आयुर्वेदः एक सुंदर कवी कल्पना

( प्रो. हरी मोहन झा (1908 – 1984) यांच्या ‘खट्टर काका’ पुस्तकातील आयुर्वेद या मूळ हिंदी लेखाचे स्वैर रूपांतर ऐसी अक्षरेच्या वाचकांसाठी देत आहे. या पुस्तकातील लेख 1950च्या दशकात लिहिलेले असले तरी आजही त्यातील विनोद व आशय आपल्याला अंतर्मुख करणारे आहेत.
'खट्टर काका' हे त्यांचे विनोदी अंगाने लिहिलेले हिंदी भाषेतील पुस्तक भरपूर गाजले. परंतु प्रो. हरीमोहन झा यांना केवळ विनोदी लेखक म्हणून ओळखणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. ते मुळात तत्वज्ञानाचे अभ्यासक होते व संस्कृत, इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. पाटणा विद्यापीठाचे हे मैथिली भाषेचे तज्ञ होते. मैथिली भाषेतील सौंदर्य फुलवून सांगणाऱ्या त्यांच्या पुस्तकांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. )
डिस्क्लेमरः हा लेख कुणाच्याही भावना दुखवण्यासाठी लिहिलेला नसून आयुर्वेदाच्या संबंधातील एक (गंमतीशीर) विचार एवढाच त्यामागचा हेतू आहे याची कृपया नोंद घ्यावी.

मी त्या दिवशी आमच्या शहरातील नामांकित वैद्यांच्या दवाखान्यात वैद्यासमोर बसलो होतो. तितक्यात खट्टर काका डोकावून पाहत आतच आले. वैद्यांच्या हातात आयुर्वेदाचा भावप्रकाश हा ग्रंथ होता. ते पुस्तक बघून
“आहा! काय सुंदर महाकाव्य आहे हा भावप्रकाश!”
वैद्यबुवा आश्चर्यचकित होत “भावप्रकाश हे एक आयुर्वेदाचा प्रमाणित ग्रंथ आहे. आणि तुम्ही त्याला चक्क महाकाव्य म्हणता?”
“मी तर पूर्ण आयुर्वेदालाच महाकाव्य म्हणतो. आयुर्वेदात ताप कशामुळे येतो याबद्दल काय लिहिले आहे ते सांगा बघू.” वैद्यांना आव्हान देत काका म्हणाले.
वैद्यानी भावप्रकाशमधील काही पानं उलटून त्यातील संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगू लागले-
“जेव्हा दक्षप्रजापतीच्या येथे भगवान शंकराचा अपमान झाला तेव्हा शंकर कृद्ध होत श्वास सोडू लागला. त्यातून जो दाह उत्पन्न झाला त्यालाच ताप म्हणतात.”
“वैद्य महाशय, तुम्हीच बघा! जगातील कुठल्याही डॉक्टराच्या डोक्यात अशी कल्पना येऊ शकेल का?”
“परंतु आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात इतर अनेक पदार्थाबद्दल चर्चा केलेली आहे.” – वैद्य
“त्यातही अलंकारिक भाषाच आहे. पारा काय असतो हे सांगा बघू जरा.”
वैद्य पुन्हा एकदा पुस्तकात डोकावून “शंकराच्या जननेंद्रियातून पडलेल्या वीर्याचा पारा झाला.”
“म्हणूनच तो इतका पांढरा शुभ्र! इतका चिवट! व रसराज! मग गंधकाबद्दल काय आहे?”
पुन्हा श्लोकाचा आधार घेत वैद्य सांगू लागले- “एकदा श्वेतद्वीपाच्या येथे खेळत असताना देवीचे स्खलन झाले. तेव्हा तिने दुग्धसागरात स्नान केले. आणि त्या कपड्यातून मळ बाहेर पडला. तोच गंधक आहे.”
“वा! क्या बात है! अगाध बुद्धीशक्ती! यालाच गंधयुक्त! यातूनच पारा शोधण्याची शक्ती! वैद्य महाशय, याप्रकारच्या कल्पना कधीतरी विज्ञानात सापडतील का?”
मी मध्येच म्हणालो- “खट्टर काका, अशा गोष्टी आयुर्वेदामध्ये कसे काय आले?”
“अरे, या देशाच्या जलवायूंच्या कणाकणात रसिकता तुडुंब भरलेली आहे. जेव्हा थोडे तरी विज्ञानाने डोके वर करण्याचा प्रयत्न केला की हे काव्य त्याच्या छातीवर ठाण मांडून बसते. आपल्या देशातील विज्ञानाला कवी कल्पनेने गिळून टाकले आहे. काव्येन गिलितम् शास्त्रम्!
म्हणूनच आयुर्वेदाला काव्याच्या स्वरूपात सादर केलेल्या भावप्रकाश ग्रंथात आणि कवी कल्पनेतील भामिनीविलास यात विशेष फरक मला तरी जाणवत नाही. त्यामुळेच वैद्य मंडळीना कविराज म्हणून संबोधले जात असावे. हा काही साधासुधा कवी नाही, प्रत्यक्ष कविराज”
“वा फारच गंमतीदार किस्सा आहे.”
“तुला माझ्याकडून अशाच गमती-जमतीच्या गोष्टी ऐकायला मिळतील. शंकराला वैद्यनाथ का म्हणतात हे माहित आहे का?”
“नाही, खट्टर काका.” माझे उत्तर.
“शंकराच्या श्वासातून उत्पन्न झालेल्या दाहातून माणसांना ताप येतो व त्यातूनच वैद्य लोकांचे पोट भरते. शंकराच्या वीर्यातून पारा निघाला व त्यापासून वैद्य मकरध्वज बनवतात. शंकराच्या आवडत्या भांगेचे मोदक विकून दाम दुप्पट कमावतात. त्यामुळेच शंकराला वैद्यनाथ न म्हणतील तर आणखी काय म्हणतील?”
“धन्य आहात काका, तुम्ही काय सिद्ध करू शकत नाही?”
“एवढेच नाही तर वैद्य प्रत्यक्ष भगवान शंकरच असतात. शंकराप्रमाणे भस्मप्रेमी! भांग परमप्रिय वस्तू! शंकरचा जसा त्रिशूल तसाच यांचाही उदरशूल, हृदयशूल व मस्तकशूल! शंकरानी भस्मासुराचा संहार केला व हे भस्म्या रोगाचा संहार करतात. त्यानी त्रिपुराचा अंत केला व हे कित्येक ‘पुरां’चे अंत करत आहेत.”
“वैद्य जरा रागारागानेच “वैद्य रक्षणही करतात. आयुर्वेदात एकापेक्षा एक असे चमत्कार करणारी रसायनं आहेत, हे तुम्हाला कदाचित माहित नसावे.”
त्यांच्याकडे दुर्लक्ष करत काका पुढे बोलू लागले. “यांच्या रसायनातील सर्वात श्रेष्ठ रस म्हणजे श्रृंगार रस...!”
मी आश्चर्यचकित झालो – “आयुर्वेदात श्रृंगार रस... ?”
“असच समज. आयुर्वेदाचार्य लोलिम्बराज अंगावरील कढत तापावर काय उपाय सांगतो हे जरा ऐक – सुगंधित फुलांचा हार व चंदन शीतल शरीराच्या पुष्टनितम्बिनीच्या आलिंगनातून ताप उतरतो. चंदन – कापूर यांचा लेप लावून नितम्ब हलवित जात असलेल्या मणिमेखलयुक्त रमणीला वनलतेप्रमाणे बिलगल्यास कुठलाही ताप असो, शांत होणारच. तूच सांग, हे रोगशास्त्र आहे की भोगशास्त्र?”
“वैद्यराज, तुमचे यावर काय म्हणणे आहे?” मी अडखळत विचारलो.
वैद्य थोडेसे घाबरतच “होय हा श्लोक आहे खरे. परंतु केवळ तापावरील उपचारासाठी याचा वापर केला जातो.”
“केवळ तापावरच नव्हे तर सर्दीसाठीचे औषधही तितकेच रसभरित आहे. हे बघ, मांसल मांड्या व स्थूल नितम्ब असलेल्या पूर्ण आकारयुक्त स्तनांचे आलिंगन केल्यास सर्दी पळून जाते! अशा अर्थाचाही श्लोक आहे. अशा प्रकारचा फॉर्म्युला कुठल्या डॉक्टराच्या पुस्तकात मिळू शकेल का? थंडी असली तरी युवती आणि उष्णतेमुळे ताप असला तरी युवतीच! युवती कसली, चहाचा कपच! महाशय, युवती जर औषधीवर्गात मोडत असल्यास इतर औषधाप्रमाणे तिला कपाटात बंद करून का ठेवत नाही?”
वैद्य ततपप करू लागले.
मी काकाना म्हणालो – “काका, ही रसिकता आयुर्वेदात कशी काय आली?”
“मुळात आयुर्वेद हा विलासी राजा-महाराजांसाठीच होता. आणि या राजा-महाराजांचा एकमेव व्यायाम म्हणजे तोंडात बोट घालून नख कुरतडणे! मनाला उत्तेजन देण्यासाठी दरबारात कवीराज व शरीरासाठी वैद्यराज! एक रसाद्वारे व दुसरे रसायनाद्वारे! काव्य आणि आयुर्वेद हे जुळे भाऊ आहेत. एकाच दरबारात वाढलेले! कवी जगन्नाथाचा जो रंग आहे तोच लोलिम्बराजाचा! कालिदासाचा ऋतुसंहार असो की सुश्रुताचा ऋतुचर्या, दोन्ही सारखेच!”
“तुम्ही असे कसे काय म्हणू शकता?” वैद्यांचा प्रश्न.
खट्टर काका भावप्रकाशातील पान उलटून “हे बघा... ही हेमंतचर्या कुणासाठी आहे? ज्याच्या अंतःपुरात केसर – कस्तूरी – कदम्ब – कलित कामिनी गंमती – जंमती करत असतात त्यांच्यासाठी! इतरांसाठी अग्रहण शब्दच सार्थकी लागतो. आयुर्वेद ही राजा-महाराजांची मालमत्ता. म्हणूनच ऋतुचर्याचा अर्थच कुठल्या वेळी संभोग करावा असा होऊ शकतो.”
“कदाचित याचा अर्थ संभोगासाठीचे नियमन व मर्यादा असाव्यात असे होत नाही का?” – वैद्य
“कसल्या मर्यादा आणि कसले नियमन?” काका अजून काही पानं उलटवीत “या मर्यादेबद्दलच आयुर्वेदाचार्यामध्ये भांडण आहे. एक आचार्य म्हणतो की दर तीन दिवसांनी संभोग करावे. दुसऱ्याला हे पटत नाही. तो म्हणतो की थंडीच्या दिवसात कसला हिशोब? जितक्या वेळा मनात येईल तितक्या वेळा गमन करायला हरकत नाही. तिसरा आचार्य याच्याही पुढे जातो – थंडी असो की गरमी, रोज बालिकेशी गमन करावे. चौथा आचार्य तर वेळापत्रकच घालून देतो. थंडीच्या दिवसात रात्री, उन्हाळ्यात दिवसा, वसंतऋतूत रात्री किंवा दिवसा कुठल्याही वेळी, वर्षाऋतूत ढगांच्या गडगडाटाच्या वेळी, शरदऋतूत जेव्हा तीव्रतेने जाणवते तेव्हा! पाचवा आचार्य तर यावर कढी करतो. उन्हाळ्यात व शरदऋतूत बालिकेशी, थंडीत तरुणीशी, वर्षा व वसंतऋतूत प्रौढ असे पथ्या पाळावे. हे म्हणजे पपई केव्हा खावे, सफरचंद केव्हा खावे असे म्हटल्यासारखे वाटते. आता या तिन्ही प्रकारच्या महिलांचा ‘सेट’ दर वर्षी तयार करून ठेवल्यास ऋतुचर्याचे योग्य प्रकारे पालन करता येईल. असे फक्त ज्यांच्या बागेत बदरीफळापासून श्रीफळापर्यंतचा फळ उपलब्ध असतील त्यानाच हे शक्य होईल.”
“काका, मला बालिका, तरूणी व प्रौढा यांच्यात नेमका काय फरक असतो हे समजले नाही.”
“हेसुद्धा याच ग्रंथात लिहिले आहे. सोळा वर्षाची बालिका, बत्तीस वर्षापर्यंत तरुणी आणि पन्नास वर्षापर्यंत प्रौढा असे यांचे म्हणणे आहे. आता तूच मला सांग, ही ऋतुचर्या कुणासाठी आहे? ज्यांच्या रंगभवनात मुग्ध बालिकेपासून प्रौढ स्त्रीपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध असतील त्यांनाच ऋतुबदलानुसार कामज्वराला शांत करता येईल. हे काय चिकित्सा शास्त्र आहे की कामशास्त्र?”
“आयुर्वेदात कामशास्त्रातल्या या गोष्टी कशा काय आल्या?” माझा प्रश्न.
“जेव्हा वृद्ध च्यवनऋषी संभोग करण्यास असमर्थ झाले तेव्हा आदिवैद्य अश्विनीने रसायनाच्या सहायाने त्यांना पुनः तारुण्य प्राप्त करून दिले. ज्या प्रकारे आदिकवी वाल्मिकीला क्रौंचपक्ष्यांची मैथुनेच्छा बघितल्यावर महाकाव्याची प्रेरणा मिळाली, त्याचप्रमाणे आदिवैद्याला वृद्ध मुनीच्या कामेच्छातून आयुर्वेदासाठी प्रेरणा मिळाली. एकाने अनुष्टुभ छंदात रचना केली व दुसऱ्याने च्यवनप्राशाची. त्या काळापासून आयुर्वेदाची वाटचाल याच दृष्टिकोनातून झाला व रतीक्रीडेतील विजयध्वज फडफडू लागला. राजाच्या राज्याचा ध्वजभंग होणार नाही यासाठी राजदरबारात मंत्री-सेनापती आणि राजाचा ‘ध्वज’भंग होऊ नये यासाठी राजवैद्य काळजी घेत होते!"
माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे बघत काका सांगू लागले – “मी काही चेष्टा करत नाही. पूर्वीच्या काळच्या राजा-महाराजांच्या जीवनात फक्त दोन गोष्टींना महत्व – पाचक व मोदक!भोडन शक्तीला उद्युक्त करण्यासाठी क्षुधाग्नी संदीपन! आणि संभोगशक्तीला उद्युक्त करण्यासाठी कामाग्नी संदीपन! हे राजे रात्रंदिवस आडवे पडून या दोन्ही प्रकारचे कुमारिकासव पीत होते. त्यांचे फक्त हेच काम! हीच त्यांची दिनचर्या! कसे सहन करत असतील? बिचारे वैद्यमंडळी रात्रंदिवस या कामोत्तेजक मोदकाच्या संशोधनात कार्यरत असत. एकापेक्षा एक स्तंभनवटी, वानरी गुटिका, कामिनी विद्रावण! यासाठीच सर्वबुद्धी खर्ची घातली जात होती. ”
“अहो वैद्य आपण काही बोलत नाही?” माझा प्रश्न.
काका – “ते काय बोलणार? यांनीसुद्धा तोच कित्ता गिरवला आहे. घोकंपट्टी केली आहे. आता येथे काय लिहिलेले आहे बघ. एका आयुर्वेदाचाऱ्याने अशी खीर बनवली की एखाद्या म्हाताऱ्याने तरी ती घेतली तरी दहा बायकांना लोळवण्याइतकी शक्ती त्याला प्राप्त होईल. दुसऱ्या आचाऱ्याच्या एका चूर्णामुळे नपुंसकालासुद्धा पौरुषत्व मिळाले. मधाबरोबर हे चूर्ण घेतल्यास कामिनीच्या गर्वाचा चूर्ण करून टाकेल. कामिनीच्या गर्वाचा चक्काचूर झाला की नाही हे फक्त कामिनीच सांगू शकेल. मात्र यातून वैद्यांचे भाग्य उजळून निघेल यात शंका नाही. सुंदरींच्या चिरंतन यौवनाची जबाबदारीसुद्धा यांच्याकडेच होती. एका आयुर्वेदाचाऱ्याने त्याची गॅरंटीसहित असा उपाय सुचवला आहे – पहिल्या कुसुम काळात नवयौवनेने तांदळाच्या स्टार्चचा नाकपुडीत नस्य केल्यास तिचे यौवन कधीच ढळणार नाही. दुसऱ्या आचाऱ्याने आणकी जबरदस्त दावा केला आहे – श्रीपर्णीच्या रसात तयार झालेल्या तिळाच्या तेलाने अंग चोळून घेतल्यास पुनः एकदा यौवन प्राप्त होऊ शकते.
या प्रकारे पुरुषांच्या बिंदूपातापासून राणींच्या कुचपातापर्यंत सर्व अधःपतनाना वैद्यराजानी ब्रेक लावला आहे. त्यांचा हा मुष्टियोग कितपत सफल होत होता हे माहित नाही. परंतु त्यांची मुष्टी मात्र (सोन्याच्या) नाण्याने गरम होत होती.”
“आमचे सर्व मुष्टियोग अनुभवातून सिद्ध झालेले आहेत” - इती वैद्य.
“जर तुमचे मुष्टियोग खरोखरच परिणामकारक असतील तर त्यातून तुम्ही करोडो डॉलर्सची विदेशी मुद्रा कमावली असती! परंतु यात ते अपयशी ठरले तर यांचे तोंड कसे दिसले असते?”
वैद्यांना राहवेना. “तुम्ही या ग्रंथातील बारीक सारीक वर्णन वाचून पहा.”
“या ग्रंथातसुद्धा अशाच गोष्टींचा भरणा आहे. अभ्रकाबद्दल येथे काय लिहिलेले आहे ते पहा. अभ्रकाच्या प्रभावामुऴे रोज शंभर स्त्रियांशी समागम करता येईल! जणू काही जास्तीत जास्त स्त्रियांशी संभोग करणे हेच जीवनाचे ध्येय आहे की काय? जी व्यक्ती शंभर वेळा संभोग करत असल्यास त्या व्यक्तीला दुसऱ्या कुठल्या कामासाठी वेळ मिळेल? तो किती दिवस टिकेल? त्यामुळेच पूर्वीच्या काळच्या राजे-महाराजे क्षयरोगाचे बळी ठरत होते. आणि वैद्य मात्र त्या रोगाला राजयोग म्हणत होते. अशा शास्त्राला आयुर्वेद म्हणावे की आयुर्भेद म्हणावे हे तुम्हीच ठरवा.”
“परंतु इतर कित्येक रोगांबद्दल आयुर्वेदात उपचार आहेतच की?” - वैद्य
“आहेत! परंतु त्यातही इतके विचित्र गोष्टी आहेत की उपचाराचा विचका होतो आणि आयुर्वेद निर्वेद होतो.”
“एक उदाहरण द्या बघू” - वैद्य
काका पुस्तकातील पानं उलटत “येथे वंध्यत्वावर उपचार सांगितलेले आहेत. ऋतुस्नान केलेल्या स्त्रीने पुष्य नक्षत्राच्या काळात लक्ष्मणाची मुळ उपटून दुधात उगाळून लेप पिल्यास कुमारिका गर्भवती होईल यात संशय नाही! या आचार्याला संशय नसेल परंतु मला आहे. गर्भ धारणेची शक्ती कशात आहे हा माझा पहिला प्रश्न – लक्ष्मणाच्या झाडाच्या जडीबुटीत की पुष्य नक्षत्रात की कुमारिकेच्य हातात? की या तिन्ही गोष्टींच्या संयोगामुळे? याला वैद्यकी म्हणायचे की जोतिष्य म्हणायचे की मंत्र-तंत्र की या तिन्हीची खिचडी?”
“परंतु काही उपचार असेही आहेत की त्यात कुठल्याही नक्षत्रांचे बंधन नाही.” – वैद्य.
“आहेत की! पळसाचे एक पान दुधातून उगाळून घेतल्यास गर्भिणीला नक्कीच मुलगा होईल. साधारण मुलगा नव्हे, अत्यंत शूर - वीर! अहो महाशय, पुत्रप्राप्तीचा एवढा सोपा उपाय असल्यास गावभर गवंडी पिटवून भारतवर्षाची जगाला दिलेली अमूल्य देणगी म्हणून प्रचार का करत नाही? त्यामुळे जगभरात आपल्या भारतवर्षाचे नाव होईल! जर हे खोटे असल्यास आताच या ग्रंथामधून त्याची हकालपट्टी करा. अशा प्रकारे खोटे नाटे लिहिलेला आयुर्वेद असल्यास त्याला शास्त्र असे कसे म्हणता?” काकांचा सवाल.
वैद्य काही बोलत नव्हते.
काकाच पुढे बोलू लागले. “दुसऱ्या देशात रोगोपचाराची प्रगती वैज्ञानिकरित्या झाली आहे. परंतु या देशात बाबा वाक्यं प्रमाणम् याची चलती आहे. त्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्र ज्या उंचीला पोचली आहे तेथे आयुर्वेद अजूनही कुठल्यातरी रस – काढ्यात बुडवून घेत आहे. आधुनिक शल्य विशारद कृत्रिम अवयवारोपण करून रोग दूर करत आहेत तेथे वैद्य मंडळी धन्वंतरीची गर्जना करत आहेत. नाकाचा फाटलेला भाग जेथे जोडता येत नाही तिथे कुठला रोगोपचार मिळू शकेल? त्यामुळेच रजःपरिवर्तिनीपर्यंतच या आयुर्वेदाची उडी आहे. आणि तेथून ते पुढे सरकतच नाही.”
“आयुर्वेदातील आचार्य नवीन संशोधन का करत नाहीत?” माझा प्रश्न.
काका हसत म्हणाले – “गधा नावाचा हा रोग आहे. त्यावर रोगोपचार करणारे या पदाला सार्थक करत आहेत. फक्त प्रखर स्वरूपात या शास्त्राचे ओझे वाहणे एवढेच त्यांना माहित आहे. उदरभरणासाठी काही खोटे नाटे कशाय, आसव, काढे इत्यंदींची नावं पुढे करतात. अरिष्ट या नावाने आपल्यावरील ‘अरिष्टा’ला दूर करतात.”
वैद्यांचा उतरलेला चेहरा पाहून काका म्हणाले – “वैद्यजी, मी आपल्याला दोष देत नाही. ज्या विहिरीत खारे पाणी आहे हे माहित असूनसुद्धा फक्त बापानी खोदलेली ती विहिर आहे म्हणत तेच पाणी पिणाऱ्यांसाठी मी हे सर्व सांगत आहे.”
“काका, तुम्ही विनाकारण वैद्यांच्यावर तुटून पडत आहात. बिचाऱ्यांना राजाश्रय नसल्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. ते तरी काय करतील?”
काका हसतच म्हणाले – “एकदा राजाश्रय मिळाला होता. म्हणून हजार वर्षे मदनानमद मोदक करत बसले. आता पुन्हा एकदा राजाश्रय मिळाल्यास गर्भ-कुठार-रस कुटत बसतील!”
इतक्यात काकांचे लक्ष तेथील पाचकाच्या बाटलीवर गेले.
“काहीही असो, वैद्य लोक पाचक मात्र छानपैकी बनवू शकतात. लवणभास्कर! हिंगाष्टक! दाडिमाष्टक! एकापेक्षा एक रुचकर! असल्या स्वादिष्ट गोष्टी डाक्टरांच्याकडे कधी मिळतील का? खारट-गोड पाचक चूर्ण खाऊन पाणी पिल्यानंतर मजा येते. आणखी कुठल्याही औषधाची गरज भासत नाही. वैद्यराजाची ही जडीबूटी जवळ असल्यास वैद्यांच्या खुशामतीला तोटा नाही!”
काकानी शेवटी वैद्याला विनयपूर्वकपणे “वाईट वाटून घेऊ नका. मी माझ्या मनातला भावप्रकाश तुमच्यासमोर उघडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आता तुमचा भावप्रकाश उघडा करा. मी निघतो!”

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

यात विनोद कुठय? आयुर्वेदात आहेच हे सर्व.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणूनच आयुर्वेदाला उपचार पद्धती न म्हणता आचारपद्धती म्हटले आहे. Lol

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

--- पण आयुर्वेद इतकही काही टाकाउ नाहीये.
हे खरय की त्वरीत गुण देणारी औषधे कमी आहेत. निकडीच्या गरजेच्या परिस्थितीत अधुनिक उपचार पद्धतीला शरण जावेच लागते.

परंतु निष्ठेने जास्त काळ आयुर्वेदीक औषधे घेतल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
रूक जाना नहीं - तू कही हारके |
काटोंपे चलके मिलेंगे साये बहारके ||

अधुनिक उपचार पद्धतीला शरण जाऊन -
नंतर
निष्ठेने आयुर्वेदीक औषधे घेतल्यास त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयुर्वेदः एक सुंदर कवी कल्पना

तिसरा आचार्य याच्याही पुढे जातो – थंडी असो की गरमी, रोज बालिकेशी गमन करावे.

हा तर सरळसरळ पेडोफिलियाचा पुरस्कार आहे.

नाही, बोले तो, ही कविकल्पना असेलही कदाचित (कशी ते मला माहीत नाही, परंतु तरीही), परंतु यात सुंदर नक्की काय आहे?

(च्यायला, हे म्हणजे, एकीकडे मुहम्मदाने (पत्याशांदे) नऊ वर्षाच्या मुलीबरोबर संबंध ठेवला म्हणून तो कसा विकृत, म्हणून गळा काढायचा (कारण तो मुसलमान!), आणि दुसरीकडे या आपल्या 'हिंदू हेरिटेज'ला बाकी काही नाही, तरी गेला बाजार 'एक सुंदर कविकल्पना म्हणून डोक्यावर घ्यायचे!)

भंपकपणा आहे सगळा!

(पाकिस्तान झिंदाबाद!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणखी एक बाजू जर बालकाने बालिकेशी गमन केलं तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आणि कल्पना सुंदरच असतात असं म्हणायचय खट्टरकाकांना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयुर्वेदाची मात्र फक्त स्ट्रेट पुरुष आणि लेस्बियनांवरच चालेल, असं कबूलही नाही करत, हे लोक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जर तुमचे मुष्टियोग खरोखरच परिणामकारक असतील तर त्यातून तुम्ही करोडो डॉलर्सची विदेशी मुद्रा कमावली असती! परंतु यात ते अपयशी ठरले तर यांचे तोंड कसे दिसले असते?”

असं काही नाही आपला पतंजली वाला बाबा नाही का पैसे कमवत? डॉलर पण कमावतो. भविष्यात तोपण वर उल्लेखलेल्या भारी भारी वटी विकेल(सध्या उपलब्ध आहेत कि नाहीत याची चोवकाशी केली नाही)

उन्हाळ्यात व शरदऋतूत बालिकेशी, थंडीत तरुणीशी, वर्षा व वसंतऋतूत प्रौढ असे पथ्या पाळावे.

बहुतांशी तेव्हा भरपूर पोरी उपलब्ध असाव्या आणि त्या पुस्तकात स्त्री भ्रूण हत्या विषयी पाठ नसावा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॅ हॅ हॅ

हाच प्रॉब्लेम आहे तथाकथित विद्वानांचा !
आयुर्वेदाचा फायदा करुन घ्यायचा पण विनोदाच्या नावाखाला टिका करायची...
न्युटन गॅलिलिओ पास्कल आपल्याकाळाच्या परिघात असलेली माणसे म्हणून त्यांचे दोष सोडून द्यायचे
पण दोन हजार वर्षापुर्वीचे हिंदू मात्र २१व्या शतकाच्या मापाने तोलायचे

चालु द्या... खाल्या ताटात.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

अभयारिष्ट एक चमचा दिवसांत तीनदा, मृत्युभय करी दूर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोल. हे सगळं आयुर्वेदात आहे हे माहित नव्हतं.

अवांतर १ - लहानपणी सतत होणारी माझी सर्दी मात्र आयुर्वेदिक औषधांनी थांबली होती.

अवांतर २ - काका, तुम्ही तुमचे इतर वैचारिक लेख लोकसत्ते मध्ये का नाही पाठवत? अजून जास्त ऑडियन्स मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0