सलमानचे चेटूक आणि आपली अविवेकी मानसिकता.

फेब्रुवारी १९९८ मधील काळवीट मारल्याची घटना . ५ एप्रिल २०१८ मध्ये जोधपुर कोर्टाचा निकाल. सलमान एका खटल्यामध्ये दोषी ठरला. आता परत अपील .. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट.अजून २० वर्षे सहज जाणार. २० वर्षे गेलेलीच आहेत !

असे हे सलमानखान या न्याय व्यवस्थेवर काय चेटूक करतो आहे कुणास ठाऊक ? एखाद्या सामान्य माणसा विरुद्ध असा खटला इतकी वर्षे चालला असता ?
“Justice delayed is justice denied” वगैरे फक्त पुस्तकात छापायला राखीव ठेवलेली वाक्ये आहेत का ?
या खटल्याशी संबंधित लोकांना या सलमान मुळे मिळणारी प्रसिद्धी हवी हवीशी वाटते म्हणून इतकी वर्षे हा खटला चालू आहे का ?
नक्की कसले चेटूक आहे हे ?
खालचे कोर्ट नंतर हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट असे सगळे या नाटकात कश्यासाठी सहभागी होतात किवा झालेत ?
इतके सगळे दिग्गज या खेळात सहभागी झालेत पण साध्य काय झाले आहे ?
शिकार केल्याबद्दल या सलमानखानला काही पश्चाताप वगैरे झालेला दिसत नाही ! शिकारींचे प्रमाणही काही या हिंदुस्तानांत कमी झालेले दिसत नाही !

कायदे कश्यासाठी करायचे किवा शिक्षा हि कश्यासाठी असते ?
गुन्हे कमी व्हावेत किवा होऊच नयेत आणि गुन्हेगार जरब बसून कमी व्हावेत. तसेच ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना योग्य शिक्षा होऊन भविष्यात त्यांनी परत तेच किवा कसलेही गुन्हे करू नयेत म्हणूनच ना ?
का अशी अपेक्षाच आता चुकीची झाली आहे !

परवाच झालेला चेंडू कुरतडणे हा क्रिकेट मधील प्रकार . ज्या खेळाडूंनी तो प्रकार केला ..तो आपण जे करतोय ते चुकीचे आहे हे माहित असून केला. त्यांना निलंबित करताच त्यांनी सार्वजनिकरीत्या आपली चूक मान्य केली ..समाजाची माफी मागितली . त्यांना झालेली शिक्षा कमी होती ..अजून व्हायला हवी होती ,,असे तुम्ही म्हणू शकता पण माझा मुद्दा फक्त इतकाच आहे कि त्यांनी चूक मान्य केली ...त्यांना पश्चाताप झाला .
हिंदुस्तानांत कोणत्याच क्षेत्रात हा प्रकार होताना दिसत नाही . ( अगदी तुरळक अपवाद असू शकतील )
आपल्याकडे बहुतेक सर्व आर्थिक घोटाळे करणारे गुन्हेगार ,किवा इतर गुन्ह्यासाठी अटक झालेले गुन्हेगार सुद्धा पोलिस पकडून नेताना ,लोकांच्याकडे हसून पहात हात वर करून फोटो काढून घेतात …

आपली वर्तमानपत्रे ..TV Channels वगैरे सलमानने माफी मागावी ...एखाद्या अभयारण्याचे संवर्धन करावे ( फक्त पैसे देऊन नव्हे !) किवा पशु संग्रहालय दत्तक घ्यावे, काळविटाची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करावे ….शिकार करणे या प्रवृत्ती विरुद्ध प्रचार करावा….याचा Brand Ambassador व्हावे ,असे सुचवताना दिसत नाहीत ….

खरे तर या सगळ्यांनी सलमान चुकीचा वागला. त्याला पश्चाताप व्हायला हवा .. त्याला शिक्षा व्हायला हवी आणि त्याने प्रायश्चित्त घ्यायला हवे असा सरळ पावित्रा घ्यायला हवा.

पण यांना काळजी कशाची? तर सलमानला वातानुकुलीत नसलेल्या कोठडीत रात्र घालवावी लागेल … त्याचे किती प्रोजेक्ट रखडतील? . Brand Salman चे किती कोटी रुपयांचे नुकसान होईल ??….या आणि अशा अनेक गोष्टींची !

योग्य काय आणि अयोग्य काय हे न समजण्याची ही कसली अविवेकी मानसिकता ?

का योग्य आणि अयोग्य असल्या खुळचट कल्पना धरून बसणे हेच सध्या अविवेकी झाले आहे ? का आजकाल योग्य आणि अयोग्य फक्त नोटांच्या तराजूत तोलले जात आहे ?
चित्र विदारक पण सत्य आहे .

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कायद्याच्या कचाट्यात सापडला. संजय दत्तही सापडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या सामान्य माणसा विरुद्ध असा खटला इतकी वर्षे चालला असता ?

हो. लागला असता. लागतो.

ही एक शोकांतिका आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काळवीटं ही मानव नाहीत, ती मतं देत नाहीत वा टॅक्स सुद्धा भरत नाहीत. तेव्हा सलमान खान सारख्या टॅक्स पेयर ला काळवीटांच्या शिकारीसाठी एवढी शिक्षा होणे हे चूक आहे. The blackbucks MUST NOT have so much of a "say". सिरियसली. अगदी पर्यावरणवाद्यांचा इगो कुरवाळला जावा म्हणून जास्तीतजास्त एखादा आठवडा शिक्षा व्हावी हे ठीक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

> काळवीटं ही मानव नाहीत, ती मतं देत नाहीत वा टॅक्स सुद्धा भरत नाहीत. तेव्हा सलमान खान सारख्या टॅक्स पेयर ला काळवीटांच्या शिकारीसाठी एवढी शिक्षा होणे हे चूक आहे. The blackbucks MUST NOT have so much of a "say". …जास्तीतजास्त एखादा आठवडा शिक्षा व्हावी हे ठीक.

ठीक आहे. वादासाठी समजा की सलमान खान शंभर रुपये टॅक्स भरतो. समजा मी काळवीटाच्या वतीने एकशेएक रुपये टॅक्स भरला तर ‘सलमानला पंचवीस वर्षे शिक्षा व्हावी’ हे माझं मत तुम्ही मान्य करणार आहात का? (काळवीटाच्या वतीने टॅक्स भरण्याची तरतूद सरकारने केलेली नसेल तर तो systemic flaw आहे. त्यात माझा दोष नाही आणि काळवीटाचाही नाही.)

मताच्या मुद्द्यात काहीच दम नाही. हिंमतराव आणि सुभानराव अशा दोन व्यक्ती आहेत. समजा हिंमतराव दर निवडणुकीला सकाळी सातपासून रांगेत उभा राहून मत देतो आणि सुभानरावाने आत्तापर्यंत कधीही मत दिलेलं नाही. असं जरी असलं तरी मी हिंमतरावाचा खून केला काय किंवा सुभानरावाचा खून केला काय, मला (ceteris paribus) शिक्षा तीच होईल. निदान ३०२ वं कलम तसं लिहिलेलं आहे.

‘एक आठवडा’ ही फिगर कुठून आली? इथे काही utility maximization अध्याहृत आहे का? असेल तर फोड करून सांगा. थोडंफार गणित आम्हालाही येतं.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

ठीक आहे. वादासाठी समजा की सलमान खान शंभर रुपये टॅक्स भरतो. समजा मी काळवीटाच्या वतीने एकशेएक रुपये टॅक्स भरला तर ‘सलमानला पंचवीस वर्षे शिक्षा व्हावी’ हे माझं मत तुम्ही मान्य करणार आहात का? (काळवीटाच्या वतीने टॅक्स भरण्याची तरतूद सरकारने केलेली नसेल तर तो systemic flaw आहे. त्यात माझा दोष नाही आणि काळवीटाचाही नाही.)

एकदम मान्य करणार.

ज्यांची प्रॉपर्टी प्रोटेक्ट केली जावी त्यांनी किंवा त्यांच्या वतीने टॅक्स भरला जावा. व टॅक्स ज्याच्याकडे भरला जातो (ते सरकार) - त्याने प्रोटेक्शन पुरवावे.

मुद्दा एकदम रास्त, मान्य.

पण ज्या काळवीटांच्याकडून व/वा वतीने टॅक्स मिळालेला नाही त्यांची कत्तल करावी व ते कत्तल करणं जल्लोषात साजरं करावं. ठीकाय ?

------

‘एक आठवडा’ ही फिगर कुठून आली?

प्रश्न रास्त आहे.

एक आठवड्याच्या ऐवजी दोन आठवडे घ्या. मुद्दा हा शिक्षा गुन्ह्याच्या प्रमाणात असावी हा आहे. काळवीट हे माणूस नाही, मतदानाचा अधिकार नाही, कर भरत नाही. कोंबड्यांची कत्तल होते (व फलस्वरूप आपण चिकन खाऊ शकतो) त्या कत्तल करणाऱ्याला आपण ५ वर्षे शिक्षा देतो का ??? कोंबड्या सुद्धा मानव नाहीत, मतदान करत नाहीत व् टॅक्स भरत नाहीत. कोंबड्या हे उदाहरण आहे तुलना नाही. ( बाय द वे --- कोंबड्यांचा मालक टॅक्स भरतो. अनेकदा. पण तो टॅक्स हा कोंबड्यांची मालकी (व पर्यायाने कत्तल करण्याचा अधिकार) अबाधित राखण्यासाठी.)
.
.
-------

मताच्या मुद्द्यात काहीच दम नाही. हिंमतराव आणि सुभानराव अशा दोन व्यक्ती आहेत. समजा हिंमतराव दर निवडणुकीला सकाळी सातपासून रांगेत उभा राहून मत देतो आणि सुभानरावाने आत्तापर्यंत कधीही मत दिलेलं नाही. असं जरी असलं तरी मी हिंमतरावाचा खून केला काय किंवा सुभानरावाचा खून केला काय, मला (ceteris paribus) शिक्षा तीच होईल. निदान ३०२ वं कलम तसं लिहिलेलं आहे.

कोणी कोणाला मतदान केलं व कोणाला नाही हा प्रश्न नसून कोणाला लोकस स्टँडी आहे - हा आहे.
सद्यस्थितीत कायदा ५ वर्षे सजा देतो हे माहीती आहे मला. व सर्वांना.
माझं म्हणणं हे आहे की हा अतिरेक आहे.
मुद्दा गणिती आहे असा तुम्ही स्वत:चाच समज करून घेतला आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

> पण ज्या काळवीटांच्याकडून व/वा वतीने टॅक्स मिळालेला नाही त्यांची कत्तल करावी व ते कत्तल करणं जल्लोषात साजरं करावं. ठीकाय ?

त्यांची कत्तल करावी इथपर्यंत ठीकाय. जल्लोष हा खाजगी खर्चाने व्हावा अशी अपेक्षा असल्यामुळे त्यावर मत नाही. जल्लोषाला जी काही सामग्री लागेल तिला सरकारी सबसिडी मिळू नये इतपतच म्हणणं आहे.

> मुद्दा हा शिक्षा गुन्ह्याच्या प्रमाणात असावी हा आहे. 

पण हा मुद्दा गणितीच आहे. शिक्षा भागिले गुन्हा हे गुणोत्तर अमुक इतकं असावं, तमुक असेल तर मात्र अतिरेक झाला असं तुमचं म्हणणं आहे. पण अमुक आणि तमुक हे आकडे (त्याबरोबरच्या युनिटस् सहित) कळल्याखेरीज ह्यावर चर्चा पुढे कशी सरकणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

त्यांची कत्तल करावी इथपर्यंत ठीकाय. जल्लोष हा खाजगी खर्चाने व्हावा अशी अपेक्षा असल्यामुळे त्यावर मत नाही. जल्लोषाला जी काही सामग्री लागेल तिला सरकारी सबसिडी मिळू नये इतपतच म्हणणं आहे.

एकदम मान्य.

-----

पण हा मुद्दा गणितीच आहे. शिक्षा भागिले गुन्हा हे गुणोत्तर अमुक इतकं असावं, तमुक असेल तर मात्र अतिरेक झाला असं तुमचं म्हणणं आहे. पण अमुक आणि तमुक हे आकडे (त्याबरोबरच्या युनिटस् सहित) कळल्याखेरीज ह्यावर चर्चा पुढे कशी सरकणार?

चला गणित करूया !!!

(१) एक काळवीट मारल्यामुळे जे नुकसान झाले ते एका बाजूला. (ते कोणाचे झाले हा प्रश्न अध्याहृतच आहे. पण कोणाचेतरी नुकसान झाले). Blackbuck is a resource for the society or even the bishnoi community.

(२) सलमान ५ वर्षे तुरुंगात असल्यामुळे जी काही संपत्ती निर्माण होणार नाही (संपत्ती निर्मीतीची संधी हुकणार) ते नुकसान दुसऱ्या बाजूला ठेवा. आता ही संधी फक्त सलमानसाठी हुकली का ? की इतरांसाठी सुद्धा हुकली ? Salman is a resource for himself as well as all the people who are dependent on his business activity.
.
(३) सलमान मुळे होणारी संपत्तीची निर्मीती demonstrable आहे. त्याने भरलेला कर हा त्या संपत्तीच्या निर्मीतीचे प्रमाण असू शकतो.

(४) आता ते काळवीट मारल्यामुळे झालेल्या नुकसानाचे प्रमाण काय आहे व असावे ? बिश्नोई समाजाने किती टॅक्स भरला काळवीटाच्या रक्षणासाठी त्याचे रिटर्न्स डॉक्युमेंट आहेत ??
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

वरील महत्वाच्या चर्चेत गब्बर सिंग यांनी जो कोंबडीचा तर्क दिला व जयदीप यांनी जो १ आठवडाच का हा प्रश्न उपस्थित केला.
आणि जो एकुण मुद्द्दा आहे त्यावर अत्यंत रेलेव्हंट अत्यंत महत्वाचा छोटासाच Alastair Norcross यांचा हा पेपर इथे आहे जो अत्यंत रोचक असे एथिकल आर्ग्युमेंट करतो हा पेपर उपयुक्ततावादाच्या Scalar Approach ने लिहिलेला आहे. यातील उदाहरण ही अतिशय रोचक आहे.
वरील विषयात रस असलेल्यांनी एकदातरी वाचावाच
https://pdfs.semanticscholar.org/59b3/5dc65c64e39e615a500ebf5a6ec0fd2998...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाव रोटी खायेंगे चायवालेको को....

The blackbucks MUST NOT have so much of a "say".

प्रश्न काळविटांच्या "से"चा (किंवा त्यांच्या हक्कांचाही) नसावा.

रादर, इतरत्र म्हटल्याप्रमाणे, काळविटांची संख्या रोडावत असू शकते, ते नामशेष होण्याच्या मार्गावर असू शकतात, आणि म्हणून त्यांचे संवर्धन व्हावे हे स्टेटच्या इंटरेस्टमध्ये आहे असे स्टेटने फॉर व्हॉटेव्हर रीज़न मानून ती जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन त्यावर प्रतिबंध करणारे कायदे केले असू शकतात.

बोले तो, प्रश्न काळविटांचे संवर्धन हे स्टेटच्या इंटरेस्टमध्ये आहे असे स्टेटने मानण्याचा असू शकतो. (आता, स्टेटने असे मानावे किंवा नाही हा पूर्णपणे वेगळा मुद्दा.)

कोणी कोणाला मतदान केलं व कोणाला नाही हा प्रश्न नसून कोणाला लोकस स्टँडी आहे - हा आहे.

काळविटाचा लोकस स्टॅण्डाय हा येथे मुद्दाच नाही; स्टेटचा लोकस स्टॅण्डाय हा आहे.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रादर, इतरत्र म्हटल्याप्रमाणे, काळविटांची संख्या रोडावत असू शकते, ते नामशेष होण्याच्या मार्गावर असू शकतात, आणि म्हणून त्यांचे संवर्धन व्हावे हे स्टेटच्या इंटरेस्टमध्ये आहे असे स्टेटने फॉर व्हॉटेव्हर रीज़न मानून ती जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन त्यावर प्रतिबंध करणारे कायदे केले असू शकतात.

अगदी.

काळवीटं नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत असे मानूनच कायदा केला गेलेला असावा. व ह्यामागची प्रेरणा पर्यावरणवादी असावेत. म्हणूनच एकदोन आठवडे शिक्षा व्हावी. ५ वर्षे शिक्षा करणे हे कैच्याकै आहे.
.
My point is that Govt has tried to create a locus standi for itself on behalf of blackbucks. And that may still be fine. But 5 years is way too much.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

But 5 years is way too much.

याच्याशी सहमत होऊ शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

इनफॅक्ट आत्तापर्यंत त्याला झालेला त्रास (२० वर्षे टांगती तलवार+ कोर्टाच्या तारखा + वेळोवेळी थोडाफार तुरुंग + अनिश्चितता + वकीलांची फौज बाळगण्याचा प्रचंड खर्च + कामधाम सोडून ऑर्डर आली की चार्टर फ्लाईटने जोधपुर इ प्रवास + पुढचा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा प्रोबेबल विरुद्ध निकाल याची भीती + एकूण सर्व खर्च आणि मनस्ताप ही बेरीज दोन काळविटांना मारल्याची शिक्षा म्हणून पुरेशी आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मधल्या वर्षांत, तारीख पे तारीख पाडली जात असताना, प्रतिमावर्धन करण्यासाठी भाईने जो खर्चा कियेला हय, त्यातून जी रोजगारनिर्मिती वगैरे होयेला हय, वकीलांनाही धंदापाणी दियेला हय, त्याची मोजणी करून उलट काळवीट-चिंकाऱ्यांनीच भाई का पुतळा बनाना मंगताय.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इनफॅक्ट आत्तापर्यंत त्याला झालेला त्रास (२० वर्षे टांगती तलवार+ कोर्टाच्या तारखा + वेळोवेळी थोडाफार तुरुंग + अनिश्चितता + वकीलांची फौज बाळगण्याचा प्रचंड खर्च + कामधाम सोडून ऑर्डर आली की चार्टर फ्लाईटने जोधपुर इ प्रवास + पुढचा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा प्रोबेबल विरुद्ध निकाल याची भीती + एकूण सर्व खर्च आणि मनस्ताप ही बेरीज दोन काळविटांना मारल्याची शिक्षा म्हणून पुरेशी आहे.

एकदम सहमत.

आता त्याला जामीन मिळाला आहे. आणि पुन्हा वाग्युद्ध पेटणार आहे. त्यापेक्षा त्याला दोनतिन आठवडे शिक्षा दिली असती तर (मला वाटतं) त्याने ती भोगली असती व मामला खत्म झाला असता. पाच वर्षे शिक्षा देऊन the jury increased the stake so much that Salman will pay his lawyers to get the dates postponed by another 5 years. He has every incentive to appeal in higher court and keep delaying the case proceedings. भारतीय कोर्टांमधे लक्षावधी केसेस प्रलंबीत आहेत. त्यातल्या अनेक केसेस या बिश्नोई समाजातल्या लोकांच्या सुद्धा असू शकतात. पण काळवीटांना न्याय देणे हे महत्वाचे का आहे याचे उत्तर कोण देणार ???
.

Bishnoi community to challenge Salman Khan's bail in Rajasthan HC

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काळवीटांचे संरक्षण आणि त्यांची हत्या होऊ न देणे हे स्टेट इंटरेस्टमध्ये असेल तर "काळवीटांची भोजनासाठी हत्या करू शकतील असे सर्व प्राणी" त्या जंगलातून नष्ट करणे ही सरकारची जबाबदारी असायला हवी ना?

त्याच जंगलात व्याघ्रप्रकल्प* चालवून सरकारनेच वाघांचे संवर्धन करणे हे त्या स्टेट इंटरेस्टला छेद देणारे नाही का?

*केवळ उदाहरणार्थ आहे. सलमानने शिकार केली त्या जंगलात असा प्रकल्प सुरू आहे का याविषयी माहिती नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"काळविटांचे संरक्षण" असा एन्ड इन इटसेल्फ लिमिटेड कार्यक्रम नसून "निसर्गचक्र संरक्षण" असा ओव्हरऑल कार्यक्रम आहे.

मग मनुष्य हाही निसर्गाचा भाग, वाघ पळून नखांनी दातांनी शिकार करतो, मनुष्य दुरून बंदुकीने करतो.. बाकी सर्व एकच, अशा प्रकारच्या चर्चेला वाव राहतोच. ते न संपणारं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हल्लीचा व्हाटस ॲप वाला समाज इतका असंवेदनशील झाला आहे की, त्याला फक्त काळवीटावरचे शाब्दिक विनोद फॉरवर्ड करण्यापुरताच या प्रकरणांत इंट्रेस्ट उरला आहे. काळवीटांचे वा सलमानचे पुढे काय होईल, यांत त्यांना काडीमात्र स्वारस्य नाही. तसेच या देशांत न्याय हा अतिविलंबानेच मिळतो, (आणि तोही चुकीच्या पक्षाला) याचीही संवय झाली आहे. त्यामुळे या किंवा कुठल्याच प्रकरणी कोणाला वांझ चर्चा करण्यांत मनापासून इंट्रेस्ट असेल, असे वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

शिक्षा किती असावी हे कायद्याच्या पुस्तकात आहे. तो फक्त गुन्हेगार आहे का कोर्टात ठरतं.
अमेरिकन डक्स खूप होती . एकेक करून संपवलीच लोकांनी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परवाच झालेला चेंडू कुरतडणे हा क्रिकेट मधील प्रकार . ज्या खेळाडूंनी तो प्रकार केला ..तो आपण जे करतोय ते चुकीचे आहे हे माहित असून केला. त्यांना निलंबित करताच त्यांनी सार्वजनिकरीत्या आपली चूक मान्य केली ..समाजाची माफी मागितली . त्यांना झालेली शिक्षा कमी होती ..अजून व्हायला हवी होती ,,असे तुम्ही म्हणू शकता पण माझा मुद्दा फक्त इतकाच आहे कि त्यांनी चूक मान्य केली ...त्यांना पश्चाताप झाला .
हिंदुस्तानांत कोणत्याच क्षेत्रात हा प्रकार होताना दिसत नाही .
( अगदी तुरळक अपवाद असू शकतील )

कारण हिंदुस्थानी लोक, हिंदू संस्कृती ही अतिशय प्रामाणिक, अत्यंत रोखठोक संस्कृती आहे म्हणून. बाहेरून एक नि आतून दुसरे असला प्रकार नाही.

उदाहरणादाखल समजा, की मी तुमच्या कानाखाली खाड्कन जाळ काढला. अगदी चारचौघांत, तुमचा अपमान होईल अशा पद्धतीने. आणि मग लगेच (पुन्हा चारचौघांतच) अत्यंत मानभावीपणे पश्चात्ताप व्यक्त केला, दिलगिरी व्यक्त केली नि तुमची माफीसुद्धा मागितली. त्या दिलगिरीला काही अर्थ राहील काय?

असली दिलगिरी तुम्ही स्वीकाराल काय? तिने तुमचे समाधान होईल काय? (का होणार नाही? मी पांढरा माणूस नाही म्हणून?)

उगाच झालेला नसताना खोटाखोटा पश्चात्ताप काय म्हणून व्यक्त करायचा?

आपल्याकडे बहुतेक सर्व आर्थिक घोटाळे करणारे गुन्हेगार ,किवा इतर गुन्ह्यासाठी अटक झालेले गुन्हेगार सुद्धा पोलिस पकडून नेताना ,लोकांच्याकडे हसून पहात हात वर करून फोटो काढून घेतात …

'इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी'चे तत्त्व विसरलात काय? शिवाय, आमच्या पाचव्या घटनादुरुस्तीसमान काहीतरी हिंदुस्थानातसुद्धा अस्तित्वात आहे असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

तस्मात, गुन्हेगार असल्याप्रमाणे तोंड करून, चेहऱ्यावर गिल्ट मिरवत जाण्याचे कोणतेही बंधन त्यांच्यावर नाही. ते जर गुन्हेगार असतील, तर तसे कोर्टात सिद्ध होऊ द्या. ती जबाबदारी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांची आहे; त्यांची नव्हे.

आपली वर्तमानपत्रे ..TV Channels वगैरे सलमानने माफी मागावी ...एखाद्या अभयारण्याचे संवर्धन करावे ( फक्त पैसे देऊन नव्हे !) किवा पशु संग्रहालय दत्तक घ्यावे, काळविटाची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न करावे ….शिकार करणे या प्रवृत्ती विरुद्ध प्रचार करावा….याचा Brand Ambassador व्हावे ,असे सुचवताना दिसत नाहीत ….

जगातली नेमकी कोठली वर्तमानपत्रे, नेमके कोठले टीव्ही चॅनेल्स असे सुचविताना आढळतात? तुमच्या मनाचे खेळ आहेत सगळे!

आणि सलमानने काळविटे मारू नये हे एक वेळ ठीक आहे. परंतु हे बाकीचे सगळे त्याने का, कसे आणि काय म्हणून करावे? मुळात त्याच्या स्किलसेटात ते बसते काय? तुम्हाला समजा एखादे काम करून हवे असेल, तर त्यासाठी माणूस नेमताना तुम्ही त्याकरिता लागणारे स्किलसेट असलेला निवडाल, की (केवळ खुन्नस म्हणून) स्किलसेट नसलेला? त्याने आउटपुटच्या दर्जावर काय परिणाम होईल? (समथिंग टेल्स मी दॅट यू विल नॉट मेक अ गुड एचआर मॅनेजर, ऑर ईव्हन अ गुड हायरिंग मॅनेजर. मी जर समजा उद्या कंपनी काढली - बहुधा काढणार नाही, ते सोडा, कारण ते माझ्या स्किलसेटात बसत नाही, पण समजा काढलीच - तर तुम्हाला मॅनेजर म्हणून निश्चित नेमणार नाही, आणि एचआर मॅनेजर म्हणून तर नाहीच नाही. त्याकरिता आवश्यक तो स्किलसेट तुमच्याजवळ नाही. सॉरी!)

(काळविटांची संख्या वाढावी म्हणून सलमान नक्की काय प्रयत्न करणार? एखाद्या हरिणीबरोबर...? त्याचा उपयोग नाही; त्याकरिता काळवीटच पाहिजे. तेथे तुम्ही, आम्ही किंवा सलमान चालणार नाही. तेथे पाहिजे जातीचे; येरा सलमानाचे ते काम नोहे!)

(आणि मुळात काळविटांचीच संख्या काय म्हणून वाढावी? हरिणींची का नको? हा विचार मुळात सेक्सिस्ट नाही काय? हिंदूंच्या या असल्या सेक्सिस्ट टेण्डन्सींमुळेच गर्भलिंगनिदानासारख्या गोष्टींवर हिंदुस्थानात बंदी आणावी लागली!)

खरे तर या सगळ्यांनी सलमान चुकीचा वागला. त्याला पश्चाताप व्हायला हवा .. त्याला शिक्षा व्हायला हवी आणि त्याने प्रायश्चित्त घ्यायला हवे असा सरळ पावित्रा घ्यायला हवा.

पवित्रा वगैरे घेणारे तुम्ही, आम्ही, वर्तमानपत्रे किंवा टीव्ही चॅनेले कोण? या केसमध्ये तुमचाआमचात्यांचा लोकस स्टॅण्डाय नक्की काय? अन्यथा मत (आणि ढुंगण) प्रत्येकाला एकएक (तरी) असतेच. (हे माझे!)

असे हे सलमानखान या न्याय व्यवस्थेवर काय चेटूक करतो आहे कुणास ठाऊक ? एखाद्या सामान्य माणसा विरुद्ध असा खटला इतकी वर्षे चालला असता ?

ड्यू प्रॉसेस? त्याला जेवढे म्हणून मार्ग उपलब्ध आहेत, त्यांचा तो वापर करणारच. नव्हे केलाच पाहिजे. (परवडत असेल तर.)

सामान्य मनुष्याला वकील चांगले लाभले असते, नि परवडले असते, तर सामान्य माणसानेसुद्धा खटला इतकी वर्षे चालविला असताच. आफ्टर ऑल, वन कॅन ओन्ली गेट द जस्टिस दॅट वन कॅन अफोर्ड.

सामान्य माणसास खटला इतकी वर्षे चालविणे, उपलब्ध त्या सर्व मार्गांचा वापर करणे हे जमत किंवा परवडत नाही, हे सामान्य माणसाचे अपयश आहे, सलमानचा दोष नव्हे.

खालचे कोर्ट नंतर हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट असे सगळे या नाटकात कश्यासाठी सहभागी होतात किवा झालेत ?

मग त्यांना पगार कशासाठी मिळतो? मग खालचे कोर्ट, हायकोर्ट नि सुप्रीम कोर्ट बनवलीयेत कशासाठी? (कायद्याच्या नियुक्त प्रॉसेसमधून जाणे) हे त्यांचे कामच आहे!

पण यांना काळजी कशाची? तर सलमानला वातानुकुलीत नसलेल्या कोठडीत रात्र घालवावी लागेल … त्याचे किती प्रोजेक्ट रखडतील? . Brand Salman चे किती कोटी रुपयांचे नुकसान होईल ??….या आणि अशा अनेक गोष्टींची !

ब्रँड 'न'वी बाजूजवळ नुकसान व्हायला जर कोट्यवधि रुपये असते, तर 'न'वी बाजूंनीसुद्धा याचीच चिंता केली असती. त्यांच्याकडे (किंवा तुमच्याकडे) नाहीत, म्हणून ते (किंवा तुम्ही) करत नाही. आणखी काही नाही.

शिकार केल्याबद्दल या सलमानखानला काही पश्चाताप वगैरे झालेला दिसत नाही ! शिकारींचे प्रमाणही काही या हिंदुस्तानांत कमी झालेले दिसत नाही !

शिकार करणे हा पर से हिंदुस्थानात गुन्हा नाही. (काळविटाची किंवा काही स्पेसिफिक प्रजातींची शिकार करणे हा असू शकेलही, परंतु इन जनरल शिकार करणे हा गुन्हा नाही.)

योग्य काय आणि अयोग्य काय हे न समजण्याची ही कसली अविवेकी मानसिकता ?

मुळात काळविटाची शिकार करणे यात 'अयोग्य' असे नेमके काय आहे? हं, काळविटांची संख्या रोडावत असू शकेलही, ते नामशेष होण्याच्या मार्गावर असतीलही, आणि म्हणून त्यांचे संवर्धन व्हावे हे स्टेटच्या इंटरेस्टमध्ये आहे असे स्टेटने फॉर व्हॉटेव्हर रीज़न मानून ती जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन त्यावर प्रतिबंध करणारे कायदे केले असू शकतीलही. इन विच केस, हे कायद्याचे उल्लंघन असू शकते, म्हणजेच अवैध असू शकते. (आणि तसे कायद्याचे उल्लंघन झाले आहे असे सिद्ध झाल्यास इन ड्यू कोर्स (आणि आफ्टर ड्यू प्रॉसेस) त्याबद्दल कायद्याने प्रस्थापित करण्यात आलेली शिक्षा होईलही.) परंतु यात योग्यायोग्यता, विवेक-अविवेक यांचा संबंध कोठे येतो? आणि तो ओढूनताणून काय म्हणून आणायचा? (कायदे हे समाजाच्या काही तात्कालिक गरजांकरिता - किंवा पर्सीव्ह्ड तात्कालिक गरजांकरिता - केलेले असू शकतात, आणि म्हणून ते तेवढ्याच मर्यादित स्कोपमधून पाहिले जावेत. एखादी गोष्ट कायद्याने प्रतिबंधित आहे, म्हणजे ती पर से आणि नेसेसरिली 'अयोग्य', 'अनैतिक' आणि/किंवा 'अविवेकी' असतेच, असे नव्हे. आणि, आज अवैध ठरलेली एखादी गोष्ट उद्या वैधही ठरू शकते, किंवा व्हाइसे व्हर्सा. त्याचा योग्यायोग्यतेशी, नीतिअनीतीशी किंवा विवेकाशी काही संबंध नसतो, तर समाजाच्या तात्कालिक पर्सेप्शनशी असतो. त्यात विवेक वगैरे उपरोक्त भानगडी ओढून आणणे हेच मुळात अविवेकी आहे.)

इत्यलम्|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही माझ्या लेखावर जे आक्षेप घेतलेत ते ...सलमान ने जे केले ते बरोबरच केले .. मनुष्य वाधातून तो निर्दोष सुटलेलाच आहे ..तेव्हा यात काय येव्हडे ? या भूमिकातून असतील तर सर्व बरोबर आहेत . ती भूमिका बदला ..आक्षेप चुकीचे होतील .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बरभौ,

पर्यावरणाचे रक्षण मुख्यत: मनुष्यप्राण्याच्या पुढच्या पिढ्यांसाठी केले गेले पाहिजे असा एक मतप्रवाह आहे आणि कित्येकजण, कित्येक शासनसंस्था त्यावर विश्वास ठेवतात आणि आपापल्या परीने पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. ह्याउलट हे एक मोठे थोतांड आहे आणि सध्या पृथ्वीवर जिवन्त असलेल्या सर्व मनुष्यांना पर्यावरण ही आपली खाजगी मालमत्ता आहे आणि त्या मालमत्तेचा कसलाहि आणि कसाहि उपभोग घेण्याचा त्या सध्या पृथ्वीवर जिवन्त असलेल्या सर्व मनुष्यांचा अनिर्बंधित अधिकार आहे असे मानणारेहि पुष्कळजण आहेत.

तुम्ही ह्या वादाच्या कोणत्या बाजूवर आहात ह्याचे स्पष्ट - हो अथवा नाही - असे उत्तर तुमच्याकडून मिळेल काय? तुम्ही जर अमर्याद उपभोगवादी असाल - त्याची कारणे काहीहि असोत, जसे की तुम्ही टॅक्स भरता - तर तुमच्याशी पुढची चर्चा म्हणजे वृषभदोहन ठरेल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पर्यावरणाचे रक्षण मुख्यत: मनुष्यप्राण्याच्या पुढच्या पिढ्यांसाठी केले गेले पाहिजे असा एक मतप्रवाह आहे आणि कित्येकजण, कित्येक शासनसंस्था त्यावर विश्वास ठेवतात आणि आपापल्या परीने पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतात.

याचा अर्थ असाकी माझ्या पिढीने माझ्या पुढील पिढ्यांसाठी सुद्धा संवर्धन करावे. ठीकाय.
पण याचा अर्थ असा सुद्धा होतो की मागच्या पिढ्यांनी जे रक्षण केले त्याची फलं माझ्या पिढीला चाखता यायला हवीत. मी याकडे सुद्धा लक्ष वेधत आहे.

----

तुम्ही ह्या वादाच्या कोणत्या बाजूवर आहात ह्याचे स्पष्ट - हो अथवा नाही - असे उत्तर तुमच्याकडून मिळेल काय?

उत्तम व रास्त प्रश्न.

माझं मत हे आहे की प्राणी, पक्षी यांच्याबाबतीत कोंबड्यांचे उदाहरण समोर ठेवावे. जर व्यक्तीला कोंबड्यांपासून लाभ होणार असेल तर व्यक्ती कोंबड्यांचे संवर्धन करेलच. मग कत्तल झाली तरी कोंबड्या नामशेष होण्याची शक्यता अत्यंत कमी होते.

किंवा गाय , म्हैस, शेळी यांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवावीत. यांच्यापासून लाभ होत असेल तर व्यक्ती यांची पैदास, संवर्धन करते. अनेक व्यक्ती करतात व करतीलही.

जाताजाता - पाण्याची कमतरता, वानवा असल्यामुळे (व त्यामुळे लाभ कमी होणार आहे असं दिसल्यामुळे) गेल्या काही वर्षांत बीड व इतर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे (गाय, म्हैस, शेळ्या) सोडून दिले. कसलीही संवेदना न बाळगता. those animals were forced to find out their own way to survive.
.
-----
.

तुम्ही जर अमर्याद उपभोगवादी असाल - त्याची कारणे काहीहि असोत, जसे की तुम्ही टॅक्स भरता - तर तुमच्याशी पुढची चर्चा म्हणजे वृषभदोहन ठरेल.

मी अमर्याद उपभोगवादी नाही. पण ते माझ्यापुरतं.

म्हंजे - उदाहरणार्थ - मी हत्ती, सिंह, साप यांचं मांस खात नाही.

एखादी व्यक्ती अमर्याद उपभोगवादी असेल तर माझी त्यास ना नाही.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे माणूस समोर दिसु द्या. पैली शिकार ह्याचीच करायला पाह्यजे.
शिक्षा काय का हुइना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बर, सांप को हाथोंसे नही ... पैरोंसे कुचला जाता है _______ ठाकुर बलदेव सिंग (चित्रपट शोले).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात कोंबडी, गाय, शेळी वगैरे प्राणी पाळले आणि संवर्धित केले जातात (म्हणजे ते पोल्ट्री एनिमल्स आहेत) याचा अर्थ निसर्गातले सगळे आवश्यक प्राणी पाळले जाऊ शकतात, ते पाळीव स्थितीशी जमवून घेऊन जगतात, पाळीव अवस्थेत प्रजनन करतात.. म्हणजे कोणत्याही प्राण्याची पोल्ट्री करता येते, हे मूळ गृहीतक फारच चुकीचं आहे. तसं असतं तर बरेच प्रॉब्लेम्स सुटले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

का योग्य आणि अयोग्य असल्या खुळचट कल्पना धरून बसणे हेच सध्या अविवेकी झाले आहे ? का आजकाल योग्य आणि अयोग्य फक्त नोटांच्या तराजूत तोलले जात आहे ? चित्र विदारक पण सत्य आहे .

पूर्वी हे नव्हतं. स्वातंत्र्यपूर्व कालात ......

सुरवात !!!
.
-----------
.
जाताजाता : योग्य काय व अयोग्य काय याचा उहापोह शतकानुशतके चालू आहे. उदा. Is Administrative Law Unlawful? - हे एका कायदेपंडिताने लिहिलेले पुस्तक.
.
तपशील खाली देतो आहे.
.
.

Is administrative law unlawful? This provocative question has become all the more significant with the expansion of the modern administrative state. While the federal government traditionally could constrain liberty only through acts of Congress and the courts, the executive branch has increasingly come to control Americans through its own administrative rules and adjudication, thus raising disturbing questions about the effect of this sort of state power on American government and society.

With Is Administrative Law Unlawful?, Philip Hamburger answers this question in the affirmative, offering a revisionist account of administrative law. Rather than accepting it as a novel power necessitated by modern society, he locates its origins in the medieval and early modern English tradition of royal prerogative. Then he traces resistance to administrative law from the Middle Ages to the present. Medieval parliaments periodically tried to confine the Crown to governing through regular law, but the most effective response was the seventeenth-century development of English constitutional law, which concluded that the government could rule only through the law of the land and the courts, not through administrative edicts. Although the US Constitution pursued this conclusion even more vigorously, administrative power reemerged in the Progressive and New Deal Eras. Since then, Hamburger argues, administrative law has returned American government and society to precisely the sort of consolidated or absolute power that the US Constitution―and constitutions in general―were designed to prevent.

With a clear yet many-layered argument that draws on history, law, and legal thought, Is Administrative Law Unlawful? reveals administrative law to be not a benign, natural outgrowth of contemporary government but a pernicious―and profoundly unlawful―return to dangerous pre-constitutional absolutism.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खानचा मुलगा, स्वतः सुपरस्टार असणारा सलमान खान, जवळजवळ २० वर्षं खटला सुरू ठेवूनही, लाचखोर देशातला चिंकारा-काळवीटांच्या शिकारीबद्दलचा बारका कायदा बदलू शकला नाही! एवढे पैसे, प्रसिद्धी, दरारा असूनही तुरुंगवास घडला. काय फडतूस इसम आहे हा सलमान खान! फडतूस माणसाला फक्त पाचच वर्षांची शिक्षा ... चांगली पन्नास वर्षांची शिक्षा करायला पाहिजे. प्रसिद्धी आणि पैशांचा अपमान होऊ देतो हा डबडचंद!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाच वर्षांची शिक्षा जास्त आहे या म्हणण्याच्या पुष्टीसाठी........

सध्याच्या "सर्वात पवित्र प्राण्याच्या हत्येसाठी" राजस्थान या राज्यातील शिक्षा जास्तीत जास्त दोन वर्षे आहे. काळवीटाच्या विष्ठेने हायड्रोजन बॉम्बपासून पण संरक्षण होऊ शकते की काय?

The Rajasthan Bovine Animal (Prohibition of Slaughter and Regulation of Temporary Migration or Export) Act, 1995 governs the slaughter of cattle in the state. Slaughter of all bovine animals (includes cow, calf, heifer, bull or bullocks) is prohibited. Possession, sale and/or transport of beef and beef products is prohibited. The export of bovine animals for slaughter is prohibited. The law requires custody of seized animals to be given to any recognized voluntary animal welfare agency failing which to any Goshala, Gosadan or a suitable person who volunteers to maintain the animal. Government of Rajasthan has also introduced a Bill (Bill No. 16/2015) to ban migration out of State and slaughter of Camels in the State. Refer bill at http://rajassembly.nic.in/BillsPdf/Bill16-2015.pdf
Anyone violating the law can be punished with rigorous imprisonment of not less than 1 year and up to a maximum of 2 years and fine up to ₹10,000. The law places the burden of proof on the accused.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सध्याच्या "सर्वात पवित्र प्राण्याच्या हत्येसाठी" राजस्थान या राज्यातील शिक्षा जास्तीत जास्त दोन वर्षे आहे. काळवीटाच्या विष्ठेने हायड्रोजन बॉम्बपासून पण संरक्षण होऊ शकते की काय?

.
थत्ते चाचा तुम्ही मदिरा पिता काय ओ ?
आणि नॉनव्हेज ? बिर्याणी ?
पार्टीला बोलवायचे होते तुम्हास .... म्हणून विचारले.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेहमी नाही. पण तुमच्यासाठी कायपण !! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जह-नसीब !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थत्ते : तुम्हीसुद्धा ? खाली वाचा आणि भेटा तुम्हाला खरंच प्रश्न पडला असेल तर .
दोन वेगळे कायदे आहेत याची तुम्हालासुद्धा माहिती नाही ? आश्चर्य आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे एक एन्डेजर्ड स्पेसीज नष्ट झाले तर ती एक साखळी असते ना निसर्गाची ती तुटते त्याने एकुण सर्वांचेच माणसांसहीत अल्टीमेटली आर्थिकपेक्षा मोठे नुकसान होते.
म्हणजे यावर काही माहीती डिटेल मिळेल का ?
की अशी साखळी बिखळी काय नसते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाव रोटी खायेंगे चायवालेको को....

काळवीट एन्डेन्जर्ड असेल तर निसर्ग साखळी तुटू नये म्हणून कोणत्याच प्रकारे काळवीटाची हत्या होऊ नये अशी काळजी घ्यावी लागेल. म्हणजेच त्या जंगलातून बिबळे, चित्ते, वाघ सिंह, तरस, कोल्हे, रानटी कुत्रे बाहेर घालवायला हवेत ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाय हो. जो कोणी पळून, हाताने, दातांनी शिकार करतोय त्याला करु द्यावी. ऑपोप मर्यादा पाळली जाते. जीपमधून पाठलाग करुन बसल्या जागेवरुन बार टाकू नये इतपत कंट्रोल केलं तरी बराच बॅलन्स होईल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मारवा यांच्यासाठी खासमखास -
.
अर्थात हा विनोदी मतप्रवाह झाला. पण मारवा, तुम्हाला आवडेल हा. मस्त खुसखुशीत आहे.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हिडियो नक्की बघतो
माझ्याकडे स्वत:चे आर्ग्युमेंट नाही म्हणुन उधारीतले रेडिमेड प्रश्न टाकतो ( वर मी दिलेल्या दुवा निबंधातुन ) तर एक वर्ग म्हणतो
मानवांचे स्थान मॉरल स्टेटस हे इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. मानवांचे हक्क हे इतर प्राण्यांच्या हक्कांच्या तुलनेने अधिक महत्वाचे आहे. (खर म्हणजे प्राण्यांना हक्कच नाहीत वगैरे ) त्यासाठी जो फरक मानव व इतर प्राण्यात दाखवला जातो तो असा.
१-
Similarly, Mary Anne Warren argues that ‘‘the rights of persons are generally stronger than those of sentient beings which are not persons’’. Her main premise to support this conclusion is the following: [T]here is one difference [between human and non-human nature] which has a clear moral relevance: people are at least sometimes capable of being moved to action or inaction by the force of reasoned argument.

Carl Cohen, one of the most vehement modern defenders of what Peter Singer calls ‘speciesism’ states his position as follows: Between species of animate life, however—between (for example) humans on the one hand and cats or rats on the other—the morally relevant differences are enormous, and almost universally appreciated. Humans engage in moral reflection; humans are morally autonomous; humans are members of moral communities, recognizing just claims against their own interest. Human beings do have rights, theirs is a moral status very different from that of cats or rats.

So, the claim is that human interests and/or rights are stronger or more important than those of animals, because humans possess a kind and level of rationality not possessed by animals
या आधारावरुन म्हणजे या वरील आर्ग्युमेंट च्या आधारावरुन जे मानवाचे श्रेष्ठत्व गृहीत धरले जाते व न्याय केला जातो त्याला खालील प्रकारे एक आव्हान दिलेले आहे ते म्हणजे मार्जिनल केसेस चे म्हणजे मानवांमध्ये असे काही मानवप्राणी आहेत की जे "प्राणीसमान" आहेत. (अपवादाने का होइना पण आहेत ) तर त्यांच्याबाबतीत प्राणीसम न्याय केला तर योग्य नव्हे का ? ते खाली अजुन नीट शब्दात असे

One of the most serious challenges to this defense of the traditional view involves a consideration of what philosophers refer to as ‘marginal cases’. Whatever kind and level of rationality is selected as justifying the attribution of superior moral status to humans will either be lacking in some humans or present in some animals. To take one of the most commonly-suggested features, many humans are incapable of engaging in moral reflection. For some, this incapacity is temporary, as is the case with infants, or the temporarily cognitively disabled. Others who once had the capacity may have permanently lost it, as is the case with the severely senile or the irreversibly comatose. Still others never had and never will have the capacity, as is the case with the severely mentally disabled. If we base our claims for the moral superiority of humans over animals on the attribution of such capacities, won’t we have to exclude
many humans? Won’t we then be forced to the claim that there is at least as much moral reason to use cognitively deficient humans in experiments and for food as to use animals? Perhaps we could exclude the only temporarily disabled, on the grounds of potentiality, though that move has its own problems. Nonetheless, the other two categories would be vulnerable to this objection.

म्हणजे अशा मानवांना प्रयोगात वापरण्यास किंवा अशा मानवांना मारुन खाण्यास काय हरकत आहे ?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाव रोटी खायेंगे चायवालेको को....

तात्विक चर्चा छान रंगली आहे . मुळात सलमानने जे केले ते बरोबर केले असेच जर गृहीतक असेल तर मग असेच चालू द्या. त्याच्या घरासमोर जमाव जमा होतो त्याचे स्वागत करायला ,एखादा पराक्रम करून आलो आहे अश्या थाटात सलमान जमावाला अभिवादन करतो ...हा जमाव काय विचार करून इथे जमा झाला आहे ? त्याची विवेकी मानसिकता आहे का ? फक्त अपील करणार म्हणजे तो निरपराधी झाला का ?
माझा समाजाच्या या प्रवृत्ती ला विरोध आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाईक साहेब , साधी आणि स्पष्ट भूमिका घेतलीत. हम आपके साथ है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तात्विक चर्चा छान रंगली आहे . मुळात सलमानने जे केले ते बरोबर केले असेच जर गृहीतक असेल तर मग असेच चालू द्या. त्याच्या घरासमोर जमाव जमा होतो त्याचे स्वागत करायला ,एखादा पराक्रम करून आलो आहे अश्या थाटात सलमान जमावाला अभिवादन करतो ...हा जमाव काय विचार करून इथे जमा झाला आहे ? त्याची विवेकी मानसिकता आहे का ? फक्त अपील करणार म्हणजे तो निरपराधी झाला का ?

तुमचा सात्विक संताप "सिर आखोंपर".

सलमान हा शिकारीच्या प्रकरणात अपराधी आहे हे आधीच सिद्ध झालेले आहे. तो अपराधी आहे याबद्दलचा वाद नाहीच्चे.

आता प्रश्न दोन उरले - (१) शिक्षा कितपत असावी ? , (२) सलमानच्या घरासमोर जमाव जमा झाला - त्याचे स्वागत करण्यासाठी - हे योग्य आहे का ? - हा आहे.

(१) चे उत्तर मी वर दिलेले आहेच.
(२) सलमानच्या घरासमोर जमाव जमा झाला व सलमानचे जल्लोषात स्वागत झाले त्याचे कारण फिल्म (असो वा इतर कोणतीही असो) फ्रॅटर्नीटी ही एक्स्टेंडेड फॅमिलीप्रमाणे असते. त्यांना त्यांच्या फ्रॅटर्नीटी च्या सभासदांच्या भावनांचे समर्थन करायचे असते. व त्यांनी तसेच करणे अपेक्षित आहे. अन्यथा ती फ्रॅटर्नीटी कसली ? सलमान ला मिळालेल्या जामिनाच्या विरोधात - बिश्नोई समाजाचे लोक नाही का एकत्र आले ?? व त्यांनी सलमानच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार व्यक्त केला नाही का ?? ती फ्रॅटर्नीटी नाहीये का ??
.
.
जाताजाता : फिल्म फ्रॅटर्नीटी ने आपल्या विरोधी फ्रॅटर्नीटीच्या (म्हंजे बिश्नोई फ्रॅटर्नीटी च्या) भावना जपाव्यात व मान राखावा ही अपेक्षा अन्याय्य आहे.
.
------
.

माझा समाजाच्या या प्रवृत्ती ला विरोध आहे.

.
काळवीटाच्या केस मधे जो काही वेळ, श्रम, निधी यांचा व्यय झालेला आहे तो अधिक योग्य कारणासाठी वापरला जायला हवा होता. Resources have alternative uses. न्यायव्यवस्था ही एक साधनसंपत्ती आहे. And unfortunately, usage of this resource is not costless. It may be free for the user (complainant). But exchequer has to allocate financial resources for that. It could and should have been used for more deserving causes than this one. न्यायव्यवस्थेत ४ लाख केसेस पेंडिंग असताना ह्या असल्या केसेस वर वेळ, श्रम, निधी यांचा व्यय करणे हे अविवेकीच आहे. त्यापेक्षा सलमानला एक ते तिन आठवडे शिक्षा देऊन केस क्लोज करायला लावणे हे अत्यंत न्याय्य होईल.
.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रा. चिपलकट्टींनी विचारलेला प्रश्न पुन्हा एकदा -

यापेक्षा सलमानला एक ते तिन आठवडे शिक्षा देऊन केस क्लोज करायला लावणे हे अत्यंत न्याय्य होईल.

एक ते तीन आठवडे हे आकडे कुठून उत्पन्न केले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रश्न एकदम रास्त आहे.

मी आधी एक आठवडा म्हणालो होतो. नंतर तीन आठवडे म्हणालो. नंतर एक ते तीन असं म्हणालो. हा माझा fickle mindedness आहे.

प्रश्न - हा आकडा कुठून काढला ?
उत्तर - कुठूनही नाही. ते फक्त माझं मत.
आणखी उत्तर - ते मत रास्त, योग्य का आहे त्याबद्दलची कारणमीमांसा खाली -

(१) न्यायाधीश fickle minded पद्धतीने न्याय करत नाही व करू शकत नाही - व ही मर्यादा न्यायाधीशावर असतेच - हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

(२) न्यायव्यवस्था तीन महत्वाचे रोल अदा करते -
_________(अ) Deterrent,
_________(ब) Restitution,
_________(क) Signaling.

(३) To maintain credibility of the justice system - Justice must be seen to have been done. हे Signaling मधे येतं. तेव्हा शिक्षा अशी द्यावी की शिक्षेतून सुटका करून घेण्याचा यत्न करणे सुद्धा जिकिरीचे व्हावे. म्हणून एक ते तीन आठवडे शिक्षा करावी की जेणेकरून सलमान वैतागून ती शिक्षा कबूल करेल व ॲक्च्युअली भोगेल. ( His next best alternative will be to appeal against it. But that entire appeal process will be so long and expensive for HIM that he will be discouraged from pursuing it)

(४) आधीच २० वर्षे खटला चालल्यामुळे जी न्यायव्यवस्थेची बदनामी झालेली आहे तिच्याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. त्यातून आता ५ वर्षे शिक्षा सुनावल्यामुळे - The stakes have been increased to such an extent that the case might be delayed further. बिश्नोई समाज आता उच्च न्यायालयात जाणार. आणखी केस लांबणार - हे सगळे रोखणे आवश्यक आहे व न्यायव्यवस्थेची क्रेडिबिलीटी राखणे महत्वाचे आहे - असं मला वाटतं.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधीच २० वर्षे खटला चालल्यामुळे जी न्यायव्यवस्थेची बदनामी झालेली आहे तिच्याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे.

किती वर्षं खटला चालवला तर न्यायव्यवस्थेची बदनामी होणार नाही/कमी होईल? या वाक्यामागे काही पुरावे, तर्कटं, विदा, किंवा सांगोवांगीतरी? की बाबा, सलमानचा खटला महिन्याभरात निकालात काढून त्याला तेव्हाच ५ वर्षं तुरुंगात टाकला असता, (झालंच तर त्याच्याबरोबर सैफ, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम यांनाही दोन-चार वर्षं) तुरुंगात टाकलं असतं (आणि कदाचित आपण 'हम साथ साथ है' या भिकारपटापासून वाचलो असतो) तर न्यायव्यवस्थेचा मान राखला गेला असता, वगैरे?

गणिताबाहेरचं -

त्यातून आता ५ वर्षे शिक्षा सुनावल्यामुळे - The stakes have been increased to such an extent that the case might be delayed further.

समजा, (मी तपशील वाचलेले नाहीत) सलमानच्या वकीलांनीच (किंवा वकीलांनीही) तारीख-पे-तारीख चालवलं असेल तर सलमानला अधिक शिक्षा देणं रास्त आहे का? इतर महत्त्वाचे (हे तुमचं मत, माझं नाही) खटले न्यायप्रविष्ट असताना सरळ ५ वर्षं शिक्षा भोगून १५ वर्षांपूर्वीच मोकळा होण्याजागी इतर कज्जेदार लोकांचं नुकसान केलं; आता फिल्लम इंडस्ट्रीचं नुकसान करतोय! त्या हिशोबात, पाच वर्षं फारच कमी झाली. चांगलं पन्नास वर्षं अडकवायला पाहिजे त्याला (- हे माझं मत).

दुसऱ्या बाजूनं, आता जया बच्चन फिल्लम इंडस्ट्रीच्या बाजूनं गळा काढत आहेत, लोकांचं नुकसान होईल वगैरे! सलमानवर खटला सुरू आहे; एवढी प्रसिद्धी आणि पैसा, बॉलिवडूमध्ये दबदबा मिळवूनही हा डबडचंद कायदा बदलू शकत नाहीये - ते गेली १८-२० वर्षं दिसत आहेच; त्याच्यावर चालवला गेलेला हा एकमेव खटला नव्हे; वगैरे सगळं जगजाहीर असूनही त्याच्यावर एवढ्या कोटींचा जुगार खेळणाऱ्या आणि आता अनेकांना बेरोजगार करणाऱ्या, कित्येक कोटींचं नुकसान करवणाऱ्या इंडस्ट्रीतल्या लोकांना काय आणि किती शिक्षा द्यायला हवी? त्याचंही गणित मांडलंत तर उत्तम.

आत्तापर्यंत फक्त चिंकारा-काळवीटांबद्दल बोलत आहात; ती मेली, माणसंही मरोत! माझ्या फार लाडक्या पैशांबद्दलही बोला की!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किती वर्षं खटला चालवला तर न्यायव्यवस्थेची बदनामी होणार नाही/कमी होईल? या वाक्यामागे काही पुरावे, तर्कटं, विदा, किंवा सांगोवांगीतरी? की बाबा, सलमानचा खटला महिन्याभरात निकालात काढून त्याला तेव्हाच ५ वर्षं तुरुंगात टाकला असता, (झालंच तर त्याच्याबरोबर सैफ, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम यांनाही दोन-चार वर्षं) तुरुंगात टाकलं असतं (आणि कदाचित आपण 'हम साथ साथ है' या भिकारपटापासून वाचलो असतो) तर न्यायव्यवस्थेचा मान राखला गेला असता, वगैरे?

म्हणूनच मी म्हणालो होतो की हा गणिताचा मुद्दा नाही. जजमेंट चा आहे.
बेसिस (लोकस स्टँडी, पुरावे) लक्षात घेऊन व जजमेंट वापरून निर्णय घ्यावा लागतो. व हे जजमेंट खटल्याच्या विशिष्ठ परिस्थितीला साजेसे असावे म्हणून न्यायाधीश अस्तित्वात असतो.
.
याबद्दलचं मला माहीती असलेलं बेस्ट विवेचन (तुमच्या भाषेत तर्कट) हायेक च्या Law, legislation and liberty या पुस्तकात आहे. की न्यायाधीश हा "institution of a spontaneous order" असतो. प्रकरण ५. The functions of the judge. बाय द वे हायेक हा न्यायशास्त्रात पदवीधर होता.
.
--
.

समजा, (मी तपशील वाचलेले नाहीत) सलमानच्या वकीलांनीच (किंवा वकीलांनीही) तारीख-पे-तारीख चालवलं असेल तर सलमानला अधिक शिक्षा देणं रास्त आहे का? इतर महत्त्वाचे (हे तुमचं मत, माझं नाही) खटले न्यायप्रविष्ट असताना सरळ ५ वर्षं शिक्षा भोगून १५ वर्षांपूर्वीच मोकळा होण्याजागी इतर कज्जेदार लोकांचं नुकसान केलं; आता फिल्लम इंडस्ट्रीचं नुकसान करतोय! त्या हिशोबात, पाच वर्षं फारच कमी झाली. चांगलं पन्नास वर्षं अडकवायला पाहिजे त्याला (- हे माझं मत).

.
तुमचं मत वाचलं.
.
---------
.

दुसऱ्या बाजूनं, आता जया बच्चन फिल्लम इंडस्ट्रीच्या बाजूनं गळा काढत आहेत, लोकांचं नुकसान होईल वगैरे! सलमानवर खटला सुरू आहे; एवढी प्रसिद्धी आणि पैसा, बॉलिवडूमध्ये दबदबा मिळवूनही हा डबडचंद कायदा बदलू शकत नाहीये - ते गेली १८-२० वर्षं दिसत आहेच; त्याच्यावर चालवला गेलेला हा एकमेव खटला नव्हे; वगैरे सगळं जगजाहीर असूनही त्याच्यावर एवढ्या कोटींचा जुगार खेळणाऱ्या आणि आता अनेकांना बेरोजगार करणाऱ्या, कित्येक कोटींचं नुकसान करवणाऱ्या इंडस्ट्रीतल्या लोकांना काय आणि किती शिक्षा द्यायला हवी? त्याचंही गणित मांडलंत तर उत्तम.

.
आमचा जया बच्चन, सोनम कपूर, अर्जुन रामपाल यांना पाठींबा. सलमानला सुद्धा.
खटला लांबला जावा व आणखी पन्नास वर्षे लांबावा (सलमानच्या वकीलांनी लाबवावा) हे उत्तम.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

> (२) न्यायव्यवस्था तीन महत्वाचे रोल अदा करते -
_________(अ) Deterrent,

> तेव्हा शिक्षा अशी द्यावी की शिक्षेतून सुटका करून घेण्याचा यत्न करणे सुद्धा जिकिरीचे व्हावे.

हा जर तुमचा तर्क असेल तर निष्कर्ष पूर्ण वेगळा निघतो. ‘पाच वर्षे’ शिक्षेतली deterrence value ही प्रत्यक्ष तुरुंगवास ही नसून तो तुरुंगवास टाळण्यासाठी जो प्रचंड वकिली खर्च करावा लागतो ती आहे. समजा आपण ठरवलं की फक्त तीन आठवडे शिक्षा असावी. तर मग तिला deterrence value काहीच उरणार नाही. कुठलाही फडतूस रामकिशोर अवस्थी म्हणेल की मला आयुष्यात एकदा काळवीट मारायचाच आहे - त्या thrill value साठी तीन आठवडे शिक्षा मी भोगायला तयार आहे. In effect, your proposal (three weeks imprisonment) drastically reduces the cost of killing a buck for the criminal. Once you reduce the cost, more people will buy the product (namely the hunted buck).

> आधीच २० वर्षे खटला चालल्यामुळे जी न्यायव्यवस्थेची बदनामी झालेली आहे तिच्याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. 

याबद्दल वादच नाही.

> न्यायव्यवस्थेत ४ लाख केसेस पेंडिंग असताना ह्या असल्या केसेस वर वेळ, श्रम, निधी यांचा व्यय करणे हे अविवेकीच आहे. 

But there is once again the ’deterrence+signalling’ issue. समजा आपण असं ठरवलं की काळवीटांच्या हत्येच्या केसेससाठी न्यायव्यवस्थेने श्रम घ्यायचे नाहीत आणि ट्रॅफिक तिकीट देणारी हवालदार मंडळी असतात त्यांच्या पातळीवर त्या निकालात काढायच्या. पण असं केलं तर सगळी deterrence value खलास होईल. सध्या इतर रामकिशोर अवस्थींना माहिती आहे की मी काळवीट मारला तर ही भलीमोठी जगड्व्याळ भारतीय न्याययंत्रणा हात धुवून माझ्या लागेल, आणि म्हणूनच ते काळवीट मारायला जात नाहीत. Disposing off the case cheaply would in fact send the wrong signal to the criminal.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

हा जर तुमचा तर्क असेल तर निष्कर्ष पूर्ण वेगळा निघतो. ‘पाच वर्षे’ शिक्षेतली deterrence value ही प्रत्यक्ष तुरुंगवास ही नसून तो तुरुंगवास टाळण्यासाठी जो प्रचंड वकिली खर्च करावा लागतो ती आहे. समजा आपण ठरवलं की फक्त तीन आठवडे शिक्षा असावी. तर मग तिला deterrence value काहीच उरणार नाही. कुठलाही फडतूस रामकिशोर अवस्थी म्हणेल की मला आयुष्यात एकदा काळवीट मारायचाच आहे - त्या thrill value साठी तीन आठवडे शिक्षा मी भोगायला तयार आहे. In effect, your proposal (three weeks imprisonment) drastically reduces the cost of killing a buck for the criminal. Once you reduce the cost, more people will buy the product (namely the hunted buck).

डिटरंन्स हा गुन्हेगाराला पुन्हा गुन्हा न करण्यासाठी.
सिग्नलिंग हे गुन्हेगारांना डिटरन्स द्वारे होतेच. पण इतरांना सुद्धा व जास्त असते.
When it comes to deterrence - मुद्दा स्पेसिफिक सलमानचा आहे.
What will deter Salman from doing this again ?
And what will deter him from attempting to go around the deterrence ?

When it comes to signaling - इतरांचा मुद्दा येतो.
what signal needs to be sent to OTHERS also so that OTHERS also do not dare to do this ?
.
.
सलमानच्या केस मधे ३ आठवडे (माझ्या मते) खूप आहेत. That will prevent him from going around and seeking bail and delaying the case. तुरुंगवासात रदबदली चालत नाही. सलमानलाच भोगावा लागेल.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा प्रतिसाद फक्त आणि फक्त थत्ते यांच्या करीत आहे.

पाहिलं साधं आणि सरळ :
१. गाय मारल्यावर शिक्षा दोनच वर्ष का आणि काळवीट मारल्यावर ५ वर्षे का याचे उत्तर :
दोन कायदे वेगळे आहेत . गोवंशहत्याबंदी कायदा वेगळं आणि वाईल्ड लाईफ च्या प्रोटेक्शन चा कायदा वेगळा .
कायदा वेगळा . शिक्षा वेगळी .
अवांतर वाचन : इंडेन्जर्ड प्राणी का मारले जातात याची कारणे वेगळी आणि
गाय आणि डुकरे का मारली जातात याची ( धार्मिक कारणे वगळता हि) कारणे वेगळी. कायदे वेगळे. कारणे वेगळी. शिक्षा वेगळ्या .
अति अवांतर : पशुसंवर्धन या विभागात /व्यवसायात कोंबड्या, शेळ्या मेंढ्या , गाय , म्हैस वगैरे पशु येत असावेत त्यात एनडेन्जर्ड प्राणी का नसतात हे ज्ञान
सहज उपलब्ध आहे.

आता गोहत्या आणि एनडेन्जर्ड प्राणी मारणे याचे कायदे वेगळे का याचे कारण खरं तर शाळकरी आहे . फार गूढ /गहन वगैरे नाहीये.
वादाकरिता वाद चालू असेल तर माझी हरकत नाही पण खरंच इंटरेस्ट असेल तर समजावून सांगू शकतो .भेटल्यास . लिहायला फार अलीकडून सुरुवात करायला लागेल .
२. निसर्ग साखळीतुन " बिबळे, चित्ते, वाघ सिंह, तरस, कोल्हे, रानटी कुत्रे"
साधी माहिती : भारतात चित्ते नाहीत . राजे राजवाडयांनी पूर्वीच नामशेष केलेत .
एशियाटिक सिंह आता फक्त तुमच्या सिंहाच्या गुजराथेत असतात.
आता उत्तर : या उर्वरित प्रिडेटर्स ना घालवून द्यायची जरुरी नसते . कारण हे प्रिडेटर्स हि एनडेन्जर्डच आहेत आणि त्यांची व काळविटांची संख्या नैसर्गिक
पद्धतीने आपोआप बॅलन्स होते. इतरांनी त्यांची काळजी करण्याची गरज नसते . फक्त स्वतः तिथे जाऊन काशी नाही केली तरी पुरेसे आहे.

तुमच्या सारख्या झंटलमन माणसानी हे मुद्दे काढावेत ? फार टॅक्स भरू लागलात का ? ( टॅक्स भरणाऱ्याला सगळं माफ असतं म्हणे म्हणून आपलं विचारलं ? )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिचारा सल्लूभाय. इथे कुणीच त्याला समजून घेत नाही. त्याच्या आत एक संवेदनशील हळवा पुरुष दडला आहे. त्याच्या एक्स-गर्लफ्रेंड्सपासून ते बिश्नोई आणि ऐसीकरांपर्यंत किती लोक त्याला छळतायत, पण खरं तर त्याला तुमच्या सहानुभूतीची गरज आहे. अर्थात, सव्वाशे करोड देशवासियांना जे कळलं आहे ते मराठी ममवला कळत नाही ह्यात विशेष काहीच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अखेर पिच्चर वालाच पिच्चर वाले की संवेदना समजून घेणार ही खात्री होती. तुम्ही , त्याचे पतंग उडवण्यातले पार्टनर आणि स्वामी समर्थ आहेतच त्याची काळजी घ्यायला.
मी आपला थत्ते यांच्या तांत्रिक प्रश्नांची उत्तरे देत होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो सेलिब्रिटी आहे.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शेवटी काय ? All people are born equal but some are more equal than others.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साधा मालक भाडेकरू कायदा किंवा लीव लाइसन कायदा किंवा पार्किंगचा हक्क यावर कित्येक वर्षे खटले चालतात. कायद्याच्या तपासणीतच काही खोट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0