मशिनार्पणम अस्तु!

हॉस्पिटलच्या बिछान्यावर तुम्ही जखडलेले, जागृत
पण बाकी फक्त असहाय्य्यपणे बघू शकणारे.
"ते" मशीन सरकत सरकत येते, कामाला सुरवात करण्याआधी
अदबीने झुकते, मग तुम्हाला समजायच्या आत तुमच्या कवटीचा
मागचा मोठासा भाग कापून काढते . (पळून जाणे आता
शक्य नाही. फार उशीर झालाय त्याला!). तुमच्या उघड्या
मेंदूच्या फिकट गुलाबी पृष्ठभागावर त्या मशीनची
नाजूक, कोळ्याच्या पायासारखी बोटे सहजतेने फिरू
लागतात, तुमच्या मेंदूच्या रचनेचा डेटा पलीकडच्या
कॉम्पुटरवर उतरू लागतो. ती बोटे आता हळूहळू मेंदूत
रुतू लागतात (काळजी करू नका: मेंदूत वेदनावाहक नसा
नसतात !) येणारा डेटा आता त्रिमिती डेटा होत जातो.
पण हे काय भयानक?: बोटांनी उकरलेला मेंदूचा भाग
ते मशीन चक्क कचरापेटीत टाकतंय .
लवकरच तुमच्या लक्षात येतं की "ते" शरीर
आता तुम्ही सोडलंय , बघा , तेही शेवटचे
आचके देत देत आता शांत झालंय . तुमचं
"प्राणी" जीवन संपुष्टात आलंय : पण
कॉम्पुटरमध्ये तुम्ही उतरलाय, हुबेहूब.
तुमच्या अमर जीवनाची सुरवात झालीय!
तुमच्या जुन्या डी-एन-ए-प्रथिने-चरबी-पाणी-युक्त
शरीराच्या वेदनाही आता संपल्या आहेत!
(आता कसं वाटतंय ? गार गार वाटतंय !)
तुमच्या "प्राणी" मेंदूत शंभर ट्रिलियन पेशी-कनेक्शन्स होती,
आणि एकाच वेळी करोडो समांतर प्रक्रिया करत तो मेंदू
तुम्हाला हे जाणवू देत नव्हता की अखेर
चरबी-पाणी यातून संदेशही खूप मंदपणे जातात, आणि
दोन संदेशांमध्ये विश्रांतीचा काळही असावा लागतो .
पण त्या साऱ्या मर्यादा आता गेल्या.
तुम्हाला उपलब्ध झालीय कॉप्युटरची रँडम ऍक्सेस मेमरी:
सेकंदाला साठ बिट्स वरून आता एकदम सेकंदाला
ट्रिलियन बिट्स पर्यंत उडी आहे ही!
अमरत्वच नाही तर अफाट, अमर्याद बुद्धिमत्ताही
आता तुम्हाला प्राप्त झालीये!
काय करणार आहेत तिचं तुम्ही, साहेब?
(२०३०च्या दशकात हे शक्य होणार आहे.
केवळ थोडीफार सॉफ्टवेअर ची डेव्हलपमेंट,
आणि थोडे अधिक शक्तीचे कॉम्प्युटर्स याची
गरज उरली आहे. विश्वास बसत नाही?
पहा: https://www.carboncopies.org/)
xxx

field_vote: 
0
No votes yet