हिमकण बघते माऊ

( १३ डिसेंबर हा माझ्या दिवंगत आईचा (सरिता पदकी ) ८९ वा जन्म दिवस. तिला अर्पण!)

हिमकण बघते माऊ
आकाशातून खाऊ
नुसतेच त्याला खिडकीमधून
बघत कसे राहू?

भुरुभुरु पडते पहा
माव्याची ही बर्फी
किंवा दूध आटवून मस्त
केली असे कुल्फी!

डोळा चुकवून आईचा
माऊ बाहेर पळते
सहा इंच बर्फामध्ये
पोट त्याचे बुडते !

खाऊन असा थंडीचा तो
जबरदस्त फटका
मेलो मेलो कशी आता
होईल यातून सुटका ?

पंधरा फुटी व्यासाचे मग
वर्तुळ बर्फात काढून
वेगाने ते परत येते
जीव आपला वाचवून !

घरात येऊन ब्लॅंकेट मध्ये
खोलवर घुसून बसते
थंडगार मांजर मग
छातीशी आई धरते!
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हिमकणांचा नाच बघून
माऊ आमचे धावत सुटले
आईने डोळे किलकिले करून
किचिन टेबलावर जाऊन बसली
खिडकीवरच्या काचेवर ओरखडून
माऊ परत सोफ्यावर आले।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस फेसबुकवरती हिमगौर माऊ फिरतायत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0