फ्युचर्स व फॉरवर्ड मार्केट बद्दल

फ्युचर्स व फॉरवर्ड अशा दोन भिन्न बाजारपेठा आहेत अशी कल्पना करा. फ्युचर्स मधे एक मध्यवर्ती एक्सचेंज असते व त्यात ट्रेडरच्या द्वारे धान्य व इतर वस्तूं साठी बोली लावता येते. बोली लावून झाली तरी दुसऱ्या दिवशी फ्युचर्स मार्केट मधे आपली बोली कॅन्सल करता येते. म्हंजे बोली लावल्यानंतर भविष्यातील ज्या तारखेचा वायदा केलेला असतो त्या तारखेपर्यंत कोणत्याही दिवशी आपली बोली कॅन्सल करता येते. व कॅन्सल करण्यासाठी व्यवहार करताना ज्याच्याशी बोली लावताना व्यवहार केला त्याच्याशीच पुन्हा कॅन्सल करण्याचा व्यवहार करायचे बंधन नसते. व मुख्य म्हंजे ॲक्च्युअली धान्य-वस्तू डिलिव्हर करण्याचे बंधन सुद्धा नसते.

फॉरवर्ड मार्केट मधे ॲक्च्युअल वस्तूची डिलिव्हरी अपेक्षित असते. फॉरवर्ड करार हा कधीही व कुठे ही केला जाऊ शकतो. त्यामधे एक्सचेंज ची गरज नसते. फॉरवर्ड मार्केट मधे रोजच्या रोज सेटलमेंट किंवा कॅन्सलेशन नसते. फॉरवर्ड मार्केट मधे जो करार असतो त्यात सहभागी पार्ट्यांना हवी ती कलमे घालता येतात. अर्थातच दुसऱ्या पार्टीला ते कलम मंजूर असायला हवे. फ्युचर्स मार्केट मधे हे अवघड असते व तिथे स्टँडर्ड कलमे असतात. उदा. गव्हाची प्रत्येक प्रत फ्युचर्स मार्केट मधे देवाणघेवाण करण्यास उपलब्ध असेलच असे नाही. त्यातल्या काही असतील. व म्हणून ज्या प्रती फ्युचर्स मार्केट मधे उपलब्ध नसतील त्या प्रतींसाठी फॉरवर्ड मार्केट असते. तांत्रिक दृष्ट्याच बोलायचे तर फ्युचर्स मार्केट हा फॉरवर्ड मार्केट चा उपसंच असतो.

फ्युचर्स मार्केट मधे व्यवहार करणे ह्यात व्यवहाराचे स्टँडर्डायझेशन असल्यामुळे शोधाशोध व वाटाघाटी चा खर्च अत्यंत कमी असतो. फॉरवर्ड मार्केट मधे पार्टी शोधणे व तिच्या क्रेडीबिलिटी बद्दल माहीती मिळवणे व व्यवहारासाठी वाटाघाटी (प्रसंगी वकील आणून) करणे हे सगळे करावे लागते. अर्थात करारामधे हवी ती कलमे अंतर्भूत करण्याची लवचिकता हवी असेल तर हे खर्च करावे लागतीलच. फ्युचर्स मार्केट मधे वचन मोडणाऱ्यास ताबडतोब शिक्षा होऊ शकते म्हंजे एक्सचेंज चे व्यवस्थापन स्वत:च व ताबडतोब कारवाई करू शकते. फॉरवर्ड मार्केट मधल्या केसेस कोर्टात जातात. तिथे वेळ लागू शकतो व खर्च सुद्धा होऊ शकतो.

फ्युचर्स मार्केट चा मोठा फायदा हा की किंमतीमधे होणाऱ्या चढ-उतारांपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर पर्याय उपलब्ध आहे.

दुसरं म्हंजे - Centralized futures trading offers another significant benefit in addition to facilitating hedging. In particular, continuous trading on a centralized exchange determines prices that embody information concerning supply (such as information on weather and insect infestations) and demand (including export orders and processor needs) in the possession of myriad individuals. Those who possess such information can profit by trading on the futures market. This trading, in turn, affects supply and demand on the futures market, thereby affecting the market price. Moreover, the ability to profit gives traders incentives to collect new information. उदा. एखादा शेतकरी ही माहीती वापरून काय पेरावे याचा निर्णय सुद्धा घेऊ शकतो.

भारतातल्या फ्युचर्स च फॉरवर्ड मार्केट बद्दलची तपशीलवार माहीती इथे आहे. ६ राष्टीय पातळीवरच्या व ११ खास धान्यमालासाठी असलेल्या एक्स्चेंजेस मधून धान्य व इतर ११३ वस्तूं/पदार्थांचे व्यवहार चालतात.

प्राईस मेकॅनिझम चे स्वरूप समजुन घेण्यासाठी फ्युचर्स मार्केट ची केस समजून घ्यावी.

फ्युचर्स मार्केट मधे किंमतींमधील चढ-उतार हे राजकारण्यांना गैरसोयीचे असल्यामुळे या मार्केट मधे सर्वसामान्यांच्या हिताच्या नावाखाली हस्तक्षेप करण्याचे प्रकार अनेकदा झालेले आहेत. अगदी अमेरिकेत सुद्धा कांद्याच्या फ्युचर्स वर १९५५ मधे घातलेली बंदी आजतागायत अस्तित्वात आहे. हे हस्तक्षेप प्राईस कंट्रोल्स पासून ट्रेडिंग वर निर्बंध यापर्यंत कोणतेही असू शकतात. पण त्याचे परिणाम व्हायचे तेच होतात - फ्युचर्स मार्केट चे मुख्य फायदे लोकांना मिळत नाहीत व लोकांचा फ्युचर्स मार्केट वरील विश्वास उडतो व त्यामुळे लोकांचा फ्युचर्स मार्केट मधला सहभाग कमी होतो व फ्युचर्स मार्केट उत्तरोत्तर कमी कमी उपयोगी बनत जाते.

------

निळ्या रंगातला मजकूर हा एका माजी फ्युचर्स ट्रेडरने लिहिलेल्या पुस्तकातून उचलेला आहे. लेखकाचे नाव S. Craig Pirrong. पुस्तकाचे नाव - Grain futures contracts - an economic appraisal - पृष्ठ क्र. ५.

field_vote: 
0
No votes yet

भारतातल्या फ्युचर्स च फॉरवर्ड मार्केट बद्दलची तपशीलवार माहीती इथे आहे. हा दुवा वर दिलेला आहेच.

फ्युचर्स मार्केट चे फायदे - वरील दुव्यातून साभार -

Benefits to farmers and other stakeholders

Farmers and growers benefit through the price signals emitted by the futures markets even though they may not directly participate in the futures market. The futures markets lead to reduction in the amplitude of seasonal price variation and help the farmer realize a better price at the time of harvest. This also helps the farmer in planning his cultivation in advance as well as to determine the kind of crop which he would prefer to raise, by taking advantage of the advance information of the future price trends, and probable supply and demand of various commodities in advance. By providing the manufacturers and the bulk consumers a mechanism for covering price-risks, the futures market induces them to pay higher price to the producers, as the need to pass on the price-risk to farmers is obviated. The manufacturers are able to hedge their requirement of the raw materials and as also their finished products. This results in greater competition in the market and ensure viability of the manufacturing units.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0