स्त्रियांना मिळणारे कमी पगार, कमी जबाबदारीची पदं, इत्यादींबद्दल
इथे सुरू झालेली चर्चा सदाबहार विषयांपैकी एकावर आहे. तिथे तसेही १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढायचाच होता, तो याच विषयावर काढला आहे.
एकंदरच ही सगळी चर्चा, विशेषतः गब्बरचा आविर्भाव, आम्ही आहोत तसेच राहणार, बायकांनी आपल्यासाठी नवं जग बनवावं, अशी वाटते. काहीही झालं तरी 'हम नही सुधरेंगे' किंवा आपल्या वा आपल्याला फायदेशीर असलेल्या व्यवस्थेच्या चुका नाकारणारे दगड मला चर्चायोग्य वाटत नाहीत. (भुसनळे निराळे; स्वतः दगड असूनही वर 'तुम्ही स्त्रिया असं करत नाही, म्हणून तुमचं नुकसान होतं' अशा छापाचे आगखाऊ विचार बाळगणारे, आणि अन्यायग्रस्त लोकांवरच अन्यायाची जबाबदारी टाकणारे - भुसनळे.)
स्त्रिया उशिरापर्यंत काम करणार नाहीत, असं म्हणताना मुळात रोजच्या रोज उशिरापर्यंत थांबून काम करणं ही गोष्ट अन्यायकारक असते याची काही दखल घेण्याची चिन्हं दिसत नाहीत. पुरुषांना अधिक कामाचे पैसे जास्त मिळत असतीलही, पण त्यातून तयार होणारी अनारोग्यपूर्ण जीवनपद्धती, आपल्या घरच्या आणि व्यक्ती म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष आणि त्यातून निर्माण होणारे जीवनपद्धतीजन्य विकार यांची दखल नाही.
दुसरं, ('द सेकंड सेक्स'मध्ये सिमोन दी बोव्हारनं मांडलेला मुद्दा) कमी पगार, कमी संधी, पात्रता असूनही जबाबदारीची पदं न मिळणं, यातून स्त्रियांमध्ये निर्माण होणारे गंड यांमुळे पुरुषांना कमी प्रतीचे जोडीदार आणि पुढच्या पिढीला किरकिऱ्या-अन्यायग्रस्त आया मिळतात. यात समाज आणि व्यक्ती दोन्ही पातळींवर नुकसान आहे.
एकीकडे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यांना आई आणि वडील दोन्ही असणं चांगलं असं म्हणायचं; दुसरीकडे बापाला कामाच्या रगाड्याला जोडून कुटुंबापासून तोडायचं आणि आईवर (व्यवस्थाजन्य) अन्याय करून तिचं खच्चीकरण करायचं यातून नक्की काय प्रकारची प्रजा तयार होते, असे प्रश्न सरसकट विचारलेही जात नाहीत. (व्यक्तिगत पातळीवर अनेक कारणांसाठी मला कुटुंबसंस्थेचा कंटाळा आहे. मात्र) बहुतेक लोकांना मुलं हवी असतात, मुलांचं मानसिक आरोग्य आणि भवितव्य यांची काळजी घेताना आई-वडील हे दोन्ही पालक मानसिक-आर्थिक-शारीरिक पातळींवर सबळ असावेत याचा विचार करावासा वाटत नाही.
स्त्रिया उशिरापर्यंत काम
स्त्रिया उशिरापर्यंत काम करणार नाहीत, असं म्हणताना मुळात रोजच्या रोज उशिरापर्यंत थांबून काम करणं ही गोष्ट अन्यायकारक असते याची काही दखल घेण्याची चिन्हं दिसत नाहीत.
हे सत्य आहे.
Work-Life Balance गेला बाराच्या भावात. मूळात त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.
दुसरीकडे बापाला कामाच्या रगाड्याला जोडून कुटुंबापासून तोडायचं आणि आईवर (व्यवस्थाजन्य) अन्याय करून तिचं खच्चीकरण करायचं यातून नक्की काय प्रकारची प्रजा तयार होते, असे प्रश्न सरसकट विचारलेही जात नाहीत.
उत्तम मुद्दा.
.
पण अमेरिकेत खुप स्त्रिया भेटल्या ज्यांचा नवरा फक्त घरचे पहात होता व त्या बाहेर नोकरी करत होत्या.
रोजच्या रोज उशिरापर्यंत काम
रोजच्या रोज उशिरापर्यंत काम करायला लागणे अन्यायकारक आहे हे मान्य. पण काही वेळा तोच यु एस पी असू शकतो. इन फॅक्ट बऱ्याच आऊटसोर्सिंग चा तोच पाया असतो.
भारतीय आय टी मजूर जास्त वेळ काम करतात म्हणूनच भारतीयांना कामे मिळतात.
दुसरा व्ह्यू - एक कंपनी पॅकिंगसाठीची खोकी बनवून घेते. खोकी बनवणाऱ्या कारखान्यात एक माणूस क्ष खोकी दर दोन तासांनी डिलिव्हर करतो. सुरुवातीला तो तीन फेऱ्या मारत असे. मग ऑर्डर वाढू लागली आणि तो चार फेऱ्या मारू लागला. आणखी ऑर्डर वाढली आणि आता पाचवी फेरी मारण्याची गरज निर्माण झाली. सदर माणसाची कामाची वेळ आठ तासाची असेल तर पाचवी फेरी मारण्यासाठी दुसरा माणूस नेमावा लागेल. जोपर्यंत ऑर्डरची क्वांटिटी दुसऱ्या माणसाच्या तीन फेऱ्या होण्याइतकी नाही तोवर पहिल्या माणसालाच (अन्यायकारक असलेली ) पाचवी फेरी वेळ संपल्यावर थांबून मारावी लागेल. (त्यासाठी अधिक पेमेंट मिळू शकेल).
व्यक्तिगत आणि मर्यादित निरीक्षणं
भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांत बऱ्याच जास्त स्त्रिया दिसतात. पदोन्नती, पगार यांबद्दल मला फार माहीत नाही. पण कोणत्याही इंटुक क्षेत्रात भारतात जितपत स्त्रिया दिसतात, तेवढ्या अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रात दिसतीलच असं नाही.
मी शिकवण्याची थोडी स्वयंसेवकगिरी केली होती, जिथे वर्षापूर्वी शिकले. तिथल्या संबंधित लोकांचं निरीक्षण असं की, हे जे विदाविज्ञान संबंधित फुकट उपलब्ध क्लासेस असतात, त्यात सगळ्यांसाठी क्लास असेल तर स्त्रिया खूप कमी असतात. फक्त स्त्रियांसाठी असेल तर वर्ग पूर्ण भरलेला असतो. विदाविज्ञान हा विषय आता नोकरीच्या बाबतीत पहिल्या दोनांत दिसतो.
मी तीनदा शिकवलं, असाच अनुभव. मी पैसे भरून, तीन महिने पूर्णवेळ शिकले, वर्गात मी एकटी स्त्री, पंधरा पुरुष. आता जी नोकरी आहे, शुद्ध तंत्रज्ञान क्षेत्र, आॅस्टिन आॅफिसात मी एकटी स्त्री. विविधता हवी, असा विचार करणारं उदारमतवादी संचालक मंडळ असूनही ही परिस्थिती.
या संदर्भात अमेरिका आणि भारतातल्या परिस्थितीत बराच फरक आहे. त्याबद्दल मला जे दिसतं, समजतं ते थोड्या वेळानं तपशिलात लिहिते.
कंटाळा
या असल्या न-विनोदांचा मला खूप कंटाळा आलाय. 'घालूनघालून सैल' होण्यापलीकडे गेल्येत ही वाक्यं!
ऑस्करच्या निवडसमितीत मोठ्या प्रमाणावर पुरुष आहेत; चित्रपटाशी संबंधित बहुतेक सर्व गोष्टींमध्ये पुरुषांचं प्रमाण ५०%पेक्षा बरंच जास्त आहे. या पुरुषी व्यवस्थेत बनलेले सिनेमे सुपरहिट करणाऱ्या लोकांंमध्येही पुरुषच जास्त; त्यांना पैसे जास्त मिळतात; पुरुष घरकाम कमी करतात. तरीही, 'पुरुषांना बायकांसमोर बोलायला मिळत नाही', म्हणणारे लोक शहामृगासारखे वाळूत डोकं खुपसून बसलेले आहेत किंवा मूर्ख तरी आहेत. हे लोक आपण किती गांजलेले, असं म्हणत रडणारे पुरुष बघितले की मला बेस्टची वापरलेली तिकीटं आठवतात; वापरून, टाकून दिलेले, रस्त्यात कचरा करणारे, कागदाचे कपटे.
व्यवस्था अन्यायकारक असतात; म्हणून व्यक्तिगत वा सार्वजनिक पातळीवर त्याविरोधात काहीही न करता रडारड करणारे लोकही मला फार आवडत नाहीत. त्यामुळे महिला दिनाच्या शुभेच्छांची मला गरज नाही, असं मी अनेकदा आवर्जून म्हणते. आजही फेसबुकवर एकांनी विचारलं - चित्रपट, पुस्तकं वा प्रत्यक्षातली कोणती स्त्री आवडते, तेव्हा मी हे लिहिलं -
'द गर्ल विथ अ ड्रॅगन टॅटू' आणि त्या चित्रपटमालिकेतली (अमेरिकी नाही, स्वीडीश) नूमी रापास हिनं साकारलेली लिसबेथ सालांडर. बुटकी, बारकी, किरकोळ रूप-अंगकाठीची, व्यवस्थेनं नाडलेली पण तरीही स्वतःला victim न समजणारी, तंत्रकुशल-हॅकर, प्रसंगावधान बाळगणारी; आणि वेळेला सुज्ञ लोकांकडे मदत मागणारी.
त्यावर उच्चवर्णीय पुरुष ८ मार्चला किंवा प्रसंगोपात असली रडारड करायला लागले की त्यांना आणखी चिडवणं-रडवणं या पलीकडे काही योग्य उत्तर असतं - प्रतिक्रिया नव्हे, यावर माझा विश्वास नाही.
आमचे, आपले परम्प्रिय मित्र परिकथेतील राजकुमार, अथवा परा यांच्या भिंतीवरून -
प्रत्येक जागतिक महिला दिनाला सोशल मिडीयावरच्या समस्त पुरुषवर्गाची कृतज्ञता, विनम्रता, आदरभाव पाहिला, की ह्या क्षणापासून आता जगात बलात्कार, विनयभंग, घसटफोट, स्त्रीअत्याचार औषधाला देखील शिल्लक राहणार नाहीत अशी खात्री पटते. अनाथ महिलाश्रम तर ओसाड पडणार ह्याची हमी मिळते. वेश्या, अडचणीतील परितक्त्या ह्यांना शोधून शोधून त्यांचे जीवन सुंदर बनवले जाणार असे वाटायला लागते... मन भरून येते...
तेवढ्यात...
कोणितरी 'खांद्याला खांदा लावायच्या गोष्टी करायच्या तर मग असले स्पेशल दिवसाचे चाळे हवेतच कशाला?' अशा प्रकारातली पोष्ट टाकते आणि माझा जीव भानावर येतो... जनजीवन सावरते अन पृथ्वी पुन्हा सूर्याभोवती फिरायला लागते...
--
अवांतर - Data याला मराठीत शब्द आहे विदा. त्यावरून विद्रटपणा असा विनोदी शब्द बनवून तो वापरला होता. त्या विनोदाचं श्राद्ध आजपासून तेराव्या दिवशी घातलं जाईल.
सहमत्
अदितीशी सहमत. असल्या शिळ्या विनोदांचा वीट यावा, इतक्या वेळा ते अजूनही सो कॉल्ड मराठी विनोदी(?) नाटकांत, सिनेमांत आणि सिरियल्समधे वापरले जातात. विद्रटपणा, या शब्दाचा अर्थ समजूनही तो चुकीच्या पद्धतीने वापरला, मागे एकदा, ऐसीवरील विद्र्ट माणसे, या अर्थाने मी तो वापरला होता, तरीही. म्हणून त्याचे श्राद्ध घालू नये.
Non sequitur
ऑस्करच्या निवडसमितीत मोठ्या प्रमाणावर पुरुष आहेत; चित्रपटाशी संबंधित बहुतेक सर्व गोष्टींमध्ये पुरुषांचं प्रमाण ५०%पेक्षा बरंच जास्त आहे. या पुरुषी व्यवस्थेत बनलेले सिनेमे सुपरहिट करणाऱ्या लोकांंमध्येही पुरुषच जास्त; त्यांना पैसे जास्त मिळतात; ...
अमेरिकी चित्रजगताशी/हॉलीवूड चित्रपटांशी (प्रेक्षक म्हणूनसुद्धा) काडीचाही संबंध नसलेली/औषधापुरता अत्यल्पक्वचित संबंध येणारी अशी बरीच मोठी अवाम तिथे बाहेर कुठेतरी आहे हो!१ काँट्ररी टू पॉप्युलर बिलीफ, अमेरिका/अमेरिकन चित्रसृष्टी (किंवा फॉर्दॅट्मॅटर पुणे, सदाशिवपेठ किंवा बॉलीवूडसुद्धा) विश्वाच्या केंद्रस्थानी नाही.
विच इज़ नॉट टू से की तिथल्या बाहेरच्या कुठल्यातरी त्या प्रचंड अवाममध्ये पुरुषांना अपरहँड (आणि/किंवा स्त्रियांवर अन्याय) नाहीच म्हणून. नॉट अॅट ऑल!२ फक्त, त्याचा संबंध (ओढूनताणून) हॉलीवुडीय पुरुषी व्यवस्थेशी लावणे हे म्हणजे, जिथेतिथे खड्डे आहेत; चंद्रावर खड्डे आहेत, आमच्या पुण्याच्या रस्त्यांमध्येसुद्धा खड्डे आहेत; पण लक्षात कोण घेतो? असे म्हणण्यासारखे आहे. ऱ्हेटॉरिक म्हणून छान वाटते (कदाचित सिन्सियरही असावे), परंतु एकंदरीत समग्र शेक्सपिअरसारखे: ऐकायला छान, परंतु अर्थहीन. (श्रेयअव्हेर: प.पू. वुड्डहौसगुरुजी.)
असो चालायचेच.
- (हवेत उंच ढुंगण ठेवून वाळूखाली तिरशिंगरावांशी कानगोष्टी खेळणारा३ आगाऊ समईचा भुसनळा) 'न'वी बाजू.
...........
१ 'तिथे बाहेर कुठेतरी'चे सोडा. खुद्द युअर्स ट्रूलींना पंचवीस वर्षे अमेरिकेत राहूनसुद्धा 'शेवटचा हॉलीवूडपट कधी आणि कुठला पाहिला?' या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही/आठवणार नाही१अ.
१अ बाकी ते स्वीडिश न् इराणी न् कुठलेकुठले चित्रपट तर सोडूनच द्या.
२ ही परिस्थिती बदलण्याची गरज नाही, आणि/किंवा त्याकरिता झटण्याच्या लायकीची नाही, असाही दावा नाही. पुन्हा, नॉट अॅट ऑल!
३ तेवढेच त्या निमित्ताने अनायासे वाळूखालच्या अकूष्टिक्सचे टेष्टिंगही होऊन जाईल, म्हणतो.
रोचक बाब म्हणजे याच्या सर्वात
रोचक बाब म्हणजे याच्या सर्वात वर आणि खाली दोन्ही ठिकाणी पूर्वाश्रमीचे कम्युनिष्ठ देश आहेत.
खरंच रोचक आहे हे.
जोडीला आणखी रोचक म्हंजे - नॉर्डिक मॉडेल बद्दल प्रसिद्ध असलेल्या देशांपैकी अनेक देश यात वर आहेत. स्वीडन बऱ्यापैकी खालीआहे.
विकिपेडियावरून साभार --
The Nordic model (also called Nordic capitalism[1] or Nordic social democracy)[2][3] refers to the economic and social policies common to the Nordic countries (Denmark, Finland, Norway, Iceland, the Faroe Islands and Sweden). This includes a combination of free market capitalism with a comprehensive welfare state and collective bargaining at the national level with a high percentage of workers belonging to a labour union[4]; and state provision of free education and free healthcare as well as generous, guaranteed pension payments for retirees funded by taxation.[5][6] The Nordic model began to earn attention after World War II.[7][8].
बंदुका, हिंसा आणि स्त्रिया
अमेरिकेत घटनेनुसार बंदुकधाऱ्यांपेक्षा स्त्रियांना कमी हक्क आहेत. तत्त्वतः स्त्रियांनाही बंदुका विकत घेता येतात; मात्र ३९% पुरुष बंदुका विकत घेतात, स्त्रियांपैकी २२%. गोऱ्या पुरुषांपैकी साधारण निम्मे बंदुका विकत घेतात.
एकंदरच अमेरिकी घटना हिंसाचारप्रेमी आणि स्त्रीविरोधी आहे अशी 'विद्रट' मांडणी करणारा लेख -
The Constitution Gives Gun Owners Greater Rights Than Women
असं ऐकलं की काल (महिला दिनाचा
असं ऐकलं की काल (महिला दिनाचा मुहूर्त पकडून) फॉक्स न्युज वर - अमेरिकन पुरुष हा कसा विदारक (?) अवस्थेत आहे याचं रसभरित वर्णन केलं गेलं. अमेरिकन पुरुष (अमेरिकन स्त्रियांच्या मानाने) लवकर मरतो, आत्महत्येचं प्रमाण अमेरिकन पुरुषांमधे (अमेरिकन स्त्रियांच्या पेक्षा) खूप जास्त आहे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे.
...
अमेरिकन पुरुष हा कसा विदारक (?) अवस्थेत आहे... ... ...अमेरिकन पुरुष (अमेरिकन स्त्रियांच्या मानाने) लवकर मरतो, आत्महत्येचं प्रमाण अमेरिकन पुरुषांमधे (अमेरिकन स्त्रियांच्या पेक्षा) खूप जास्त आहे वगैरे वगैरे
ज्या दिवशी (शॉन हॅनिटीपासून सुरुवात करून) समग्र फॉक्सावळ स्वतःच्याच बंदुकी स्वतःवरच वापरून आत्महत्या करेल, त्या दिवशी मी हे खरे मानेन.
तोवर जरा डाऊट वाटतो.
हफपोस्ट हे माझं पॉर्न आहे.
अगदी अगदी. खरं तर फॉक्स सौम्य वाटेल का काय, ब्राईटबार्टशी टक्कर असेल असं मला कधीमधी वाटतं. (आणि गब्बरशेटना तुम्ही इथेच वर दिलेला, शॉन हॅनिटीचा उल्लेख असलेला प्रतिसाद बघून, तुम्ही हफपोस्ट वाचत असणार याबद्दल मला खात्री पटलीच.)
पण कधीमधी हफपोस्टवरही बरं काही वाचायला मिळतं.
मूळ विषय - धागा शीर्षक -
मूळ विषय - धागा शीर्षक - स्त्रियांना मिळणारे कमी पगार
एकंदरच ही सगळी चर्चा, विशेषतः गब्बरचा आविर्भाव, आम्ही आहोत तसेच राहणार, बायकांनी आपल्यासाठी नवं जग बनवावं, अशी वाटते. काहीही झालं तरी 'हम नही सुधरेंगे' किंवा आपल्या वा आपल्याला फायदेशीर असलेल्या व्यवस्थेच्या चुका नाकारणारे दगड मला चर्चायोग्य वाटत नाहीत.
(१) तुम्ही ज्या सुधारण्याबद्दल बोलत आहात ते सुधारणं (म्हंजे स्त्रियां व पुरुषांच्या पगारांमधे मधे समानता आणण्यासाठी मिनिमम वेजेस सारखे कायदे आणणं) हे तुमच्यासाठी (सुद्धा) अहितकारक आहे हे तुम्हाला लक्षात येत नाही. कारण स्त्रियांना स्त्रीवाद पुरुषांपेक्षा जास्त समजतो व म्हणून तुम्हाला तुमचे हित जास्त व्यवस्थित समजते असं तुमचं म्हणणं.
.
ठीकाय.
.
(२) पण या विशिष्ठ बाबतीत "हम नही सुधरेंगे" हा माझा होरा नक्क्कीच योग्य आहे असं माझं ठाम म्हणणं आहे. जोपर्यंत तुम्ही (१) मधील तांबडा मजकूर समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही असंच म्हणत रहाल की "गब्बर सारख्यांनी सुधारण्याची गरज आहे". पण समजून घेतलात तर मात्र कदाचित तुम्ही स्वत: सुधारण्याची शक्यता निर्माण होईल.
(३) तुम्ही माझ्या भूमिकेला/विचारांना ॲरोगंट, इन्सेन्सिटिव्ह, डिफायंट, घमेंडखोर, स्टबर्न, एम्सीपी म्हणू शकता. किंवा अदखलपात्र, बकवास, दुर्लक्षणीय, बिनडोक, निरर्थक, आकसयुक्त, विनोदी, पकाऊ म्हणू शकता.
.
सुधारणं (म्हंजे स्त्रियां व
सुधारणं (म्हंजे स्त्रियां व पुरुषांच्या पगारांमधे मधे समानता आणण्यासाठी मिनिमम वेजेस सारखे कायदे आणणं) हे तुमच्यासाठी (सुद्धा) अहितकारक आहे हे तुम्हाला लक्षात येत नाही.&>>>
एका मर्यादित अंशी हे वाक्य अनेकांना बरोबर वाटू शकते कारण असं ग्रुहित धरल्या जाते की महिलांचे प्रमाण वाढले तरी इकोसिसटम (म्हणजे कायदे, अलिखीत नियम, यशाची व्याख्या) आत्तासारखीच राहील. पण हे चुकीचं गृहितक आहे.
बरोबर गब्बर नेहमी तेच म्हणतात
बरोबर गब्बर नेहमी तेच म्हणतात. वर्क फोर्स मध्ये जास्त स्त्रिया येतिल. पण अगदि खरे हेच आहे की ते मर्यादित प्रमाणात यश आहे. ते म्हणजे भिकाऱ्याला तुकडा अन्न दिल्यासारखे, उपकारात्मक.
असं का होउ नये कि पगारही सारखा आणि स्त्रियाही किमान ५०%
तसच व्हायला पाहीजे.
असं का होउ नये कि पगारही
असं का होउ नये कि पगारही सारखा आणि स्त्रियाही किमान ५०%
तसच व्हायला पाहीजे.
शुचे, अमेरिकन सैन्यदलात नेमकं कसं करायचं ते सांग बरं ?
अमेरिकन सैन्यदलांमधे २४% स्त्रिया व ७६% पुरुष आहेत.
मग जबरदस्तीने स्त्रियांना सैन्यदलांत भरती (ड्राफ्ट) करायचं आणि रेश्यो ५०% वर आणायचा का, शुचे ??
.
अमेरिकन लेबर फोर्स ..........
अमेरिकन लेबर फोर्स ............. मध्ये ८०% पुरुष आणि २०% स्त्रिया असतील तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये ............ ८०% स्त्रिया आणि २०% पुरुष करा
कॉर्पोरेट क्षेत्रातल्या व्यक्ती ह्या लेबर फोर्स मधे च असतात.
लेबर फोर्स म्हंजे फक्त कामगार नव्हे. लेबर फोर्स म्हंजे सॅलरीड, एम्प्लॉईड असलेले सर्व.
>>इकोसिसटम (म्हणजे कायदे,
>>इकोसिसटम (म्हणजे कायदे, अलिखीत नियम, यशाची व्याख्या) आत्तासारखीच राहील. पण हे चुकीचं गृहितक आहे.
यशाची व्याख्या आतासारखीच न राहणे यात काय अभिप्रेत आहे?
यशाची व्याख्या समाजाने बदलली न बदलली तरी स्वत:पुरती यशाची व्याख्या स्वत:च्या (जे काय असेल त्या) कुटुंबाचा सद्यकालात उत्कर्ष साधणे आणि कुटुंबाच्या भविष्यातील गरजांची तजवीज करणे हीच राहील.
Time rich and cash rich are
Time rich and cash rich are two different concepts. Current society puts emphasis on being cash rich and thats one parameter of success. In another ecosystem dominated by women, the parameters of success maybe different. It may be anything, may be much more wholesome. The point is that if you consider more than 50% contribution of women in influencial positions in society, politics, science, corporates etc the world itself may be a very different place. E.g. It may not have the need of armies at all, so having 50% females in armies (current problem) will not be a problem at all. I know this is just a hypothesis but i am giving this example to make my point clear.
आई व्हायचंय?... मग नोकरी सोडा!
पुण्यातली बातमी : आई व्हायचंय ?... मग नोकरी सोडा!
(मला अशी काही उदाहरणं व्यक्तिशः माहीत आहेत.)
तुम्ही दिलेल्या दुव्यातून
तुम्ही दिलेल्या दुव्यातून साभार -
मातृत्व राजा वाढवून ती सहा महिन्यांची करणारा कायदा झाल्यापासून महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक आयटी कंपन्यांची धोरणे अतिशय प्रतिकूल झाल्याचे दिसून येते.
हा कायदा झाल्यावर कंपन्यांनी आपली धोरणं बदलली तर त्यात नवल ते काय ?
कामगार आयुक्त जे म्हणतात ते कायदेशीर आहे हे मान्य. पण हा कायदा अचानक कंपन्यांच्या कॉस्ट्स प्रचंड वाढवणारा आहे. तेव्हा परिणाम व्हायचा तोच होणार. साधा मुद्दा आहे - सहा महिने एका रिसोर्स ला पगार द्यायचा व त्या बदल्यात तो रिसोर्स काहीही काम करणार नाही. म्हंजे एकतर सहा महिन्यांचा पगार हा दुसऱ्या कुठल्यातरी रिसोर्स / रिसोर्सेस कडून मिळवायचा (क्रॉस सब्सिडायझेशन ला समांतर)..... नाहीतर ......
.
आता नोकरी/जॉब जर पर्मनंट नसेल तर या केस मधे गच्छंती अटळ आहे.
.
-------------
.
दुसरे एक उदाहरण देतो. लाँग शॉट उदाहरण आहे. एक्स्ट्रिम केस आहे. १९९३ मधे अमेरिकन डेमोक्रॅट सिनेटर टॉम हार्किन यांनी अमेरिकन सरकारने बालकामगार विरोधी कायदा करण्याचा प्रस्ताव आणला. म्हंजे बालकामगारांनी बनवलेली वस्त्रे आम्ही आयात करू देणार नाही - असा काहीसा आशय. इकडे या बातमी च्या नुसत्या धास्तीने बांग्लादेश (जो एक बऱ्यापैकी वस्त्रनिर्यातदार देश आहे) मधे वस्त्रोद्योग क्षेत्रातील सुमारे ५०,००० बालकामगारांना काढून टाकण्यात आले. (यानंतर ती मुलं कोणत्या व्यवसायात पडली ते तर विचारूच नका.) याचे रिपोर्टिंग “Ethical Shopping; Human Rights,” The Economist, June 3, 1995 मधे आहे.
.
अर्थातच हे लाँग शॉट उदाहरण आहे. एक्स्ट्रिम केस आहे. पण - मुद्द्याचं मूळ समजून घेण्यास उपयुक्त केस आहे. इन्सेंटिव्हज आणि डिस-इन्सेंटिव्हज.
.
या विषयावर
या विषयावर इथे विस्ताराने चर्चा झाली होती. गरोदरोत्सुक मुलींना कंपन्या नोकरीला ठेवणार नाहीत ही भीती तेव्हाच लक्षात आली होती. http://www.aisiakshare.com/node/4709
नेमके प्रॉब्लेम स्टेटमेंट
सो, इतक्या चर्चेनंतर समान कामासाठी महिलांना कमी मोबदला दिला जातो याची काही उदाहरणे सदस्यांच्या पाहण्यात आहेत का? आठवत आहेत का?
The above problem statement is different from the one stated below.....
समान कामाची शक्यता असते त्यासाठी महिलांची निवड केली जात नाही. किंवा जिथे शारिरिक कामाचा प्रश्न असतो तिथे (प्रचलित पारंपरिक समजुतीमुळे) क्षमता असूनही महिलांना समान काम दिले जात नाही.
दुसरे प्रॉब्लेम स्टेटमेंट खरोखरीचे आहे असे माझे मत आहे.
असा भेदभाव असेल तर ते चूक
असा भेदभाव असेल तर ते चूक/निषेधार्ह आहेच. यात काही संशय नाही.
पण पण पण
एकच शंका. सादरकर्ता असे काही फिक्स्ड पद असते का? आणि सर्व "पुरुष" सादरकर्त्यांना समान मोबदला मिळतो का? की त्या त्या कार्यक्रमांच्या टीआरपीनुसार पगार मिळतो?
सारेगमप सादर करणाऱ्या पल्लवी जोशीला रोहित राऊतपेक्षा कमी मोबदला मिळाला का? (रोहित राऊतचा मोबदला आडजष्टेड बाय त्या क्षेत्रातला सामान्य वाढीचा दर)
असा भेदभाव असेल तर ते चूक
असा भेदभाव असेल तर ते चूक/निषेधार्ह आहेच. यात काही संशय नाही.
(१) एक्झॅक्टली सेम काम असेल व कामावर एक स्त्री असेल व दुसरा पुरुष असेल तर - स्त्री ला जास्त पगार व पुरुषाला कमी पगार असा भेदभाव असेल तर ते निषेधार्ह नाही. चूक नाही.
(२) एक्झॅक्टली सेम काम असेल व कामावर एक स्त्री असेल व दुसरा पुरुष असेल तर - स्त्री ला कमी पगार व पुरुषाला जास्त पगार असा भेदभाव असेल तर ते निषेधार्ह नाही. चूक नाही.
पगार कमी / जास्त असणे / मिळणे
पगार कमी / जास्त असणे / मिळणे / मिळवणे हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे व आपण कोण निषेध करणारे असे म्हणताहात का?
हो.
पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हंजे - जसं कर्मचारी हे लेबर मार्केट मधे एकमेकांशी स्पर्धा करतात तसं हायरिंग मॅनेजर्स सुद्धा एकमेकांशी स्पर्धा करतात. Enforcing equal pay for equal work has the effect of foreclosing competition. Competition is defined as price discovery process.
.
गब्बर
तुम्हाला असे म्हणायचे आहे की हायरींग मॅनेजरमध्ये निरोगी बाजारस्पर्धा चालु राहणे आवश्यक आहे त्यासाठी इक्वल पे फोर्स केला जाणे चुक आहे.
अहो पण इथे तर धडधडीत जेंडर बेस्ड अन्याय होत आहे ना हो ? तुम्ही दोन मिनिट बाजार बाजुला ठेवला तरी तुम्हाला लिंगाधारीत अन्य्याय होतो तो दिसतच कसा नाही ? म्हणजे दिसतो पण तो तुम्ही काउंटच करत नाही राव
हे काही कळल नाही अजिबातच म्हणजे एकदा स्पष्ट सांगा बर की तुमच्या मते जेंडर बेस्ड अन्याय हा समाजात होतो की नाही ? व तो होणे चुक आहे की नाही ?
मार्केट फोर्सेस चा विचार नंतर करु त्यानुसार काय योग्य अयोग्य हे पुढची गोष्ट अगोदर तुम्ही हा अन्याय आहे की नाही ते सांगा
एक उदाहरण कच्चे आठवले ते सांगतो डिसग्रेस या जे एम कोएटझी च्या कादंबरीवर टीका करतांना एक समीक्षक म्हणाली की कोएटझी हा चलाखीने रेसीझम वर आधारीत प्रश्नांना अस्तित्ववादी प्रश्नांशी जोडुन त्यांची धार बोथट करतो
गब्बरही असेच करतात का ?
अहो पण इथे तर धडधडीत जेंडर
अहो पण इथे तर धडधडीत जेंडर बेस्ड अन्याय होत आहे ना हो ? तुम्ही दोन मिनिट बाजार बाजुला ठेवला तरी तुम्हाला लिंगाधारीत अन्य्याय होतो तो दिसतच कसा नाही ? म्हणजे दिसतो पण तो तुम्ही काउंटच करत नाही राव. हे काही कळल नाही अजिबातच म्हणजे एकदा स्पष्ट सांगा बर की तुमच्या मते जेंडर बेस्ड अन्याय हा समाजात होतो की नाही ? व तो होणे चुक आहे की नाही ?
.
हा अन्याय नाहीच.
.
काम जर असरकारी संगठनातले असेल् तर - एक्झॅक्टली एकाच प्रकारच्या कामासाठी दोन भिन्न व्यक्तींना असमान पगार मिळणे हा अन्याय नाहीच - असं माझं म्हणणं आहे.
.
त्या दोन्ही व्यक्ती स्त्री असोत वा पुरुष असोत. किंवा एक स्त्री व दुसरा पुरुष असोत.
.
मात्र सरकारदरबारी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र एकाच कामासाठी असमान पगार हा अन्याय होऊ शकतो.
.
गब्बर मी तुमच्या थॉमस सॉवेल च्या पुस्तकातील
चॅप्टर -९ प्रॉडक्टीव्हीटी ॲन्ड पे पुन्हा एकदा नीट वाचला. त्यातील बहुतांश मुद्द्यांशी मी सहमत आहे. हा खालील सर्व भाग मला मान्य आहे की
१-Whatever the amount and magnitude of discrimination, it is important to be aware of what economic factors tend to cause it to be larger or smaller.
२- While it is obvious that discrimination imposes a cost on those being discriminated against, in the form of lost opportunities for higher incomes, it is also true that discrimination can impose costs on those who do the discriminating, where they too lose opportunities for higher incomes. For example, when a landlord refuses to rent an apartment to people from the "wrong" , group, that can mean leaving the apartment vacant longer.
पण हा थॉमस सॉवेल सुद्धा हे मान्य करतो की
The question as to whether or how much discrimination women encounter in the labor market is a question about whether there are substantial differences in pay between women and men in the same fields with the same qualifications. The question as to whether there is or is not income parity between the sexes is very different, since differences in occupational choices, educational choices, and continuous employment all affect incomes.
आता तुम्ही वर जे म्हणता त्यात तुम्ही एक फरक केला सरकारी व असरकारी ठिक आहे सरकारी बाजुला ठेवा आता असरकारी मध्ये जर सेम फील्ड सेम क्वालिफीकेशन असेल व तरीही पगार भिन्न असेल तर त्या अन्यायाला अन्याय म्हणायला थॉमस सॉवेल तयार आहे तर तुम्ही का नाही ?
आता तुम्ही वर जे म्हणता त्यात
आता तुम्ही वर जे म्हणता त्यात तुम्ही एक फरक केला सरकारी व असरकारी ठिक आहे सरकारी बाजुला ठेवा आता असरकारी मध्ये जर सेम फील्ड सेम क्वालिफीकेशन असेल व तरीही पगार भिन्न असेल तर त्या अन्यायाला अन्याय म्हणायला थॉमस सॉवेल तयार आहे तर तुम्ही का नाही ?
(०) असरकारी संगठने विचारात घेऊ
(१) पहिलं : सॉवेल भेदभावाला अन्याय म्हणालेला नाही. लॉस ऑफ अपॉर्च्युनिटिज म्हणालेला आहे. अन्याय, इन्जस्टिस हा केव्हा होतो ? एखाद्याच्या मूलभूत, किंवा कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन होते तेव्हा. संधी हा अधिकार नाही.
(२) समान कामास समान वेतन हा मूलभूत अधिकार नाही. तेव्हा कायदेशीर अधिकारात खालील दोन मुद्दे येतात - (३), व (४)
(३) कायदेशीर अधिकार हा एकतर सरकारने व्यापक कायदा करून दिधलेला असतो. त्याचे उल्लंघन झाले तर ती फसवणूक आहे व म्हणून अन्याय आहे हे मान्य. व त्याबद्दल कर्मचारी कोर्टात जाऊन भरपाई मिळवू शकतो.
(४) कर्मचाऱ्याच्या एम्प्ल्यमेंट काँट्रॅक्ट मधे एम्प्लॉयर व कर्मचाऱ्यात विशिष्ठ करार (त्यांच्यापुरता) झालेला असू शकतो व त्यात समान कामास समान वेतन हे कलम असले तर असमान पगार मिळणे हे फसवणूक व म्हणुन अन्याय असू शकतो. व त्याबद्दल कर्मचारी कोर्टात जाऊन भरपाई मिळवू शकतो.
(५) पण माझा मुद्दा (३) व (४) च्या अनुपस्थितीतला आहे.
(६) माझा मुद्दा असा सुद्धा आहे की (३) च्या अनुपस्थितीत असा कायदा करणे हे स्त्रियांना (किंवा पुरुषांना) सुद्धा समस्याजनक होऊ शकते. नेमकं सांगायचं म्हंजे समान कामास समान वेतन हा कायदा आणणे हे फक्त राजकारण्यांच्या हिताचे असते. व काही वेळा कंपनी मालकाच्या सुद्धा हिताचे असते.
.
.
तुम्ही सगळी चर्चा वाचली नाही
तुम्ही सगळी चर्चा वाचली नाही असं म्हणाला आहात. तर तुम्ही मांडलेल्या दोन खेळाडूंच्या मोबदल्यातील फरकाबाबत माझे मागच्या धाग्यावरील प्रतिसाद पहा. त्या धाग्याची लिंक या धाग्याच्या सुरुवातीसच आहे.
From the remuneration point of view, are the two jobs (Captains of two football teams) identical? Remuneration to players or public performers is paid on the basis of how many viewers a person (or a group of persons) is able to draw to the playground or TV screens. If Dhoni is able to pull more viewers than Mitali Raj, it is the fault of the viewers if any than that of the sponsors who pay Mitali Raj less than Dhoni.
In that sense it will be unfair if Madhuri Dixit was paid less than or equal to Sanjay Kapoor for the film Raja; or Madhubala was paid less than Bharat Bhushan for Barsaat Ki Raat
निषेधार्ह?
समान काम असं काही असतं का? स्त्री-पुरुष हा मुद्दा सोडून देऊ. संजय दत्त आणि सलमान खान यांना बिग बॉसच्या अंकरिंगसाठी समान मोबदला मिळाला पाहिजे असं काही आहे का?
गब्बरने बरेच चांगले मुद्दे मांडलेत. मोबदल्याची आकारणी ही केवळ कामाच्या स्वरुपावर अवलंबून नसते. बहुतेक कंपन्यांमध्ये एकाच कामासाठी वेगवेळ्या पगारावर अनेक लोक असतात.
जुनी चर्चा वाचली नाही, तरी
जुनी चर्चा वाचली नाही, तरी माझे काही (नेहमीचे) मुद्दे.
- पालकत्वाची रजा १ वर्षाची असावी आणि ती {आई, वडील, इतर मित्र/ नातेवाईक} इ पैकी जे बाळ सांभाळणार असतील त्यांना कोणालाही वाटून घेऊ द्यावी. रजेच्या काळातील पगार काही प्रमाणात सरकारकडून तर काही प्रमाणात कंपनी/ मालकाकडून यावा. कंपनी/ मालकाकडून येणारा हिस्सा शून्य असण्याची मुभा द्यावी.
- पाळणाघरांसाठीचे नियम विचारपूर्वक ठरवावेत; पाळणाघर चालवणे यासाठी शैक्षणिक पात्रता + जागेची योग्यता आवश्यक ठेवावी. पाळणाघराचा खर्च (गृहकर्जाप्रमाणे) करपात्र उत्पन्नातून गाळावा.
- मुलग्यांना व मुलींना बाळे ही पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते; स्त्रियांना थेट पैसे मिळवून देणारे काम करणे जितके ऑप्शनल असते तितकेच ते पुरुषांनाही असते; घरातील कोणतीही कामे ही घरल्या सगळ्यांची असतात इ सोप्या गोष्टींचे संस्कार मिळावेत.
- अमुक काम, आवड, रंग, खेळ, चळवळी स्त्रियांच्या आणि तमुक पुरुषांच्या असे, विशेषत: जाहिरातींमधून दिसणारे भेद कमी व्हावेत म्हणून 'पूर्वग्रह तपासणारे' नियम व्हावेत.
--
अवांतर : फार उशीर कधीच होत नाही; लग्नाआधी टीव्हीसमोरून "चहा" असं ओरडल्यावर जादूने हातात चहा मिळणाऱ्या पुरूष इसमाचे सांसारिक झाल्यावर आपल्या घरीच काय पण सासरघरी भेट देतानाही स्वत: किचन मध्ये जाऊन चहा करून घेणाऱ्यात रूपांतर झालेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे.
- पालकत्वाची रजा १ वर्षाची
- पालकत्वाची रजा १ वर्षाची असावी आणि ती {आई, वडील, इतर मित्र/ नातेवाईक} इ पैकी जे बाळ सांभाळणार असतील त्यांना कोणालाही वाटून घेऊ द्यावी. रजेच्या काळातील पगार काही प्रमाणात सरकारकडून तर काही प्रमाणात कंपनी/ मालकाकडून यावा. कंपनी/ मालकाकडून येणारा हिस्सा शून्य असण्याची मुभा द्यावी.
माझं मत -
(कर्मचारी सरकार मधे नोकरीस नसल्यास) रजेच्या काळातील पगार सरकारकडून दिला जाण्यास माझा प्रखर विरोध. कंपनी/मालकाकडून (एखादा कायदा करून) वसूल करण्यास माझा प्रखर विरोध. बालकास जन्म देणे ही मातापित्यांची गरज आहे. सरकारची व कंपनीची नाही. ती मातापित्यांची जबाबदारी आहे.
------
मुलग्यांना व मुलींना बाळे ही पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते; स्त्रियांना थेट पैसे मिळवून देणारे काम करणे जितके ऑप्शनल असते तितकेच ते पुरुषांनाही असते; घरातील कोणतीही कामे ही घरल्या सगळ्यांची असतात इ सोप्या गोष्टींचे संस्कार मिळावेत
.
एकदम मान्य. जोरदार सहमती. सिरियसली.
------
- अमुक काम, आवड, रंग, खेळ, चळवळी स्त्रियांच्या आणि तमुक पुरुषांच्या असे, विशेषत: जाहिरातींमधून दिसणारे भेद कमी व्हावेत म्हणून 'पूर्वग्रह तपासणारे' नियम व्हावेत.
नियम व्हावेत हे ठीक. ते नियम हे संकेत म्हणून असावेत.
कायदे नसावेत. ते कायदे बनवण्यास माझा प्रखर विरोध.
.
-----
( टंग इन चीक )
गॅस चा सिलिंडर उचलून आणणे हे घरातल्या मुलींचे सुद्धा काम आहे असा संकेत असावा.
.
नवीन प्रजेची निर्मिती होत
नवीन प्रजेची निर्मिती होत राहणे ही समाजाची गरज आहे.
ओ माय गॉड !!
अपत्यांच्या संगोपनात आवश्यक असणाऱ्या बहुतांश कृत्या समाज करत नाही. अपत्यांचे आईवडील करतात.
अपत्यांच्या शिक्षणासाठी अपत्यांना शाळेत पाठवलं जातं. पण फी मातापित्यांनी भरावी अशी अपेक्षा असते. (अनेकदा सरकार भरते हे ठाऊक आहे मला. परंतू ......)
समाजात असे अनेक लोक असतात की ज्यांना विवाह, मुलं नको असतात. ब्रह्मचर्योत्सुक. संख्येने कमी असतीलही. पण असतात.
तेव्हा नवीन अपत्यांची निर्मीती होत राहणे ही मातापित्यांची गरज आहे/असते. व म्हणूनच ते एकत्र येतात व विवाह करून कुटुंब स्थापित करतात.
समाजाची असते असं म्हणणं बरोबर नाही.
.
अपत्यांची निर्मीती होत राहणे
अपत्यांची निर्मीती होत राहणे ही मातापित्यांची गरज आहे
तुमच्या सगळ्या मुद्द्यांचा प्रतिवाद करता येईल, तर यावर वेगळी चर्चा सुरू करावी.
ब्रह्मचर्येत्सुक लोक, अल्पसंख्य का होईना असतात हे तुम्हीच लिहिले हे उत्तम. :)
तथाकथित प्रगत देशांमध्ये लोकसंख्यावाढीचा दर हा त.क. अप्रगत भागांपेक्षा कमी का आहे, याचे काय कारण असावे असे तुम्हाला वाटते?
आपला वंश पुढे चालावा ही प्रेरणा प्रत्येक सजीवात असते, त्याला मनुष्य अपवाद नाही. त्या दृष्टीने पहाता नवीन अपत्यांची निर्मिती मातापित्यांच्या प्रेरणेने होणे स्वाभाविक व अविवादास्पद आहे. इथे मुद्दा संगोपनाचा आहे. मनुष्यबाळांची संगोपनाची गरज इतर पिल्लांच्या तुलनेत खूप जास्त असते हे तर आहेच पण संगोपनाच्या 'प्रतवारी'प्रमाणे पुढे समाजाला मिळणाऱ्या नागरिकाची प्रतवारी ठरू शकते. म्हणून ज्यांना शाळा परवडत नाही त्यांची फी सरकार भरते. वगैरे.
वर्षभराची संगोपनाची रजा कुटुंबात/ मित्रमंडळीत वाटून घेता आली तर स्त्रियांना संगोपनासाठी आपल्या कामावर पाणी सोडावे लागणार नाही. व कामाच्या ठिकाणचे वैविध्य टिकून राहून, कल्पनांचे एककल्लीकरण (जे सध्या काही क्षेत्रांमध्ये पहायला मिळते) कमी होईल. मानवजात म्हणून आपल्या एकूण सर्वांगीण प्रगतीसाठी ते जास्त योग्य ठरेल असे मला वाटते.
तुमच्या सगळ्या मुद्द्यांचा
तुमच्या सगळ्या मुद्द्यांचा प्रतिवाद करता येईल, तर यावर वेगळी चर्चा सुरू करावी.
वेगळा धागा काढावा लागेल.
--
तथाकथित प्रगत देशांमध्ये लोकसंख्यावाढीचा दर हा त.क. अप्रगत भागांपेक्षा कमी का आहे, याचे काय कारण असावे असे तुम्हाला वाटते?
अप्रगत देशांमधे मुलांना म्हातारपणाची काठी समजले जाते व म्हणून प्रजनन जास्त होते. असं वाचल्याचं आठवतंय. डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स मधला बेसिक प्रॉब्लेम असावा हा.
अर्थात त्यात देशातल्या व्यक्ती अप्रगत असल्याचा सहभाग असतो.
प्रगत देशांमधे मातापित्यांच्या प्रायॉरिटिज बदलतात. प्रगत देशांमधे मातापित्यांना कमी मुलांना जन्म देऊन त्यांच्या संगोपनावर अधिक भर देणे योग्य वाटत असते.
.
-----
आपला वंश पुढे चालावा ही प्रेरणा प्रत्येक सजीवात असते, त्याला मनुष्य अपवाद नाही. त्या दृष्टीने पहाता नवीन अपत्यांची निर्मिती मातापित्यांच्या प्रेरणेने होणे स्वाभाविक व अविवादास्पद आहे. इथे मुद्दा संगोपनाचा आहे. मनुष्यबाळांची संगोपनाची गरज इतर पिल्लांच्या तुलनेत खूप जास्त असते हे तर आहेच .
मुद्दा संगोपनाचाच आहे. संगोपनामधे ज्या कृत्या कराव्या लागतात त्या ना समाज करतो ना सरकार.
बाळाला खाद्य भरवणे, त्याची शी, शू काढणे, थोपटून झोपवणे, आंघोळ घालणे, कपडे घालणे, प्रेम करणे हे समाज करत नाही. आईवडील करतात. अपत्य हे आईवडिलांचे असते कागदोपत्री सुद्धा. व म्हणून अपत्याची जबाबदारी आईवडिलांची असते. नाबालिग अपत्याने बाहेर मारामाऱ्या केल्या, तोडफोड केली तर आईवडिलांना सुद्धा शिक्षेची तरतूद आहे. अशा वेळी समाजाला किंवा सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता येत नाही.
---
पण संगोपनाच्या 'प्रतवारी'प्रमाणे पुढे समाजाला मिळणाऱ्या नागरिकाची प्रतवारी ठरू शकते. म्हणून ज्यांना शाळा परवडत नाही त्यांची फी सरकार भरते
तुमच्या माहीतीसाठी सांगतो - की सरकार ही जी फी भरते ती दुसऱ्या कोणाच्या तरी खिश्यातून ओरबाडून काढून भरते. व तो दुसरा कोणी कोण असतो ? तर तो ब्रह्मचर्योत्सुक सुद्धा असू शकतो. व अविवाहीत सुद्धा. किंवा विवाहित असूनही अपत्य नको असलेला सुद्धा असू शकतो. किंवा असा एखादा की ज्याला फक्त एकच बालक हवे आहे व त्याचं एकच बालक आहे व तो त्या बालकाचं संगोपन करताना सुद्धा जिकीरीने करू शकतोय कारण त्याची आवक तुटपुंजी आहे. To the extent that the school fees for a particular child are paid by Govt. - the Govt Coercively takes away that money from someone else who might have earned it in legitimate manner and still may be struggling to support his own family.
व असे हे जे पालक ज्यांना त्यांच्या मुलांच्या शाळेची फी परवडत नाही (व म्हणून सरकार भरते) हे सरकार च्या माध्यमातून अन्याय करवत असतात.
----
वर्षभराची संगोपनाची रजा कुटुंबात/ मित्रमंडळीत वाटून घेता आली तर स्त्रियांना संगोपनासाठी आपल्या कामावर पाणी सोडावे लागणार नाही. व कामाच्या ठिकाणचे वैविध्य टिकून राहून, कल्पनांचे एककल्लीकरण (जे सध्या काही क्षेत्रांमध्ये पहायला मिळते) कमी होईल. मानवजात म्हणून आपल्या एकूण सर्वांगीण प्रगतीसाठी ते जास्त योग्य ठरेल असे मला वाटते.
हा नक्की वेगळा विषय आहे.
पण असरकारी संगठने (उदा. खाजगी कंपन्या) ही कल्पनांचे विविधिकरण करण्यासाठी सर्वसामान्यपणे नसतात. ज्या दिवशी अनेक ग्राहक कल्पनांचे विविधिकरण या संकल्पनेसाठी दमड्या मोजायला तयार होतील त्या दिवशी ......................
Whatever emphasis the companies put on diversity of viewpoints and ideas - is a cherry on top. A side effect which those companies sell in the labor market in order to attract talent. Not because they have a mandate for it.
.
भांडवलशाहीच्या भाषेत
>>अपत्यांची निर्मीती होत राहणे ही मातापित्यांची गरज आहे
ही समाजाची गरज आहे. पोटेन्शिअल कष्टंबर + पोटेन्शिअल वर्कर्स
त्यांनी पोटेन्शिअल कष्टंबर व्हावं म्हणून त्यांच्याकडची क्रयशक्ती वाढती राहील हे पाहणे
त्यांनी पोटेन्शिअल वर्कर व्हावं म्हणून त्यांच्या आरोग्याची शिक्षणाची/प्रशिक्षणाची काळजी घेणे.
-----------------------------------------------------------
अकुशल कामगारांनी झोपडीत राहणे ही शहरातील मध्यमवर्गीयांची गरज आहे.
त्यांचं म्हणणं हे आहे की
त्यांचं म्हणणं हे आहे की मुलांचे प्रजनन समाजाची गरज असते, व सरकार हे समाजाच्या वतीने काम करते आणि म्हणून सरकारने रजेच्या कालातला पगार कर्मचाऱ्यास द्यावा.
एक लाँग शॉट उदाहरण देतो. समाजात बचतीची सुद्धा गरज असते व खर्चाची सुद्धा गरज असते. पण जितका खर्च जास्त तितकं सेव्हिंग कमी. म्हंजे खर्च करणे व बचत करणे ह्या दोन कृत्या खूप प्रमाणावर एकमेकांविरोधी असतात. व म्हणून खूप बचत करणं ही समाजाची गरज आहे असं म्हणणं बरोबर नाही आणि खूप खर्च करणं ही समाजाची गरज आहे असं म्हणणं पण बरोबर नाही. हे लाँग शॉट उदाहरण आहे पण मुद्दा समजून घेण्यास उपयुक्त आहे.
सांगायचं हे आहे की मुलांचं संगोपन आईवडील करतात. समाज करत नाही. मुलांचं संगोपन व्यवस्थित झालं नाही तर ती चूक समाजाची नसते. मूल् आजारी पडले आणि मुलाला वेळेत औषधं मिळाली नाहीत तर समाजाला दोष देता येत नाही. आईवडीलांना (व काही केसेस मधे डॉक्टर ला) दिला जातो. तेव्हा मुलं जन्माला घालणं ही मातापित्यांची गरज असते.
.
न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति।
सांगायचं हे आहे की मुलांचं संगोपन आईवडील करतात. समाज करत नाही. मुलांचं संगोपन व्यवस्थित झालं नाही तर ती चूक समाजाची नसते. मूल् आजारी पडले आणि मुलाला वेळेत औषधं मिळाली नाहीत तर समाजाला दोष देता येत नाही. आईवडीलांना (व काही केसेस मधे डॉक्टर ला) दिला जातो. तेव्हा मुलं जन्माला घालणं ही मातापित्यांची गरज असते.
ते जे काही _सु_भाषित आहे ना - पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने । रक्षन्ति स्थाविरे पुत्राः न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ।। ते आठवलं.
पहिली काही वाक्यं आणि शेवटचं वाक्य यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. लोक असं म्हणतात, लोक असं समजतात, म्हणून मूल जन्माला घालणं ही मातापित्यांची गरज असते.
Paid maternity leave? Your
Paid maternity leave? Your baby will get the bill.
it is now retrograde to expect family planning to involve families making plans that fit their resources
युरोपात मुलं जन्माला घालण्यासाठी पैसे मिळतात
जर्मनी मध्ये युद्धानंतर बर्थ रेट कमी झाला, तसेच इतर प्रगत देशांमधे वयस्करांची संख्या वाढत असल्यामुळे मुले जन्माला घालण्याबद्दल टॅक्स बेनिफिट व भत्ता मिळतो असे ऐकले आहे.
समान वेतनाधिकारा बद्दल सहमत. त्याबद्दल एक विनोदी व्हिडीओ: https://youtu.be/7HvaGy1rLvk
मुळात सर्वच कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवणे आवश्यक नाही काय?
वेतन हा अधिकार होत नाही कारण: सर्व मानवांच्या कौशल्याचे/जीवनाचे मूल्य समान नाही? त्याअर्थी भांडवलशाही म्हणजे मानवांच्या जीवितमूल्याची वर्गवारी लावणारी थिअरी?
जिथे शोषण होतं, तिथे सर्वात आधी हतबल, असहाय जीव (लहान मुले) बळी पडतात. मग अपंग, मग स्त्रिया, मग वयस्क.
हे असं आहे, म्हणून हे असंच असायला ही हवंच का?
मानवी संस्कृतीचा पायाच आदर्शांवर आधारित आहे, जिथे माणसाला निसर्गाविरुद्ध झटतांना 'संघटित' होता यावे, म्हणून समानता वगैरे कल्पना अस्तित्त्वात आल्या असाव्या. तिथे वृद्धांचा अनुभव, मुलांच्या हाती भविष्य वगैरे प्रत्येक समाजघटकाला सन्मान देण्याची पद्धत होती. हा दृष्टिकोण टाकून आता आपण अचानक "असमानतेत प्रगती' वगैरे म्हणू लागलो, पण ह्यात काय हरवते आहे, ते लक्षात येत नाही का? प्रगती करतांना ती संयत असावी यासाठी समान अधिकार आवश्यक आहेत.
शेवटी शोषणातुन असमानता वाढते, व असमानतेपोटी युद्ध, हिंसाचार वाढतो, तर मानवाने त्यापासून दूर राहण्यासाठी समान हक्क प्रस्थपित करायला काय हरकत आहे?
मला चर्चेच्या सर्व बाजू कळल्या नसतील, पण हे इतकं साधं लॉजिक तेवढं समजतंय.
धागा नवीन काढला तर नवीन वाचक,
धागा नवीन काढला तर नवीन वाचक, लेखक, वेगळे विचार आले तर बरं होईल. अन्यथा दळण.
शेवटच्या मुद्याबद्दल-
१) नोकरी करणाय्रा स्त्रिया कोणत्या राज्यांत अधिक आहेत? त्या काय करतात? त्यांचे स्थान काय?
( केरळमधले कन्नुर,कोझिकोड जिल्हे)
२) नोकरी करत नाहीत परंतू उत्पन्न मिळवण्यात सहभागी आहेत अशा गटांत काय वागणूक मिळते?
( शेतकरी, मासेमारी/विक्रीमधले कोळी)