संध्यात्रस्त पुरुषांची भक्षणे

संध्याकाळी दमून जेंव्हा थोडी व्हिस्की पिती
पुरुष सारे वाटेवरती चिकन-कोंबडी खाती

हॉटेल ताजखाली उभा "बडे मिया" कबाब
पंचक्रोशीमध्ये चाले त्याचा मोठा रुबाब
त्याच्यासाठी लाईन लागे मोटारींची उंची
बाजूवाले म्हणती पहा "कटकट यांची शिंची"

झोपडपट्टीत ढाबा खासा
तेलास उकळी , पोहे मासा
गांडाभाय खाये "डीस "
सरदारजीका "फराइ फीस"

अमेरिकन पुरुषांची तीच असे स्थिती
बियर पिता पिता ते पंख म्हशीचे* खाती
पंखांवरती लावून येई इतका तिखट sauce
दुसऱ्या दिवशी नको तेथे होतो फार त्रास !

बाला बारमधल्या पहा, उंच आणि टंच
कामुकतेने ओथंबे तो एक एक इंच
हात घासू पहाल जर त्यांच्या मांडीवरती
कानाखाली खाल एक, फजिती मग पुरती!

बार होई बंद, पुरुष सारे घरी जाती
बार-बालांचीही पहा तीच असे स्थिती
फुल साईझ बेडवरती एकाकी त्या निजती
भग्न संध्या , चढे रात्र , दिवेही ते विझती !
xxx
पंख म्हशीचे = Buffalo wings

field_vote: 
0
No votes yet