तारूण्यरुदन

(लोकसत्ता-लोकरंग १०/१२/२०१७ मुखपृष्ठ 'आपण संवेदनाहीन झालोय...?' लेखाबाबत प्रतिक्रियात्मक लेख)

गेल्या दशकात समाजधारणा, समजुती, दृष्टीकोन ह्यांनी बरीच मोठी झेप घेतलेली आहे. अर्थात त्याचे बरेच परिणाम कलाक्षेत्रावर झाले. पटकन मिळणारी जागतिक स्तरावरची प्रसिद्धी ह्यामुळे स्पर्धा, सादरीकरणाच्या पद्धती ह्यांच्यात भलताच फरक जाणवला. उदाहरणार्थ, मला आठवतंय, साधारण ७-८ वर्षांपूर्वी तिकीट खिडकीवर इमानेइतबारे रांग लावावी लागायची. दर आठवड्याला सिनेमा पाहणं हा बऱ्यापैकी 'रईसी छंद' होता. त्रिमीतीय चित्रपट म्हणजे पर्वणी, काहीतरी हाय फाय अशी धारणा होती. नाटकांचं काही फार वेगळं नाही. नाटकातील कलाकारांभोवती चित्रपट कलाकारांइतकंच वलय होतं.
ह्या सगळ्या गोष्टी जुन्या म्हणून कुरवाळत बसाव्या, की अडचणी म्हणून त्यांच्यावर मात करून , अधिक गतिमान, अधिक सोईची व्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करावा हे ज्याचं त्यानं ठरवावं. अधिक सोय, अधिक गती हीच काळाची दिशा आहे. तिच्याविरुद्ध जाऊन उगीच जुन्याच गोष्टी कशा चांगल्या, सकस आणि नवीन सगळंच कसं पानी कम हे नवीन काळातलं 'तारुण्यरुदन' म्हणावं लागेल. सध्याचं तारुण्य हे 'आपलं' राहिलं नाही ह्याबाबतचा व्यर्थ आक्रोश.

लेखात बऱ्याच ठिकाणी सरधोपट विधानं आहेत. एक उदाहरण घ्यायचं; तर मुंबई. हे शहर नाही. मुंबई ही एक जीवनशैली आहे. हे शहर तुमच्या रक्तात उतरल्याशिवाय राहत नाही. मुंबईतली जीवनशैलीही अर्थातच ह्याला साजेशी आहे. आपल्याला रिझवणाऱ्या, सुखावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापर्यंत जायचं म्हणजे लोकलचं कोष्टक किंवा ट्रॅफिकचं गणित तोंडपाठ असावं लागतं. त्यामुळे आठवडाभर हे करणाऱ्या लोकांना परत आराम, रिझवणारी गोष्ट म्हणजे उशिरापर्यंत झोपणं, चविष्ट काहीतरी खाणं आणि एखादा चित्रपट/नाटक/प्रहसन/संगीत कार्यक्रम पाहणं इतकंच उरलेलं आहे. त्यासाठी दूरचित्रवाणीही हळूहळू कालबाह्य होऊन ॲमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, व्हूट, हॉटस्टार आदी गोष्टींनी हवं तेव्हा, हवं तितकं आणि दर्जेदार मनोरंजन उपलब्ध करून दिलेलं आहे. यूट्यूबवरही बरंच काही उपलब्ध आहे. गेल्या पन्नास वर्षांतले बरेच चित्रपट, काही नाटकंही. त्यामुळे, अगदी आवर्जून घराबाहेर पडण्यासाठी तितकंच साजेसं काही असेल तर त्यासाठी युवावर्ग बाहेर पडेलही, पण तसं आज उपलब्ध आहे तरी काय?

मराठी चित्रपट पाहिले, तर तेच ते, तेच ते विषय, तेच ते कलाकार घेऊन नवीन फोडणी दिलेल्या गोष्टी पहायला मिळतात. 'तरूणांसाठी' म्हणून केलेल्या चित्रपटांमध्येही काही नाविन्य क्वचितच पहायला मिळतं. नाटकं असतात खरी दर्जेदार, पण निर्भेळ आनंदासहीत जरा जगण्याबाबतचं चिंतन वगैरे असलेलं गोष्ट तशी गमतीची वगैरे फारच विरळा. अत्रे, डांगे, वाजपेयी, पु.लं. सारखे वक्ते तरी राहिलेयत कुठे? सध्याच्या वक्तृत्वात मतं खोडून काढण्याचा आवेश दिसत नाही. तो कोणी दाखवलाच तर त्याला बरेचदा असंवेदनशील म्हणून हिणवलं जातं. समाजमाध्यमांमुळे हे करून दाखवणाऱ्यावर कोणीही, कशीही अश्लाघ्य टीका करू शकतो. ह्यामुळे खरोखरीचे प्रगल्भ लोक तोंडावर बोट ठेवून असतात. सगळ्यांनाच मान्य, सगळ्यांसाठीच गोग्गोड अशीच मतं सगळीकडे मांडली जात राहतात. टीका हीही अशांवर केली जाते जे समाजाकडून तसेही निरपेक्षरीत्या वाईट ठरवले गेलेले असतात.

ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून एक 'सामाजिक सत्य' निर्माण होत जातं. ह्या सत्याच्या विरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दडपला जातो, टिंगलटवाळी करून/अश्लाघ्य/अपरिपक्व टीका करून त्यांचं म्हणणं न खोडता आवाज दाबला जातो. हे लोक गप्पच बसतात किंवा मग अगदीच दुसरं टोक गाठतात. मधल्यामध्ये रसिक, मध्यमवर्ग इ. कंटाळलेले असतात. त्यांना ह्याच सर्वसंमत गोष्टी पहायचा कंटाळा येणं, किंवा त्यासाठी पैसे/वेळ न मोजावेसे वाटणं स्वाभाविक आहे. आधीची पिढी, जिने खरंतर इतकीऽ मोऽठ्ठी साहित्य/कलांची पायाभरणी म्हणे केलेली आहे ती तरी काय करतेय मग?

इथे आपण मूळ मुद्द्यापाशी येतो. आधीच्या पिढीनेच, कमअस्सल सगळ्याच मध्यमवर्गात तरी; चंगळवाद इत्यादी गोष्टी कळत-नकळतपणे रुजवल्या. ह्या संदर्भातली समांतर चर्चा ह्या धाग्यावर पाहता येईल, पुंबांची दिलखेचक टिप्पणीही अवश्य वाचावी. अशा वेळी, नकळतपणे मागच्याच पिढीने सध्याच्या युवावर्गाला ह्या मार्गावर येणं भाग पाडलेलं नाही काय? ती पिढी सध्या काय करतेय म्हणे? ती तिच्या तरुणपणच्या स्टीमपंक मुंबईत अजून हरवलेली आहे. नौशाद की यादें आणि एव्हरग्रीन शंकर जयकिशन, गेला बाजार खळे, वाडकर-मंगेशकर ह्यांच्यातून ती बरीचशी बाहेर आलीच नाहीए अजून.

अहो, हे ऐकलंय आम्ही. कॅथोड रे टीव्ही पासून ते स्पॉटीफाय पर्यंत अभिजात अभिजात म्हणून तुम्हीच कोंबत आला आहात आमच्या ज्ञानेंद्रियांत हे.

जमाना विद्या व्हॉक्स, न्यूक्लेया, सनबर्न फेस्टीव्हल, टीव्हीएफ-एआयबीचा आहे. त्यांचं कितपत चांगलंय, कितपत अभिजात वगैरे आहे इत्यादी अलाहिदा. ह्यांचं गाजतंय, तरूणवर्ग ह्यांची तिकीटं प्री-बुक करतोय, प्लॅनवर प्लॅन खपवतोय तर ह्यांचे गळे घोटायला तर तुम्ही सज्जच आहात. त्यांचं काही चुकतं आहे का? चुकत असेल तर ते दुरुस्त करायला तुमचा पुढाकार आहे का? टीव्हीएफ ट्रिपलिंग पाहिलीत का? पहाच. त्यातल्या एका एपिसोडमध्ये खालील संवाद आहे:

चितवन: मी डीजे आहे. संगीतकार वगैरे.
वयस्क माणूस: अच्छा अच्छा. कुठलं वाद्य वाजवता?
चितवन: नाही हो... मी संगीत फक्त एकत्र करतो. संगणकावर त्यातून स्वत:चं संगीत बनवतो.
व.मा.: संगणकावर?
चितवन: हो.
व.मा.: मग त्यात तुमची काय प्रतिभा?
चितवन: (चेहऱ्यावर त्रासिक भाव.) बरंच क्लिष्ट काम आहे हो, संगीताची जाण असणं फार गरजेचं आहे.
व.मा.(उपहासात्मक): तुम्हाला आहे का? नाही म्हणजे, वाद्यं वगैरे वाजवता तर येत नाहीत ना तुम्हाला? तबला, सारंगी, तानपुरा वगैरे... तुम्ही तर रिमिक्सवाले...

ह्यानंतर मागच्या पिढीला संगीतातून काय हवं होतं नी ह्या पिढीला काय हवंय, इतक्या प्रश्नाबद्दल जरा विचार केला तरी माझा मुद्दा स्पष्ट होईल.
असो.

नंतर एकाएकी लेख जो तत्त्वचिंतनात्मक होतो त्यामुळे उगीच तो अभिनिवेशपूर्ण वाटतो. कलांच्या आवडीनिवडीवरून लेख एकाएकी जीवनशैलीवर घसरतो. शुद्धलेखन, शुद्ध व्याकरण ह्याचे संस्कार खरंतर कोणी केले पाहिजेत? ते करण्यात ते आणि त्यांनीच आखलेल्या चौकटी यशस्वी झाल्या आहेत का? उत्तर तर नाहीच दिसतंय. लोकसंख्येचाच स्फोट इतका झालाय की दररोज वेगवेगळे प्राणी प्रवचन झोडायला तयार असतातच. कायम स्वत: साठी काही नाही केलं, कसं दुसऱ्यांसाठी जगलो आणि कशी चूक केली वगैरे रडगाणी गाणाऱ्या आधीच्या पिढीने शब्दांवाचून, शब्दांच्या पलिकडलं बरंच ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे ह्या पिढीवर केल्या गेलेल्या संस्कारांतला फोलपणाच जागोजागी दिसणाऱ्या नव्या पिढीने ही तत्त्वं झुगारून देणं शहाणपणाचंच ठरतं.

त्यामुळे शेवटच्या परिच्छेदात जो काही शंभर ओळींचा निबंध पूर्ण करण्याचा अट्टहास जाणवतो तो वगळता मूलगामी प्रश्न जो विचारला गेलेला आहे, त्यावर, आधीच्याच पिढीने विचार करणं जास्त सयुक्तिक आहे. आणि तितका जर करायची इच्छा असेल, तर मग परिच्छेदाच्या आधीच्या भागास तसा काहीच अर्थ उरत नाही.

(माझा लेखकांबद्दल काही आकस नाही. त्यांची एक सदाबहार मालिका, बरेच चित्रपट पाहतच मी लहानाचा मोठा झालो. त्या लेखाद्वारे त्यांनी, आणि ह्या लेखाद्वारे मी एक काळाची गरज असलेल्या संवादाला सुरूवात करून द्यावी इतकीच सदिच्छा.)

field_vote: 
0
No votes yet

माझा लेखकांबद्दल काही आकस नाही.

माझे मात्र असे नाही चौदावे. म्हणजे आकस वगैरे नाहि पण, सुमारपणाचा शोपिस आहे लेखक. म्हणजे आज नव्हे गेली ४० वर्ष. एकूणच लेखकाची अभिनयसमज बाळबोध** आहे. काही लोक जन्मजात ग्रंपी ओल्ड मॅन असतात तसा तो असावा.
पूर्वीच्या म.म.व नी डोक्यावर चढवलेला सुमार अभिनेता आणि त्याजोरावर लिखाणाची हिम्मत करणारा लेखक. मी तर लेखकाचे नाव वाचुन तो लेखच वाचला नाही.
** : असे लिहिले म्हणुन माझ्यावर ओरडु नका. चिंजं ची माझ्या मताशी पूर्ण सहमती आहे हे आधी लक्षात घ्या.

बरं अभिनयसमजे ची बोंब चालवुन् घेतली असती पण दिसायला हँडसम, वागण्यात स्टाईल, ग्रेस वगैरे असती तरी आवडला असता. पण काय ते अहो रुपम अहो ध्वनींम. नो डाऊट ममवंनी स्वताला त्याच्याशी स्वताला रीलेट केले असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी ते शेवटचं कंसातलं वाक्य सोमीवर हेत्वारोप करणाऱ्या माणसांसाठी टाकलेलं आहे. दिप्रंचा अभिनय मी फक्त टिपरे आणि देऊळ मध्ये पाहिला, बोक्या मध्ये लेखनशैली पाहिली. त्यांचं एका खेळियाने ही वाचलं. दोन्ही पुस्तकं मला आवडली. विशेषत: चौकट राजासाठी त्यांनी जी मेहनत घेतली तिला दाद द्यावीशी वाटली.
--
तारुण्यरुदन कमीअधिक सगळेच करतात. ह्या लेखात आपली कलेबाबतची बाजू मध्येच सोडून एकूणच युवावर्गावर जी टिप्पणी केली आहे ते पाहून मला लिहावंसं वाटलं.
--
उगीच वैयक्तिक न होता लेखाबद्दल तुमचं मत असतं तर मला ते वाचायला जास्त आवडलं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

आमच्या मराठित एक म्हण आहे "आडात नाही तर पोहऱ्यात कुठुन येणार?"**
त्याप्रमाणे मी पोहऱ्यात काय आहे ते बघायच्या आधी त्यातले पाणि कुठल्या आडातुन आले आहे ते बघते.
इथला आड ( पक्षी दिप्र ) हा मला अभिनेता/लेखक म्ह्णुन तिरस्करणीय ( हे माझे मत झाले ) वाटत असेल तर त्याचा पोहरा ( पक्षी त्याने लिहिलेला लेख ) मी वाचण्याचे कष्ट का घेऊ?

आता पोहऱ्यातले पाणी ( पक्षी लेख ) चेक करायच्या आधी मी जर ते कुठल्या आडातुन ( पक्षी दिप्र ) आले आहे हे बघितले तर ते वैयक्तीक कसे होते?
आणि जो माणुस मला आवडत नाही त्याच्या वर टिका करायला संधी मिळाली की मी ती अजिबात सोडत नाही.

बरं मी हुच्चभ्रूं डाव्या किंवा उजव्यांसारखी स्वताची मते न बदलणारी नाही. डेटात बदल दिसला की मी माझे मत पण बदलते. तुम्हाला माहिती असलेले ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे मोदी.

दिप्र मधे जर सुधारणा झाली ( जी अशक्य आहे कारण पुन्हा आडात नाही तर पोहऱ्यात कुठुन येणार? ) तर मी माझे मत बदलीन पण तो पर्यंत नाही.

----------------
** : हा सिद्ध झालेला हायपॉथिसिस आहे आणि अपवाद पण नाहीत ह्या सिद्धांताला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

का बरे तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढा तिरस्कार ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकंदर पिढी जसजशी बदलते, तसतसे सगळंच बदलत जातं, एकच गोष्ट कायम राहते "आमच्या वेळी असं नव्हतं".
फक्त सुपातले जात्यात एवढाच काय तो फरक.

----------
मला बोक्या सातबंडे आवडतो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.

एकंदर पिढी जसजशी बदलते, तसतसे सगळंच बदलत जातं, एकच गोष्ट कायम राहते "आमच्या वेळी असं नव्हतं".

फक्त सुपातले जात्यात एवढाच काय तो फरक.

अय्या कित्तीकित्ती गोग्गोड आहात हो तुम्ही! पु.लं.साठी घोस्टरायटरगिरी करत होतात काय कधी?

(माझी श्रेणीव्यवस्था काम करू लागली, की 'मार्मिक' देईन. तोपर्यंत ही फक्त पोच.'मार्मिक' दिली.)

मला बोक्या सातबंडे आवडतो.

ही बोक्या सातबंडे भानगड काय आहे तेवढी मात्र कळली नाही. (जाऊद्या, आमचेच वाचन कमी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही बोक्या सातबंडे भानगड काय आहे तेवढी मात्र कळली नाही. (जाऊद्या, आमचेच वाचन कमी.)

सिऱीयल दिखिल होती (तुम्च्या जवानीत आणि आम्च्या बालपणात), बोक्या सातबंडे टुणूक अस काही तरी गाणं होत त्याच (टुणूक हा आवाज आहे, माझ्या कानांना आईकू आलेला)

स्वतःला त्रास कमी करून घ्याय्चा असेल तर गोग्गोड बनाव लागतं हो,
बोंबलू दे तिच्या आयचं थेऱडं असं म्हंटल तर कुणाचा दुसऱ्याचा घोस्टरायटर बनवाल हो तुम्ही..

-------------------
कुछ तो लोग कहेंगे..

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.

नेमकी प्रतिक्रिया आहे. आमच्या वेळी असं नव्हतं हे म्हणण्यात चूक काहीच नाही.
पण नवीन जे आहे ते सगळंच चूक आहे हे म्हणणं अन्यायकारक नक्कीच आहे. ह्याचाच व्यत्यास म्हणजे आमच्या वेळी जे होतं तेच कश्शं छांछांछां म्हणणं म्हणजे पोरकटपणा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

पण नवीन जे आहे ते सगळंच चूक आहे हे म्हणणं अन्यायकारक नक्कीच आहे. ह्याचाच व्यत्यास म्हणजे आमच्या वेळी जे होतं तेच कश्शं छांछांछां म्हणणं

आयुष्यभर देशी कोंबडी खालेल्या आजोबांनी माझ्याकडे सुगुणा बॉयलर खाल्ली तेव्हा "आमच्याकडं अशी फक्कड मांसाची कोंबडी मिळत नाही" अशी तक्रार केली ते आठवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

आयुष्यभर देशी कोंबडी खालेल्या आजोबांनी माझ्याकडे सुगुणा बॉयलर खाल्ली तेव्हा "आमच्याकडं अशी फक्कड मांसाची कोंबडी मिळत नाही" अशी तक्रार केली ते आठवलं.

तुमचे आजोबा भांगेत तुळस होते... Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.

काय चाललंय हे चौदावे , जरा ठोकायचं कि अजून . सिक्सर फोर मारायला भरपूर स्कोप होता . ( फोडा आता हेही खापर आदल्या पिढीवर )
प्रभावळकर का लिहितात हा प्रश्न कायम पडतोच. ( म्हणजे ते षटकार मध्ये आधी लिहायचे तेव्हापासून आत्तापर्यंत )
कमालीचे सुमार .
++ तर मुंबई. हे शहर नाही. मुंबई ही एक जीवनशैली आहे.++
या वाक्याबद्दल तर फटके मारायला पाहिजेत जाहीर आणि मग वपु पुरस्कार म्हणून नुसतीच रिकामी दोर्याची माळ घालावी यांच्या गळ्यात .

++कलांच्या आवडीनिवडीवरून लेख एकाएकी जीवनशैलीवर ++
अगदी अगदी .... हे म्हणजे अतिम्हातारं झाल्याची कबुलीच .

++आधीच्या पिढीनेच.... , रुजवल्या++
आदल्या पिढीचा कुठल्याही पुढच्या पिढीवर मोठा परिणाम असतो हा तुमचा भ्रम . असं काही नसतं .

++चिंजं ची माझ्या मताशी ++
आणि आता अनुताई , या अशा पुढे या .
इतर वेळी त्यांच्या उच्चभ्रू पणावर ताशेरे झोडत असता , आणि हल्ली जिथे तिथे चिं जं चा आशीर्वाद का लागतोय तुम्हाला ?
आणि मग त्या ( बिचार्या ) मनोबांवर का टीका करताय हेच्च केल्याबद्दल .
पूर्वीच्या अनुताई नाही राहिल्या हल्ली .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कमालीचे सुमार .

तुम्हाला पण पटलय ना बापटण्णा दिप्र अतिसुमार आहे म्हणुन.

हल्ली जिथे तिथे चिं जं चा आशीर्वाद का लागतोय तुम्हाला ?

त्याचे कारण आहे ऐतिहासिक. काही महिन्यापूर्वी पण मी दिप्र ह्यांच्या अभिनयक्षमतेवर सुमार असा शिक्का मारला होता. तेंव्हा काही आयडींनी माझ्या वर जोरदार हल्ला केला. म्हणुन ह्यावेळेला आधीच चिंजंची सहमती आहे माझ्याशी हे सांगुन ठेवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला पण पटलय ना बापटण्णा दिप्र अतिसुमार आहे म्हणुन.

होय दिप्र अतिसुमार आहे. लेखक म्हणूनच नव्हे, तर अभिनेता म्हणूनही.

पण काय आहे ना, की हे आता पटते. त्याच्या 'चिमणरावा'च्या, झालेच तर (आता तपशील फारसे आठवत नाहीत, पण) ब्लॅक-अँड-व्हाईट दूरदर्शनवरच्या इतरही आचरटपणाच्या खुराकावर लहानाचे मोठे झालेल्या आम्हाला तेव्हा मात्र हे पटत नसे. आणि दामूअण्णांच्या 'चिमणरावा'च्या खुराकावर लहानाचे मोठे झालेल्या पिढीने त्याला नावे ठेवल्याबद्दल त्या पिढीचा राग येत असे.

पण फॉरदॅटमॅटर लहानपणी आम्हाला 'पप्पा सांगा कोणाचे' गाणेसुद्धा आवडायचे. एक तर हे ढापलेले गाणे आहे हे आम्हाला तर सोडाच, आमच्या आजूबाजूच्या आबालवृद्धांपैकी कोणालाही ठाऊक नव्हते, ठाऊक असायचा मार्गही नव्हता. आलम हिंदुस्थानाचीच समज तेव्हा अंमळ कमी होती; सारा - किंवा बहुतांश - देश अज्ञानांधःकारात सुखाने ठेचकाळत होता. पण त्याहीपेक्षा, घरच्या-दारच्या-शेजारघरच्या रेडिओंवरून चोहीबाजूंनी झालेल्या संततभडिमाराने - An oft-repeated lie becomes the gospel truth या गोबेल्सनीतीस अनुसरून - ते गाणे परिचयाचे होऊन आवडीचे झाले होते. ('अतिपरिचयात् अवज्ञा' ही संस्कृत भाषेतील एक निव्वळ लोणकढी अशी थाप आहे. जाहिरातक्षेत्रातील मंडळींना मला वाटते हे गुपित अतिपरिचयाचे असावे.)

थोडक्यात काय, तर आपण ज्याच्या खुराकावर लहानाचे मोठे होतो, ते आवडू लागते. कितीही सुमार असले तरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या हिशोबाने लता-आशा-किशोर-रफी-बर्मन-गुलजार हेही सुमार का मग?
असतीलही. Who really knows?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

माणूस म्हणून बोल साला जीव काढून देईन.

कोणी माणुस म्हणुन बोला, डुक्कर म्हणुन बोला किंवा देव म्हणुन बोला, मी जीव वगैरे काही काढुन देणार नाही.
------------------------------

आता चौदावे, तुम्हाला वैयक्तीक. तुम्हाला अशी टाळीखाऊ वाक्य खरी वाटतात का?
भाबडे आहात का? अश्या वाक्यामधे ०.०१% सबस्टंस आहे असे तुम्हाला खरच वाटतं का?
आपण मिळुन लक्षी शैलाचा जीव काढुन घ्यायचा प्रयत्न करायचा का, तसे करायला मनोबाची मदत लागेल. बघु खरंच जीव वगैरे काढुन देते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कृपया लहान चेंडू घेऊ नका मध्ये तुम्हाला खूप सबस्टंस दिसतो का?
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे ह्यात खूप सबस्टंस आहे का?
----
तुमचे (स्वघोषित) पट्टशिष्य आम्ही. खवचटपणा आहे हा फक्त. म्हटलं आपणही केला तर 'माला पन त्यांच्यात घेतील'.
Cray 2

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

चुक झाली, तुमच्या कडुन खवचट पणाची अपेक्षाच नव्हती म्हणुन असे झाले माझे.

ता.क., तुम्हाला "त्यांच्यात" घेण्याची शक्यता तुमच्या सध्याच्या स्वरुपात अशक्य आहे. तुम्हाला ८९% तरी बदल केला पाहिजे तुमच्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

अनु तै ,
"त्यांच्यात "म्हणजे कोणात नक्की ?
++ ८९% तरी बदल++
एवढी बरोब्बर नेमकी टक्केवारी सांगू शकता म्हणजे तुम्ही सनातन च्या संस्कार वर्गात संतपदाची टक्केवारी काढण्याचे वैदिक गणित शिक्षण घेतले आहेत का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खवचट प्रतिसाद.

"त्यांच्यात" म्हणजे मनोबा ला ज्यांच्या गटात जायचे आहे त्या गटात.
बाकी ८९% हा आकडा चौदाव्यांचे आज पर्यंतचे लिखाण , प्रतिसाद ह्यांच्या विदाच्या ॲनॅलिसिस करुन काढलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिकडचे टॉपर का तुम्ही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१००-१४ =८६% असं हवं होतं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कृपया लहान चेंडू घेऊ नका मध्ये तुम्हाला खूप सबस्टंस दिसतो का?

सबस्टन्स अस काही नसतं. तरीही लहान चेंडू घेऊ नकाच ही कळकळीची विनंती.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

माझी श्रेणीव्यवस्था पुन्हा काम करू लागल्यावर तुम्हाला 'मार्मिक' देईन. तोपर्यंत हा फक्त IOU.'मार्मिक' दिली.

(आता 'थँक्यू' म्हणा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणी माणुस म्हणुन बोला, डुक्कर म्हणुन बोला किंवा देव म्हणुन बोला, मी जीव वगैरे काही काढुन देणार नाही.

अश्या वाक्यामधे ०.०१% सबस्टंस आहे असे तुम्हाला खरच वाटतं का?
आपण मिळुन लक्षी शैलाचा जीव काढुन घ्यायचा प्रयत्न करायचा का, तसे करायला मनोबाची मदत लागेल. बघु खरंच जीव वगैरे काढुन देते का?

माणूस म्हणून बोलल्यास ही जी कोण ती ल.शै. आहे, ती जर खरोखरच जीव काढून देणार असेल, तर तिच्याशी माणूस म्हणून बोलणेच (व्हॉटेवर दॅट मे मीन) श्रेयस्कर.

तिची एकंदर भाषा स्त्रीवादी व्यक्तीची नसून रस्त्यावरच्या मवाल्याची वाटते. हं, आता 'गर्व से कहो हम रस्त्यावरले मवाली हैं'मधला प्रकार असल्यास गोष्ट वेगळी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय चाललंय हे चौदावे , जरा ठोकायचं कि अजून

किती काही असलं तरी त्यांचा लेख (माझ्या मते हां) बराच प्रगल्भ आहे. तुम्ही इकडे सायकोसोशल भाग २ च्या अपेक्षेने आलात ह्याची जाणीव आहे मला. पण त्यावेळची लेखात मांडलेली मतं आणि लेख शुद्ध बिनडोक होता. त्याला धरून हाणणं हे एक मेटलहेड ह्या दृष्टीने मी माझं कर्तव्य समजलं. Biggrin
जसं सुचलं तसं लिहीलं. लेखावर फक्त टीका करणं हे माझं उद्दिष्ट नव्हतं. लेखातल्या अभिनिवेशाला प्रत्युत्तर देण्याचा माझा इरादा होता.

या वाक्याबद्दल तर फटके मारायला पाहिजेत जाहीर

का बरं? मुंबई ही खरंच जीवनशैली आहे. मुंबईतले लोक्स फार वेळ इतर ठिकाणी प्रसन्न राहू शकत नाहीत.

आदल्या पिढीचा कुठल्याही पुढच्या पिढीवर मोठा परिणाम असतो

नाहीतर काय? आपले समज आणि इत्यादी अजून कोण रुजवतं आपल्यामध्ये? एखादा समज जितका पूर्वापार आणि जितका वादातीत गणला जातो तितकाच त्याला विरोध करायची इच्छाही प्रबळ होत जाते. म्हणून पालकांसारखं कोणी वागत नसेल तर त्यालाही पालकच कारणीभूत असतात, आणि असेल तरीही तेच.
अनुताईंना त्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिसादात बघतो.
बाकी सॉरी, उगीच आपलं तोफा डागत रहायचं काही मला पटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

लेख छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला, अडाणी थेरड्यांचे उदात्तीकरण एकूणच सद्यकालीन परिस्थितीत जास्त खुपते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मलाही दि.प्रंच लिखाण आवडतं. माझ्या सात वर्षाच्या पुतणीला बोक्या आवडतो हे मी पहातो. प्रिजुडाईस नसेल तर दि.प्र. आवडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बराय लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुन्यांना जरुर ठोका. विशेषत: ते 'आमच्या वेळी असं होतं' ची रेकॉर्ड लावत असतील तर. पण त्यांनाही व्यक्तिस्वातंत्र्य आहे, हे मान्य करा. म्हणजे, मला जुनेच संगीतकार आवडतात आणि रेहमान सारख्यांची मला ॲलर्जी आहे, असे कोणी थेरडा म्हणाला, तर त्याला तसे प्रामाणिकपणे वाटत असते, आणि ते व्यक्त करण्याचा त्याला अधिकार आहे, तो हिरावू नका.
कोणी सुमार थेरडा, वर्तमानपत्रात लिहितो , ते त्याचे मत असते. तो काही सार्वकालीन सत्य सांगत नसतो. त्यावरुन त्याचा पूर्ण हिशोब मांडणे अतिरेकी वाटते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

तिरसिंगराव , ठोकणे हे वृद्ध आहेत म्हणून नाही तर "आमच्या वेळी असं नव्हतं " "गेले ते दिन" प्रवृत्ती बद्दल आहे . इथे वयाचा संदर्भ नाहीये , तसाच वैयक्तिक आवडी निवडीचा पण संदर्भ नाहीये .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चौदावा हा डँबिस इसम आहे. आता मूळ लेख वाचणं आलं.

मूळ लेखातल्या शेवटच्या परिच्छेदातला मुद्दा - 'मला मदत' या मराठीची जागा 'माझी मदत' ही शब्दकळा घेत्ये, याबद्दल मात्र सहमत. मी म्हातारी आहे, असा आक्षेपही मला मान्य आहे. माझ्यापेक्षा वयानं मोठे लोक 'वॉक घ्यायला जातात' मात्र 'चालायला जात' नाहीत; तेव्हा माझी फार चिडचिड होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझा लेख 'कुठली गोष्ट कुठच्या कुठे नेणं' आणि पर्यायाने तोच तो पिढीवाद चालू करणं ह्यासंदर्भात आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमात युवावर्ग न दिसणं ह्या एका कलाकाराच्या (योग्यच) व्यथेने एकदम हल्करुप धारण करून एकदम सगळ्या पिढीला वेठीला धरण्याचं टिप्पीकल आर्ग्युमेंट टाकून स्वत:च्या पिढीचं यथार्थ प्रतिनिधित्व करण्यावर आहे.

(थोडक्यात मंजे ती व्यथा ब्रूस बॅनर नसून नताशा रोमानॉफ आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

चौदावे, मूळ लेखातली तेवढी एकच गोष्ट लक्षणीय होती; अशा विचारानं फक्त त्याबद्दल लिहिलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विचारमंथन वाचून "दिप्रणीय" हा शब्द डोळ्यांसमोर तरळून गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उभयपक्षांनी एकमेकांना 'त्याज्यायचं येडं' असं म्हणणे हा जनरेशन ग्यापवरचा सर्वात जालीम उपाय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेखकाने स्वतःच्या रुदनाचे सरकसकटी केलेले दिसते. काही थोर मंडळी अनुमोदताना पण दिसतेय. असो चालु द्या, अहो रुपम अहो ध्वनी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

फुढचा दिवाळी अंक विषय म्हाताय्रा लेखकांसाठी. आमच्यावेळी कर्णे,ग्रामोफोन रेडियो,डब्याला डोळे लावून बंबई का तमाचा देखो ढिक्कुटिक्कु ढिक्कुटिक्कु.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पडणारी स्कायलॅब
अर्थिंग ला पाणी घालून चालणारे रेडु
करकर वाजणारी मोट
दोन-चार तास वाट बघून शेजाऱ्याच्या फोनवर येणारा बुक केलेला ट्रंककॉल
घासलेटावरच्या चिमण्यांवरचा अभ्यास इ. इ. का

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी