समांतर

४ वाजून ५७ मिनीटं.
कंपनीचं आऊटपंच मशीन वेळ दाखवत होतं. काम संपवून लवकर खाली यावं तरी असं ५ वाजेपर्यंत ताटकळत थांबावं लागतं. एरवी मी नेहेमीसारखा त्या मशीनकडे पाहून हळूच एक शिवी पुटपुटलो असतो, पण आज नाही.
कारण आज तिथे ती होती. पहिल्यांदाच पाहत होतो तिला कंपनीत. कदाचित न्यू जॉईन केलं असावं किंवा कदाचित लांब कुठेतरी बसत असावी आणि आज पंचिंगला या गेटजवळ आली असावी. काही का असेना. मला घंटा फरक पडत होता. मला काळजी वेगळीच होती.
मला मुलींशी बोलायला जमत नसे. आत्ताही मला वाटत होतं की मी असाच येड्यासारखा तिच्याकडे कटाक्ष टाकत राहिन आणि हा हा म्हणता ही ३ मिनीटं संपून जातील. मग मी माझ्या वाटेला, ती तिच्या.

****

"काय रे! अचानक गप्प?" तिने काहीच न कळून मला विचारलं.
मी भानावर आलो. मला असं समोर कोणीही असलं तरी बोलता बोलता विचारात गढून जाण्याची वाईट सवय होती.
"काही नाही. तू क्वांटम फिजीक्समधला समांतर विश्वाचा हायपोथेसीस ऐकलायस का?" मी तिला विचारलं.
ती इरीटेट झाल्यासारखी वाटली. एक नजर पंचिंग मशीनकडे टाकत तिने खालचा ओठ बाहेर काढून नकारार्थी मान हलवली.
"त्यात असं म्हणलय..." मी निर्लज्जासारखा बोलत राहिलो, "...की जगात जेवढ्या शक्यता असतात तितकी वेगवेगळी जगं असतात. म्हणजे समजा आपण एक कॉईन हवेत उडवलं तर लगेच आपल्या जगाची २ जगं बनतात. म्हणजे पूर्ण कॉपी च्या कॉपी बरका. फक्त एकात त्या कॉईनचा छापा पडतो आणि दुसऱ्यात काटा....पण आपल्याला मात्र..."
"हां....ऐकलंय ऐकलंय.." ती मान डोलवत म्हणाली, "पण माझा नाही विश्वास यावर..."
"का?"
"असं असेल तर मग चॉईसला काय अर्थ राहतो ना? म्हणजे जे जे शक्य आहे ते ते सगळं होणारच असेल तर मग आपण मार्ग निवडतो म्हणजे काय करतो? मला तर वाटतं ही कोणीतरी स्वत:ला दिलासा द्यायला बनवलेली थीअरी आहे. काय पाहिजे ते मिळालं नाही की मग ते दुसऱ्या जगात झालं असं म्हणायचं आणि आपली जबाबदारी झटकून टाकायची!"
बोलता बोलता तिने फोन काढला आणि व्हॉट्सॲप चालू केलं. खरं तर मी तिला सांगणार होतो की आत्ता थोड्यावेळापूर्वीही जग विभागलं गेलं असेल आणि त्यापैकी एका जगात मी तुझ्याशी बोललो असेन आणि एका जगात नाही, आणि आत्ता आपण त्यापैकी पहिल्या जगात आहोत, पण आता पुढे बोलायची माझी हिंमत होईना.
हिच्याशी ॲग्री व्हावं का? पटणार असेल तर काय हरकत आहे? का नको? हिला वाटायचं पोराला स्वत:चं मतच नाही.

****

"हो ते पण आहेच!" मी बारीक आवाजात म्हणालो.
"तिने व्हॉट्सॲप मधून तोंड बाहेर काढून माझ्याकडे पाहिलं. हलकसं हसून फक्त "हं" असं म्हणाली आणि पुन्हा पटापट टाईप करायला लागली.
च्यायला हिला बॉयफ्रेंड दिसतोय. त्याच्याशीच गुलूगुलू करत असेल. श्या राव! काय नशीब असतं लोकांचं! आत्ता ती अशी माझ्याशी बोलत असती तर?

****

फोनमध्ये नोटिफिकेशनचा आवाज आला तसा मी लगेच पांघरूणातून हात काढून पटकन मोबाईल घेतला. अनलॉक करता करता मला क्षणभर घड्याळात ४:५८ झालेले दिसले.
तिचाच मेसेज होता. आत्ता झाली आठवण सालीला.
"इकडे एक उपाशी डेस्परेट माझ्याशी क्वांटम मेकॅनिक्सवर बोलतोय...(विंक)" मी मेसेज वाचला.
माझी सटकली.
"इथे मी आजारी पडलोय, ऑफिसला नाही आलो तर मला मेसेज करायला वेळ नाही तुला आणि लोकांशी फालतू बौद्धिक गप्पा करायला वेळ आहे वाटतं" मी मेसेज टाईप केला, आणि मग जोरात एक शिवी घालून डीलीट केला. अशा वेळी मला स्वत:चा फार राग येत असे.
"कोण आहे?" मी मेसेज पाठवला. मग पटकन एक डोळ्यातून पाणी काढून हसणारं तोंडपण पाठवलं.
एक टिक.
मी आशाळभूतासारखा दुसरी टिक येण्याची आणि ती निळी होण्याची वाट पाहत बसलो. तिला कंपनीत नीट रेंज नसते मला माहित होतं. कदाचित म्हणूनच तिने दिवसभर मेसेज केला नसेल....
पण हे काय कारण आहे का च्यायला? आत रेंज नाही तर बाहेर येऊन करायचा. बॉयफ्रेंडसाठी इतकंपण नाही करू शकत का! माजलीये साली. सगळे सारखं अटेंशन देतात त्यामुळे हिला आपली किंमत उरली नाहीये.
मी अचानक भयंकर निराश झालो. फोन लांब फेकून दिला आणि परत पांघरूणात शिरलो. साला आपल्याला कधी मिळेल असं इतकं अटेंशन?

****

४:५९!
अजून एक मिनीट. शिट.
फोनची रेंज गेलेली होती. आता हा परत चिडणार. संध्याकाळी भेटायला गेले तर परत तमाशे करेल.
मी काहीच न कळून केस बोटाने कानामागे सारले आणि थोडी मान तिरकी करून भुवई खाजवली. समोर तो होताच. आशाळभूतासारखा मला न्याहाळत.
मी किळस येऊन दुसरीकडे पाहू लागले. अभावितपणे कंबरेकवळ हात नेऊन मी टॉप खाली ओढला.
३० सेकंद.
माझा फोन किणकिणला. त्याचाच होता. आता याला कसं आणि काय समजवायचं? कट करावा का? नको! परत याची आणखी सटकायची...
बघ बाबा बघ आशाळभूता! असं असतं. कशाला टापतोस मला? बरा आहेस की सिंगलच...
१० सेकंद.
फोन वाजतच होता. शेवटी मनाचा हिय्या करून उचलला आणि बारिक आवाजात हॅलो म्हणाले. आता मशीनपाशी गर्दी होऊ लागली होती.
"एक मिनीट थांब फक्त!" मी कसबसं बोलले. त्यानी ऐकलं की नाही कोण जाणे कारण त्याने अगोदरच आरडाओरडी चालू केली होती....

****

"पीप-पीssssप"
तिने आऊट स्वाईप केलं. ही ३ मिनीटं मला अगदी वाटलं तशीच गेली होती. पण असाही काही ओळखपाळख नसताना मी तिच्याशी कसा आणि काय बोलणार होतो? तेही कंपनी प्रीमाईसेस मध्ये! उगीच हॅरेसमेंट केस वगैरे पडायची.
आणि असंही कोणी आपणहून बोलेल असं आपलं थोबाड नाही. मी उगाच फोन काढून त्यात स्वत:चं रीफ्लेक्षन पाहिलं.
काल दाढी केली असती तर काहीतरी होप्स होते.
"पीप-पीssssप" चला. संपला आजचा दिवस.
"एक्स्क्यूज मी.." मागून एक अनिश्चीत आवाज आला. मी गर्र्कन मागे वळलो.
ती तिच होती.
"अं...मी नवीन आलीये. बसस्टॉप कुठे आहे सांगतोस का?"
आज मी गाडी आणली होती. कुठे राहते विचारवं का?....

****

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एक नंबर हो केदारभाऊ. तुम्ही काहीतरी मोठं लिहा राव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

Thanks! lihin nakki!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Radical honesty! Cool!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम लेखन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Thank you so much!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त हो..
आणखी वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आणखी वाचायला आवडेल.

ठीक.

पुन्हा पहिल्यापासून वाचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Thanks for your permission.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

Thank you so much!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लय भारी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)