रमलखुणांची भाषा

जरी तुटले आतून काही,
तरी नकोस ओळख देऊ
जाताना थांबून थोडे,
तू नकोस मागे पाहू

दिसतील अनाहूत इथल्या,
सावल्या गडद होताना
हुरहुरत्या संध्याप्रहरी,
पावलांत घुटमळताना

पारावर तेवत असता,
फडफडेल इथली दिवली
मग उरेल काजळमाया,
शोषून स्निग्धता सगळी

ते वादळ येईल फिरुनी,
पण सावर तोल जरासा
ओठींचे स्मित लपवूदे,
श्वासातील खोल उसासा

ते विसर उमाळे इथले,
पुसताना प्राक्तनरेषा
उलगडेल अवचित अवघी,
मग रमलखुणांची भाषा.....

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान्

जरी तुटले आतून काही,
तरी नकोस ओळख देऊ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कातरवेळ लैच बेक्कार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं होत, टुकार होतो...
ना भावना होत्या, ना ओघाने होणारा ञास...
अंगामध्ये धमक होती...आणि ना कुणाची आस...

पण रमलखुणा म्हणजे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

(figurative) : a peep into future.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

लहानपणी चंद्रकांता मालिका पाहिली नाहीत वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहायली ना. त्यातल्या पंडितराज जगन्नाथामुळे रमल काय ते माहीत होतं. 'रमलखुणा'चा अर्थ 'त्या खेळाचं आउटपुट, पक्षी: संकेत' असा वाटत होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

सुंदर आहे कविता.. आवडली!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली. जीएसंदर्भ नेमके आलेत. ("पावले जरी दूर भटकत गेली तरी तुझ्या जुन्या आठवणींची बुत्ती सतत जवळ राहिली आहे...")

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता जमली आहे.
अश्या कविता पाडायची रेसिपी तशी फारशी अवघड नाही. ग्रेसभूल आणि जी.ए.भूल पडलेले रसिकजन वाहवा म्हणतील अशा कविता कुणी पाडू लागले की मला हटकून डार्कलॉर्ड जिवंत करायची रेसिपी आठवते.
दोन ओळी संध्या*** (छाया, माया, काया, ओंजळ)
दोन ओळी आदिमाय
दोन ओळी प्राक्तन नशीब ललाट रमल
स्वादानुसार आठवण उसासा आवंढा
(ग्रेस चाहत्यांसाठी) थोड्याश्या भावल्या, कावळे
इत्यादी इत्यादी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डार्कलॉर्ड जिवंत करायची रेसिपी

फ्लेश ऑफ अ सर्व्हंट, विलिंगली गिव्हन ...

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

डार्कलॉर्ड जिवंत करायची रेसिपी आठवते.

हा हा हा. काय उपमा!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हा कॉमन सेन्स आहे. ग्रेस, जीए काय कॉपिराइट घेउन बसलेत काय. नसेल जिलबी आवडत तं खाऊ नै.
कविता छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं होत, टुकार होतो...
ना भावना होत्या, ना ओघाने होणारा ञास...
अंगामध्ये धमक होती...आणि ना कुणाची आस...

ऐसीवरील पाकक्रियापारंगतांनी (माहितीपूर्णरीत्या) व त्यांच्या अनुमोदकांनी (मार्मिकरीत्या) माझ्या काव्य-कोंबडीतील मालमसाल्याचे जे अचूक (मोज)माप काढले आहे त्यानुसार ही कविता येथून काढून पाक-कृती या सदरात टाकावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

भारतात किंवा भारताबाहेर राहून पाक-कृती???? जावा पाकिस्तानात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तसं ऐसी पण काय खराब नाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

हा हा हा, सहीच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...जावाबद्दल बोलताहेत.

(चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मिळणार नाही!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण3
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

जावा पाकिस्तानात.

असे आहे होय!

आणि मग भारत काय, मायक्रोसॉफ्ट शॉप आहे काय?

(चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मिळणार नाही!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.