अलीकडे काय पाहिलंत? - ३२

आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.

या धाग्याचा वापर करणाऱ्या सर्वांना विनंती - कृपया लिंक द्यावी. शक्यतो व्हिडियो एम्बेड करू नये. धागा लोड होईपर्यंत वृद्धापकाळ येतो.

-------

नागराज मंजुळे यांची शॉर्ट फिल्म 'पिस्तुल्या' आता अधिकृतरीत्या यूट्यूबवर उपलब्ध आहे.

https://www.youtube.com/watch?v=ovimYnrk07o

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नेफि वर 'द विण्डसर्स' ही एक मालिका दिसली. पहिले दोन भाग पाहिलेत. जबरी धमाल वाटले. ब्रिटिश राजघराण्याच्या लाइफस्टाइल वर स्पूफ सारखे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोम चॉम्स्कीबद्दलचा 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट' हा माहितीपट यूट्युबवर पाहिला. एडवर्ड हर्मन व नोम चॉम्स्की लिखित 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट' ह्या पुस्तकासंदर्भात चॉम्स्कीच्या भाषणांचे, मुलाखतींचे संकलन असे माहितीपटाचे स्वरूप आहे. सत्ताधारी गट हे प्रसारमाध्यमांना हाताशी धरून कन्सेंट तयार करतात असा काहीसा सिद्धांत आहे. अमेरिकन माध्यमांची, विशेषतः न्यूयॉर्क टाईम्सची, कंबोडियातील ख्मेर राजवटीतले अत्याचार व इंडोनेशियाचे ईस्ट तिमोरमधले अत्याचार ह्यांना वेगवेगळी प्रतिक्रिया ह्या उदाहरणाची विशेषत्वाने चर्चा केली आहे. दोन्ही ठिकाणचे अत्याचार साधारण सारख्याच तीव्रतेचे (?) असले तरी इंडोनेशियाला अमेरिकन सरकारचा पाठिंबा असल्याने कंबोडियाच्या तुलनेत ईस्ट तिमोरबद्दल न्यूयॉर्क टाईम्समध्ये खूपच कमी लिहून आले होते. अगदी सगळेच मुद्दे मला पूर्ण समजले नसले तरी माहितीपट एकुणात अत्यंत रोचक वाटला व मूळ पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाटते आहे.

माहितीपटाच्या मुख्य विषयाशिवाय अजून एक भागही अतिशय रोचक वाटला. फ्रान्समधल्या फॉरिसन नावाच्या प्राध्यापकाने एका पुस्तकात होलोकॉस्ट झालेच नव्हते असे म्हटले. चॉम्स्कीने फॉरिसनला अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून असे म्हणण्याचा अधिकार असला पाहिजे असे म्हटले. इथे दोन तास पाच मिनिटांपासूनची दहा मिनिटे पहा. ह्या सगळ्या घटनांमुळे चॉम्स्की होलोकॉस्ट डिनायलचे समर्थन करतो असा समज होऊन त्याची फ्रान्समधली प्रतिमा खालावली व तो त्यानंतर अनेक वर्षे फ्रान्समध्ये गेला नाही असे विकिपीडियावर म्हटले आहे. ह्या प्रकरणाबद्दल इथे कोणाला जास्त माहिती आहे का? नक्की काय झाले, बारकावे, त्याबद्दलची मते? अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या समर्थनामुळे एखाद्याची फ्रान्समधली प्रतिमा खालावली हे वाचून गंमत वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फ्रान्समधल्या फॉरिसन नावाच्या प्राध्यापकाने एका पुस्तकात होलोकॉस्ट झालेच नव्हते असे म्हटले. चॉम्स्कीने फॉरिसनला अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून असे म्हणण्याचा अधिकार असला पाहिजे असे म्हटले. इथे दोन तास पाच मिनिटांपासूनची दहा मिनिटे पहा. ह्या सगळ्या घटनांमुळे चॉम्स्की होलोकॉस्ट डिनायलचे समर्थन करतो असा समज होऊन त्याची फ्रान्समधली प्रतिमा खालावली व तो त्यानंतर अनेक वर्षे फ्रान्समध्ये गेला नाही असे विकिपीडियावर म्हटले आहे. ह्या प्रकरणाबद्दल इथे कोणाला जास्त माहिती आहे का? नक्की काय झाले, बारकावे, त्याबद्दलची मते? अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या समर्थनामुळे एखाद्याची फ्रान्समधली प्रतिमा खालावली हे वाचून गंमत वाटली.

एक गोष्ट लक्षात घ्या. जसं नास्तिकांना किंवा मांजरांना एका कळपात एकत्र आणणं अवघड (किंबहुना अशक्यच) असतं, तसंच फ्रान्सबद्दलचं (किंवा भारताबद्दलचंही) सरसकटीकरण करताना होतं. त्यामुळे एखादी गोष्ट कशी बघितली जाते हे ठरवणं कठीण होऊन बसतं. तुम्हाला उत्तर म्हणून एक फ्रेंच दुवा देतो. गूगल ट्रान्सलेट त्याला न्याय देईल अशी आशा आहे. 'नूव्हेल ओब्जेर्वातर' ह्या प्रतिष्ठित नियतकालिकातला तो २०१४मधला लेख आहे. लेखाचं निमित्त म्हणजे चोम्स्कीवर एका फ्रेंच माणसानं केलेला एक हँड-पेंटेड अॅनिमेशन माहितीपट. हा फ्रेंच इसम कोण, तर मिशेल गोंद्री. त्यानं केलेले काही इंग्रजी चित्रपट गाजले होते. विशेषतः 'इटर्नल सनशाइन आॅफ द स्पाॅटलेस माइंड'. थोडक्यात, ज्या माणसावर मिशेल गोंद्री चित्रपट बनवतो आणि ज्या चित्रपटाची दखल 'नूव्हेल आॅब्ज' घेतं, तो माणूस फ्रान्समध्ये खालावलेल्या प्रतिमेचा असतो असं म्हणायला माझी जीभ तरी धजत नाही.

चित्रपट इथे पाहता येईल :

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद मिहीर . हे इंटरेस्टिंग आहे . बघणे आले हे आता .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद मिहिर सर, आता हे पाहणे आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुक्ती
बांग्लादेश युद्धाच्या अखेरीस जनरल जेकब वि. जनरल नियाझी यांच्यात ज्या वाटाघाटी झाल्या त्याच्यावरचा १७ मिनिटांचा चित्रपट.
कलाकार - मिलिंद सोमण व यशपाल शर्मा.

https://www.youtube.com/watch?v=6bGdIAf2J_k

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"आम्ही दोघी" हा दिवंगत मराठी लेखिका गौरी देशपांडे यांच्या "पाऊस आला मोठा" या कथेवर आधारलेला सिनेमा आज पाहिला.

कथेचा पैस तसा लहान आहे. अनेक उपकथानकं असलेली दीर्घकथा अशी ही नव्हे. आधीच सिनेमा बनवण्याकरताचा जीव लहान असलेलं, दोन प्रमुख स्त्रीव्यक्तिरेखांचं कथानक. त्यामुळे यात आणखी एक पात्र आणि पर्यायाने त्या अनुषंगाचं उपकथानक सिनेमात आणण्यात आलं.

प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांची कामं चांगली झालेली आहेत. मात्र काही गमतीजमती झालेल्या आहेत. प्रिया बापट यांना चक्क यत्ता नववी-दहावीतली मुलगी (काही भागापुरती) दाखवलेली आहे. आणि तिथे बर्‍यापैकी प्रकरण गंडलेलं आहे. त्यांचं अजिबात टीनेजर न वाटणं, ते करताना आलेलं अवघडलेपण, जूनपण - प्रचंड रसभंग करणारं.

चित्रपटाच्या एकंदर "मूड" किंवा हाताळणीबद्दल : गौरी देशपांडे यांचा wry humor सिनेमामधे अजिबातच जाणवत नाही. त्यांच्या "आहे हे असं आहे" या कथासंग्रहातल्या बहुतेक कथा साठ-सत्तरच्या दशकात आलेल्या होत्या. जवळजवळ सर्व कथा First person मधल्या आहेत. त्या वेगवेगळ्या असल्या - म्हणजे एका मालिकेतल्या नसल्या - तरी त्या वाचताना निवेदिकेच्या , पर्यायाने नायिकेच्या स्वभावातला , विक्षिप्त वाटेल इतका इतरांपासून असलेला तुटलेपणा आणि आत्मकेंद्रितपणा त्या सर्वांमधे आहे. त्याला सिनेमामधे पुरेसा न्याय दिलेला नाही. The narrator-protagonist in this story-collection is never likable. आपल्या कठोर, विक्षिप्त वाटेल अशा स्वभावाकडे निवेदिका स्वतःच भाष्य करते. प्रिया बापट यांनी साकारलेली "सावी" अशी अलिप्त, तुटक नाही आणि "आपण असे आहोत" असं थंडपणे भाष्य करणारी आणि पर्यायाने आपल्या स्वभावातली विसंगती दर्शवणारी नाही.

प्रिया बापटवर हे लिहिताना अन्याय केल्यासारखं वाटेल पण त्यात त्यांचा दोष कमी आणि दिग्दर्शिकेच्या व्हिजनचा थोडा अधिक.

मुक्ता बर्वेंना अगदीच लहान काम आहे. त्यांचं पात्रच फार depth असणारं नाही.

एकंदर या प्रकरणाचा जीव तसा मुळात लहानच असल्याने हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असणं शक्य नव्हतं. त्यांचा प्रयत्न प्रामाणिक पण मूळ लेखिकेच्या मर्माला चिमटीत पकडण्यात अपुरा ठरलेला वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ईंटर्नेटीन्सवरच्या एका नव्या मराठी वेबसिरीजमध्ये प्रिया वरियारच्या भूमिकेसाठी प्रिया बापट यांचा विचार चालला आहे असं ऐकलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0