कौतुक कशासाठी?

कवी हा बाष्कळयाचा धोका पत्करूनच
लिहायला उतरतो, एखादा ड्रायव्हर , डॉक्टर
स्वैपाकी, लाकूडतोड्या जसे समाजाचे
उपयुक्त काम करतो तसे प्रशस्तिपत्रक मिळायला
आयुष्य जाते, बहुतेक कवी नापास होतात, जो गाजतो
तोही शेवटी वैषम्याने विचारतोच की मी लिहिल्याने
काय फरक पडला? तर ऐका : तुम्ही कविता
न लिहिता (आणि मुख्य म्हणजे न वाचता)
जगू शकणार आहात का?
तसे असेल तर अभिनंदन ! सुखी व्हा!
पण ज्यांना ती एक जीवनावश्यक गोष्ट वाटते ,
त्यांना प्रश्न असा की, तहान लागल्यावर तुम्ही जर
पाणी प्यायलात , तर त्याचे
कौतुक कशासाठी?
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

और इक चीज़ मिलेगी, टूटा खाली जाम....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको