एका डायरीतले एक पान

आज झोपायला अमळं उशीरच होतो आहेय. शाखेत जाणारा वेळ पहाता आता एखादे दिवशी रात्री तिथेच मुक्कम करायला थांबावे लागेल असे दिसते. शिवाय रात्रभर निरनिराळे काढे पिउन पिउन घसा धरतो तो वेगळा. इतर सर्व काढे पिउन घसा खवखउ लागल्यास अळवाच्या पाण्यात थोडी खसखस उगाळुन त्याचा काढा काढुन प्यावा असे जोशीबुवांनी सांगितलेय. उद्यापासुन तेच ट्राय करतो. पाहुयात किती फरक पडतो. आयडाहो प्रांतातले काम व्यवस्थीत सुरु आहे पण आमच्या ओहायो मधल्या लोकांनीही व्यवस्थीत काम करायला पाहिजे. अमेरीकेत संघ येउन आज अठ्ठावीस वर्षांहुन जास्त काळ लोटला तरी अद्याप राजकारणात म्हणावी अशी प्रगती झालेली नाही. त्या राजशेखरांचे मोठे चिरंजीव बोईंग कॉर्पोरेशनमध्ये आहे. म्हणालो 'बाळ शाखेत येत चल' तर म्हणे तुमच्या पुष्पक विमानाच्या डोक्याने चाललो तर बोईंगमधला जॉब जाईल माझा. राजशेखरांचा मुलगा काही चुकीचे बोललेला नाही. दंतकथा कुठे नसतात? शाखेचा संस्कार रुजविण्यासाठी आम्हीही पार्ल्यात असतांना कितीतरी दंतकथा तयार केल्या. मुदलात गोची अशी की पार्ल्यातले लोक आगोदर शिकागोत स्थीरावले आणि प्रारंभीचा सगळा संस्कार पार्ल्यातुन जसान तसा उचलला. नव्याने दंतकथा काही बनविल्या नाहीत, सगळा पार्ल्यातलाच कंटेट. तर झाले असे की शिकागोमध्ये प्रारंभीच्या शाखा भरायच्या तेंव्हा गोष्टी पार्ल्यासारख्याच चालायच्या. तेच ते गोविंद विडे चोरुन आणुन चघळणे, त्याच त्या गुलबकावलीची फुले आणि केशर टाकुन बनविलेल्या श्रीखंडवड्या, आणि तेच ते पोह्याचे पापड.

तर आता असे झालेय. ओहायो प्रांतात तिकडुन एक चमचमीत मुलगा आणला आहे. म्हणजे तसा ३५ एक वर्षाचा असेल पण चेहर्‍यावरचे ब्राह्मतेज आणि डोळ्यातली विद्वत्ता कित्ती अमाप हे ज्याने त्यानेच पाहुन घ्यावे. ह्याच्याकडून अपेक्षा आहेत, आयडाहो प्रांतातले समस्त लोक तुर्तास बादच. शिवाय बॉबी जिंदल ह्यांना भेटायला गेल्यास आयडाहोतल्या लोकांना ते साधा चहाही विचारीत नाहीत.

अमेरीकेत संघाचा राष्ट्राध्यक्ष निवडुन यायचा असेल तर ओहायोतल्या लोकांनीच पुढाकार घ्यायला हवा. त्या चमचमीत मुलाचे समलैंगीकतेबाबतचे विचार एकदा जाणुन घ्यायला हवे, होमीओपॅथी कसे थोतांड आहे हे अगदी अभ्यासाने बोलतो तद्वत समलैंगिकांवरतीही काहीतरी बोलु शकेल असे वाटते. मुलगा मोठा हुशार आणि गोड आहे हो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Abruptly संपला कल्पनाविस्तार!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बनसोडे सर ,
+ओहायो प्रांतात तिकडुन एक चमचमीत मुलगा आणला आहे. म्हणजे तसा ३५ एक वर्षाचा असेल पण चेहर्‍यावरचे ब्राह्मतेज आणि डोळ्यातली विद्वत्ता कित्ती अमाप +
Smile फारच स्पष्ट होतंय हे . आणि होमिओ पॅथी की आयुर्वेद ? असो.
थत्ते म्हणतात तसं फार एकाएकी संपवलं आहात हे . विस्तार आवडला असता .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होमिओपॅथीच. ती परदेशी आणि थोतांड आहेच. आयुर्वेद देशी असल्यामुळे तो पुरावे न देतात शास्त्रीय.

बनसोडे सर, विस्तार कराच. वाटल्यास, ओहायोमधल्या लोकांची मराठा मूक मोर्चा, भीमा-कोरेगाव यांबद्दल असलेली जळजळीत प्रातःस्मरणीय मतंही वाचायची आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परदेशी होमिओ पॅथी वाईट आहेच , पण त्यापेक्षा त्या चष्म्यातिल विदवत्ता पूर्ण डोळे असलेल्या , ब्राह्मतेजः पुंज चेहऱ्याच्या चमचमीत मुलाला आयुर्वेद जास्त वाईट वाटत असेल तर ?
मुलगा चमचमीत असल्याने वांड आहे , त्यात ओहायो राज्य , अजून काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्रमश: लिहा, आणखी चमचमीत गोष्टी येऊ द्यात बाहेर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'राम' हवा म्हणून 'त्यांना' बडवतो,काम हवे म्हणून 'यांना' बडवतो
आम्ही रामाचे हो दास, आम्हाला बडवे होण्यातच रस|

तिथे देशी गायी नाहीत म्हणून संघ पुष्ट होत नाही. जर्सी गायींवर संघविचार कसे पोसतील? ॲक्चुअली अट्ठावीस वर्षांपूर्वी संघ पोचण्याआधी देशी गायी पोचायला हव्या होत्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिथे देशी गायी नाहीत म्हणून संघ पुष्ट होत नाही. जर्सी गायींवर संघविचार कसे पोसतील?

जर्सी गायींचे ष्टेक भाजून खावेत. (मीडियम रेअर. आतून किंचित लालसर, आणि किंचित रक्त अजूनही स्रवणारे.) रोजरोज. त्या खुराकावर नाही झाले संघजन पुष्ट, तर आयडी बदलीन.

आणि संघजन पुष्ट झाले, की संघ पुष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

थोडक्यात, संघ पुष्ट न व्हायला संघविचार कारणीभूत आहेत. ते एकदा का बदलले, की काम झालेच म्हणून समजा.

(किंवा, रोजरोज ष्टेक खाणे कदाचित परवडत नसेल - जे समजण्यासारखे आहे. संघविचारांचे निव्वळ अंजीरपान. असो चालायचेच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

पार्लेकर कुठेही असले तरी पार्लेकरच असतात. तिथे पारलेमहोत्सव भरवतात, पारलेकट्टा करतात. सिनेमाला गेले तर सन सिटीला गेलो म्हणतात. नवीन मटार आला की आठवडाभर मटार शिजवतात. (ॲक्चुअली हे वाक्य असे हवे: नव्या मटारची नव्हाळी उतरली आणि बाजारात मटारचे ढीग पडून राहू लागले की आठवडाभर घरात मटार शिजवतात.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाखेनंतर आम्ही देशपांड्यांच्या घरी गेलो. म्हणजे तसं आग्रहाचं आमंत्रणच होतं मागच्या आठवड्यात. शिस्तीत पलंगावर,सत्रंजीवर हायरआर्कीप्रमाणे स्थानापन्न झालो. देशपांड्यांनी लगबगिने आतून आंब्याचच्या कापी डिशमधून आणल्या. डिश फिरवली. मी दोन उचलल्या.
" अंहं एकच."
या गोष्टीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोमण सर विसकॉन्सिनमधील -२१ फॅ० तापमानातही मोठ्या हौशीने गणवेश घालुन बाहेर पडले, म्हणाले नवीन वर्षाचा नेम - इथेच चार पावलांवर तर शाखा आहे, जरासं चालायचं, व्यायामही होईल आणि सकाळची गोठणबिंदू खालची प्रसन्न हवाही खाउन होइल हाकानाका. अर्धे मिनीट झाले नाही तोच हातची बोटे काळीनीळी पडली, स्वर्गवासी पपू. सावरकर आठवले. परत म्हणुन गणवेशावर बाहेर पडले नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'गणवेशा'वर जर बाहेर पडले असतील, तर त्या मांडीघोळ प्रकरणातून ती गोठणबिंदूखालची थंडगार हवा गेल्यानंतर फक्त बोटेच (हातांची अधिक पायांची) काळीनिळी पडली असतील, हे संभव वाटत नाही.

(हं, आता आधीच काळी असलेली एखादी वस्तू काळीनिळी पडणे शक्य नाही, असा काही दावा असल्यास गोष्ट वेगळी.)

स्वर्गवासी पपू. सावरकर आठवले.

हं, बरोबरे. संघाचीच शिकवण ती, सावरकरच आठवणार. पंचात लंडन हिंडणारे स्वर्गवासी प.पू. गांधी नाही आठवणार. हल्ली कितीही प्रातःस्मरणीय केलेले असले, तरीही; प्रभातफेरीचे समयीसुद्धा. चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

संघाची शिकवण, शरीराचे चोचले पुरवायचे नाहीत. त्यामुळे फक्त बोटांकडेच बघण्याची संमती असते असं प्रातःशाखेतल्या बौद्धिकात शिकवलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

---काळीनिळी पडली असतील, हे संभव वाटत नाही ---
.हे जास्त शक्य आहे . शिवाय काळे निळे होणे व पडणे या दोन वेगळ्या व एक पाठोपाठ होणाऱ्या प्रक्रिया असाव्यात .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रातःस्मरणीय for laxative effect ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पार्ल्यात पेठा नाहीत, पाट्या नाहीत.
( बाकी एक स्थळ पार्ल्याचे आले होते मला. आटीव दुध काय , सौम्य बोलणे काय अगदी घाबरलो होतो. शाखावाले होते का माहित नाही/ नसावेतच. )
नाहीतर एकेक मुद्दा खोडला असता इथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या पुणेकरांना आधीच बदनाम करुन सोडले आहे, आता आम्हा पार्लेकरांवर वक्रदृष्टी ? विजुभाऊ, धावा, आपण पार्लेकर धोक्यांत आलो आहोत.

-जुन्या पार्ल्यातल्या मोरबागेच्या शाखेवर तय्यार झालेला...
शरीराच्या सर्व अवयवांचे चोचले पुरवणारा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'राम' हवा म्हणून 'त्यांना' बडवतो,काम हवे म्हणून 'यांना' बडवतो
आम्ही रामाचे हो दास, आम्हाला बडवे होण्यातच रस|

पुण्याला पेठीय { इतरांनी उगाचच घोटलेले} विनोदांतून मुक्त करण्यासाठी दुसरे कोणतेतरी लोकमान्य शहर/रे पुल करायला हवीत. त्यासाठी पारले चांगले उमेदवार आहे. विमानतळ जवळून दिसणारे शहर. शिवाय गायीचे नाही पण म्हशिचे दूध गोरेगावातून प्रथम पोहोचते. पौष्टिकपणाचे रहस्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0