तुकडे

पेशी दुंभगतात आणि जोडून राहतात
असे काही तुकडे.
शिवण घालून जोडले जातात, अंगचेच होतात
असे गोधडीसारखे काही तुकडे.

माझे आणि माझ्या जगाचेही.
जगाचा एक तुकडा माझ्या एका तुकड्याला ओळखतो.
दुसरा दुसर्‍याला.

जग तुकड्यापुरतं
मीही तुकड्यापुरतीच.

अनोळखी तुकड्यांची वाट दिसत नाही,
बघाविशी वाटत नाही
जगाला आणि मलाही.

जगाला मी कळलेली असते आणि मला जग.
- नी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुकडा तुकडा चंद्र - सुशि

'माकडे' असे विडंबन होण्याची शक्यता असलेली कविता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

'माकडे' असे विडंबन होण्याची शक्यता असलेली कविता

करून दाखवाच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विडंबन होण्याची शक्यता वर्तवली होती याचा अर्थ (असे वर्तवणा-याने) ती विडंबन केलीच पाहिजे असे नाही.

१ भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याचे वर्तवले की भ्रष्टाचार करुन दाखवणे बंधन कारक नसते. इत्यादी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ3

बाकीचे सोडून द्या, पण...

जगाला मी कळलेली असते आणि मला जग.

हे अंमळ जास्तच अँबीशियस होत नाहीये काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगाला मी कळलेली असते आणि मला जग.

आवडले.
"दिल से" सिनेमातील "मै यहा टुकडोमे जी रहा हूं , तू भी टुकडेमे जी रही है ..." ही ओळ आठवली.
.
आपल्या संपुर्ण अस्तित्वाच्या निव्वळ लहानशा तुकड्याशी जगाचा तेही जगाचा जेमतेम एक तुकडा परिचित असतो - हे सत्यच आहे की.
शिवाय जगाच्या अन्य तुकड्यांना आपले अन्य रुपच फक्त द्न्यात असते हेही.
.
पण आपण तरी आपल्याशी पूर्ण परिचित कुठे असतो. अमूर्त मन इतकं अथांग आहे की मूर्त त्या मानाने निव्वळ "टिप ऑफ आईसबर्ग" ..... मग त्यात बालपणीच्या आठवणींपासुन ते पुर्वजन्मीच्या आठवणी व संस्कार सारे काही आले.
_______________
ही कविता मला योग्य वेळी सापडली. लॉ ऑफ ग्रेस!!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पावस देखि रहीम मन, कोइल साधे मौन.
अब दादुर वक्ता भए, हमको पूछे कौन...
पावसाळ्यात कोकीळा मौन पाळते कारण ती वेळ बेडकांच्या कर्कश्श उच्चारवाची असते.

थँक्स! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

आयुष्य तुकड्या-तुकड्यांनी पाहू नका. विशाल दृष्टिकोन ठेवा.

--- संत तुकडोजी महाराज
--- बंता तिरशिंग

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

कविता आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

थँक्स राबा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी