Making of photo and status : ९. जाऊँ क्या खंडाला!?

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://www.aisiakshare.com/node/6241

येऊ का आता? लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी. पाहून तर येतो, आमिर खान बायांस्नी का म्हुन सारखं खंडाळ्याचं आमंत्रण देऊन रहातो ते!

Making of photo and status :
मी आंतरजालावरून घेतलेल्या वरील फोटोत काय दिसतंय ते पहा बरं!!? त्यात एक जोडपं दिसतंय ना? त्यांच्या गळ्यात असलेल्या हारावरून आणि एकंदर पेहरावावरून त्यांचं नुकतंच लग्न झालेलं वाटतंय ना? जोडपं जरा गावकडचं असावं. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे अभिर्भाव तर किती मजेदार दिसतायत नाही!!? डोक्यावर पदर घेतलेली नवरी कित्ती नाजूक साजूक वाटतेय. तिचे टपोरे डोळे नववधूसारखे बावरलेले वाटतायत. ओठांचा केलेला चंबु तर खासच दिसतोय. आणि चेहऱ्यावर रुळणार्या बटेने तर नागिणीसारखे वेटोळे घेतलेत. तसेच डोक्याला मुंडासे बांधलेल्या नवरदेवाच्या जाड भुवया, सुपासारखे कान, आणि फुगीर नाक त्याच्यातील राकटपणा दर्शवितोय.

हा फोटो पाहून मला असं वाटलं, की नुकतेच लग्न झालेले त्यातील नवरा नवरी हनिमूनला जाताना कोणाचातरी निरोप घ्यायला दोन क्षण थांबलेत. बस्! मी ठरवलं की आपण ह्या त्यांच्या निरोप घेण्याच्या प्रसंगावरचंच स्टेटस लिहावं. दोघेही गावाकडचे वाटत असल्यामुळे स्टेटसची भाषा मी मुद्दाम गावरान निवडली आणि स्टेट्सच्या सुरवातीलाच पहिलं वाक्य लिहिलं "येऊ का आता?" आपण निरोप घेताना म्हणतो ना अगदी तसं! पुढे लिहिलं "लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी." या वाक्यावरून वाचकांना मी कन्फर्म करून दिलं, की या जोडप्याचं नुकतंच लग्न झालंय आणि ते खंडाळ्याला हनिमूनला जायला निघताना आपला निरोप घ्यायला थांबलेत.

आता मी त्या जोडप्यांकरिता 'खंडाळा' हेच हनिमूनचं ठिकाण का निवडलं असावं? कारण मला स्टेटसमध्ये जराशी गंमत आणायची होती. खंडाळा म्हटलं तर आपल्याला काय आठवतं बरं? अगदी बरोब्बर!! आपल्याला 'आमिर खान'चं तुफान गाजलेलं 'आती क्या खंडाला?' हे गाणं आठवतं. बस् ! मी त्या गाण्याचा आणि आपल्या स्टेटसचा संबंध लावून टाकला. आणि नवरदेवाच्या तोंडी उपहासाने एक वाक्य टाकून दिले, की "पाहून तर येतो, आमिर खान बायांस्नी का म्हुन सारखं खंडाळ्याचं आमंत्रण देऊन रहातो ते!" म्हणजे पहा! नवरदेव किती खोडकर आहे ते!! त्यालाही माहितेय ते आमिर खानचं गाणं आणि त्यातील गंमत.

इथे झालं की मग आपलं फोटोवरून स्टेटस तयार! फोटोमध्ये कुठल्याही प्रकारचे स्पष्ट निर्देश लिहिलेले नसतानाही मी त्या फोटोला अजूनच मजेदार करून टाकलं. प्रत्येकाचा एकाच गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. तुम्हीही तुमची कल्पनाशक्ती वापरून ह्याच फोटोवर एक संपुर्ण वेगळं स्टेटस लिहू शकता. बघा बरं प्रयत्न करून. पण ते मला कळवायला विसरू नका हं!

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त सचिनदादा. आज उशीर झाला
तुमचे हे धागे कायप्पावर शेअर केले तर चालतील का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सचिन दादा आणि कोमल तै या दोघांच्या धाग्याच्या जीवावर ऐसी उभे आहे . ऐसी चे दोन आधारस्तंब.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ अबापट, सचिन दादा आणि कोमल तै या दोघांच्या धाग्याच्या जीवावर ऐसी उभे आहे . >>> एवढी माझी योग्यता नाही हो! असे म्हणून आपण मला लाजवताय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ते आम्हालाही माहीत आहे हो. पण असे म्हणायची आपली एक पद्धत असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण3
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ 'न'वी बाजू, हा! हा!! हा!! लई भारी!! दोघांची पद्धत आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

@ अनु राव, काही वैयक्तिक कारणामुळे उशीर झाला. तुम्हाला वाट पहावी लागली ह्याकरिता माफी मागतो. आपल्या लेखाची कोणीतरी वाट पहाणारा आहे, अशा सुदैवी लोकांत आपल्यामुळे मी माझी गणना करेन. हो! आपण कायअप्पावर जरूर शेअर करू शकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यावेळचं स्टेटस मजेशीर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ ..शुचि, आपल्याला आवडलं हे वाचून आनंद झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

हा हा हा!
चित्र आपणच काढलंत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ भाऊ, नाही हो! हे चित्र मी आंतरजालावरून घेतलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरर..मंग लिहा की राव तसं.
मला वाटलं तुमच्या गोलुमोलूसारखं हेही तुम्ही काढलं आहे..!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ भाऊ, ok, तुमच्या सूचनेनुसार मूळ लेखात तसं लिहिलंय. गोलुमोलुची तुम्हाला आठवण आहे, हे वाचून आनंद झाला. आणि मी तुम्हांस सांगू इच्छितो की तेही चित्र मी काढलेले नाही. सवड मिळताच त्या लेखातही मी योग्य तो बदल करेन. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

तुम्ही दिवाकरांच्या नाट्यछटा वाचल्यात का हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

@ राव पाटील, 'दिवाकरांच्या नाट्यछटा' हे दोन शब्द ओळखीचे आहेत. बऱ्याच वर्षांनी ऐकले. मी मूळ पुस्तक वाचलेले नाही, पण आम्हाला लहानपणी शाळेत मराठीच्या पुस्तकात एक धडा अभ्यासाला असावा असं अंधुकसं आठवतंय. नक्की नाही सांगता येणार. का हो????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

काही विशेष कारण नाही, सहजच विचारलं. प्रतिक्रियेच्या विषयात नमुदलेले वाक्य, आणि त्यानंतर विचारलेला प्रश्न अगदी सहजच सुचलं. असो!
तर हा! हा!! हा!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

Double post

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

Triple post

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ट्रिपल पोस्ट झाली की ओ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ अनु राव, खरंच की हो!!! हा! हा!! हा!!
नेट प्रॉब्लेम, योग्य बदल केलाय. पहा बरं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

हा!हा!!हा!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सकाळी पार्कात चालतो तो हुच्चभ्रु लोकांचा हाहाकार आठवला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

फोटो कसा शोधला पण तुम्ही? फोटो पाहून स्टेटस मनोरंजक सुचलंय मात्र. पुढच्या रविवारच्या प्रतीक्षेत. मी हा फोटो आणि स्टेटस शेअर केलंय. मला मात्र कुठं कुठं जायचं हनिमूनला हे गाणं आठवलं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

@ नील लोमस, आपल्या प्रांजळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार! आपण बिनधास्त शेअर करा.

फोटोच्या निवडीविषयी प्रस्तावनेत मी सविस्तर लिहिलेय. तरी आपल्या माहितीकरिता ते येथे पुन्हा डकवीत आहे.

मी रोज माझ्या प्रोफाइल फोटोमध्ये एक फोटो डकवत असे, आणि स्टेटसमध्ये त्या फोटोसंबंधी काही चविष्ट लिहीत असे. प्रोफाइल फोटो मी कुठूनही मिळेल तिथून घेत असे. काही फोटो आंतरजालावरून घेई, तर काही मी स्वतः काढलेले असत. तसेच काही स्वतःचे, कुटुंबाचे आणि मित्रांचे असत. फोटोबाबत असा काही विधिनिषेध नव्हता. बस! फोटो मनात कुठेतरी क्लिक व्हायला हवा. मग मी तो माझ्या संग्रहात ठेवायचो आणि रोज एक फोटो घेऊन पाऊण तासाच्या माझ्या लोकल प्रवासात त्यावर स्टेटस लिहायचो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

याविषयीची उत्सुकता इतर शिनियरांनाच फार असते. वेळीच तिकिटं / बुकिंग करून ठेवतात. उलट त्यांनाच टुअरवर पाठवले तर दुधात साखर.*१

*१ हा वाक्प्रचार बय्राच दिवसांनी वापरला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@ अचरटबाबा, Lol

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

का कोण जाणे, मला हे लोक उत्तर भारतीय वाटले. त्यामुळे 'आती का पटियाला' जास्त बरोबर वाटेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मला बिहारी जोडपे वाटले विशेषत:बायको वरुन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

एक ''आयुर्हीत'' म्हणून होते, त्यांची आठवण झाली. ......

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0