हैदराबाद - वरंगळ - भुबनेश्वर - पुरी - कोणार्क

मागच्या आठवड्यात हैदराबाद - वरंगळ - भुबनेश्वर - पुरी - कोणार्क भटकंती केली. मागील दोन वर्षांत कुठेच जाता आले नव्हते. रेल्वेचा प्रवास मला सोपा वाटतो. शिवाय लागणारा वेळ हीसुद्धा करमणूकच वाटते. सहप्रवासी गप्पीष्ट असले तर मजाच. हैदराबादला जाताना खेळाडू होते. दिल्लीला/कुठे बोटिंग स्पर्धेतून परतत होते. रोइंगची वल्ही घेऊनच आलेले. वजनदार होती. मुले सवासहाफुट उंच आडदांड. साइड बर्थ पुरत नव्हता. चर्चा - "या देशात क्रिकेट हद्दपार केलं पाहिजे. जो काही पैसा ,प्रसिद्धी,सवलती मिळतात त्या क्रिकेटपटुंनाच. इतर खेळाडूंकडे पार दुर्लक्ष होते."
शिवाय राजकारण - " कुठे खेळाडूंची टीम जायची होती त्यात निरनिराळे बावीसजण होते. नंतर त्याचे सदतीस झाले. कसे? तर मंत्र्याच्या बायकोच्या रेकमेंडेशनातून आलेले. खेळ येतच नव्हता पण त्यांच्याकडे कुठलीतरी भाग घेतलेली प्रमाणपत्रे होती! उत्तम बूट,कपडे त्यांनाही मिळाले. गुणी होतकरू खेळाडू नाराज."
हैदराबाद अगोदरच थोडे पाहिले होते. १)रामोजी फिल्मसिटी, २)हुसेनसागर परिसर, गोलकोंडा बाकी होता ते पाहायचे होते. मागच्यावेळी इद असल्याने गर्दीमुळे श्रीशैलम,झु,सलारजंग केलेले. रामोजी पाहण्यात काही अर्थ{१५००+भरून} नाही हे युट्युबवरच्या एका व्हिडिओतून कळले.

Ramoji Film City, Hyderabad - Full Video Tour 2017 (21:44)/askfranklin

सकाळी गोलकोंडा. थंडीचे दिवसांमुळे फिरणे थोडे सुसह्य होतं. कमानी, कमानी आणखी कमानी. डोंगरावर खूप पसरलेला आहे. शहर वस्ती तटबंदीच्या आतमध्ये घुसली आहे. टाळी प्रवेशद्वारावर वाजवली की वरच्या उंचावरच्या महालात ऐकू येणे खास आहे.
( सिटी बस सर्विस उत्तम आहे. कुठूनही मेहदीपटनम येथे यायचे. तिथून गोलकोंडा बस असतात त्या थेट किल्ल्यात नेतात.) अंदाजे दहा किमि. वाहतूकीसाठी जिथे चार लेन रस्ते आहेत तिथे रस्ता ओलांडता येत नाही. सिग्नल नाहीत, मध्ये डिवाइडर टाकले आहेत. सरळ ट्राफिकमध्ये घुसावे लागते. फार वाइट परिस्थिती. नंतर हुसेनसागर परिसर. त्याचे फोटो पाहून छान वाटले होते. एनटिआर गार्डन, अंजेय्या पार्क वगैरे. प्रत्यक्षात गटाराचे पाणी जमा झालेले आहे. दुर्गंधी. ड्रेनिज सिस्टम फसलेली आहे. जाऊ दे.
सिकंद्राबाद हे साताठ किमिवरचे जुळे शहर आणि मेनलाइन_स्टेशन मस्त. सकाळी ट्राफिक असते.
हैदराबादपासून १४० किमिवर वरंगळ हे ऐतिहासिक शहर. काकतिय राजांमुळे प्रसिद्ध.
फोटो १
काकतिय राजा आणि सिंह

फोटो २
पाटी वारंगळ

फोटो ३
वारंगळ अवशेष

मुद्दामहून इथे येणे होणार नाही. पुरी ट्रेनला दोन नाइट लागतात त्यापेक्षा इकडे एकदिवस मुक्कामच केला. वरंगळ किल्ला हे खास आकर्षण.
फोटो ४
वरंगळ आवार

शत्रुने तोडफोड करून उरलेले पाहून समजते की तेव्हा काय सुंदर असेल. काळा कठीण दगड वापरलेला आहे.
फोटो ५
वरंगळ किल्ल्यातलं एक मंदिर

उंच प्रवेशद्वारं मात्र अखंड आहेत.
फोटो ६
हंस तोरण, वारंगळ

रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला आहे. बरेचसे शहर पश्चिमेला काजिपेट रस्त्याकडे पसरलेलं आहे. इथे थाउंजड_ पिलर_ टेंपल आहे(८ किमी) त्याचे खांब कोसळल्याने बंद केलय. बाजूलाच असलेले शंकराचे देऊळ पाहता येते. अलिकडे तीन किमिवर भद्रकाली तलाव व मंदिर आहे. तलावाची अवस्था हुसेनसागरसारखीच. दुर्गंधी.

वरंगळ ते भुबनेश्वर रेल्वेने अठरा तासांचा प्रवास आहे. आजचे शेजारी विजयवाड्याचे एक कुटुंब शिरडीहून परत चालले होते. फोटो एकमेकांस दाखवण्याचा कार्यक्रम झाला. " पुन्हा याल तेव्हा शिरडीचा प्रसाद घेऊन या. इकडे फार भाविक आहेत." मी शिरडीला एकदाच कुणाबरोबर सोबत म्हणून गेलो होतो पण बाबांचे पुन्हा बोलावणे नाही आले. ईस्ट कोस्ट एक्सप्रेस सकाळी साडेसातला भुबनेश्वरला पोहोचते आणि पूर्ण दिवस फिरायला मिळतो. भुबनेश्वर समुद्रापासून साठ किमि दूर आहे. उडिशाची पुर्वीची राजधानी कटक ही महानदीच्या बेटावर असल्याने लहान पडायची. "५२ रस्ते अन ७२ चौकांत कटक आटपते" अशी म्हण प्रचलित आहे. उडिशाचे जुने नाव उत्कल हे राष्ट्रगितात आहेच. नवीन राजधानी भुबनेश्वर ऐसपैस. स्टेशनच्या पूर्व भागात जुने आणि पश्चिम भागात नवे शहर आहे. मस्त रस्ते. पूर्वेला अडीच किमिवरचा बिंदुसागर तलाव आणि त्याभोवती पसरलेली पन्नासेक मंदिरे आठव्या ते तेराव्या शतकांतील आहेत.
फोटो ७
भुबनेश्वर - बिंदुसागर तलाव - आसपासची मंदिरे नकाशा. परशुरामेश्वर मंदिराबाहेरच्या भिंतीवर.

काही घरे मंदिरांना चिकटूनच आहेत. शिल्पकला सुंदर. यांमध्ये लिंगराज मंदिरात आणि अनंत बसुदेवमध्ये पूजा होते. लिंगराज भव्य आहे. अनंत बसुदेव अगदी बिंदुसागरसमोरच आहे.
फोटो ८
भुबनेश्वर - बिंदुसागर तलाव

उडिशा देवळाची संपूर्ण रचना ( कल्याण,नाट्य,भोगमंडप आणि देऊळ असे चार भाग असतात) पाहायला मिळते.
फोटो ९
उडिशा मंदिर रचना १

फोटो १०
उडिशा मंदिर रचना २

अकरा वाजता 'भोग' असतो. फारनरना प्रवेश आहे आणि पुरीच्या जगन्नाथाचा दहाटक्के अनुभव घेता येतो. दोनतीन किलोंच्या मातीच्या मडक्यांत भात,वरण,दोन भाज्या असे एकेका मोठ्या टोपल्यांतून(दहापंधरा!) भोगमंडपात ठेवून अर्धा तास दारं बंद केली जातात. यावेळीच फक्त मंदिर बंद असतं. द्वारका/नाथद्वारा येथे मंदिर बंद/उघडे ठेवण्याचा अतिरेक असतो तसा इथे नाही. भोगमंडपात सांडलेले अन्न नकोसे वाटले.
आम्ही कोपय्रावरच्या शहाळीवाल्याकडे प्रसाद घेतला. १०-१५-२०रु स्वस्त अन मस्त. इथे दुसरे आकर्षण खोंडगिरी - उदयगिरी. स्टेशनच्या पश्चिमेस शहरातच तीन किमिवर विमानतळ, पाच किमिवर मुख्य नवीन बस टर्मिनल( इथून पुरी आणि इतर बस सुटतात ) आणि सात किमिवर खंडगिरी परिसर एकप्रकारचा पिकनिक स्पॅाट. थोड्या गुंफा आहेत. छान जागा.

फोटो ११
उदयगिरी गुंफा शिल्प पट्टीका

फोटो १२
उदयगिरी हत्ती

फोटो १४
चाकावरच्या आलस्यकन्या

फोटो १५
सूर्यास्त, कोणार्क मंदिर

फोटो १६
चामुंडा, भुबनेश्वर म्युजियम

पूर्वेला पुरी जाणाय्रा बस थांबतात त्या कल्पना चक ( चौक ) येथे म्युझियम आहे. यामध्ये काही चांगल्या मूर्ती ठेवल्या आहेत.
भुबनेश्वर स्टेशनवर पूर्व- पश्चिम जोडणारा सामान्य ओवरब्रिज नसल्याने रेल्वे प्लॅटफॅाम तिकिट काढून पलिकडे जावं लागलं. जिथे जेवत होतो त्याला पुरी - कोणार्कची माहिती विचारली. "सकाळी कोणार्कला जा,तिथून पुरी. पुरीहून परत येण्यास भरपूर बस असतात. शिवाय दुपारी भोगप्रसाद तीननंतर मिळेल."
"ये प्रसाद का महत्व बहुत है. एक बार भक्त ने चढाया हुआ भोग कुत्ते ने लिया तो भगवान ने कुत्ते के मुँह से छिन लिया था।"

भुबनेश्वर - पुरी साठ किमि, भुबनेश्वर - कोणार्क ६४ किमि, पुरी - कोणार्क तीस किमि. समुद्रावर आहेत. बरेचजण कार हायर करून पुरी कोणार्क करून परत भुबनेश्वरला येतात. पुरीसाठी दर दहा मिनिटांनी बसेस आहेत. साधी जनता, एक्सप्रेस आणि एसी नानस्टॅाप असे तीन प्रकार. कोणार्कला कमी बस आणि फक्त जनता बस.
त्यादिवशी कोणार्ककडे जाणाय्रा बसमध्ये जागा मिळेना मग प्लान बदलला आणि प्रथम
साडेनऊला पुरी गाठलं. स्टँड ते जगन्नाथ मंदिर अडिच किमि, रूंद मोठा रस्ता,याच रस्त्याने रथ जातो. दोन्ही बाजूंस दुकानं, धर्मशाळा आणि टपय्रा. कपडे,भांडी आणि मिठाई. मिठाई - रासगुल्ले, छेनापोडा, पाकातले चिरोटे भरपुर माशांसह उघडेच. देउळ मजेदार. मूर्ती मजेदार. या विशेष आकाराच्या जगन्नाथ - बलभद्र - सोभद्र च्या मूर्ती बारा वर्षांनी नवीन करतात. "नीम का दारू से बनाते है." ( कडुनिंबाच्या लाकडापासून घडवतात.) आवारात मोठा भोगमंडप त्यात सर्व वरण भात सांडलेले. देवळाचे शिखर ५८ मिटरस उंच,त्यावर मोजकीच मिथुन शिल्पं. काही उपमंदिरं. काही ठिकाणी श्राद्धविधि उरकत होते. बहुतेक पितरांना अन्नदानविधि. शेजारच्या ग्रांड हाटेलात थाळी मागवली. "भोग चढवतात त्यातल्या भाज्या इथे मिळतात का?" "नाही, भोगमध्येच मिळतात." मग जेवण झाल्याने प्रसाद कॅन्सल केला. बीचवर नारळपाणी.

जगन्नाथ मंदिरापासून अर्ध्या तासावर समुद्र. तिथून परत येऊन जनता बसने कोणार्क गाठले.
फोटो १३
कोणार्क रथाचे चाक

मुख्य देऊळ ढासळत आहे त्यास आधार लावले आहेत. पंधरा फुटी चौथय्राच्या ( सूर्याचा रथ) भिंतीवर अनेक नायिका ,मिथुन शिल्पे आहेत,बारा तासांची बारा चाके सहाफुटी आहेत. रथाच्या सात घोड्यांपैकी एकच तुटका उरला आहे. हत्तीचे दमन करणारा सिंह अशी दोन मोठी शिल्पे होती त्यापैकी एकच घाबरवतो. देवळावर मोजकीच चारपाचफुटी मिथुनं आहेत. मिथुनं साताठ प्रकारांत आहेत तीच पुनरावृत्तीत आहेत आणि मुद्रा आनंदी. फोटो काढायला दुपारनंतरचा उजेड मिळाला हे बरंच झालं. गाइड लोकांची क्यासेट - आत्मा परमात्मा - गीता - कर्म - देहधर्म - मिथुन - दिवसाची बारा चाके. दिवसाढवळ्या उभ्याउभ्याने सूर्यसाक्षीने आनंदीआनंद हे तत्त्वज्ञान भारीच. ,

कोणार्क मिथुन शिल्पे १

कोणार्क मिथुन शिल्पे २

कोणार्क मिथुन शिल्पे ३

कोणार्क मिथुन शिल्पे ४

कोणार्क मिथुन शिल्पे ५

कोणार्क मिथुन शिल्पे ६

जैनमुनिंची शिल्पेही आहेत. नायिकांची एक रांगच आहे. शालभंजिका ( शाल वृक्षाची फांदी धरून उभ्या राहणाय्रा,) पैंजण काढणाय्रा, वादन नर्तन करणाय्रा. आलस्य कन्या - आळस देणाय्रा.

ज्या नगरांत या असतील ती नगरी सुखवस्तुच असणार.
पुरीला राहण्यास समुद्रकिनाय्रालगत भरपूर हॅाटेलस आहेत. "यहा बांगाली साबलोग रहते हैं." किनाय्रावर भरपूर भाविक आणि पर्यटक. कोणार्क मंदिर किनाय्रापासून थोडे आत आहे, जवळच चंद्रभागा नावाचा किनारा आहे. थोडा परिसर 'बालुवन' राखीव आहे. रात्री भुबनेश्वरला जेवताना मालकाने विचारले " कैसा हुआ ट्रिप?" प्रसाद घेतला नाही कळल्यावर भडकला. तासंपट्टी झाली.

पुरी/ भुबनेश्वरहून मुंबईला ( कुर्ला लो० टिळक ट० ) येणाय्रा सोम-मंगळ-गुरुवार तीन गाड्या एका नाइटमध्ये पोहोचतात हे बरं. पण संबलपूर - झारसगुडा - रायगड - गोंदिया भागातून येतात. नक्षलवादी चळवळ वाढल्यास काही तास थांबवून ठेवतात. पुन्हा शिरडीचेच सहप्रवासी. सतराजणांचा ग्रुप. पुरीला राहणारे. ग्रुपलिडर शिरडीबाबाभक्त. दरवर्षी तीनदातरी येतोच. "बाबा का बुलावा आयेगा तो आ जाता हूँ।" "बाबा ने बहुत कुछ दिया है। पुरी में घर बनवाया उस का नाम 'द्वारकामाई रखा है। मेरी देढ साल की बेटी भी बाबा को बहुत मानती है।" ये ट्रेन के सभी कँटिनवाले,टिसी पहचानते हैं।टिकट बुक नही हुआ तो भी मुझे बर्थ मिलता है।" "आप कभी जाते हैं शिरडी?"
त्यातला एक वॅालिबॅालपटु होता. " एंजिनिअरिंग केलय. स्टेट, नॅशनल लेवल,खेळलोय. मला महिना चाळीस हजार रु स्टाइपेंड मिळायला हवा पण तो क्रिकेटलाच देतात. सगळी राजनितीच आहे. मला फक्त आठच देतात. आता खेळाडू कोट्यात नोकरी शोधतोय." नागपूरला एक सहाफुट तिशितला तरुण आला. धोतर,बंडी,शेंडी,झोळीत प्रभुपादाची पुस्तकं. कोणाकोणास वाचायला दिली. मी नको म्हटले. शेजारी एक पन्नाशीचा नोकरदार बसलेला त्याला दिले पुस्तक चाळायला. थोड्या वेळाने परत येऊन शेजाय्राला कर्मयोग सांगू लागला. हिंदी नंतर इंग्रजीत सुरू. शेजाय्राने शांत चित्ताने पंधरा मिनिटे ऐकले. मग उलटतपासणी. काय शिकलास वगैरे. "खरगपुरचा मेटलर्जिकल एंजिनिअर. आता गिता प्रचार कामाला वाहून घेतलय."
"मीही एंजिनिअरच आहे. तुझं आयुष्य असं वाया का घालवतोस? इतर काही काम करून हेसुद्धा काम प्रचार करता येईलच. काही चांगलं कर."
"हे चांगलं नाही का?"
"चांगलंच आहे रे पण आयुष्य वाया घालवण्याइतकं चांगलं नाही रे."
तरुणाच्या पाठीवर थाप मारत दोघेही अकोल्याला उतरले.
नाशिकला आम्ही भाव करून सुकी द्राक्षे उर्फ बेदाणे घेतले. खोकला आल्यास उपयोगी पडतात. दुपारी घरी पोहोचून बॅगा उघडून रिकाम्या करत होतो.
"आता फेब्रुवारीतली तिकिटं मिळतात का पाहा गुजरातकडची."

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आचरट बाबा . झकास .
एकेकाळी रेल्वे नि भरपूर प्रवास केला .सगळ्यात कंफर्टेबल प्रवास रेल्वे चा . मजा येते रेल्वे नी प्रवास करताना . गफ्फा टफफा पीपल वॉचिंग मस्त वाटते .
बाकी मस्तच . लिहीत जावा हो असे सारखे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तं वृत्तांत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अचरटबाबा मस्त वृत्तांत ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त लिहिलंय. त्या चाकाचा फोटो तर जबराच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

वृत्तांत मस्त ओघवता लिहिलाय, रेल्वेसारखी अखंड लय आहे.

ओडिसातील देवळे मस्त असतात राव, कधी तिथे जायचा चान्स येतो काय की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+++भोगमंडपात सांडलेले अन्न नकोसे वाटले.+++
हि अन्न सांडण्याची काय पद्धत आहे जरा सविस्तर लिहाल का आचरट बाबा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त लेख.
कोणार्क, पुरी केव्हापासून जायचे आहे. हा लेख वाचून जाण्याची ओढ आणखी तीव्र झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

छानय प्रवास वर्णन. फोटो पण सुंदर.
उडिशा मंदिर रचना १ आणि २ हे फोटो पाहताना खालचं कायप्पावरचा ढकल संदेश तिव्रतेने आठवला,

गुरुजी - सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात ??

गण्या - कारण भारतातील बायका त्यावर पण कपडे वाळत घालायला कमी करणार नाहीत...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

सांडलेलं अन्न म्हणजे रोज दोनवेळा हारेभरून ( टोपल्या) अन्न ठेवतात त्यातले अन्न इकडे तिकडे भोगमंडपातच पडलेले असते ते पाणी मारून धुतले तरी थोडे राहतेच॥ अर्थात भाविक इथे येत नाहीत. ते देऊळातच जातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वृत्तांत आवडला. फोटोही छान आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो सुंदर आहेत. दगडातली जुनी शिल्पं आवडली. वारंगळ किल्ला तर मला माहीतच नव्हता. वारंगळ, ओदिशा मंदीराचा परिसर स्वच्छ वाटतोय.

हैद्राबाद शहर मी जितपत फिरले ते मला आवडलं. ठरावीक ठिकाणी जायचंय म्हणून न फिरता उगाच, घरंगळत फिरायलाही मला आवडलं. मात्र हैद्राबादच्या नव्या भागांत, आधी खेडी होती आणि हाय-टेक सिटीमुळे शहरात आलेला भाग वाटतो, तिथे फिरताना रस्त्यावर स्त्रिया फार कमी दिसल्या. असुरक्षित वाटलं नाही, पण विचित्र वाटायचं. मात्र लोक फारच सभ्य आणि स्वभावानं गरीब वाटले. कदाचित पुण्यात राहत असताना हैद्राबादच्या बऱ्याच फेऱ्या झाल्यामुळे वाटलं असेल.

रामोजी फिल्म सिटीला मी कर्तव्य म्हणून गेले होते. ठीक आहे. त्या प्रकरणाबद्दल आपलं एकमत.

रेल्वेचा प्रवास मलाही आवडतो. १८-२० तासांच्या वर असेल तर शेवटी कंटाळा येतो. पण इतर कोणत्याही वाहनांपेक्षा रेल्वेच सर्वात आवडती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसी संचालक/ऐसी वाचक लेखात कोणार्कमधली मिथुनशिल्पांची चित्र मुद्दामहून दिली नाहीत. मंदिरावर आहेतच परंतू संस्थळावर द्यावीत का? किंवा aise rasik/ facebook closed group वर द्यावीत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही आपल्या संस्कृतीचा स्वीकार करायला लाजताय! बघताय काय, फोटो दाखवा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खास शैलीतला वृत्तांत आवडला. नेमका-अजिबात लांबण नसणारा-किंचित तुटक-तरीही निरीक्षक असा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उदयगिरीला कलिंगाधिप खारवेलाचा हाथी गुंफा शिलालेख पाहिलात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0