Skip to main content

सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - १०

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.

---

.
हे आज लतादीदींनी त्यांच्या फेबु पेज वर शेअर केलं होतं.
.
भिमण्णा व जसराज.
.

अमित.कुलकर्णी Tue, 30/01/2018 - 10:48

प्रीतम भट्टाचार्जी यांनी गायलेली ही रागमाला. यात वेगवेगळ्या रागांच्या सिग्नेचर फ्रेझेस घेऊन त्यात रागांची नावे कल्पकतेने गुंफली आहेत. (पारंपरिक रागमालांपेक्षा वेगळा प्रयोग)
आणि ही बंदिश - यात बंदिशेचे बोल नोटेशनप्रमाणे लिहिले आहेत.
(आणखी एक उदाहरण - चैतन्य कुंटे)

१४टॅन Sat, 03/02/2018 - 15:54

व्हाईट कॉलर ही सिरीअल पाहतो आहे. त्यातल्या पहिल्या सीझनच्या सहाव्या एपिसोडात हे गाणं आहे.
कविता फार खास नाही, पण आवडली बा. शेन अलेक्झांडरचा आवाजही छान. गाण्याला मस्त फ्लो आहे. ३:०७ पासून सुरू होणारा सोलोही मस्त.
गाण्यातला फ्लो आवडत असेल तर नक्की ऐकावं.

ppkya Tue, 06/02/2018 - 06:30

आधी भाग २ वाचला, आता भाग १ वाचतोय. थोडेसे उलटे झाले, पण काही फरक पडत नाहीये...! हेमलकसा मधील प्राणी विश्व यावर आहे...माहिती असलेच...गमतीशीर पुस्तक आहे...पण नेगेलचा अर्थ काय असावा बरे?

अबापट Mon, 19/02/2018 - 15:43

https://www.facebook.com/vineet.alurkar/posts/10156222860489809
हे घ्या रंगीत गाणं !!
मूळ कार्यक्रम मंडईत झाला होता .
कार्यक्रमाचं फडतूस लोकेशन आणि
"चाकवत आणि शेपू
घरी जाऊन चेपू "
असल्या तद्दन देशी भाषेमुळे जंतूंना नापसंत असणारच !!
पण बरं आहे हे रॉक ballad ..

लोकाभिमुख कला

अबापट Fri, 23/02/2018 - 13:44

In reply to by बिटकॉइनजी बाळा

अहो हा विनीत अलुरकर माफक फेमस आहे . ( अलुरकर म्युझिक वाल्या अलुरकरांचा मुलगा असावा ) विद्या व्हॅली शाळेत संगीत शिकवतो . कुठल्याश्या ऑस्ट्रियन इसमाबरोबर योगा लॉजिक नावाचा ब्यांड आहे त्याचा . वर्षातले काही महिने तो तिकडं युरोपात शो करत असतो . ( तरीही जंतू त्याची दाखल घेत नाहीत ) उर्वरित वेळेस त्याचे तुम्ही ( म्हणजे तू , ब्याट्या , ढेरे सर , मनोबा) ज्या ठिकाणी सारखे हादडायला जात असता त्या कोरेगाव पार्कात शिशा कॅफे , क्लासिक रॉक कॅफे , हार्ड रॉक कॅफे वगैरे ठिकाणी भूपाल लिमये , कुणि फॉंसेका वगैरे चांगलं वाजिवणाऱ्या पुमव ( अर्थात ममव अधिक क्याम्पातील इमव ) मंडळींबरोबर शोज करतो . चांगला गातो . उर्वरित मंडळी चांगलं वाजवतात .
मी त्याच्या काही शोज ना गेलो आहे .
तो चांगला कलाकार आहे , तुमच्या कट्यार वाल्या काळ्या पेक्षा असं वैयक्तिक मत . ( हे उगाच )
अजून काय ?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 21/02/2018 - 21:25

चौदावा खरडफळ्यावर तक्रार करत होता की फार ब्लॅकँड व्हाईट गाणी बोर्डावर दिसत आहेत. तर त्याची माफी मागते.

गेले बरेच दिवस आमच्याकडे ढगाळ हवा आहे. एखाद दिवस तापमान बरं असतं, आणि पुन्हा थंडी-वारा. गेले काही दिवस काही घटनाही अशा घडत आहेत की जोनी मिचेलचं हे गाणं, आणि त्यातही या धाटणीचं गाणं पुनःपुन्हा आठवत राहतं. तिच्या आल्बममध्ये ज्या धाटणीत ती हे गाते ते मला फार आवडत नाही. खर्जातलं, शांत गाणंच जवळचं वाटतं. (वय झालं, दुसरं काय!) -

१४टॅन Thu, 22/02/2018 - 20:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गाणं छान आहे. उतरवून घेतो. ह्याच्या निमित्ताने काही झकास गाणी आठवली ती सवडीने टाकेन. फायनली 'अलिकडचं' काहीतरी नवीन ऐकायला मिळालं ह्यातच आपण खूष.

१४टॅन Sun, 25/02/2018 - 22:00

हे गाणं अलिकडे ऐकलं, आणि ऑटाफे झालं. संथ, मंदगतीचं आणि अतिशय स्निग्ध आवाजात गायलेलं आहे. कायम कलेक्षन मध्ये असावं असं.

अबापट Mon, 26/02/2018 - 05:23

वा.वा.झकास. मिहिर शेठ, जॉर्ज च्या नेहमीच्या पठडी बाहेरच ऐकायच असेल तर 'I got my mind set on you 'ऐका.
जॉर्ज गेल्यावर एक वर्षानी CONCERT FOR GEORGE झाली होती .तीही ऐका. थोर थोर मंडळी गाऊन गेली आहेत यात .जॉर्ज अती भारत प्रेमी होता. त्यामुळे सुरुवात संस्कृत श्लोक ,मग अनुश्का शंकर वगैरे बोअर पार्ट आहे. पण असो. CONCERT जबराट अहे .बघा जरुर .यू ट्यूब वर आहे संपुर्ण.
(अवांतर : आता स्वताला पण्डित म्हणवून घेणारे एक दाढी धारी पुणेरी तब्बल्जी पन दिसतील तुम्हाला त्यात .कोणाचा मटका कुठे लागेल सांगता येत नाही.)

मिहिर Mon, 26/02/2018 - 08:37

In reply to by अबापट

I got my mind set on you ही आवडते. मस्त आहे. कॉन्सर्ट फॉर जॉर्ज मागे उडत उडत पाहिला होता. त्यातलं एरिक क्लॅप्टन व पॉल मॅकार्टनीचं While my guitar gently weeps व्हर्जन खूप आवडतं. अनेकदा ऐकलं आहे. तबलजी कोण, विजय घाटे का? पूर्ण कॉन्सर्ट दिसत नाहिए आता युट्युबवर.
अनुष्का शंकर आवडत नाही का तुम्हाला? त्या कॉन्सर्टमधला तिचा भाग मला बोअर वाटला होता, पण तिचे Traces of you व Land of Gold हे अल्बम आवडतात मला.

अबापट Mon, 26/02/2018 - 13:19

In reply to by मिहिर

++या कॉन्सर्टमधला तिचा भाग मला बोअर वाटला होता++
एवढेच म्हणणे आहे . लोकं भार्तीय एक्झॉटिक म्हणून ऐकून घेतात का काय कोण जाणे .
++तबलजी कोण,++
समजून घ्या . जास्त सांगनार नाय . पूर्ण बघा कॉन्सर्ट .

अमुक Mon, 26/02/2018 - 22:48

माझ्या एका जुन्या प्रतिसादातून..

'वरुमयिन् निरम् सिवप्पू' (म्हणजे शब्दशः - 'गरिबीचा रंग लाल') ह्या के. बालचंदर दिग्दर्शित चित्रपटातले माझे आवडते 'सिप्पी इरक्कद' गाणे. संगीत एम्.एस्. विश्वनाथन्.
कमल हा एक खिशाने अत्यंत फाटका, नोकरीसाठी वणवण करणारा पदवीधर. कवीमनाचा, भावूक आणि मानी. श्रीदेवीशी ओळख झाल्यावर दोघांत आकर्षण निर्माण होते पण प्रेम बराच काळ अव्यक्त राहते. तर ह्या गाण्याच्या सुरूवातीस, श्रीदेवी त्याला आव्हान देते, की ती एक धून गाईल आणि कमलने त्यावर लगोलग काव्य रचावे. कमल 'जय भारती' म्हणत ते आव्हान स्वीकारतो आणि मग गाणे सुरू होते. जुगलबंदीच्या एका टप्प्यानंतर कमल अलगद त्याचे प्रेम काव्यात उलगडतो आणि मग श्रीदेवीही त्याला प्रतिसाद देते, असे हे गुणी गाणे. ( इंग्रजीत शब्दानुवाद असल्याने समजायला सोपे. दुर्दैवाने गाण्यापूर्वीचा आणि थोडा नंतरचा प्रसंग मिळून असे एकत्रित गाणे सापडले नाही.) चित्रपटातील अनेक प्रसंग (आता भडक वाटतात पण) हेलावून टाकणारे आहेत/होते.

ह्या चित्रपटावरून हिंदीत 'जरासी जिंदगी' नावाचा चित्रपट निघाला. अनिता राज आणि कमल अशी जोडी होती. त्यातही हे 'तनदीम तेरेना' गाणे जुळवले होते पण 'सिप्पी..' इतके नीट जमले नाही.
'निळू फुलें'नी अनिता राजच्या वडिलांचे काम जबरा केले होते.

अबापट Thu, 08/03/2018 - 11:48

In reply to by चिंतातुर जंतू

होय होय ...नक्कीच.
आता दररोज देणार एक एक . टेक्नोमंद अशा मी व्हिडिओ एम्बेड का काय ते करू शकत नाही . माझ्या लिंका संपादक म्हणून तुम्ही एम्बेड का काय ते करणार का ?

चिंतातुर जंतू Thu, 08/03/2018 - 12:01

In reply to by अबापट

लिंक एम्बेड कशी करावी?
१. तुम्ही वर दिलेल्या 'स्वीट होम आलाबामा'च्या लिंकवर मी गेलो.
२. व्हिडिओ सुरू झाला तरी त्याकडे दुर्लक्ष करून मी उजवीकडे खाली असलेल्या 'शेअर'वर क्लिक केलं.
३. एक छोटी आडवी खिडकी पॉप-अप झाली. त्यात https://youtu.be/9Cyokaj3BJU ही लिंक दिसली, पण उजवीकडे 'एम्बेड'चा पर्याय दिसला. त्यावर क्लिक केलं.
४. तेव्हा एम्बेड कोड मिळाला : iframe width="560" वगैरे. तो कॉपी केला आणि इथे प्रतिसादात डकवला. त्याला पाहा आणि म्हणा अहाहा :

अबापट Tue, 13/03/2018 - 13:35

In reply to by गवि

गवि शेठ ,
++ठराविक जॉनर हे बकवास, कचरा असं खऱ्या दर्दी संगीतप्रेमीनं कधी म्हणू नये.++
नाही हो , असला काही प्रमाद मला करायचा नाहीये . मी जॉनर वाईट म्हणत नाहीये .
त्यावर अनेक लोकांनी अमाप लिहिले आहे त्याबद्दल लिहिले आहे हो .
कृपया गैरसमज करून घेऊ नका .
मी कुठल्याही जॉनर ला कचरा म्हणणार नाही. फारतर मला झेपत नाही म्हणेन .

१४टॅन Sun, 01/04/2018 - 22:43

महेश काळेबद्दल काहीही म्हणा, प्रत्येक मैफिलीनंतर शेकडो सेल्फ्या त्याला घेऊ द्या, हे एक गाणं तोडफोड गायला आहे बुवा. श्यामराज ह्यांचं सोप्रानो सॅक्सोफोन आणि तौफिक कुरेशींचा जेम्बे झक्कास. जरुर जरुर ऐका. ३४:०८ ला गाणं सुरू होतं.
(आधीच्या कुठल्यातरी एपिसोडातलं घेई छंद ब्ल्यूज आणि रॉक स्टाईल मध्ये फ्युजन केलेलं- पब्लिकला जास्त आवडलं. मला पर्सनली हे एक फार फार आवडलं. )
https://www.voot.com/shows/sur-nava-dhyas-nava/1/547920/mahesh-kale-s-s…

चिमणराव Mon, 09/04/2018 - 05:54

मागे एकदा फ्रेंच शिकण्यासाठी पुस्तक आणलेलं. इंग्रजी स्पेलिंगमधून फ्रेंच उच्चार कळत नाहीत. मराठीत हवे होते. युट्युबवरची learn french - frenchpod101 dot com यांचे व्हिडिओ पाहिले/ऐकले आणि लक्षात आलं बरंच कठीण आणि अगम्य उच्चार ( स्पेलिंगप्रमाणे) आहेत.
slow and easy french हेसुद्धा छान वाटले.

पुंबा Mon, 09/04/2018 - 15:57

In reply to by चिमणराव

मला फ्रेंच शिकण्याची फार ईच्छा आहे. युट्युबवर पाहिले बरेच चॅनेल्स मात्र फारसे चांगले वाटले नाहीत. पुस्तके वगैरे तर आजिबातच योग्य माध्यम नाहीत भाषा शिकण्यासाठी असे वाटते. कुणी इतर काही मार्ग सुचवू शकेल का?

बॅटमॅन Mon, 09/04/2018 - 16:14

In reply to by पुंबा

पुंबा सर, तुम्ही डुओलिंगो.कॉम ही वेबसाईट पहा. पूर्णपणे मोफत आहे आणि फ्रेंचचा फ देखील तुम्हांला माहिती नाही असे समजून त्यातला कोर्स तयार केलेला आहे. मी त्यावरूनच बेसिक फ्रेंच शिकलो, फार उत्तम प्रकार आहे नक्की ट्राय करून बघा. साधारणपणे रोज पंधरावीस मिनिटे दिली तर वर्षभराच्या आत फ्रेंचशी बऱ्यापैकी ओळख व्हावी.

पुंबा Tue, 10/04/2018 - 19:35

In reply to by गब्बर सिंग

कामात आजिबातच लागत नाही. मात्र फ्रेंच संस्कृती, समाज याविषयी आकर्षण वाटते. त्यासाठीच फ्रेंच भाषा शिकावी अशी इच्छा बर्‍याच वर्षांपासून आहे.

चिमणराव Tue, 10/04/2018 - 07:13

In reply to by बॅटमॅन

ड्युओलिंगो( अॅप आणि साइट) पूर्वीही पाहिले होते. आता पुन्हा पाहिले. त्यांची टेस्टिंग पद्धत फार वेळखाऊ आणि कंटाळवाणी आहे. त्यापेक्षा इतर युट्युब व्हिडिओ चांगले फास्ट आहेत ते ओफलाइन डाउनलोड केलेत. फक्त फ्रेंच उच्चार वाचून कळणे कठीण आहेत इतर भाषांपेक्षा. जर्मन जपानी सोपे वाटते. त्यामध्येही "learn while you sleep" videoचे mp3 केल्यावर तर लॅाक स्क्रीनमध्येही ऐकता येते.

चिमणराव Tue, 10/04/2018 - 05:35

झाशीजवळच्या ओर्छा इथले महाल पाहण्यास बरेच परदेशी पर्यटक येतात त्यांच्याशी तिथले गाववाले फ्रेंच/जर्मन/रशिअन/इंग्रजीत बोलतात हे पाहिले आहे. एवढं कामाचं तुटपुंज बोलता आलं,फावल्या वेळात शिकता आलं तर बरं होईल.डुओलिंगो पाहतो.

१४टॅन Sun, 22/04/2018 - 21:08

अश्विन श्रीनिवासन ह्यांनी बासरीवर झकास वाजवलेला आहे. रुट्स अल्बम उपलब्ध आहे, त्यातलं हे एक खूप सुंदर आहे. इथे ऐका:

मिहिर Sat, 28/04/2018 - 02:25

परवापासून Joan Baezचं Diamonds and rust ऐकतोय. हे गाणं बॉब डिलनबद्दल लिहिलंय असं वाचलं. सध्या गाणं इतकं आवडलंय की त्यातल्या "Hearing a voice I'd known a couple of light years ago" कडे दुर्लक्ष करायला तयार आहे. :)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/05/2018 - 22:38

In reply to by मिहिर

अमेरिकेत राहायचं तर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकणं गरजेचं.

बॅटमॅन Fri, 25/05/2018 - 20:25

नामिका म्हणून एक शर्मण्यदेशीय ललना आहे. तिची तीन जर्मन गाणी सांप्रति ऐकली. साधी सरळ, कदाचित म्हणूनच सुंदर.

लिब्लिंगमेन्श ऊर्फ प्रियतम

https://www.youtube.com/watch?v=6Bt1KeMNqvc

ज न पा पार्ल फ्राँसे अर्थात फ्रेंच बरंगिल्ला

https://www.youtube.com/watch?v=OsYg4M3rbYw

कोम्प्लिझिर्ट अर्थात कोम्प्लिकेटेड.

https://www.youtube.com/watch?v=Rh4ZbSjUZjI

सामो Sun, 16/09/2018 - 22:45

जर कोंबडा 'अण्णा अण्णा' हाका मारु शकतो तर, द्न्यानेश्वरांनी रेड्याच्या तोंडी वेद कशावरुन वदविले नसतील? ;)
https://www.youtube.com/watch?v=V-6IQ_7UblQ

अजुन एक टग्या कोंबडा -
https://www.youtube.com/watch?v=MpUDrSYKUAs

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 23/09/2018 - 19:20

In reply to by पुंबा

या वरच्या गाण्यात टीना सानीच्या तोंडी फैजच्या कवितेतले अशा अर्थाचे शब्द आहेत : देवा, मला राजेपद नको आहे; माझ्यासाठी इभ्रतीचा छोटासा तुकडा पुरे आहे.

वर दिलेल्या गाण्यातलं व्हायलिन आवडल्याचं लिहिलं आहेच.

सामो Sun, 23/09/2018 - 20:46

मैत्रिणीने सुचविलेला व्हिडीओ ऐकला. छान आहे.

____________________
_______________________
हा व्हिडिओ देखिल फार छान आहे.

__________________________
डॉक्टर उत्तम वक्तेदेखिल आहेत. फारच छान.

सामो Tue, 23/10/2018 - 23:16

कोठुन आलो, कुठे चाललो ते एक विश्वेश्वराला ठाउक. सगळेच दोन घडीचे प्रवासी. कोणी लवकर स्टेशनवरती उतरणारं तर कोणी उशीरा उतरणारं. कोणि आपल्याला शेवटच्या स्टेशनपर्यंत साथ देत चालणारं. सुखदु:खाचे क्षण तर कधी धुसफूस. मागे उरतात त्या व्याकुळवणाऱ्या आठवणी. हे गाणं ऐकताना अत्यंत शांत वाटते. मन तल्लीन होते. नवथर प्रणय हा या गाण्याचा आत्माच नव्हे. श्रोत्यांच्या मनावर अक्षरक्ष: गारुड घालणारं, मोहीनी घालणारं गाणं.
'ऋणानुबंधाच्या गाठी' हा गूढार्थ असलेला शब्द आणि त्याच्या अवतीभवती गुंफलेलं हे सुरेल गाणं. माझ्या अत्यंत प्रिय व्यक्तीच्या आवडीचे. किंबहुना, मोबाईलवरती रोज, आमच्या घरात भूपाळीपश्चात हेच गाणं प्रथम लागतं. आजच्या बोर्डावरच्या 'प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला' या गोड गाण्योपरान्त कुमार गंधर्व व वाणी जयराम यांच्या, अजरामर गाण्याव्रती, 'ऋणानुबंधाच्या गाठी' वरती पोचले. चंद्रमणी जसा चंद्रप्रकाशात पाझरतो तसं हृदय वितळतय असे वाटत राहीले.
.

तिरशिंगराव Wed, 24/10/2018 - 10:45

काव्य कितीही चांगले असले, चाल कितीही चांगली असली तरी, कुमार गंधर्वांनी भावगीते म्हणायला नको होती. चुकीच्या जागी हिसके आणि हार्श आवाज लावणे, या प्रकारामुळे गाण्याचा रसभंग होतो. त्यांचं, केवळ तीन मिनिटांचं, ' शंकरा रागातलं - सिर पे घरी गंग' ऐकताना जे थरारुन जायला होतं, तो अनुभव आणि ही भावगीतं, यांत फार फरक वाटतो.

स्वधर्म Thu, 25/10/2018 - 16:22

अापण लहानपणापासून लता यांचे हृदयनाथ यांनी संगितबध्द केलेले रूणूझुणू रूणूझुणू रे भ्रमरा ऐकलेले असतेच. अत्यंत क्रिएटीव्ह चाल. मला सांप्रदायिक चाली पण अावडतात, मधूनमधून एकतो. अचानक काही वेगळं ऐकायला मिळतं. गोदावरी मुंडे यांनी गायिलेलं हेच भजन खूप अावडलं. अावाज काही वेळा खूप वरचा लागला अाहे, पण चाल फारच गोड अन् साधी. गंमत म्हणजे लता यांच्या गाण्याच्या प्रभावामुळे नंतर ही चालच मला अनेकदा अाठवली नाही. गाणं ऐकलं, की तेवढ्यापुरतीच लक्षात राहते.
https://www.youtube.com/watch?v=359nhzcJ_M4

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 25/10/2018 - 21:52

In reply to by स्वधर्म

त्यांच्या आवाजातली निरागसता फारच आवडली. तुम्ही म्हणता तशी साधी आणि गोड चाल.

कालच फेसबुक कृपेनं कडूबाई खरात यांचा असाच निरागस आवाज आणि पारंपरिक चालीतलं गाणं ऐकलं.

पुंबा Fri, 26/10/2018 - 11:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कडूबाईंच्या आवाजात जी कृतद्न्यता, बाबासाहेबांप्रती असणारा आदरभाव आणि मुला-सुनांप्रतीचा अभिमान दिसतो तो लाखमोलाचा आहे. मी आतापर्यंत ४०-५० वेळा ऐकलं असेल हे गाणं. युट्युबवर त्यांची आणखीही गाणी आहेत. जरूर ऐका.
इतक्या गोड आवाजाच्या बाईला कडूबाई असलं नाव ठेवलं गेलें हेच जातीव्यवस्थेचं भिषण, किळसवाणं रूप दाखवणारं आहे.

नंदन Fri, 26/10/2018 - 13:13

In reply to by पुंबा

इतक्या गोड आवाजाच्या बाईला कडूबाई असलं नाव ठेवलं...

शांताबाईंनी एका 'आही चुकी' नावाच्या स्त्रीचा एका लेखात उल्लेख केला होता, ते आठवलं.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 26/10/2018 - 22:51

In reply to by नंदन

कडूबाईंबद्दल हे वाचलंत का?

सप्रेम जय भीम...
एक आवाहन. कडूबाई खरात यांचा आवाज आपण तीन वर्षांपासून ऐकतो आहोत. त्यांची परिस्थिती काल आपणा सर्वांसमोर आली. तर सर्व सहकाऱ्यांनो आपला या महिन्यातील उत्पन्नाचा विसावा हिस्सा कडूबाई खरात यांच्या नावाने असावा असं माझं आवाहन आहे. आपले कलावंत जगले तरच सांस्कृतिक चळवळ तग धरेल. Nikhil Borde कडे डिटेल्स आहेत. आपलं सहकार्य मिळेलच यात शंका नाही. यथाशक्ती मानधन व प्रवासखर्च देऊन विहारांत, परिसरांत, कार्यक्रमात बोलावून मेहनताना प्रदान करावा. क्राऊड फंडिंग करून त्यांना सहकार्य करावं ही नम्र विनंती. पत्रकार मित्रांनी आवाज सर्वदूर पोहोचवावा.

स्वधर्म Fri, 26/10/2018 - 14:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ऐकले. खूप छान स्वच्छ अावाज. सुचवल्याबद्दल तुमचे अाभार. पुंबा, अाणखी ऐकतो कडूबाईंची गाणी.

मिहिर Fri, 07/12/2018 - 01:09

शोस्ताकोविचची 'लेनिनग्राड' ही सातवी सिंफनी न्यूयॉर्क फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात ऐकली. दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याने लेनिनग्राडला (सेंट पीटर्सबर्ग) वेढा घातला होता त्या काळात रचली गेलेली आणि युद्धकाळात सोव्हिएट युनियनमध्ये आणि इतरत्रही भरपूर प्रसिद्ध असलेली सिंफनी. पहिल्या मूव्हमेंटमधली 'इन्व्हेजन मार्च' ही धून खूपच आवडली. इथे सुमारे आठ मिनिटांनंतर पुढची काही मिनिटे ऐकता येईल. परवापासून सतत ऐकतोय. ह्यावेळी योगायोगाने विद्यार्थ्यांसाठी सवलतीची तिकिटे पहिल्या रांगेतली मिळाली होती. समोरच असलेल्या 'चेलो'ची कंपने जाणवणे हा भलताच जबरदस्त अनुभव होता.

अबापट Sun, 13/01/2019 - 13:12

In reply to by सामो

मामी, टेक ऑन मी (1985 -86 ?)आणि स्वीट ड्रीम्स (1983-84 ?) स्मरणरंजनाबद्दल धन्यवाद. हमारे जमाने का पॉप.
स्वीट ड्रीम्स चक्क दूरदर्शन वर बघितलं होतं. 1984 ला ग्रॅमी नॉमीनेटेड होतं ( ज्या वर्षी बीट इट ला मिळालं त्या वर्षी ) अक्खा कार्यक्रम दूरदर्शन वर दाखवला होता ( उरलेले म्हणजे डेव्हिड बावीच लेट्स डान्स, बिली जोएलच अपटाऊन गर्ल, बॉय जॉर्जचं कर्मा कमिलिऑन , स्टिंगच एव्हरी ब्रेथ यु टेक वगैरे होती त्यात आठवतंय)
मायकेलनी खाल्ला सगळ्यांना त्या वर्षी

सामो Sun, 13/01/2019 - 22:25

In reply to by अबापट

स्मरणरंजनाबद्दल धन्यवाद

होय अबा, काल सर्व ८० चे रॉक अन पॉप वगैरे ऐकत होते. 'टेक ऑन मी' चे सादरीकरण काय भन्नाट आहे ना!