हे सव्यसाची,

खुणावतील तुला जटिल गणिते-
आदिस्फोटाच्या प्रसववेणांची

हाकारतील तुला कोडी-
विस्कळखाईत क्षणोकणी होणार्‍या
विश्वाच्या अटळ अंताची

या अपार भूतभविष्यादरम्यान
लीलया झुलणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका
कुठे खिळवलाय, हे सव्यसाची?

तो इथेय बघ,
निळ्या पाखरपंखावर
अथक थिरकणार्‍या
क्षणभंगूर वर्तमानात

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुंदरच!!! फारच आवडली. तुमच्या कविता संग्राह्य आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गहन! रसग्रहण अपेक्षित..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विस्कळखाईत क्षणोकणी होणार्‍या

जी.ए. च कविता लिहायला लागले की काय, असं वाटलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच लता
बाकी साऱ्या लापता|

..शुचि, फुटकळ, तिरशिंगराव - आपल्या प्रतिसादांबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

तुमचा कॅलिडोस्कोप भलताच जोरदार होत चालला आहे. हा प्रकार फार आवडतो. अजून कवितांच्या अपेक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माणूस म्हणून बोल साला जीव काढून देईन.
- लक्ष्मी शैला

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)