आकाश, सागर आणि धरती

आकाश, सागर आणि धरती

निळ्या आकाशी
मेघांची गर्द दाटी
सांज प्रकाशी

सागर लाटा
वसुंधरेला छेडी
अंधार वाटा

धरती नटे
नभाचा केला साज
सागर गाज

शांत ते रुप
सागराचे बघून
आनंद खूप

धरा नटली
सागराचे संगीत
नभाचे गीत

भेटीची ओढ
धरेला गगनाची
मिलन गूढ

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बॅटोबा, हे कुठले वृत्त आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या वृत्ताचे लक्षणगीत नाही. एखादे काव्य वाचल्यावर/ऐकल्यावर 'जळ्ळं मेलं लक्षण' असे मनात आले की ते रलाटवृत्त होय. दर एका ओळीनंतर (कपाळावर हात मारून) यती असते.
एका सिद्धहस्त लेखकांनी सुरु केलेल्या 'दवणरचना' ह्या साहित्यप्रकारात, पद्यामध्ये हे वारंवार दिसते. यमक ह्या अलंकाराचा त्यात बराच अंतर्भाव असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss

एका सिद्धहस्त लेखकांनी सुरु केलेल्या 'दवणरचना' ह्या साहित्यप्रकारात, पद्यामध्ये हे वारंवार दिसते. यमक ह्या अलंकाराचा त्यात बराच अंतर्भाव असतो.

या साहित्यप्रकारास 'रलाटलिखित' अशाही नावाने ओळखले जाते.

(काय नंदन, इ.इ.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या साहित्यप्रकारास 'रलाटलिखित' अशाही नावाने ओळखले जाते.

थालेपारट अगदी नेमका आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हायकूचा प्रयत्न दिसतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0