कल्लोळती रंगरेषा

मन घनदाट वन
त्याचे गूढ आरण्यक
कधी निबिड, दुर्बोध
कधी आकळे क्षणैक

लाल जांभळ्या छायेत
श्रांत आदिम श्वापद
माझ्या मातीच्या पायांची
देई रासवट याद

दूर झळाळे नारिंगी
एक कोना आरस्पानी
अज्ञाताची निळी हाक
ऐक, दुमदुमे कानी

हिर्वळीस सृजनाच्या
वैफल्याचे खत काळे
कुतूहलाच्या देठास
पक्व पिवळीशी फळे

कल्लोळती रंगरेषा
ध्यानीमनी रात्रंदिन
शोधू कशाला आकाशी
इंद्रधनूची कमान

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माझ्या मातीच्या पायांची
देई रासवट याद

हे कळलं नाही.

हिर्वळीस सृजनाच्या
वैफल्याचे खत काळे
कुतूहलाच्या देठास
पक्व पिवळीशी फळे

हे अप्रतिम लिहीलंय. हाऊसचं Here is how to become a great artist: First, get miserable. Misery drives you to become a great artist, but the art does nothing for your misery, which drives you to drugs, which makes you a lousy artist! हे आठवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss

हे तर फार प्राचीन आहे. क्रौञ्च जोडप्यातल्या एकाची शिकार झाल्यावर 'मा निषाद प्रतिष्ठाम्' या ओळी उमटल्या. केशवसुतही म्हणाले आहेत, "तारा ताणिलियावरी पिळुनिया खुंट्यास वाद्याचिया, त्यांच्यातून अहा! ध्वनि उमटती ते गोड ऐकावया"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. ती टेक्स्ट स्ट्रिंग सर्च केल्यास मिपावरच्या तुमच्याच एका प्रतिसादापाशी पोहोचलो. कोणती कविता ते सांगाल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss

या शीर्षकाची ही कविता ' केशवसुत यांची कविता ' या त्यांच्या एकमेव काव्य संग्रहात आहे. या कवितेतल्या काही ओळी मराठी साहित्यात प्रसिद्ध आहेत. उदा. ' प्रौढत्वीं निज शैशवास जपणें , बाणा कवींचा असे!' किंवा ' गाण्याने श्रम वाटतात हलके, हेंही नसे थोडकें.' किंवा ' स्फूर्तीचा तुमच्या पिढ्यांस पुढल्या साक्षी कवी होईल' वगैरे.
संपूर्ण कविता टंकायला खूप वेळ लागेल .
कविता सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीची आहे. ' देश हलाखीत असताना तुम्हांला गाणे सुचतेच कसे' असा प्रश्न कवीला कोणी विचारल्यावर कवीने दिलेले ते उत्तर आहे. 'आता समाज जागा झाला आहे, शिथिलता जाऊन कठोर परिश्रमास तयार झाला आहे. तंतूवाद्याच्या सैल तारा जेव्हा पिळल्या जातात तेव्हा त्यातून उमटणारा ध्वनि अतिशय मधुर असतो. कष्टमय परिस्थितीतून उमटणारे काव्य असेच असते.' असा काहीसा अर्थ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"शान्तीचें घर सोडुनी प्रखर त्या हाटीं प्रयत्नाचिया,
प्रीतीचाहि निकुंज सोडुनि रणीं जीवित्व नांवाचिया,
सर्वांहीं सरमावणें झटुनियां हें प्राप्त झालें असे;
या वेळे न कळे कवे ? तुज सुचे गाणें अहा रे कसें !

” माता ही सुजला स्वभूमि सुफला, तीच्या परी लेंकरीं
खायाला पुरतें पहा नच मिळे कीं हाल आहे पुरा;
झांकायास तनूस वस्त्रहि न तें आतां पुरेसें मिळे;
या वेळेस कसें कवे ! तुज सुचे गाणें न मातें कळे !’

हें कोणी म्हणतां जवें कविमनीं खेदोर्मि हेलावल्या,
नेत्रांतून सवेंचि बाष्पसरिता वाहावया लागल्या;
त्याचा स्त्रैणपणा असा प्रकटला वाटेल कोणा, परी
धीरोदात्त असेचि तो श्रुत असे हें दूरही भूवरी !

सोन्याचे सरले अहा ! दिवस ते, आली निशा ही कशी !
सौख्याचा नद तो सुकून पडलों या दुःखपंकीं फशीं !
कालक्रीडीत हें बघूनि रडला, हें व्यस्त कांहीं नसे;
प्रौढत्वीं निज शैशवास जपणें बाणा कवींचा असे,

बाष्पान्तीं तरलस्वरें मग कवी निश्वासुनी बोलिला ---
जो पूर्वीं गुण पुण्यभूमिवरि या अत्यन्त वाखाणिला,
तें हें दिव्य कवित्य दुर्विधिवशें हीनत्व कीं पावलें,
त्याची बूज करावया न अगदीं कोणी कसें राहिलें !

” गाणें जें परिसावया कविपुढें राजेशही वांकले,
यन्नादेंच लहान थोर सगळें गुंगून वेडावले,
त्याला मान नसे, नसो पण, अतां त्याची अपेक्षा नसे ---
हें कोणी म्हणतां विषाद अहिसा मन्मानसाला डसे !

” आलेल्या दुरवस्थितींतुनि तुम्ही उत्तीर्ण व्हाया जरी,
जद्योगीं रत व्हावया धरितसां सौत्सुक्य चित्तीं तरी,
गाण्यानें कविच्या प्रभाव तुमचा वर्धिष्णुता घेइल,
स्फुर्तिचा तुमच्या पिढयांस पुढल्या साक्षी कवी होइल !

” हातीं घेउनियां निशाण कवि तो पाचारितो बान्धवां ---
‘ या हो या झगडावयास सरसे व्हा मेळवा वाहवा !’
प्रेतेंही उठवील जी निजरवें, ती तो तुतारी करी,
आतां नादवती, निरर्थ तर ती त्याची कशी चाकरी ?

” आशा, प्रेम तसेंच वीर्य कवनीं तो आपल्या गाइल;
गेलें वैभव गाउनि स्फुरण तो युष्मन्मना देइल,
द्या उत्तेजन हो कवीस, न करा गाणें तयाचें मुकें;
गाण्यानें श्रम वाटतात हलके, हेंही नसे थोडकें;

“ आतां जात असे दुरी शिथिलता अस्मत्समाजांतुनी,
याची खूणच गान जें निघतसें तें साच जाणा मनीं;
तारा ताणिलियावरी पिळुनियां खुंटयास वाद्याचिया,
त्याच्यांतून अहा ! ध्वनी उमटती जे गोड ऐकावया !”

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss

एव्हढे सगळे टाइप केलेत. ते सुद्धा जुन्या शुद्धलेखनात. जालावरून उतरवलीत का?
मी टंकाळा केला होता. जालावर आहे का? मी शोधले नव्हते. मजजवळ पुस्तक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार सुंदर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार सुंदर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरा प्रयत्न

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडक्या शब्दात आशय सुंदर मांडलाय. लिहित राहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0