तरुणाई

कुणाच्याही समोर शरीर पसरतात , तरुणाईला कसली बंधने नसतात.
शरीराची भूक हाक देते ,मनाची कसली भिती नसते.
घरात आई असून नसते ..बाहेर बापाची आडकाठी नसते…
“ आजकाल सगळे असेच करतात “ अश्या शब्दांची ढाल असते.
मोह असतो पण प्रेम नसते ..मी आणि माझे या शिवाय काही दिसत नसते.
प्रेमातून प्रार्थना ...प्रार्थनेतून परमेश्वर ….असले काही अजिबात नसते...
कसल्या खुळचट कल्पना ! कसल्या बुरसटलेल्या विचारांचा पगडा !
आला क्षण महत्वाचा ...आत्ता मिळतंय ते ओरबाडा..
पैसा हवा. पैसा सोडला की हवे ते मिळते …
तरुणाईची नशा तुम्हा जुनाट लोकांना काय कळते ?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दिशाहीन तरुणाईच्या कानफडात वाजवणारी कविता !
शरीराच्या भुकांना भाळलेल्या भाग्यहिनांना आरसा दाखवणारी कविता !!
आईच्या मायेला बापाच्या धाकाला न जुमानणाऱ्या तरुणाईला धिक्कारणारी कविता !!!
मीपणाच्या मोहाच्या मायाजालात गुरफटलेल्या तरुणाईला प्रेमाच्या पवित्र मार्गावर पिटाळणारी कविता !!!!
प्रेमातुन पार्थनेपर्यंत प्रार्थनेतुन थेट परमेश्वरापर्यंत पोहोचवणारी महावेगवान कविता !!!
बुरसटलेल्या विचारांचा म्हणुन हिणवणाऱ्यांना हीनत्वाला नेणारी कविता !!
ओरीओक्रीम ओरबाडणारी तरुणाई झोडपणारी कविता !

आवाज दो हम एक है
महात्मा गांधी अमर रहे
इन्किलाब जिंदाबाद
जयहिन्द्
जयम्हाराष्ट्र्

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“There is but one truly serious philosophical problem, and that is suicide” – Albert Camus

तरुण आई तरुण असल्याने असा सगळा करुण प्रकार झाल्याला आहे तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुमच काय म्हणण आहे ? आम्हाला कविता कळत नाही काय ?
तरुणाई म्हणजे तरुण आई अशी अश्लील फोड तुमच्या सारखे तरुणाईचे (तरुण वर्गाचे/ युथ )प्रतिनिधीच करु शकतात.
हेच हेच ते आहे ज्याला आक्षेप आहे.
तरुणाई म्हणजे युवावर्ग असा सरळ अर्थ सोडुन तरुण - आई असा भलता अर्थ घेतला तर तुम्हाला कवि

तरुणाईची नशा तुम्हा जुनाट लोकांना काय कळते ?


यातुन तरुण आईची नशा असला हिन अर्थ काढुन आव्हान देतोय असला आरोप तुम्ही करताय का?
यातुन काय अर्थ निघता ? कविला तसे अभिप्रेत आहे का ? याचा तरी विचार करा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“There is but one truly serious philosophical problem, and that is suicide” – Albert Camus

नाईक आजोबा, नसतं हो असं काही. आता, बघा असल्या नासलेल्या, वाया गेलेल्या, सग्गळ्ळं सग्गळ्ळं विकून खाणाऱ्या, पैशालाच केवळ महत्व देणाऱ्या वाईट्ट, वाईट्ट दुत्त दुत्त तरूणाईच्याच हातात असणारे की नै जग, मग तुमच्या रडण्या- भेकण्याचा काय उपयोग होणारै. त्यामुळे, टेक अ चिल पिल.
भोक्कात गेली ती तरूणाई..
ओक्के?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

जरा जागे व्हा . आजकाल सगळे राज्यकर्ते आजोबा आणि पणजोबाच आहेत. गोवऱ्या मसणात गेल्या तरी खुर्चीचा मोह सुटत नाही ! मला जे दिसले ते सांगितले इतकेच. यात सुधारणा करावी अशी अपेक्षा आहे. ती अवास्तव असू शकेल. काय केले म्हणजे यात सुधारणा होईल ? माझ्याकडे याचे उत्तर नाही . आपल्यासारख्या विचारवंतानी याचे उत्तर शोधले पाहिजे . मी फक्त कवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(सं)भोग आणि प्रेम यांचा काय संबंध? गुण -५, अवगुण- हवेत तेवढे.

आता बघा, गेल्या रविवारचीच गोष्ट. शेजारच्या मैत्रिणीनं प्रेमापोटीच मला रेस्टॉरंटात नेलं. बळंच, माझा वाढदिवस साजरा करायचा म्हणून मला मार्गारिटा प्यायला लावली; केक खायला लावला. पोट फुटेस्तोवर तुडुंब जेवण घातलं. तिच्यावरच्या प्रेमापोटी मी ते सगळं जेवले. चारचौघांत, लोक माझ्या अंगावर 'हॅपी बर्थडे' म्हणून ओरडत-गात होते; ते ही सहन केले.

मग चार दिवस वजनवाढही भोगावी लागली मलाच. प्रेम आणि भोगाचा संबंध असतो तो असा. मार्गारिटा आणि केक बाकी झकास होते हो.

आता कोणी तरी मला गुण आणि अवगुण द्या बघू!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रेमापोटी मी ते सगळं जेवले. चारचौघांत, लोक माझ्या अंगावर 'हॅपी बर्थडे' म्हणून ओरडत-गात होते; ते ही सहन केले.

कोणीतरी काहीतरी केलं आणि तुम्हाला ते आवडलं, खुदकन स्माईल फुलली, मनमोर थुईथुई नाचायला लागला असं झाल्याचं उदाहरण आहे का एखादं?

(म्हणजे "कंटाळा" आला नाही, "बोर" मारलं नाही, लोकाला सहन करावं लागलं नाही, समोरचा टिप्पिकल इरिटेटिंग, ममव, एमएसीपी , चाकोरीतला, "शाम्या", निघाला नाही असा एखादा प्रसंग ?) Wink

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आली गं बाई आली गं बाई आली गं.
आली आली आली आली..
आली गं रोचक श्रेणी...!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही म्हणजे, आम्हालाही रोचक श्रेणी द्यायचीच होती, परंतु त्या क्षणी आमची श्रेणीव्यवस्था चालू नसल्याकारणाने देऊ शकलो नाही; सबब ती पहिली रोचक श्रेणी आमची नव्हे.

आता तूर्तास आमची श्रेणीव्यवस्था पुन्हा चालू झालेली असल्याकारणाने, ती दुसरी रोचक श्रेणी आमची.

(याबद्दल 'माहितीपूर्ण' पायजेलाय!)

- (चाकोरीतला, 'शाम्या') 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आय कान्ट कॉम्पेनसेट धिस फॉर एंटायर लाइफ इव्हन विथ मेकिंग शूज ऑफ माय स्किन लेदर अँड पुटिंग देम इन युअर फीट ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुटिंग देम इन युअर फीट

इन, की ऑन?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पायात,
पायावर नव्हे..

Hence इन युअर फीटच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचं दोघांचं जे काही चालतं, तो शामूपणा नसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अस्स इतकं उघड करायला हे काय फेसबुक आहे?
( तरुणाईच्या भाषेत व्हेरी पझेसिव (=?) आणि तो प्रसंग कुण्णाशी शेअर करणार नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ये भोगभी एक तपस्या है
तुम त्यागके मारे क्या जानो
अपमान रचेताका होगा
रचनाको अगर ठुकराओगे

असं आपला साहिर म्हणून गेलाय! तेंव्हापासून आम्ही, प्रत्येक रचनेला आमचा समोर पसरायला सांगतो.

-तिमा पणजोबा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सैराट बघितला का?
आजकाल आईस्क्रिम/पाणीपुरी ई इ खायला जाताना तरुण लवक्रोज (बर्डस) नाहित ना हे बघूनच हिला अन् मुलीला घेऊन जातो. ह्या फालताड क्रोज ना कुठं काय बोलताहेत हे समजत नसावं. अवघडल्यासारखं होतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

तुम्ही खूप गोड आहात. जरा आयर्न मेडन, स्लिपनॉट वगैरे ऐकत जा स्वस्थ प्रकृती, मन:शांती आणि स्थिरचित्तासाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

तरुण आहे आजचा दिवस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुणाच्याही समोर शरीर पसरतात ,

नाय हो. काश...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय ही खंत ? असे लोक आम्हाला का भेटत नाहीत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हलकेच घ्या हो. तुमची तळमळ पोचतेय कवितेतून.

विनोदनिर्मितीचा एक क्षीण प्रयत्न करुन पाहिला इतकंच.

पण विषयाच्या गांभीर्याशी सहमत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. आपल्या भावना पोचल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय ही खंत ? असे लोक आम्हाला का भेटत नाहीत ?

नाही. रादर, असे लोक तुम्हाला(च) कोठे भेटतात?

इन अदर वर्ड्ज़, खंत तुमच्याकरिता आहे; आमच्याकरिता (स्वादरार्थी बहुवचन) नव्हे.

- (आमच्यासमोर शरीर पसरणाऱ्या लोकांच्या शोधात न जाणारा, गांधीजींचा वॉनाबी एक तृतीयांश माकड) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रादर, असे लोक तुम्हाला(च) कोठे भेटतात?

स्पा वगैरे मध्ये जावं, स्लीपर कोच ट्रेन/व्होल्वोबशीतून मस्त प्रवास करावा, योगासनं करावीत, जिममध्ये जावं...

(नाही, नाही, मन:शांती वगैरे शाबूत राहण्यासाठी आणि पर्यायाने असल्या कविता न स्फुरण्यासाठी नाही; आपल्यासमोर पसरणारे लोक (खासकरुन तरुणाई) पहाण्यासाठी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

पॉइंट नोटेड. हे आधी लक्षात आले नव्हते. (सांगितले ना, गांधीजींचा वॉनाबी एक तृतीयांश माकड ('बुरा मत देखो') म्हणून!) परंतु तरीही...

...त्या पसरणाऱ्या जनसंख्येत एक्स्क्लूज़िवली (किंवा स्पेसिफिकलीसुद्धा) तरुणाईचाच भरणा असतो, अशातला काही भाग नव्हे. नाईकआदिपूर्वजांचा रोख/आक्षेप स्पेसिफिकली/एक्स्क्लूज़िवली तरुणाईकडे दिसतो. का, ते कळत नाही.

(ऑल्सो, प्लीज़ नोट: नाही म्हणजे, आपल्या सूचनेचे स्वागतच आहे, परंतु आम्ही लोकांसमोर शरीर पसरतो; लोकांची आमच्यासमोर पसरलेली शरीरे शोधण्यात आम्हांस रस नाही. धन्यवाद२अ.)
...........

आजोबा/पणजोबा थीमचे एक्स्ट्रापोलेशन/कल्पनाविस्तार म्हणून 'आदिपूर्वज' असा शब्दप्रयोग केला खरा, परंतु आता असे लक्षात येते की आपल्या आदिपूर्वजांना बहुधा कोणासमोर शरीर पसरण्याचा विधिनिषेध नसावा; मनाला येईल तेथे बिनदिक्कतपणे शरीर पसरू शकत असावेत. (मने स्वच्छ होती त्यांची.) ही विधिनिषेधाची खासियत बहुधा आपल्या आजोबा/पणजोबांच्या पिढीचीच. पण असू दे. आता खोडून करेक्ट करायचा कंटाळा आला.

२, २अ हे 'तुझ्या बैलाला घो, साल्या!'चे सभ्य मराठीतील ईक्विव्हॅलंट मानण्यास आम्हांस प्रत्यवाय नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या मते जे चालू आहे ते योग्य आहे तर मग ...चालू द्या ! लगे रहो!.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या अनुमतीच्याच प्रतीक्षेत होतो. आता (आपल्या आशीर्वादाने) निर्धास्तपणे चालू राहीन.

- (वडीलधाऱ्यांच्या शब्दाचा (सोयिस्करपणे) मान राखणारा) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय ही खंत ? असे लोक आम्हाला का भेटत नाहीत ?

नाही. रादर, असे लोक तुम्हाला(च) कोठे भेटतात?

अती मार्मिक प्रश्न अती नवीच बाजु
याचे उत्तर कवीवर्य देतील का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“There is but one truly serious philosophical problem, and that is suicide” – Albert Camus

कविता पेरापेरांत फुटलीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी काही कविवर्य वगैरे नाही . शिकाऊ कवी फारतर ... चुका दाखवा . स्वागतच आहे. जरूर सुधारेन . माझ्या परीने ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या परीने ...

म्हणजे तुमची परी आहे? तीही पर्सनल परी? मजा आहे ब्वॉ!

बाकी, परी वगैरे बालपणात असते, हे ठाऊक होते. पहिल्या तसेच दुसऱ्याही, याची कल्पना नव्हती. (पण कवी बुवा तुम्ही! 'प्रौढत्वी निजशैशवास जपणे, बाणा कवींचा असे' असे कोणीसे (कोण्या कवीने) म्हणून ठेवलेलेच आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पेरापेरांत साखर भरली अशी चांगली कॅामेंट आहे हो.
तुझ्या उस्साला लागल कोल्ला~~~

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माणसाला वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षांपर्यंत व्हर्जिन ठेवू शकणाऱ्या एका क्रूर देशात जन्माला आलेल्या एका जवळच्या मित्राला ही कविता पाठवली. बघू काय होतंय आता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

कोणाचं काय होणार? मित्रानं कविता वाचल्यामुळे त्याच्यासमोर तुम्ही, इतर कुणी शरीर पसरणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

२८?
Height आहे. Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फिर से मन में अंकुर फूटे, फिर से आँखों में ख्वाब पले
फिर से कुछ अंतस् में पिघला, फिर से श्वासों से स्वर निकले
फिर से मैंने सबसे छुपकर, इक मन्नत मांगी ईश्वरसे
फिर से इक सादा-सा चेहरा, कुछ ख़ास लगा दुनिया भर से

नाही, वय आहे वय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एककसुद्धा सांगा. नाही तर मी '२८ महिने' वगैरे छपराटपणा सुरू करेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय ठरलं मग ?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1