तिरस्कार...

किसान मोर्चा २०० किलोमीटर चालला
भगव्या मतदारांनी मात्र प्रतिगामी विचार केला

सण-समारंभांचे ट्रॅफिक जाम आपल्याला पचतात
दलित-शेतकऱ्यांचे मोर्चे मात्र वेळ वाया घालवतात

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे आपण कानाडोळा केला
त्यांचा लाल झेंडा मात्र आपल्या डोळ्यांत रुतला

दंगलींमध्ये ज्यांनी गर्भार आणि वृद्धांना नागवले
त्यांना मूक मोर्चातही माओवादाने भेडसावले

शिखांनी आणि मुस्लिमांनी अन्नदान केले
आपण सगळेच गावकुसाबाहेरचे मूकपणे दर्शवले

सणांमध्ये शेतकरी बळीराजा आणि जवान भाऊराया
एरवी वर्षभर यातना मुकाटपणे सोसा

मोर्च्याच्या व्यवस्थेचे १.३ करोड कुठून आले विचारले
पुतळे, उद्घाटने, जाहिरातींचे अब्जो रुपये मात्र सोयीस्कर विसरले

२०० किमी प्रवासाकरता पाच दिवस लागले
आपण मंत्रालयात बैठक मारून बैठकीचे फड जमवले

लाल रंगाचा इतका तिरस्कार केलास
मग पायांतून रक्त सांडेपर्यंत भगव्या वेळ का दवडलास?

- अमर (लक्ष्मिकांत) देशपांडे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Straightface

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भगवाच भगव्याला विचारतोय, अशी परिस्थिती आहे. ज्या भगव्याने एकेकाळी लाल बावट्याचा खातमा केला तोच, साळसूदपणे लाल आमचा म्हणतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.