"असं वाटायचं"

(भाषांतर: मिलिंद पदकी)

आम्हाला वाटायचं की "हे सगळं " ठीक करण्यासाठी
साध्या बोलण्यातही व्याकरण-शुद्ध वाक्येच वापरावीत ,
चालताना किंवा स्कूटर वरून जाताना पाठीचा कणा
शक्य तेव्हढा ताठ ठेवावा,
अशांत आणि अराजकाच्या बातम्या धैर्याने झेलाव्यात
खोट्या मतदानासाठी पोलिंग बूथमध्ये घुसणाऱ्या गुंडांना
आरडा-ओरडा करून हाकलून लावावे

भूतकाळातील घटना आणि त्यांचे संदर्भ आठवणीत ठेवावेत
अकस्मात आनंदही उसळू द्यावा
चमचेगिरी सोडावी
आपापल्या कारणांनी विकल झालेल्या लोकांबरोबर
माणुसकीने वागावे

एव्हढे बास झाले.

पण त्यानंतर खूपच काळ लोटून गेला आहे
आणि आता आम्हाला असं वाटतंय
की आम्हाला असं वाटायचं !
xxx

मूळ हिंदी: "लगता था / व्योमेश शुक्ल"

http://kavitakosh.org/kk/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%A5%...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भाषांतर छानच जमलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
इक दिन बिक जायेगा माटी के मोल |
जग में रहे जायेंगे प्यारे तेरे बोल ||