कळी म्हणते कळीला...

कळी म्हणते कळीला

कळी म्हणते कळीला 
उद्या मी होईल फुल गळेल मग
पाकळया सार्या नेईल 
कोणीतरी मजला चुरगळून ...
  
किती छान वाटतं जेव्हा कोहळं
हे बालपण पानाच्या गर्द 
हिरवाळाईत डुलतं पण कळीच जेव्हा फुलं होतं
तेव्हा इतराच्या नजरेत भरतं....

स्त्री आणि कळी 
यांचा मिलाप किती जुळतो 
दोघीच्याही वाट्याला खुटून नेण्याच दुख: मात्र
माणसाकडूनच मिळतं....

फांदीवरच्या देठावर फुल नाही रहात
रहातो तो त्या कळीचा संवाद जो  निर्थकळ पण
अर्थपूर्ण वाटतो समजून घेतला ना हा साम्यवाद 
तर काळजाला लागतो ....

शेवटी कळी म्हणते.......
कळीला ,
        चुरगळून नेणार्यां मनमौजजिंनी
केला हाच एक विचार फांदीला ही 
फुल दिसते कीती छान ....!!

झाड म्हणजे विश्व त्या फुलाचं
गर्दीत नाही त्यांच्या वैफल्य कशाचं
शेवटी फुलं ही देते ना 
फळांना जन्म ..॥

अधोरेखित एक विधीलिखित होते 
पुर्ण इथे  कळीचा संवाद लागू होतो 
स्त्री मनाच्या विश्वव्यापी 
अभुतपूर्णांईला जिथे.... 
   

   @ - कोमल प्रकाश मानकर
   
        

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला खालील शब्दांचे अर्थ :
कोहळं, हिरवाळाईत, निर्थकळ, हा साम्यवाद, मनमौजजिंनी, अभुतपूर्णांईला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोहळं: एका प्रकारची फळभाजी. (पाहा (मोल्सवर्थातून): कोहळा, कोहाळा, कोहोळा: See कोव्हाळा. कोव्हाळा m कोव्हाळें n: A pumpion gourd, Cucurbita Pepo.) ('आवळा देऊन कोहळा काढणे' हा वाक्प्रचार आपण ऐकला असेलच.)

हिरवाळाईत: हिरवळ आणि वाळा यांची बागाईत. (डबल) पोर्टमँटो शब्द आहे हा.

निर्थकळ:
याचा अर्थ सांगण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी (ईईईईईईईई!) सांगतो. फारा वर्षांपूर्वी, आमच्या बालपणी, एकोणीसशे सत्तरच्या दशकात इ.इ., 'किशोर' मासिकात मानवाच्या उत्क्रांतीसंबंधी एक लेखमालिका प्रकाशित झाली होती. त्यातील निअँडरथॉल मानवासंबंधीच्या लेखात त्याच्या नावाचे मराठीकरण 'निंदरथळ' असे केलेले होते. (त्यानंतरच्या क्रो-मॅग्नॉन मानवाचे मराठीकरण 'क्रूमग्न' असे केलेले होते. अर्थात, कार्बनचे 'कर्ब' नि नैट्रोजनचे 'नत्र' करणाऱ्या संस्कृतीस हे साजेसेच होते म्हणा! किंबहुना, नसते केले, तरच आश्चर्य वाटले असते. तर ते एक असो बिचारे.)

हां, तर 'निर्थकळ'चा अर्थ. A specimen of the Neanderthal species who particularly makes no sense. हा 'निंदरथळ' आणि 'निरर्थक' यांचा पोर्टमँटो शब्द मानता यावा.

हा साम्यवाद: कमॉन, कॉम्रेड! तुम्हाला साम्यवादाचा अर्थ ठाऊक नाही? आजपावेतो तुम्हाला कोणी सरकारी खर्चाने सैबेरियाच्या दौऱ्यावर पाठविले नाही काय?

मनमौजजिंनी: मनमौजी मनमोहनजींनी. (कवयित्रीला पोर्टमँटो शब्दांचा भारी षोक दिसतो. अर्थात, हे वाईट आहेच, अशातला भाग नाही. 'अॅलिस इन वंडरलँड'चा जनक ल्यूइस कॅरॉललासुद्धा होता. कवयित्रीचे शुद्धलेखन भयंकर आहे, हा दुसरा भाग, परंतु तो आजकालच्या पिढीचा स्थायीभाव आहे, चालायचेच. असो.)

अभुतपूर्णांईला: प्रत्येक शब्दास अर्थ असलाच पाहिजे, असे नक्की कोठे म्हटलेले आहे? दाखवा पाहू! (मनुस्मृतीत तरी असा काही उल्लेख निदान माझ्या माहितीप्रमाणे तरी नसावा. (चूभूद्याघ्या.)) 'इफेक्ट' (परिणाम) साधल्याशी मतलब. (गेला बाजार, कवयित्रीच्या कानांना तसे वाटले पाहिजे.) शेक्सपिअरसुद्धा हेच तंत्र वापरीत असे.

..........

तळटीपा:

कॅरॉलसाहेबास लहान मुलींची नागडी चित्रे/फोटो काढण्याचासुद्धा छंद होता म्हणतात. किंबहुना, त्याची 'अॅलिस' ज्या खऱ्या मुलीवर बेतली होती, तिचेसुद्धा त्याने नागडे फोटो काढले होते म्हणे. अर्थात, तो जमाना वेगळा असल्याकारणाने तुलनेने फारसा गदारोळ न होता खपून गेले म्हणा. अनेकांना त्यात निरागसतेच्या छटेची शक्यता दिसली१अ. तर काहीजण 'He probably felt more than he dared acknowledge, even to himself' असा 'बेनेफिट ऑफ डाऊट' त्याला देऊ शकले (इफ दॅट इज़ अ बेनेफिट ऑफ डाऊट अॅट ऑल). कालाय तस्मै नमः। असो, हे अवांतर झाले.

१अ अॅलिसच्या निरागसतेबद्दल माझ्याही मनात संदेह नाही.

गुरुवर्य वुड्डहौससाहेबाचे - त्याच्या पात्रांकरवी व्यक्त केलेले - एक सुप्रसिद्ध विधान आहे: 'It's like Shakespeare. Sounds great, but does not mean a thing.'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त कविता कोमल्तै.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समजून घेतला ना हा साम्यवाद
तर काळजाला लागतो ....

हे एकदम काळजाला भिडलं, कॉम्रेड.

कळलं का गब्बर?

- साथी ए० बाळ, शॉलिट ब्युरो

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मला मजला चुरगळायचा एफेसायवाद अधिक आवडला.
ग्रेटच कविता.
सुरुवातीलाच कोहळं लावलंय, नजर लागायची भीतीही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>मला मजला चुरगळायचा एफेसायवाद लोल. खुटून नेलं तुमी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

हे एकदम काळजाला भिडलं, कॉम्रेड.
कळलं का गब्बर?

अगदी.

ही कविता वाचल्यावर माझी कुंडलीनी जागृत होऊन .... त्या इडापिंगलेतून प्रवास करून क्षणार्धात तिचे आत्म्याशी मिलन झालं.

आप भी इतना समझ लें, मुझको समझाने के बाद,
आदमी मजबूर हो जाता है, दिल आने साम्यवाद समझने के बाद,

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'तू कशी कळकट
मी कशी छान!'

(संदर्भ/प्रेरणा: फारा वर्षांपूर्वी - आमच्या बालपणी, एकोणीसशे सत्तरच्या दशकात - 'किशोर' मासिकात प्रसिद्ध झालेली एक (मोठ्या माणसाने लिहिलेली) बालकविता.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फांदीवरच्या देठावर फुल नाही रहात
रहातो तो त्या कळीचा संवाद जो निर्थकळ पण
अर्थपूर्ण वाटतो समजून घेतला ना हा साम्यवाद
तर काळजाला लागतो ....

ह्या पुर्ण कडव्यात (कि परिच्छेदात?) मधे मधे घालायचे पूर्णविराम एकदम शेवटी घातलेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

मला वाटलं होतं कोणी काही बोलणार नाही. ज्यायोगे नवकविंना उत्तेजन मिळेल. पण हाय रे दैवा! कुठे नेऊन ठेवलीये माझी ऐसी!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुचि मी चांगला पॉझीटिव्ह प्रतिसाद दिला होता की नाही, पण बाकी ऐसीवर फारशी माणुसकी शिल्लक च नाही राहिली,

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु तुझा प्रतिसाद आवडला. मी व तू आपणच फक्त रसिक इथे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे बाकी बरंय हो शुचितै अन् अनुतै. बैदवे...असो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

कविता फारच आवडली. व्यक्तीगत पातळीवर सुरु झालेली कविता हळूहळू वैश्विक होत जाते व शेवटी तर ती स्त्रीमुक्ती व साम्यवाद दोहो कवेत घेते. अप्रतिमच. कोलमलताई तुम्ही कविता जरुर टाका इथे. आणि अन्य खवचट कमेंङटकडे दुर्लक्ष करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्त्रिया आणि फुलांची तुलना गंडली आहे. फुलं सहसा कळी असताना चुरगळली जात नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Liberalism is a mental disorder

कवितेचा आस्वाद घेताना शुद्धलेखनाचा आग्रह धरु नये. त्यामुळे कोमल कळ्यांना ठेस लागते. 'मोकलाया दाही दिशा' कसं डोक्यावर घेतलं ?

तेंव्हा कुठे गेला होता रसिकसुता तुझा धर्म ? आँ ?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

कविता अंमळ अवघड वाटली
चांगलीच असावी ---

अवांतर आहे पण हे गाणे आठवले .
https://youtu.be/sJgYbEa_Jso

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||

कोमल तै ,
गर्दीत नाही त्यांच्या वैफल्य कशाचं
ही ओळ हृदयाला भिडली , पण फार नाही कळली .
या ओळीचे रसग्रहण करून सांगाल का ?
धन्यवाद ,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि सचिन दादांच्या जीवावर ऐसी उभी आहे अशी प्रतिक्रिया वाचली,
ही कविता वाचल्यावर प्रत्यय आला.
टीप: मोकलाया दाही दिशा नक्की वाचा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

"काव्यसुधारसपान करण्यापासून स्वत:ला हेतुपुर:सर वंचित ठेवणाऱ्या अनेक ऐसीकरांना या कवितेने आकृष्ट तर केलेच शिवाय तिची समीक्षा करणे भाग पाडले हेच या कवितेचे बलस्थान होय" एवढे नोंदवून मी ......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अगदी हेच ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता भारी, आमच्या आऊसाहेबांच्या गावच्या तुम्ही,
अस्स माहेर सुरेख बाई हे ठणकावून सांगितलेलं असताना तुमची कविता पण सुरेख च असल्यात जमा आहे.
(बाकी काय म्हणाय्ची आमची काय बिशाद !)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.