांचे महत्व समजते, पण त्यांना फॉलो करणे आता मुर्खपणाचे हेदेखिल समजते.
टिळक, आगरकर, आंबेडकर, सावरकर, नेहरू, बोस, गांधीजी, आझाद, पटेल, इंदिरा गांधी या साऱ्यांचंच कूठे ना कुठे चुकलं, काही बरोबर ठरलं(त्यांच्या काळात नसळं तरी नंतर). सगळे मानवी विकार- दोष त्यांच्यात होतेच, ते त्यांना चुकले नाहीत. आता, त्यांच्या काळ- कर्तृत्वाचा साकल्याने अभ्यास करावा, जळजळ न करता, दातओठ न खाता त्यांच्या चूकांना माफ करून टाकावं. कुठल्याही विचारसरणीचे अंकित न होता निखळ मूल्यांच्या फूटपट्टीने केस बाय केस गोष्ट समजून घ्यावी. विचारव्युह अन थोर्थोर व्यक्ति त्यांचा चष्मा आपल्या डोळ्याला लवू पाहतायत हे समजणं म्हणजे मॅच्युरिटी येणं, असं मला वाटतं. सनातनी असण्याच्या स्टॅबिलिटीपेक्षा कॉग्निटिव्ह डिसोनन्सची तनातनी परवडली हे कळणं म्हणजे मॅच्युअर्ड, मोठं होणं. अर्थात परत, असं मला वाटतं. Tongue

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आपापल्या विहीरीइअतकं जग बेडकाला दिसतं. मूळात तो फक्त भ्रम असतो. देअर आर ऑल काईंड ऑफ पीपल.
____-
माझी काही मतं ठाम आहेत -

(१) Most people operate from an innate goodness
(२) कोणत्या कर्माचा फळ देण्याचा काळ आलेला आहे हे केवळ विधाताच जाणू शकतो.
(३) इवल्याश्या बीजाला जगण्याची जिजीविषा देणारी शक्ती माझ्यावरही लक्ष ठेऊन असणारच की. मी काय अशी वेगळी लागुन गेले?
(४) माझ्या कुंडलीतील जलराशीचा अतिरेक हे दर्शवितो की मला प्रेम, ओलावा, माया, त्याग या गोष्टी अधिक करायच्या आहेत व त्या मानाने अन्य लोकांचा कोरडेपणा अधिक अनुभवायचा आहे.
(५) आपल्या प्रत्येक कृतीतून समोरच्याचा जगावरील विश्वास वाढायला हवा. प्रत्येक वेळी हे शक्य असेलच, असलच पाहीजे.
(६) I am only one, But still I am one. I cannot do everything, But still I can do something; And because I cannot do everything, I will not refuse to do the something that I can do.

ओके यांना मत न म्हणता श्रद्धा म्हणता येईल. मान्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टिळक म्हणजे तेव्हाचे बाळ ठाकरे ही तुलना अतिशयित बालिश आणि चुकीची आहे.

पहिली गोष्ट म्हणजे आवाका. टिळकांच्या कार्याचा आवाका देशभर होता. ठाकऱ्यांना धड महाराष्ट्रात सगळीकडे पाळेमुळे रोवता आली नाहीत.

सैद्धांतिक बैठक. टिळकांनी सैद्धांतिक बैठक दिली इंग्रज सरकारविरुद्ध लढायला. ठाकऱ्यांची बैठक म्हणजे आज लुंगी हटाओ, उद्या अजून कुणी हटाओ, परवा टाईमपास भाषण करो.

प्रॅक्टिकल पावले. टिळकांनी न्यूजपेपर काढला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याद्वारे अनेक फंड काढून तशी कार्ये केली. जनजागृती तर मी जमेत धरतच नाहीये. कारण नगाला नग म्हणून सामना आणि त्यातली जागृती ही केसरीप्रणीत जागृतीला समकक्ष मानतील लोक.

इंडस्ट्री. टिळकांनी स्वदेशीचा नुस्ता पोकळ प्रचार नै केला तर स्वत:ही पावले उचलली. माझे स्मरण बरोबर असेल तर विदर्भ साईडला कुठेतरी कापूस फॅक्टरीकरिता त्यांनी प्रयत्न केले होते. ठाकऱ्यांनी काय केले?

तत्त्वासाठी तुरुंगवास. टिळक हे डोंगरीच्या तुरुंगात होते, मंडालेच्या तुरुंगात होते, आणि कधीतरी. ठाकऱ्यांची कुठली तत्त्वे होती आणि त्यासाठी त्यांनी प्रस्थापितांचा रोष कधी ओढवून घेतला? एक अगोदरच मोडकळीस आलेली बिल्डिंग आपल्या लोकांनी पाडली हे सांगण्यात कसलं आलंय तत्त्व?
मेजॉरिटीप्रणीत राजकारण हे एकमेव सूत्र धरून जर दोन्ही सेमच असे म्हणायचे असेल तर त्यालाही काहीच अर्थ नाही कारण दोघांच्या कार्यकालांमधील परिस्थिती आमूलाग्र बदललेली होती. शिवाजीउत्सव आणि गणेशोत्सव यांमधून जे जनसंघटन होते त्याला तत्कालीन स्थितीत काहीएक महत्त्व नक्कीच होते कारण पारतंत्र्य. शिवसेनेच्या संघटनेचे नक्की काय महत्त्व?

टिळकांनी शिवाजीउत्सव सुरू केला इतकेच नाही तर रायगडावरील शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी फंड काढला आणि तो घडवून आणलादेखील. इतकेच नव्हे तर शिवचरित्राचे एक अतिमहत्त्वाचे समकालीन विश्वसनीय साधन जी जेधे शकावली, तीही त्यांनी प्रकाशित केली. शिवजन्मतिथीवर काहीएक लेखही लिहिले. एकाच वेळी हा माणूस किती आघाड्यांवर भरीव योगदान देतोय ते पहा. मेहेंदळे सरांच्या मते अख्ख्या विसाव्या शतकात शिवचरित्राबद्दल अतिशय जास्त माहिती पर ऐतिहासिक साधन मिळण्याची २ च उदाहरणे आहेत, एक शिवभारत आणि दुसरी जेधे शकावली. ठाकऱ्यांनी काय केले? एक सिंहासन करवून घेतले तेही स्वत:साठी.

बाकी विद्वत्ता वगैरे तर सोडूनच देऊ कारण जोवर शेतकरी आणि शेतमजुराला एखाद्या गोष्टीचा उपयोग होत नाही तोवर कुठलीही गोष्ट तशीही वर्थलेस असते, बरोबर? टिळक प्रतिगामी होते म्हणावे तर लखनौ करारात निव्वळ स्वराज्य हवे म्हणून मुसलमानांना वाजवीपेक्षा जास्त हक्क प्रदान कसे काय केले त्यांनी? वेदोक्त प्रकरणात शाहूविरोधी भूमिका घेतल्याने टिळकांना लाथाडणाऱ्यांना त्यांचा हा "सिक्युलर" पैलू बरा दिसत नाही? समाजकारणात ते उघडपणे बोलताना प्रतिगामी असले तरी स्वत:च्या मुलींची लग्ने मात्र बालिग वयातच लावून दिली हे विसरतात लोक. Smile

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टिळकांमुळे महाराष्ट्राकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. टिळकांचा दबदबा इतका होता की बंगालात ते गेले असताना त्यांना विचारण्यात आलं, स्वराज्य म्हणजे नक्की तुमचा प्लॅन काय आहे? मराठेशाहीत जसे मराठे पसरले होते तसंच की अजून कसं? टिळक उत्तरले की तो काळ वेगळा, हा काळ वेगळा, लोकशाही व्यवस्थेत असं चालत नाही वगैरे वगैरे. टिळकांच्या वेळेस महाराष्ट्रातील नेत्यांचा वरचष्मा खूप जास्त होता. नंतर नचिं केळकर वगैरेंपासून अधोगती सुरू झाली ती झालीच. या तुलनेत ठाकऱ्यांचं काय? महाराष्ट्राला मुंबईपुरते मर्यादित करून टाकले यांनी. यांच्यामुळे मराठी माणसाचे नाव खराब झाले, अगोदरचा प्रसरणशील महाराष्ट्र जाऊन अजूनच संकुचित होऊ लागला. मराठीभाषक प्रदेशाबाहेरील लोकांची महाराष्ट्राशी नाळही याच काळात अजून कमकुवत झाली, आणि एकूणच महाराष्ट्रातील मराठी माणसाचे आत्मभान हे अधिकाधिक संकुचित झाले. वास्तविक पाहता हा काळ खुद्द महाराष्ट्राकरिता अगदी भरभराटीचा म्हटला तरी चालेल देशभराच्या तुलनेत. पण यात शिवसेनेचे योगदान नक्की काय? सहकार वगैरेमध्ये शिवसेना होती कुठे? प्रॅक्टिकल राजकारण असो किंवा सशक्त सांस्कृतिक आत्मभान असो, यांनी काय केले? कुठे टिळकांचे देशव्यापी राजकारण आणि कुठे हे धड मुंबईही सांभाळताना धडपडणारे लोक?

एकूणच असली मते कुठून येतात काय माहिती. थोडा विचार केला तरी हे स्पष्ट होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रतिसाद अतिशय आवडला. अनेक गोष्टी ज्या ठाऊक नव्हत्या त्या कळल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मला वाटतं ती तुलना फेसव्हॅल्यूवर घेऊ नये.

'पूर्वी जेव्हा निरागसपणा होता तेव्हा कोणी काही ठामपणे सांगितलं तर कशावरही विश्वास ठेवायचो. आता तो निरागसपणा गेलेला आहे. आता सिनिसिझम वाढलेला आहे आणि लंबक पार दुसऱ्या टोकाला गेलेला आहे. इतका, की काहीपण शंका येतात.'

हे सांगण्यासाठी काहीतरी अतिरेकी तुलना केल्यासारखं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा हा, अतिनेमके. त्यात परत अगोदरचा निरागसपणा चूक होता हे मनात इतकं ठसलंय की त्याची भरपाई अशा शंकांनी होईलसे वाटत असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तपशीलांनी , तर्कानी खच्चून भरलेल्या प्रतिसादाबद्दल आभार. ह्यातल्या काही गोष्टी ठाउक नव्हत्या.
आणि ज्या ठाउक होत्या(संमति वय वगैरे) त्याकडे ह्या नजरेनं बघायचं सुचलं नव्हतं.
विशेषत: हे फार मोलाचं वाटलं--

....टिळकांनी स्वदेशीचा नुस्ता पोकळ प्रचार नै केला तर स्वत:ही पावले उचलली. माझे स्मरण बरोबर असेल तर विदर्भ साईडला कुठेतरी कापूस फॅक्टरीकरिता त्यांनी प्रयत्न केले होते.

...शिवचरित्राचे एक अतिमहत्त्वाचे समकालीन विश्वसनीय साधन जी जेधे शकावली, तीही त्यांनी प्रकाशित केली.

.
@अॅमी ह्या केसचे तपशील ठाउक नव्हते. वाचवतही नाही.
@अनुप -- हा फार मोथा लेख असेल तर पुढील वेळी पाच सात भागात प्रकाशित करेन, टप्प्याटप्प्यानं Smile
@ शुचि -- बरोबर. दुनिया मोठ्ठी आहे. आख्खी बघुन कुणाचीच होणार नै. (इथुनच गब्बरच्या लाडक्या "बाउण्डेड रॅशनॅलिटी"ची सुरुवात होते.)
@ पुंबा -- तुमचं म्हण्णं पुन्हा एकदा वाचून बघतो, मग सांगतो काय म्हणायचय ते.
.
सर्व वाचक , चावक आणि प्रतिसादकांचे मन:पूर्वक आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि ज्या ठाउक होत्या(संमति वय वगैरे) त्याकडे ह्या नजरेनं बघायचं सुचलं नव्हतं. >> ह्या नजरेने म्हणजे "स्वत:च्या मुलींची लग्ने मात्र बालिग वयातच लावून द्यायची आणि इतरांच्या मुलींसाठी उघडपणे बोलताना प्रतिगामी असायच" ही का?? रोचक 'नजर' आहे.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

शंभरसवाशे वर्षांपूर्वीचा माणूस पुरेसा मॉडर्न नाही म्हणून टीका करणे कितपत सयुक्तिक? मुद्दा इतकाच की राजकीय सोय म्हणून प्रतिगामी राहूनही वैयक्तिक आयुष्यात त्याचे स्तोम माजवले नाही. त्यावेळच्या हिंदू समाजाला (सध्या समजतात त्याप्रमाणे फक्त ब्राह्मण नव्हे, इतर जातींचे प्रतिनिधीही यातच आले) कितीतरी गोष्टी पटत नव्हत्या. मोठा राजकीय नेता व्हायचे तर अंधश्रद्धा इ. शी तडजोड ही अपरिहार्य आहे. टिळकांचा स्टान्स पूर्णपणे अँटीसुधारक नव्हता, फक्त स्वराज्य आल्यावर सुराज्य असा होता. प्रेफरन्स ऑर्डरवरून मतभेद व्हायचे लोकांशी, ते स्वाभाविकच आहे. पण म्हणून एकच प्रेफरन्स ऑर्डर योग्य अन दुसरी पूर्णच अयोग्य हे चूक आहे. संमतिवयाला पाठिंबा देऊन ब्रिटिशांखाली राहणे हे चूक की बरोबर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शंभरसवाशे वर्षांपूर्वीचा माणूस पुरेसा मॉडर्न नाही म्हणून टीका करणे कितपत सयुक्तिक? >> त्या काळातल्या इतर महत्वाच्या माणसांशी तुलना करता ते किती मॉडर्न होते या मुद्याबाबतीत?

मुद्दा इतकाच की राजकीय सोय म्हणून प्रतिगामी राहूनही वैयक्तिक आयुष्यात त्याचे स्तोम माजवले नाही. >> याला दांभिक म्हणावे का?

मोठा राजकीय नेता व्हायचे तर अंधश्रद्धा इ. शी तडजोड ही अपरिहार्य आहे. >> आणि अशा तडजोड करणाऱ्याचा आदर करायचा?

संमतिवयाला पाठिंबा देऊन ब्रिटिशांखाली राहणे हे चूक की बरोबर? >> आजच्या हिंदूंच्यावादींच काय मत आहे याबद्दल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

त्या काळातल्या इतर महत्वाच्या माणसांशी तुलना करता ते किती मॉडर्न होते या मुद्याबाबतीत?

फसवा प्रश्न. त्या काळातील महत्त्वाची माणसे म्हणजे नक्की कोण? फक्त आंबेडकर आणि आगरकरच महत्त्वाचे होते की अजून कोणी?

याला दांभिक म्हणावे का?

अनुयायांच्या मर्यादेपुढे हतबल होणे म्हणावे असे माझे मत. तुमचे मत वेगळे आहे हे दिसतेच आहे.

आणि अशा तडजोड करणाऱ्याचा आदर करायचा?

नका ना करू, सक्ती कोण केलीय? तडजोड करून काय करू इच्छित होते ते न पाहता असे प्रश्न विचारले की असंच होणार.

आजच्या हिंदूंच्यावादींच काय मत आहे याबद्दल?

पारतंत्र्यातील समाजापुढे राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे प्रश्न होते. आज स्वराज्य असल्यामुळे सुराज्यावर फोकस करणे हे ऑब्वियस वाटते. त्या काळात तसे नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फसवा प्रश्न. त्या काळातील महत्त्वाची माणसे म्हणजे नक्की कोण? फक्त आंबेडकर आणि आगरकरच महत्त्वाचे होते की अजून कोणी? >> आधी म्हणायच "शंभरसवाशे वर्षांपूर्वीचा माणूस पुरेसा मॉडर्न नाही म्हणून टीका करणे कितपत सयुक्तिक?" मग "त्या काळात त्याच केसमधे मोडर्न स्टँड घेणार्यांशी तुलना कर" म्हणलं तर फसवा प्रश्न म्हणायचं. मज्जाच आहे....

===
अनुयायांच्या मर्यादेपुढे हतबल होणे म्हणावे असे माझे मत. >> मग एवढ्या हतबल माणसाला फार बाणेदार, कणखर, सिंहगर्जना वगैरे म्हणत का प्रोमोट करतात?

===
तडजोड करून काय करू इच्छित होते ते न पाहता असे प्रश्न विचारले की असंच होणार. >> तेच विचारलय पुढे.
• 'संमतिवयाला पाठिंबा देऊन ब्रिटिशांखाली राहणे (खरतर हे देखील झालं असतच अस नाही. एका मुद्यावर ब्रिटिशांना पाठिंबा दिला तर स्वातंत्र्य 1947 ऐवजी 2047 मध्ये मिळालं असत अस नाही. पण तरी सोयीसाठी समजुया तसं)' की
• 'मरूदेत थोड्याफार स्त्रिया मेल्या तर... बडे बडे देशों में... पण हे ब्रिटिशमात्र गेलेच पाहिजेत!'
काय महत्वाचं वाटतं आताच्या हिंदुत्ववाद्यांना? टिळकांनी योग्य स्टँड घेतला?

आणि आत्ताच्या हिंदुत्ववाद्यांच्या उत्तराबद्दल आताच्या स्त्रियांना काय वाटतं?

===
आज स्वराज्य असल्यामुळे सुराज्यावर फोकस करणे हे ऑब्वियस वाटते. त्या काळात तसे नव्हते. >> सर्वसामान्य हिंदू स्त्री च्या दृष्टीतुन त्याच काळात कोण बरे होते? ब्रिटिश कि हिंदू?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

आधी म्हणायच "शंभरसवाशे वर्षांपूर्वीचा माणूस पुरेसा मॉडर्न नाही म्हणून टीका करणे कितपत सयुक्तिक?" मग "त्या काळात त्याच केसमधे मोडर्न स्टँड घेणार्यांशी तुलना कर" म्हणलं तर फसवा प्रश्न म्हणायचं. मज्जाच आहे....

फसवा प्रश्न अशासाठी की महत्त्वाचे लोक म्हणजे नक्की कुणाला म्हणणार? जे आजच्या हिशेबाने पाहता मॉडर्न होते तेच लोक फक्त महत्त्वाचे असा निकष असेल तर ते चेरीपिकिंग होईल आणि तस्मात चूक असेल. म्हणून म्हणतोय नक्की महत्त्वाचे म्हणजे कोण ते ठरवा अगोदर.

मग एवढ्या हतबल माणसाला फार बाणेदार, कणखर, सिंहगर्जना वगैरे म्हणत का प्रोमोट करतात?

कारण त्यांचे एकूण स्वातंत्र्यसंग्रामात योगदान खूप महत्त्वाचे आहे. एक संमतिवयाला नाही म्हटले म्हणून होलसेल निकालात काढणे याची सध्या फॅशन आहे पण बाकीचं काही विचारात घेतलं नाही तर असंच होणार.

तेच विचारलय पुढे.

तडजोड करून का होईना, स्वराज्य मिळवावे असा त्यांचा फोकस होता.

काय महत्वाचं वाटतं आताच्या हिंदुत्ववाद्यांना? टिळकांनी योग्य स्टँड घेतला?

टिळकांच्या वेळची परिस्थिती पाहता त्यांचा फोकस बह्वंशी योग्य गोष्टींवर होता असं वाटतं - यद्यपि काही केसेसमध्ये अजून प्रोग्रेसिव स्टान्स घेतल्यास चाललं असतं.

सर्वसामान्य हिंदू स्त्री च्या दृष्टीतुन त्याच काळात कोण बरे होते? ब्रिटिश कि हिंदू?

लोडेड प्रश्न कारण उत्तर प्रश्नकर्त्रीच्या मनात अगोदरच ठरलेले आहे. Smile तरी प्रयत्न करून पाहतो.

ब्रिटिश बरे नक्की कशावरून हे अगोदर पाहिलं पाहिजे. युनिवर्सल सफ्राज यायला खुद्द ब्रिटनमध्ये १९१८ उजाडलं बहुधा. तोवर तिथे स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता. बाकी सोडा, १९४५ पर्यंत केंब्रिज वगैरे ठिकाणी स्त्रियांनी ॲडमिशन घेतली, डिग्री कोर्स पूर्ण केला तरीही डिग्रीचे सर्टिफिकेट न मिळता "फिट टु गेट डिग्री" असे वेगळे सर्टिफिकेट मिळायचे. आहे की नाही मजा?

आणि राहता राहिली गोष्ट स्त्रियांना घराबाहेर न सोडण्याची. सोकॉल्ड उच्चजातीय लोकांमध्ये हे प्रमाण जास्त होतं. पण त्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या किती पट होती? जे सोकॉल्ड नीचजातीतले आहेत त्यांच्यात असं काही नव्हतं. शिवाय बहुसंख्य समाज गरीब असल्याने झकमारी करत स्त्रियांनाही घराबाहेर पडून काम करणे भागच होते. तेव्हा सर्वसामान्य हिंदू स्त्री असं काही नसतं. स्थान आणि जातीवरून या स्त्रीला मिळणाऱ्या हक्कांमध्ये बरेच फरक होते.

आणि चालू फ्याशनप्रमाणे हेही कबूल करू की सर्वसामान्य हिंदू स्त्रीसाठी भारत हा नरक होता. मग असं असूनही स्वातंत्र्यलढ्यात स्त्रिया कशा काय सहभागी झाल्या बरं? त्यांना पुरुषांनी ब्रेनवॉश केलं ते त्यांनी खपवून कसंकाय घेतलं? आपल्या तारणहार ब्रिटिशांशी अलायन्स करून भारतातील एमसीपी पुरुषसत्ता का नाही उलथली?

'मरूदेत थोड्याफार स्त्रिया मेल्या तर... बडे बडे देशों में... पण हे ब्रिटिशमात्र गेलेच पाहिजेत!'

ब्रिटिश राहिले तरी चालतील, पराकोटीचे आर्थिक शोषण झाले तरी चालेल, अख्खा देश ब्रिटिशांचा कुत्रा झाला तरी चालेल, मेकॉलेप्रणीत काळ्या साहेबांनी साहेबाची हांजी हांजी करत नेटिव्हांना हाड हाड केले तर चालेल, पण एकही महिला मरू नये. आफ्टर ऑल महिलांना इतर कशानेच काहीही फरक पडत नाही.

बरोबर ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असो.
कुठूनही कुठेही चाललंय....

सर्वसामान्य हिंदू स्त्री च्या दृष्टीतुन त्याच काळात कोण बरे होते? ब्रिटिश कि हिंदू?

विचारलतर ब्रिटिश त्यांच्या देशात काय करत होते सांगत बसलेत.
आणि ते दुसरं आयटम आलं लगेच मस्त प्रतिसाद करत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

लोल. दोन्ही पैलू सांगितलेत ते लक्षात घ्यावे कोणी?

जर ब्रिटिश भारी असतील तर त्यांच्या स्वत:च्या देशात ही अशी मजा.

जर भारत इतका नरक असेल तर स्त्रियांनीही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला तो विरोधाभास.

सबब, या प्रश्नाचे तुम्हांला अपेक्षित असलेले उत्तर उपलब्ध पुराव्यावरून मिळेलसे वाटत नाही. Smile

आणि ते दुसरं आयटम आलं लगेच मस्त प्रतिसाद करत!

क्या बात, असेच वस्तूकरण करत रहा. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्तं प्रतिसाद बॅटमॅन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मस्त प्रतिसाद बॅटमॅन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss

अनुयायांच्या मर्यादेपुढे हतबल होणे म्हणावे असे माझे मत. >> मग एवढ्या हतबल माणसाला फार बाणेदार, कणखर, सिंहगर्जना वगैरे म्हणत का प्रोमोट करतात?

ज्यांच्यासमोर सिंहगर्जना करत (पक्षी: इंग्रज), आणि ज्यांच्यासमोर हतबल होत (पक्षी: अनुयायी), त्या एंटिटीज़ वेगळ्या होत्या, हे लक्षात घेतले असता हा प्रश्न पडू नये.

आणि असा कोएक्झिस्टन्स सहज शक्य असावा. 'गावचे गांडे, नि बायकोचे सरदेशपांडे' ही म्हण कधी ऐकली नाहीत काय? त्याचा बरोब्बर रिव्हर्स सिनॅरियो म्हणता यावा इथे - काय म्हणता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 1. निरागसपणा आणि भोळसटपणा ह्यांत गल्लत होते आहे का? जगरहाटीतून कितीही पोळलेला माणूस असला तरीही त्याच्यात एक कोपरा अलवार असू शकतो. एखाद्या हलकट किंवा पराकोटीच्या सिनिकल माणसात किंवा अगदी निर्ढावलेल्या गुन्हेगारातही ते असू शकतं. संदर्भचौकटीनुसार माणसं वेगळं वागू शकतात. ही गुंतागुंत आहे, पण मानवी स्वभाव पाहता ती अगदीच स्वाभाविक आहे.
 2. वाटेल त्या माणसावर / व्हाटसापवर विश्वास ठेवला नाही, तर त्याला निबरपणा का म्हणावं?
 3. दोन टोकांची मतं असलेल्या माणसांचे काही काही मुद्दे पटले, तर तो दुभंग कसा?
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

निरागसपणा आणि भोळसटपणा ह्यांत गल्लत होते आहे का?

चिंजं, मनोबा ना निरागस आहे ना भोळसट आहे. ऐसीवर तुम्हाला तोडीसतोड फक्त तोच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. अशाच वयाचा मी सुद्दा असल्यामुळे असे अनेक विचार माझ्या मनातही सतत येत असतात .
बर्‍याच दिवसांपासून एक मुद्दा मला मांडायचा आहे. काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्यसैनिक , क्रांतिकारक यांना देव किंवा महामानवाचा दर्जा दिला जायचा. आता प्रत्येकाने ही माणसे वाटून घेतली आहेत आपल्या जाती , धर्म आणि विचारसारणीनुसार. मग प्रत्येक विरोधी माणसाचे फक्त दोषच दाखवले जातात आणि ही माणसे कशी सर्वार्थानं चूक होती आणि वाईट होती असं दाखवलं जातं. पण पूर्वी आणि आता दोन्ही बाबतीत ती व्यक्ती गुणदोषांसकट एक माणूस होती हे कधी लक्षात का घेतलं जात नाही? (त्यांचे गुण जास्त असल्यामुळे आणि ते योग्य रीतीने वापरल्यामुळे ते महान ठरतात.) त्यात तो माणूस कोणत्या परिस्थितीत वाढला , त्याच्यावरचे संस्कार , आजूबाजूचे लोक , आणि तो काळ आणि तेव्हाच्या समाजाची विचारसारणी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत . व्यकती समाजातूनच येत असते . समाज हा सतत काळानुसार बदलत असतो आणि मूल्य आणि beliefs बदलत असतात. त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर होणारच ना? त्याची काही मतं त्यानुसारच घडणार. हे कोणीच का लक्षात घेत नाही ? अमिताभ एका चित्रपटात पोलिस इंस्पेक्टर असतो (नाव आठवत नाही) आणि झीनत अमान एका मवाल्याने पाहून शिटी वाजवली अशी तक्रार करायला येते. अमिताभ तिच्या वेशभूषेकडे पाहून म्हणतो : " बुरा मत मानो, लेकीन अगर आदमी अपना घर ही खुला रखेगा तो चोर तो आयेगा ही ! " (अशा अर्थाचे) आज त्याच अमिताभच्या 'पिंक' मध्ये तो 'नो मीन्स नो इन एनी केस' असे संवाद म्हणतो. इतका समाज बदलला आहे आणि मूल्य बदलली आहेत इतक्या कमी वर्षात. मग स्वातंत्त्र्यपूर्व काळातल्या व्यक्तींकडून प्रत्येक गोष्टीत परफेकशनची अपेक्षा का ? त्यांचे ही अंदाज चुकू शकतात , चुका होऊ शकतात किंवा समजाच्या तत्कालीन धारणेनुसार मते तयार होऊ शकतात. या गोष्टींमुळे त्या माणसाचं संपूर्ण कर्तुत्व मातीमोल ठरवणं कितपत योग्य ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमिताभ एका चित्रपटात पोलिस इंस्पेक्टर असतो (नाव आठवत नाही) आणि झीनत अमान एका मवाल्याने पाहून शिटी वाजवली अशी तक्रार करायला येते. अमिताभ तिच्या वेशभूषेकडे पाहून म्हणतो : " बुरा मत मानो, लेकीन अगर आदमी अपना घर ही खुला रखेगा तो चोर तो आयेगा ही ! " (अशा अर्थाचे) आज त्याच अमिताभच्या 'पिंक' मध्ये तो 'नो मीन्स नो इन एनी केस' असे संवाद म्हणतो. इतका समाज बदलला आहे आणि मूल्य बदलली आहेत इतक्या कमी वर्षात.

विशेषतः अमिताभच्या संवादांच्या तपशिलाबद्दल मनापासून आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टिळक, आगरकर, अमिताभ बच्चन, शाहूमहाराज, शिवाजीमहाराज, भगतसिंग, हिंदुहृदयसम्राट वगैरे चर्चा पाहिल्या की आम्हाला शाळेत असताना 'फ्रेम ऑफ रेफरन्स' की कायतरी शिकवलं होतं त्याची आठवण होते.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा वा , भटोबा , एकदम मस्त !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसेच म्हटले, तर फ्रेम ऑफ रेफरन्सने वाटेल त्याचे समर्थन करता येईल - गुलामगिरीचे, हिटलरचेसुद्धा. (आफ्टर ऑल, हिटलर वॉज़ अ प्रॉडक्ट ऑफ हिज़ टाइम्स. ज्यूंचा द्वेष वा छळ ही थोड्याफार फरकाने तमाम तत्कालीन युरोपातील जनरीतच होती. त्याने फक्त ती लॉजिकल कन्क्लूजनाप्रति नेली, इतकेच. आणि, त्याने जे केले, ते तो जनतेचा पाठिंबा असल्याखेरीज करूच शकला नसता. थोडक्यात, संपूर्ण समाजाचीच ती सायकी होती, आणि हिटलर हा तर निव्वळ समाजघटक होता. नॉट हिज़ फॉल्ट अट ऑल! फ्रेम ऑफ रेफरन्स! फ्रेम ऑफ रेफरन्स!!! वगैरे, वगैरे.) मग?

आणि याचे जे व्हिक्टिम्स होते, त्यांच्या फ्रे. ऑ. रे.चे काय? की ती इतिहासाच्या कार्पेटाखाली लोटून द्यायची?

थोडक्यात, फ्रे. ऑ. रे. ही निव्वळ पळवाट आहे. त्याने गोष्टी पर्स्पेक्टिवमध्ये आणता येतीलही कदाचित (उदा., सुरतेची लूट. टॅक्स कलेक्शन/रेव्हेन्यू जनरेशनची ती तत्कालीन सामान्य पद्धतच होती, शिवाजीने त्यात जगावेगळे किंवा युनीक असे काही केले नाही, सबब या एका मुद्द्यावरून तो जर वाईट ठरत असेलच, तर तत्कालीन इतरांपेक्षा विशेष असा काही वाईट ठरत नव्हता. पण इतकेच.), पण त्याने त्या गोष्टींचे समर्थन करता येऊ नये.

थोडक्यात, ऐतिहासिक व्यक्तींचे आजच्या निकषांवर पुनर्मूल्यमापन करण्यात फारसे काही गैर नसावे. ते पुनर्मूल्यमापन तथ्यतः किती बरोबर वा चूक, क्वालिटेटिवली किती चांगले वा वाईट, यांचे मूल्यमापन करता येईलही, परंतु तो वेगळा मुद्दा. पुनर्मूल्यमापन करणे हे पर से त्यामुळे गैर ठरू नये.
..........
राजकीय बाबतींत गांधीपूर्व काळात टिळकांचे (नारायण पेठेपुरते किंवा पुण्यामुंबईपुरते किंवा महाराष्ट्रापुरतेच नव्हे, तर त्याहून व्यापक हिंदुस्थानी पातळीवरील) नेतृत्व निर्विवाद असावे, परंतु सामाजिक बाबतींत त्यांचे चुक्याच, हे किमान आजमितीस तरी मान्य करावयास अडचण नसावी.

------------

दिल्लीतल्या 'हार्डिंज ब्रिज'चे स्वातंत्र्योत्तर 'तिलक ब्रिज' असे नामांतर टाइम इम्मेमोरियलमध्ये झाले असावे. त्याच्या पुढच्याच 'मिंटो ब्रिज'चे 'शिवाजी ब्रिज' असे नामांतर मात्र तुलनेने परवापरवा झाले. असो.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

"परंतु सामाजिक बाबतींत त्यांचे चुक्याच, हे किमान आजमितीस तरी मान्य करावयास अडचण नसावी." हे किंवा
" यद्यपि काही केसेसमध्ये अजून प्रोग्रेसिव स्टान्स घेतल्यास चाललं असतं." हे एवढच लिहलं असतं तरी पुरेसं होतं.

===
ऐतिहासिक व्यक्तींचे आजच्या निकषांवर पुनर्मूल्यमापन करण्यात फारसे काही गैर नसावे. >> आजच्या निकषांवर तर आहेच पण त्यांच्याच काळात रखमाबाईना आणि संमती वय वाढवण्याच्या कायद्याला पाठिंबा देणारे हातच्या बोटंवर मोजण्याइतके का होईना भारतीय नेते असतीलच की! कि कोणीच नव्हतं? The least Tilak could have done was kept quiet!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

माझा मुद्दा असा नाहीये की हिटलर किंवा टिळकांच्या तत्कालीन फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये ते बरोबर अथवा चूक आहेत की नाही. मुद्दा असा आहे, की टिळकांची फ्रेऑरे बाठांना लावू नये आणि बाठांची टिळकांना. दोघेही चूकच वाटतील. त्यामानाने टिळक-आगरकर ही तुलना योग्य आहे कारण त्यांची फ्रेऑरे निदान सारखी तरी आहे. आता टिळकांच्या मते सामाजिक स्टेटस क्वो ठेवून समाजाची उर्जा/शक्ती स्वातंत्र्यासाठी वापरणे योग्य होते आणि आगककरांच्या मते इंग्रजांची आयती उर्जा/शक्ती वापरून आधी सामाजिक सुधारणा करायच्या आणि पब्लिकला जरा अक्कल आली इंग्रजांच्या गांडीवर लाथ घालून त्यांना हाकलून द्यायचे हे जास्त योग्य होते. आता नंतर काय घडले त्यावरून टिळक तत्कालीन फ्रेऑरेमध्येही चूक होते हे आपण म्हणू शकतो, कारण सामाजिक आणि राजकीय दोन्ही आघाड्यांवर बदल म्युच्युअली एक्स्क्लूझिव्ह नसतात हे आत्ता स्पष्ट दिसतं.

आणि शेवटी कितीही म्हटलं तरी मोठ्या लोकांच्या कामाचं मूल्यमापन हे त्यांच्या पश्चातच जास्त चांगलं होतं कारण नंतरचे लोक त्यांच्या प्रभावातून बाहेर पडून निरपेक्षपणे त्यांच्या कर्याकडे बघू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दा असा आहे, की टिळकांची फ्रेऑरे बाठांना लावू नये आणि बाठांची टिळकांना. दोघेही चूकच वाटतील. त्यामानाने टिळक-आगरकर ही तुलना योग्य आहे कारण त्यांची फ्रेऑरे निदान सारखी तरी आहे.

म्हणजे, दोन व्यक्ती जर एकाच काळात आणि एकाच समाजात वावरल्या नसतील, तर त्यांची तुलना करू नये, असा ह्याचा अर्थ होतो का? अशा प्रकारचे नियम तर्कशुद्ध तुलनेपुढे फार टिकाव धरू शकत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे, दोन व्यक्ती जर एकाच काळात आणि एकाच समाजात वावरल्या नसतील, तर त्यांची तुलना करू नये, असा ह्याचा अर्थ होतो का?

असे नाही. त्याठिकाणी नुसती फ्रेऑरे असणे इतकेच महत्वाचे नसेल तर त्या फ्रेऑरेची व्याप्तीही तितकीच महत्वाची असेल. तुलना करताना फ्रेऑरेचे भान ठेवले नाही तर तुलना अस्थानी होणार नाही का? उदा. एक कट्टर हिंदुत्ववादी टिळक आणि बाठा यांची तुलना करत आहे. त्याने हिंदुत्वाला सपोर्ट या मुद्द्यावर जर फ्रेऑरे विचारात घेतली नाही तर लखनौ अधिवेशनात मुस्लिम लीगला ढील देऊनही डील घडवून आणणारे टिळक (प्रत्यक्षात कितीही जहाल विचारांचे असले तरी) मुंबई दंगलींत महाआरत्यावगैरे घडवून आणणाऱ्या हिंदुहृदयसम्राटांपेक्षा पुचाटच ठरतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@आदिती, धन्यवाद !

@अमुकराव , लिंकबद्दल धन्यवाद !

@भटोबा, लोल, खरय !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरील चर्चेतून असाही एक प्रश्न पडतोय (विशेषत: राजेश यांच्या प्रतिसादावरून) , निरागस म्हणजे बावळट किंवा भोळे का ? एक मूलभूत चांगुलपणातून असलेला विश्वास नंतर भोळेपणा किंवा बावळटपणा बनतो का ? इनोसन्स अस काही नसतच का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0