अनुसूयेचं #MeToo, ब्रह्मा विष्णू महेश संकटात

दि. माघ कृ ८, कलियुगाब्ध ५११२
चित्रकुटचे जंगल: आताच हाती आलेल्या बातमीनुसार 'मीटू' चळवळीच्या लाटेत संकटात सापडलेल्यांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचीही भरती झालेली आहे. पतिव्रता अनुसूया यांनी या तिघांवर परिस्थितीचा गैरफायदा घेऊन विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. पतीच्या व्रतात अडकल्याचा फायदा घेऊन या तिघांनी आपल्याला नग्न होण्यास भाग पाडले असे त्यांचे म्हणणे आहे.

आकाशवाणीचे वार्ताहर नारदमुनी कळलावे यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत त्यांनी वरील आरोप केला आहे. सध्या मानवलोकात उलथापालथ घडवलेल्या मीटू चळवळीच्या पार्श्वभुमीवर नारदमुनी यांचा देवलोकात चाललेल्या गैरप्रकारावर 'देवलोकातल्या भानगडी' नामक exposé आकाशवाणीच्या 'समुद्रमंथन' या विशेषांकात प्रसिद्ध झाला आहे.

आमच्या वार्ताहराने या तिघांनाही या बातमीवर प्रतिक्रीया देण्यास संपर्क करायचा कसोशीने प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. केवळ निर्मळ श्रद्धा असलेल्यांचाच संपर्क होऊ शकतो असे तिघांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून आम्हांस कळवण्यात आले. (तिघांचे जनसंपर्क कार्यालय एकच आहे आणि संपर्क करण्यास लागणारी पात्रताही एकच आहे हे आमच्या वार्ताहराने विशेष नमूद केले.)

जनसंपर्क कार्यालयाकडून जाहीर केलेल्या पत्रकात दिलेल्या निवेदनाप्रमाणे, देवलोकात घडणार्‍या दैवी लीला प्रकारच्या कामात असल्या भानगडी देवलोकांना कराव्या लागतातच. त्यात त्यांचा कोणताही विपरीत हेतू नव्हता. अर्थात पुर्वीच्या दैवी लीलांचा प्रकार तसलाच होता आणि अशा गोष्टी आता आमच्याकडून चुकूनही होणार नाही अशी खात्री तिघांनीही दिली आहे.

सरस्वतीदेवींनी, या तिघांच्या बायकांना अनुसुयेची असुया होती. म्हणूनच या तिघींनी पतिव्रता चाचणी यांसारखी थेरं करण्यास या तिघांना भाग पाडले असा टोला लगावला आहे. आधुनिक शिक्षण आणि मुल्यं या तिघींनीही आतातरी अनुसरावीत असे सरस्वतीदेवींचे म्हणणे आहे.

तिकडे इंद्राच्या दरबारातून मात्र विपरीतच सूर ऐकू आले. रंभा आणि उर्वशी यांनी हे जरा अतीच होत आहे असे म्हणत नाराजी दाखवली. "नग्नतेचा इतका बाऊ का करावा हे कळत नाही. इथे इंद्राच्या दरबारात फ्रेंच सुद्धा लाजतील एव्हढी नग्नता आम्ही दिवस अन रात्र करीत असतो!"

देवलोकातील सोशलमाध्यम 'ऐरावत' यावर तात्काळ रंभा आणि उर्वशी यांवर टिकेची झोड उठली. ऐरावत वरील काही देवीद्वेष्ट्या लोकांनी अनुसूयेला तक्रार करायला इतका वेळ का लागावा असे म्हणत या आरोपावर शंका व्यक्त केली आहे. इतर ऐरावतकरांनी तात्काळ "ब्रह्मदेवाचा काटा सेकंदानं पण पुढे सरकला नसेल!" याची आठवण करून देऊन त्यांची तोंडं गप्प केली आहेत.

नारदमुनींच्या exposé मध्ये अजून कोणाकोणाचे पीतळ उघडे पडते याकडे राक्षसवर्गाचे लक्ष लागून राहीले आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे ज्या मिथक कथेचं विडंबन आहे - असं मला वाटतं आहे - ती, अनसूयेची ब्रह्मा-विष्णू-महेशासंदर्भातली (आणि बहुदा दत्तात्रेयाच्या उत्पत्ती संबंधातली )मूळ पुराणकथा नेमकी काय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त वगैरे लिहिणाऱ्या मुक्तसुनीतकुमारांनी हा प्रश्न विचारावा! अशानं आमच्यासारख्या (दुसऱ्या पिढीच्या) ओवाळून टाकलेल्या अपारंपरिक लोकांचं कसं होणार!

निळोबा, तुमची कथा मलाही आवडली हो. त्या संदर्भात तुम्हाला MeToo.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद. अहो, पण ही कथा नाय वो! हे रिपोर्टींग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टेक्निकली बोलायचं झालंक तर हे त्या कथेचं विडंबन नाही. कथेतील मूळ वस्तूत कोणताही बदल केलेला नाही. कथेतील वस्तूला नव्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न केला आहे इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा वाचते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>कथेतील वस्तूला नव्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न केला आहे इतकेच.>>

हे तर कोकणी विडंबनांत सततच होत असते. दुसय्रा एका लेखकाने मुलांसाठीच्या पौराणिक कथांमध्ये " हे तिघे रुचिपालट करण्यासाठी पृथ्वितलावर येतात" असे वाक्य लिहिले आहे. एखाद्या मुलाने ** म्हणजे काय विचारले तर तो लैंगिक शिक्षणासाठी योग्य वयाचा झाला असे म्हणता येईल काय?
-
कथेमध्ये " *** तुला माज्ज्यावर बरोस्सा नाई क्काय" हे मेटल गाणं का नाही?"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथेच विडंबन नाही असं मी म्हणलं कारण कथा जशी काही आहे, तशीच ती इथे वापरलेली आहे.

>>दुसय्रा एका लेखकाने मुलांसाठीच्या पौराणिक कथांमध्ये " हे तिघे रुचिपालट करण्यासाठी पृथ्वितलावर येतात" असे वाक्य लिहिले आहे. एखाद्या मुलाने ** म्हणजे काय विचारले तर तो लैंगिक शिक्षणासाठी योग्य वयाचा झाला असे म्हणता येईल काय?

ही दोन वाक्यं एकमेकाला संबंधित आहेत का? ** म्हणजे नक्की काय?

>>कथेमध्ये " *** तुला माज्ज्यावर बरोस्सा नाई क्काय" हे मेटल गाणं का नाही?"

का असावं? ही कथाच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0