Making of photo and status : ८. वाळूवरच्या रेघोट्या!

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://www.aisiakshare.com/node/6241

'कोण वसे तुझ्या हृदयी, कळू दे की मला हरीणी.
वाळूवरच्या रेघोट्यानी, सांगु पाहे माझी मानिनी'
आपल्या मनीचे हितगुज आपल्या बापाला सांगू पहाताना एक तरुणी.

Making of photo and status :
मी एकदा माझ्या पत्नी आणि मुलीला घेऊन अलिबाग येथे सहलीला गेलो होतो. समुद्रकिनारी वसलेले अलिबाग हे खरोखरीच एक निसर्गरम्य ठिकाण आहे. तेथे सुंदर सुंदर समुद्रकिनारे, नारळीपोफळीच्या बागा आणि खाण्यापिण्याची रेलचेल आहे. तीन दिवस आम्ही हिंडलो फिरलो, भरपूर मजा केली.

आम्ही खास एक दिवस समुद्रस्नानाकरिता राखून ठेवला होता. त्याप्रमाणे सकाळी हॉटेलवर दाबून नाष्टा केला आणि स्विमिंग कॉश्च्युम घालून समुद्रावर पोहोचलो. ऑड डे असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर अगदी तुरळक गर्दी होती. पाच सहाच कुटुंबे पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत होती. आमचे त्रिकोणी कुटुंब आहे. मुलीला भाऊ बहीण नसल्याने बिचारी एकटीच तिच्यापरीने सहलीचा आनंद ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करीत होती.

बराच वेळ समुद्राच्या पाण्यात खेळून झाल्यावर मी आणि सौ. किनाऱ्याच्या वाळूवर पहुडलो होतो. आमच्या बाजूलाच मुलगी तिथेच सापडलेल्या एका काठीने ओल्या वाळूवर रेघोट्या ओढीत होती. मला उत्सुकता वाटली की ती वाळूवर काय लिहितेय ते पहावे. मी जवळ जाऊन पाहिले तर तिचे वाळूवर उभ्या आडव्या रेघोट्या मारणे चालू होते. मी सहजच तिचा एक फोटो काढून घेतला.

काही दिवसांनी मी आमच्या अलिबागच्या सहलीचे फोटो पहात असताना हाच फोटो माझ्या पहाण्यात आला. आणि माझ्या मनात कुठेतरी क्लिक झालं. मला वाटलं की ह्या फोटोवर काहीतरी स्टेटस लिहावं. मी विचार करू लागलो. आणि मला एक कविकल्पना सुचली. मी कल्पना केली, की एका लग्नाच्या वयाला आलेल्या मुलीच्या बापाला तिच्याकरिता सुयोग्य वर शोधायचाय. त्यापूर्वी तो मुलीच्या हृदयात कोणी राजकुमार भरलाय का याची तिच्याकडे चौकशी करतो. पण मुलगी स्त्रीसुलभ लज्जेने आपल्या मनातले बापाला सांगू शकत नाही. म्हणून ती समुद्रकिनाऱ्यावरल्या ओल्या वाळूवर रेघोट्या ओढून आपल्या बापाला सांगू पहाते. आणि बाप ते जाणण्याचा प्रयत्न करतो. यावरून मला कवितेच्या पुढील ओळी स्फुरल्या.
'कोण वसे तुझ्या हृदयी, कळू दे की मला हरीणी.
वाळूवरच्या रेघोट्यानी, सांगु पाहे माझी मानिनी'...........

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

तुमचा हा धागा बघण्या/वाचण्यासाठीच रवीवारी सकाळी सकाळी ऐसीवर येते मी सचिनदादा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ अनु राव, आपणांसारख्या वरिष्ठांकडून मला पसंतीची पावती मिळाली आणि माझे मन भरून आले. आपल्या प्रतिक्रियेवरून मी योग्य वाटेवर चालत असल्याची मला खात्री पटली. आपले खूप खूप आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

अनुतै, मी पण रविवारी सकाळी चहा बरोबरच आधी कुंडलकर सर आणि मग काळे सर यांच्या ब्लॉग ची वाट बघत बघत असतो . एकवेळ चहा गार होतो , पण हे ब्लॉग्स कायम हॉट च असतात.
तुमच्यासारख्या वरिष्ठ व्यक्ती ची ही तशीच परिस्थिती आहे बघून आनंद झाला . माझीही वाटचाल नीटच चालू असणार .
काळे काका आगे बढो , हम तुम्हारे साथ है .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ अबापट, काळे काका आगे बढो , हम तुम्हारे साथ है . >>> आपले खूप खूप आभार! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

वाळूवरच्या रेघोट्या पाहून अंदाज घेता तो नियोजित वर 'अॅरागॉग'च्या कुळातला असावा.

बाकी अनुरावांशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

@ आदूबाळ, वाळूवरच्या रेघोट्या पाहून अंदाज घेता तो नियोजित वर 'अॅरागॉग'च्या कुळातला असावा. >>> हा! हा!! हा!! मी वर जाऊन फोटोतील वाळूवरच्या रेघोट्या पुन्हा नीट निरखून पाहिल्या. Smile

बाकी अनुरावांशी सहमत. >>> आपले खूप खूप आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय? वाळूवरच्या केवळ रेघोट्या. आपल्याला मिळालेल्या साडेतीन हात मातीवर निष्ठेने मारायच्या इतकंच आपल्या हाती असतं. त्याचं फलित काय विचारायचं नाही हे कृष्णानेच सांगून ठेवलेलं आहे. काही लोक गिचमिड काहीतरी लिहितात तर काही लोक सुंदर कलाकृती निर्माण करतात. पण सगळ्यांच्या ललाटी शेवट एकच लिहिलेला असतो. भरतीची एक लाट आणि किनारा पुन्हा सपाट. नवीन रेघांसाठी.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ राजेश घासकडवी, फारच सुंदर लिहिलंय. आवडलं!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

मला खरच आवडलं. खूप सुरेख लिहीले आहे दावण्यप्रतापार्क घासकडवी जी Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दावण्यप्रतापार्क

इथे महान खावचट्य दिसले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ अचरटबाबा, आपले आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

हे गृहस्थ पहा, कसे अंगठा वर करून त्या दुसर्‍या गृहस्थांना पसंतीची पावती देत आहेत. "कुठून हो असला आयटम गटवलात? काश हमारा ऐसा नसीब होता" असंच म्हणत आहेत, हो की नाही? यावरून मला कवितेच्या पुढील ओळी स्फुरल्या.

अशीच असती अमुची पत्नी सुंदर रूपमती
नांदवली अम्हीही असती तिज, वदले दिल्लीपती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

प्रतिसाद चालू
................
चांगलाय फॅमिलीचा छंद.
................
प्रतिसाद संपला
.
हा!हा!!हा!!! धन्यवाद. अगदी खरेय. आम्हा फॅमिलीला छंदच आहे आणि आम्ही तो जोपासतो.
(तुमचा त्रास वाचवला, त्याला परत धन्यवाद म्हनू नका)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2