उदासगाणी

चार महिने या खोलीत मी राहतो आहे, तितक्या रात्री मी इथे जागवल्या आहेत. आज उद्याची शेवटची रात्र असणार आहे. काहीही धड हाती न लागता इथून मी निघणार आहे, तरी पण, हा ‘पण’ जमा केलेल्या इथल्या आठवणींना माझ्या मनात उभा करतो आहे. मला माझं गवसण्याच्या अडनिड्या प्रयत्नात ही खोली आता एक भाग झाली आहे. कित्येक गाणी इथे मी ऐकली असतील, ठराविक गाण्यांच्या रिंगणात रात्री गेल्या खऱ्या, त्यातून मला उदास गाण्यांचेच वेड लागले आणि मग त्या जोडीला पैसे कमवायला काही कामे मिळवता येतात का, त्यासाठी कित्येक गोष्टींना नेटवर जोखून पाहिले असेल. सप्टेंबरच्या परीक्षेचा पास निकाल इथेच पाहिला. डिसेंबरच्या परीक्षेच्या अभ्यासाला या खोलीत तर पालवी फुटायला सुरुवात झाली होती खरी पण आता त्या पालवीला नाजूक हातांनी उचलून त्या परीक्षेला पास करावे लागणार आहे. जी ती उदास गाणी माझ्यात रूतून बसली, संग्रहात तेवढीच राहिली आहे आणि त्यांना व्यक्तिगत रूप मिळाले आहे, त्या गाण्यांना भर मित्रांच्या मेळाव्यात स्थान नाही आणि म्हणून कुणी मला माझ्या संग्रहातले गाणे लावण्यास सांगितले तर माझी नाचक्की ओढवण्याचा प्रसंग निश्चित आहे. अश्या गाण्यांना केवळ मनात स्थान असते, आणि हे मन मी माझ्या लिहिण्यातून व्यक्त करतो. त्या गाण्यांचे ओघ मला छळत असतात; कधी दिवसा त्या ओळी मनावर उमटल्यावर माझे डोळे पाणावतात आणि तेच रात्रींत ऐकत ऐकत त्यांचा लख्ख प्रकाश काचत राहतो. ही तेजाळ गाणीच खरी, अंधाराचे वर्णन करत करत जीवनात प्रकाशाचे अस्तित्त्व जाणवून देणारी, मनाला त्याच्या संवेदनांची ओळख करून देणारी. कोणाचाच विरह नाही, मनावर उदासी नाही पण या जीवनाच्या बेरोजगार दिशाहीन अस्थिर टप्प्यावर तरी खोलवर ह्या गाण्यांनी मला शांत करणे हे एक वेगळेच वाटते आहे, त्यांनी माझी कसली तरी परतफेड केली असे वाटते आहे. कधी नदीच्या प्रवाहात किंवा समुद्राच्या लाटांमध्ये दगड भिरकावा, वाऱ्याचा वेग कानांनी तासन् तास ऐकत राहावा त्याप्रमाणे मनाच्या डोहात माझं मीपण भिरकावून द्यावे, मनाच्या वेगाने जीवन आयुष्यभर पेलावे आणि त्या दगडाचे भविष्य आपल्याला जसे माहिती नसते, तसे माझे भविष्य अगदी मनाच्या कोलाहलात विलीन, नामशेष व्हावे असे वाटते आहे. उंच एकच उडीने दरीच्या आत उतरून सारेच संपवावे वाटते आहे. सभोवतालचा एकेक कण आपल्याला आव्हान देत आहे, असा अनुभव जाणून घेणे माणसालाच का निसर्गाने दिले असावे. डोंगर नद्या समुद्र दऱ्या न् त्यासभोवताली सोबतीला सजीव सचेतन जीवसृष्टी वेढून असणे आणि त्यांच्या अस्तित्वाचे सातत्य असणे माणसाव्यतिरिक्त कोणत्याही जीवाला स्फूर्ती देत नाही, आणि ह्या शाश्वत स्मारकांना ऋतूंचे कोंदण लाभले आहे हे जाणवणे आणि ते साजरे करणे सुद्धा केवळ माणसालाच का येत असावे. अश्या प्रेरणेने एक दिव्य आयुष्य जगणे माणसाला शक्य होत असते. आता तर असे होत आहे की ही शाश्वततेची रूपं एका बाजूला राहिली आहेत, आणि त्यामुळे चेतनहीन स्थिती, नैराश्य आले आहे. प्रतिशाश्वत रूपं म्हणवणारे जे की पुढची एकच पिढी फारतर टिकेल अशी एका बाजूला सभोवताली व्यापत आहे, आणि त्यांचा मला एक प्रचंड त्रास होत आहे. पण जरी सभोवताल प्रेरक नसला तरी मनाला शाश्वततेची ओढ थोडीच मागे हटणार आहे, ती या गाण्यांनी मी भरून काढत आहे. जीवन तत्क्षणी थांबावे किंवा माणसांचा तिटकारा यावा इतपत या गाण्यांना मी जवळ केले आहे.

हँसने की चाह ने कितना मुझे रुलाया है
कोई हमदर्द नहीं, दर्द मेरा साया है

दिल तो उलझा ही रहा जिंदगी की बातों में
साँसे जलती हैं कभी कभी रातों में
किसी की आह पर तारों को प्यार आया है

सपने छलते ही रहे रोज नयी राहों से
कोई फिसला है अभी अभी बाहों से
किसकी ये आहटें, ये कौन मुस्कुराया है

– कपिल कुमार, ‘आविष्कार’ चित्रपट १९७४

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आज उद्याची शेवटची रात्र असणार आहे. काहीही धड हाती न लागता इथून मी निघणार आहे,

कुठे जाणार आहात? एकंदर सूर नैराश्यजनक वाटला म्हणुन चटकन विचारते आहे. प्रतिक्रिया सवडिने देइन.

जीवाला घोर लावू नका हो! नक्की हे काल्पनिक आहे की सत्य?

सत्य असेल तर थांबा ऐसीकरांशी बोला. कोणाशीही फोनवरही बोलू शकता.

आय होप हे ललित काल्पनिक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल्पनिक नाही, सत्यच आहे. त्या खोलीतून निघून दुसऱ्या खोलीत जाणार आहे एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खोली? ओके. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असो. आम्हाला तुमच्या लेखनातली 'खोली' ओळखता आली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

असो. पण खोलीत आगमन नक्कीच करू शकता..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFLROFL
खोली = डेप्थ्
मी ही अर्थ खोलुन सांगीतला Wink हाकानाका

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0