संबंध मानवी मुंडक्याचे दुसऱ्या एका कबंधावर आरोपण

इटलीचे सर्जिओ केनावेरो आणि चीनचे शाओपिंग रेन हे दोन शल्यविशारद डिसेंबर २०१७ मध्ये पहिले संबंध मानवी मुंडक्याचे दुसऱ्या एका कबंधावर आरोपण करणार अशी बातमी गाजत होती. मेंदूकडून मज्जारज्जूमधून (spinal cord) शरीराच्या निरनिराळ्या भागांकडे सुमारे २ कोटी मज्जातंतू (axons) जातात. त्यामुळे मुंडक्याचा योग्य तो मज्जातंतू कबंधाच्या योग्य त्या तंतूला जोडणे हे आजच्या तंत्रज्ञानाला अशक्य आहे, त्यामुळे चुकीची जुळणी होऊन पेशंटला अतोनात यातना होत राहतील, त्यामुळे या उद्योगात पडू नये, अशी इतर सर्व तज्ज्ञांची धारणा होती. पण यावर केनावेरो यांचे असे म्हणणे पडले की जर मुडके-कबंध एकमेकांना पॉलिइथिलिन ग्लायकॉल हा गोंद वापरून चिकटविले , तर १०-२० टक्के "बरोबर" जुळण्या होऊन संदेशवहनाचे नवे मार्ग आपोआप तयार होतील. (मज्जारज्जूच्या दोन तुकड्यांना याप्रकारे - अगदी माणसांमध्ये सुद्धा- यशस्वीपणे चिकटविले गेले आहे). अजूनपर्यंत तरी याबाबत बातमी नाही. (दुसरीकडे आम्ही हे भारतात यशस्वीपणे केले असून असे अनेक लोक आता भारतात फिरत आहेत असेही एका भारतीय शास्त्रज्ञाने आणि वार्ताहराने जाहीर केले आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी काय नवे विज्ञान शोधून काढले आहे यावर अजून तरी प्रकाशन आलेले नाही). पण हे सर्व भयचकित करणारे, पण लाखो अपंगांना , रोग्यांना नवजीवन देऊ शकणारे विज्ञान कुठे जाते ते बघायचे. अधिकसाठी बघा:
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5025958/
https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/24244881

field_vote: 
0
No votes yet

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे हे तर मागच्या वर्षी होणार होते ना, काय झालं मग?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

No news.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बघा आपल्याकडे पूर्वीपासूनच हे द्न्यान होते. गणपतीचेच उदाहरण घ्या ना Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको