Dead Man's Hand - १० (अंतिम)

सिनीयर इन्स्पे. रोहित प्रधान आ SS वासून समोर बसलेल्या रोशनीकडे पाहत होता.
सब् इन्स्पे कदम आणि हेड कॉन्स्टेबल नाईकांचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती.

या संपूर्ण केसला अशी काही कलाटणी मिळेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

हे लॉकेट स्वप्नाचं आहे याचा अर्थ....
सापुतारा पोलीसांना वर्षभरापूर्वी सापडलेला तो स्केलेटन स्वप्नाचा आहे? माय गॉड!
दोन महिन्यांपासून ज्या मुलीला पकडण्यासाठी आपण अखंड धावपळ करत होतो, तिचा वर्षाभरापूर्वीच खून झाला होता?

.... आणि अचानक विजेसारखा तो प्रश्नं सर्वांच्या मनात चमकून गेला.

स्वप्ना जर वर्षभरापूर्वीच मरण पावली होती, तर किरण आणि इतर चौघांची हत्या कोणी केली?

"आर यू शुअर रोशनी?" रोहितने पुन्हा खात्री करुन घेण्यासाठी विचारलं, "हे लॉकेट स्वप्नाचं आहे?"

"येस सर!" रोशनी लॉकेटवर नजर रोखत ठामपणे म्हणाली, "मी आणि कॅरोलने अनेकदा हे तिच्या गळ्यात पाहिलं आहे! स्पेशली एखादी इव्हेंट कव्हर करताना आणि फिल्डमध्ये असताना ती हे नेहमी घालते सर! आय अ‍ॅम हंड्रेड पर्सेंट शुअर हे स्वप्नाचंच लॉकेट आहे!"

त्याच क्षणी आपण हे लॉकेट कुठे पाहिलं होतं हे त्याला आठवलं!
स्वप्नाचं फेसबुक प्रोफाईल तपासताना एका फोटोत हे लॉकेट तिच्या गळ्यात असलेलं त्याला आढळलं होतं!

रोहित इतका हादरला होता की काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं. रोशनीबरोबर असलेल्या फर्नांडीसांकडे लक्षं जाताच मात्रं त्याने झटक्यात स्वत:ला सावरलं. या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होईपर्यंत मिडीयाला कोणतीही माहिती न देण्याची कमिशनर मेहेंदळेंनी सर्वांना ताकीद दिलेली होती. या प्रकरणात काही काळंबेरं आहे असा फर्नांडीसना नुसता वास लागला असता तरी त्यांनी त्यांच्या चॅनलवरुन पोलीसांविरुद्ध रान उठवलं असतं यात शंका नव्हती!

"थँक्स अ लॉट रोशनी!" आवाजावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवत तो म्हणाला, "यू हॅव फिट इन अ ग्रेट पीस ऑफ द पझल! वन लास्ट क्वेश्चन, तुझी कलिग आणि टीम मेंबर कॅरोल, ती आली नाही तुझ्याबरोबर? मि. फर्नांडीस?"

"कॅरोलने दोन महिन्यांपूर्वीच पर्सनल रिझन्ससाठी जॉब सोडला सर!" ती म्हणाली.

"पर्सनल रिझन्स?" तो क्षणभर विचारात पडला, "व्हॉट पर्सनल रिझन्स?"

"आय डोन्ट नो सर! कॅरोल माझी कलीग असली तरी तिच्या पर्सनल लाईफबद्दल ती खूप सेन्सिटीव्ह होती. शी वॉज इन रिलेशनशीप विथ समवन अ‍ॅन्ड देअर वेअर सम प्रॉब्लेम्स इन दॅट, बट नेव्हर रिव्हील्ड अ लॉट अबाऊट इट! काल रात्रीच्या फ्लाईटने ती सिडनीला गेली! शी इज गोईंग टू सेटल देअर इन ऑस्ट्रेलिया!"

तो क्षणभर अविश्वासने तिच्याकडे पाहत राहिला.
मुंबई - सिंगापूर फ्लाईटच्या पॅसेंजर्स लिस्टमध्ये नुकतंच वाचलेलं ते नाव त्याच्या डोळ्यांसमोर गरगर फिरुन गेलं....
कॅरोलीन डि'कोस्टा
त्या वेळेस ते नाव त्याला फारसं महत्वाचं वाटलं नव्हतं, पण आता....

त्याने कदमना खूण केली तसे रोशनी आणि फर्नांडीस दोघांसह ते केबिनमधून बाहेर निघून गेले. त्याने पुन्हा पॅसेंजर्स लिस्ट काढून पाहिली. कॅरोलचं नाव वाचताना ती आपल्याला वाकुल्या दाखवून हसते आहे असा त्याला क्षणभर भास झाला.

कॅरोलने दोन महिन्यांपूर्वी जॉब सोडला होता....
..... आणि दोन महिन्यांपासूनच हे हत्यासत्रं सुरु झालं होतं!

तिनेच या पाचजणांची हत्या केली होती?
कदाचित.... स्वप्ना आणि प्रियाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी?
का त्यामागे आणखीनही काही वेगळं कारण होतं?
कदाचित कॅरोलही सेक्स रॅकेटमध्ये फसली तर नसेल?
ती ज्या माणसाबरोबर रिलेशनशीपमध्ये होती त्याचा तर या सगळ्याशी काही संबंध नसेल?

तो विचारात हरवलेला असतानाच कदम आत आले. ते अद्यापही शॉकमध्ये होते. त्यांच्या हातात एक पॅकेट होतं.

"सर, कुरीयरने हे पॅकेट आलं होतं!

ती सीडी कॅरोलने पाठवली असली तर हे पॅकेटही तिच्याकडूनच आलेलं असणार... आणखीन एखादी सीडी?

कदमना समोरच्या खुर्चीत बसण्याची खूण करत त्याने घाईघाईने ते पॅकेट उघडलं. सीडी नव्हती, पण आतमध्ये असलेल्या एन्व्हलपमध्ये टाईप केलेलं सुमारे पंधरा-वीस पानी पत्रं होतं! त्याने शांतपणे ते पत्रं वाचण्यास सुरवात केली,

"मि. प्रधान, तुम्हाला हे पत्रं मिळण्यापूर्वी मी हा देश सोडून निघून गेलेली असेन...."

******

एअरपोर्ट सिक्युरीटीचे सर्व सोपस्कार पार पडून ती फूड कोर्टमध्ये पोहोचली तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते. सँडविच आणि गरमागरम कॉफी घेतल्यावर तिला जरा बरं वाटलं. बोर्डींग करुन आपल्या सीटवर व्यवस्थित सेटल झाल्यावर तिने जीन्सच्या खिशातला फोन काढून एक नंबर डायल केला. बराच वेळ रिंग वाजल्यावरही कोणी फोन उचलला नाही. पाच मिनिटांनी पुन्हा तिने त्याच नंबरला कॉल लावला आणि यावेळेस मात्रं लगेच फोन उचलला गेला.

"मी बोलते आहे..... हो, एअरपोर्टवरुनच.... एकदा तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून इतक्या रात्री फोन केला ... आय वाँट टू थँक यू अगेन! तुम्ही मदत केली नसती तर हे सगळं शक्यंच झालं नसतं! तुम्हाला पर्सनली भेटायची इच्छा होती, बट दॅट वॉज नॉट टू बी! आपण भेटलो, आणि ते जर तिसर्‍या कोणाला कळलं तर त्यातून आणखीन कॉम्प्लीकेशन्स निर्माण झाले असते आणि कदाचित त्याचा तुम्हालाही त्रास झाला असता.... आय अ‍ॅम सॉरी!"

"डोन्ट वरी! काळजी घे स्वत:ची! गुडलक अ‍ॅन्ड गुडबाय!"

एव्हाना फ्लाईट गेटवरुन रनवेच्या दिशेने निघाली होती.

All electronic devices should either be turned off or put in an airplane mode!

एअरहोस्टेसने अनाऊन्समेंट केल्यावर तिने आपल्याजवळचा दुसरा फोन काढला. भराभर एक मेसेज टाईप करुन तिने तो 'सेंड' केला, आणि 'मेसेज डिलीव्हर्ड' असं नोटीफिकेशन स्क्रीनवर दिसताच फोन स्विच ऑफ केला. आपण पाठवलेल्या मेसेजच्या होणार्‍या परिणामांच्या कल्पनेने तिच्या चेहर्‍यावर एक खोडकर स्मितरेषा चमकून गेली.

दोन मिनिटांतच फ्लाईटने रनवे सोडून आकाशात झेप घेतली....

फोन खिशात टाकून तिने विमानाच्या खिडकीतून बाहेर नजर टाकली. रात्रीच्या अंधारात मुंबई शहर वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघालं होतं. काही क्षणांतच ते दिवे खूप खाली राहीले. शांतपणे डोकं मागे टेकत तिने डोळे मिटले. आता कोणतीच काळजी करण्याचं कारण उरलेलं नव्हतं. कोणाचेही हात तिच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते!

******

मि. प्रधान, तुम्हाला हे पत्रं मिळण्यापूर्वी मी हा देश सोडून निघून गेलेली असेन. पुन्हा परतून कधी भारतात येईन की नाही, आणि आले तरी आपली गाठ पडेल की नाही, हे मला माहीत नाही. पण जाण्यापूर्वी काही गोष्टी क्लीअर करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आय अ‍ॅम शुअर, गेल्या दोन महिन्यांत जे काही झालं, ते मी नेमकं कसं घडवून आणलं आणि मोअर इम्पॉर्टंटली त्यामागचं कारण काय हे जाणून घेण्यात तुम्हाला नक्कीच इंट्रेस्ट असेल. बट बिफोर आय गेट स्टार्टेड, आय मस्ट से, आय अ‍ॅम एक्स्ट्रीमली हॅपी अ‍ॅन्ड सॅटीस्फाईड विथ व्हॉट आय हॅव डन! त्या पाचजणांचं जे काही झालं, त्यांना ज्या पद्धतीने मृत्यू आला दे डिड नॉट डिझर्व्ह एनीथिंग लेस दॅन दॅट!

किरण, रिझवान, उदय, कौशल आणि धीरज.... तसं बघितलं तर रिझवान, कौशल आणि धीरज हे स्वत:चा बिझनेस असलेले, उदय आय टी इंजिनियर आणि किरण एक अपकमिंग पॉलिटीशीयन... वरवर पाहता सोसायटीत प्रतिष्ठीत म्हणून मिरवणारे आणि व्हाईट कॉलर लोक! एमएलए चव्हाणांच्या पेड मिडीयाने चार - पाच दिवस त्या किरणचं गुणगान त्याच्या सगळ्या भानगडी लपवून व्यवस्थित गायलेलं तुम्ही पाहिलं असेलच. थोड्याफार फरकाने इतरांच्या बाबतीतही तोच प्रकार.... अगदी तो रिझवानसुद्धा! तो तर सरळ - सरळ गुंड, पण त्या किरणचा खास माणूस... समर्थाघरचे श्वान!

पण प्रतिष्ठेच्या या बुरख्याआड दडलेला त्यांचा खरा चेहरा हा अतिशय विकृत आणि काळाकुट्टं असा आहे! सैतानी लालसा आणि विकृत मनोवृत्तीच्या या लोकांनी आजवर किती मुलींना फसवलं, त्यांच्यावर शारिरीक आणि मानसिक अत्याचार केले आणि त्यांना आयुष्यातून उठवलं याची कल्पनाही करणं अशक्यं आहे! सोशल नेटवर्कींग किंवा इतर कोणत्याही मार्गाने मुलींशी ओळख करुन घ्यायची, सुरवातीला मैत्री आणि नंतर प्रेमाचं नाटक करुन त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचं आणि एखाद्या बेसावध क्षणी भावनेच्या भरात त्या मुलीचा गैरफायदा घेत आपली वासना शमवायची! त्यांच्यादृष्टीने कोणतीही स्त्री म्हणजे फक्तं भोगण्यासाठी असलेलं आणि आपली विकृत इच्छा पूर्ण करण्यासाठी असलेलं एक शरीर! पण इतक्यावरच समाधान मानतील तर हे नराधम कसले? त्यांच्या कचाट्यात सापडलेल्या त्या दुर्दैवी मुलीचे नको त्या अवस्थेत फोटो आणि व्हिडीओ काढायचे आणि त्याच्या जोरावर तिला ब्लॅकमेल करुन पुन्हापुन्हा तिचे वाटेल तसे लचके तोडून चघळायचे. आपली भूक भागली किंवा तिचा कंटाळा आला की स्वत:प्रमाणेच प्रतिष्ठेच्या बुरख्याआड वावरणार्‍या सो कॉल्ड हाय प्रोफाईल पण प्रत्यक्षात वासानेने चटावलेल्या लांडग्यांसमोर तिला फेकून तिच्या जीवावर पैसे कमवायचे! फकींग बास्टर्ड्स!

त्या कौशलची इव्हेंट मॅनेजमेंट आणि एस्कॉर्ट एजन्सी हा फक्तं दिखावा होता. प्रत्यक्षात त्या एजन्सीच्या पडद्याआड या लोकांचे हेच धंदे सुरु होते. अ हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट! या चक्रात अडकलेल्या मुलींपैकी कोणी आत्महत्या केली, कोणाला वेड लागलं, कोणी आपल्या नशिबाला दोष देत आयुष्यभर वेदना भोगत राहीलं तरी या सैतानांना काही फरक पडत नव्हता. एखाद्या मुलीने यातून बाहेर पडण्याचा किंवा तक्रार करण्याचा प्रयत्नं केला तर यांच्याकडे असलेले तिचे फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्धं करण्याची धमकी देणं, मारहाण करणं आणि एवढं करुनही ती बधली नाही तर कॉलगर्ल म्हणून तिची बदनामी करणं आणि प्रसंगी तिचा जीव घेणं.... पैशाने सहज विकला जाणारा कायदा आणि किरणच्या बापाचा राजकीय वरदहस्तं यामुळे त्यांच्यापर्यंत कधीच कोणाचे हात पोहोचले नाहीत!

या सगळ्यामागचा ब्रेन होता तो म्हणजे उदय इनामदार! त्यांच्या जवळपास सगळ्या उद्योगांचे प्लॅन्स त्याचेच असत. ही वॉज सच अ श्रूड कॅरेक्टर, की प्रत्येक गोष्ट सिस्टीमॅटीकली प्लॅन करुनही, किरणच्या पैशाच्या जोरावर चालणार्‍या एकाही बिझनेसमध्ये त्याचं स्वत:चं कुठेही नाव नव्हतं! त्याच्यावर कोणतीही लिगल रिस्पॉन्सिबिलीटी येत नव्हती! फॉर दॅट मॅटर, कौशलची इव्हेंट मॅनेजमेंट आणि एस्कॉर्ट एजन्सी किंवा धीरजची इन्स्टीट्यूट आणि प्लेसमेंट एजन्सी किरणच्या फायनान्शियल बॅकींगवर उभी राहिली असली, तरी प्रत्यक्षात किरणचा त्यात काही संबंध येणार नाही याची उदयने खबरदारी घेतली होती!

सेक्स रॅकेटमध्ये खेचण्यासाठी त्यांनी टार्गेट केलेली एक मुलगी होती सुनेहा!

सुनेहाला जाळ्यात फसवण्यासाठी त्यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीचा वापर केला. फेसबुकच्या माध्यमातून तिला भेटलेला समीर हा दुसरा-तिसरा कोणी नसून कौशल होता. बरेच दिवस चॅटींग करुन तिच्याशी मैत्री वाढवल्यावर अखेर दोघं प्रत्यक्षं भेटले. आपण सॉफ्टवेअर इंजिनिअर आहोत आणि पुण्याला राहतो आणि मुद्दाम तिला भेटण्यासाठी मुंबईला आल्याची त्याने तिला थाप मारली. त्यानंतर ते दोघं वारंवार भेटत राहीले. एकत्रं मूव्हीला, लंचला जात राहिले. अत्यंत सभ्यपणाचं नाटक करणार्‍या कौशलमध्ये सुनेहा हळूहळू गुंतत चालली होती. तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला होता. त्याने तिला प्रपोज करताच क्षणाचाही विचार न करता तिने होकार दिला!

सुनेहा आपल्या मैत्रिणींबरोबर गोव्याला गेल्यावर दुसर्‍या दिवशी संध्याकाळी कौशलने तिला फोन करुन अर्जंटली भेटायला बोलावलं. हा आपल्या जीवन-मरणाचा प्रश्नं आहे आणि फोनवर जास्तं काही सांगता येणार नाही असंही त्याने तिला सांगितलं होतं. सुनेहा त्याच्या या इमोशनल ड्रामाला फसली आणि कोणालाही काही न सांगता आणि आपल्या घरी देखील न कळवता दुसर्‍या दिवशी संध्याकाळी तिने मुंबई गाठली. दोघांची भेट झाल्यावर रात्री डिनर घेताना सुनेहाच्या नकळत त्याने ड्रग्ज घातलेलं कोल्ड्रींक तिला पाजलं. शी वॉज ट्रॅप्ड! डगचा इफेक्ट होताच सुनेहा जवळपास अनकॉन्शस झाली आणि कौशलने तिला कर्जतला किरणच्या फार्महाऊसवर आणलं. फार्महाऊसच्या आपल्या केअरटेकरला किरणने दोन दिवसांची सुट्टी दिलेली होती. इतर सर्वजण तिथे वाटच पाहत होते. बेशुद्धावस्थेत असलेल्या सुनेहाचा त्यांनी पुरेपूर उपभोग घेतला आणि तिचे फोटो आणि व्हिडीओही काढले.

त्या ड्रगचा इफेक्ट संपल्यावर शुद्धीवर आलेल्या सुनेहाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करणं अशक्यं आहे. स्वत:चे नको त्या अवस्थेत तसे फोटो आणि व्हिडीओ तिला पाहून तर तिला जीव द्यावासा वाटला असणार! कौशल आणि इतरांच्या दृष्टीने मात्रं सुनेहा म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती. त्या फोटो आणि व्हिडीओच्या जोरावर तिला ब्लॅकमेल करण्यास त्यांनी सुरवात केली. आपण बोलावू त्या वेळेस आणि त्या जागी तिला यावं लागेल आणि तसं न केल्यास इंटरनेटवर सोशल मिडीयामध्ये तिचं नाव, पत्ता आणि फोन नंबर यासह ते फोटो आणि व्हिडीओ अपलोड करण्यात येतील असं तिला धमकावण्यात आलं. पण सुनेहाच्या बाबतीत त्यांचा अंदाज चुकला! त्यांच्या धमक्यांना आणि ब्लॅकमेलींगला न जुमानता त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यास तिने साफ नकार दिला. माझं काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी तुमची सर्वांची पोलीस कंप्लेंट करणारच, असं तिने त्यांना ठणकावलं. पुढचा दिवसभर त्यांनी तिला ब्रूटली टॉर्चर केलं. किरणने तिला बेदम मारहाण केली. त्या रिझवानने तर तिच्या हाता-पायांवर सिगारेटने चटके दिले! शी वॉज सब्जेक्ट टू रेप अगेन अ‍ॅन्ड अगेन, परंतु सुनेहा बधली नाही! एवढं सगळं झाल्यावरही ती ऐकत नाही म्हटल्यावर ती नक्कीच पोलीसात जाणार याची सगळ्यांना कल्पना आली. भडकलेल्या किरणने त्याचक्षणी निर्णय घेतला आणि एक भयानक योजना आकाराला आली. सुनेहा वॉज टू डाय!

सुनेहाला किडनॅप केल्यावर लगेचच तिची शोधाशोध सुरू होणं टाळण्यासाठी तिच्या फोनवरुन तिच्या वडीलांना मेसेज पाठवण्यात आला होता. रात्री साडे दहाच्या सुमाराला त्यांनी सुनेहाला फार्महाऊसमधून बाहेर काढलं आणि रिझवानच्या व्हॅनने ते अर्नाळ्याला लागूनच असलेल्या नवापूर बीचवर आले. रोडवर एके ठिकाणी व्हॅन पार्क करुन त्यांनी तिला बीचवर आणलं. आदल्या दिवसाची रात्रं आणि दिवसभर अत्याचार सोसणार्‍या सुनेहाच्या शरीरात प्रतिकार करण्याची शक्तीच राहीली नव्हती. शी वॉज स्ट्रँगल्ड टू डेथ! तिची डेडबॉडी तिथेच बीचवर टाकून त्यांनी मुंबई गाठली. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी उदयने सुनेहाच्या मोबाईलचा प्रॉब्लेम असल्याबद्दल त्रिवेदींना आणि प्रियाला मेसेज केला आणि सिम कार्ड काढून तिचा फोन पवई लेकमध्ये फेकून दिला! सुनेहाज् चॅप्टर वॉज क्लोज्ड फॉरएव्हर!

रोहित गंभीर झाला. या केसच्या मुळाशी सेक्स रॅकेटच असावं हा त्याचा अंदाज अखेर खरा ठरला होता.

सुनेहाच्या मृत्यूचा प्रियाला खूप शॉक बसला होता. दोघी कॉलेजपासूनच्या फ्रेंड्स होत्या. सुनेहाचा सो कॉल्ड फ्रेंड समीरच्या एकंदर लपवाछपवीवरुन आणि खासकरुन त्याला फोटो काढण्याबद्दल असलेलं ऑब्जेक्शन पाहून प्रियाला डाऊट आला होता. सुनेहाच्या खुनामागे या समीरचाच हात असावा याबद्दल प्रियाला कोणतीच शंका नव्हती. आपला संशय तिने पोलीसांनाही बोलून दाखवला होता, पण पोलीस समीरला गाठण्यात अयशस्वी ठरले होते. पोलीसांनी ही केस फाईल केली तरी प्रिया मात्रं हार मानण्यास तयार नव्हती. स्वत:च्या हिमतीवर ती सुनेहाच्या मृत्यूचा छडा लावण्याच्या प्रयत्नात होती. त्याचवेळेस तिची गाठ पडली स्वप्नाशी!

स्वप्ना एक स्मार्ट आणि इंटेलिजंट जर्नलिस्ट होती. सुनेहाचा खून होण्यापूर्वी कित्येक दिवसांपासून ती कौशलच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीबद्दल इन्व्हेस्टीगेशन करत होती. एस्कॉर्ट्सच्या नावाखाली कौशल कॉलगर्ल्स सप्लाय करतो अशी तिला खबर लागली होती. त्याच्या रॅकेटमध्ये फसलेल्या एका मुलीची तिने भेट घेतली होती. त्या मुलीलाही सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून ओळख वाढवत पद्धतशीरपणे फसवून आणि मग ब्लॅकमेल करुन सेक्स रॅकेटमध्ये खेचण्यात आलं होतं. बट दॅट गर्ल वॉज टू मच स्केअर्ड टू कंप्लेन अ‍ॅन्ड रिव्हील एनीवन्स आयडेंटीटी! प्रियाकडून सुनेहाच्या खुनाबद्दल आणि विशेषत: फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या समीरविषयी माहिती मिळाल्यावर तिला सेक्स रॅकेटमध्ये फसलेल्या त्या मुलीशी झालेली भेट आठवली. त्याचवेळी तिला कौशलचा यात काहीतरी हात असावा असा संशय आला. त्या मुलीने कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी कौशलचे काही मित्रं यात सामिल आहेत असा उल्लेख केला होता. कौशलचे हे मित्रं कोण हे शोधून काढणं स्वप्नाला अजिबात अवघड नव्हतं. कौशलच्या सगळ्या उद्योगांमागे किरणचा हात आहे हे तिला माहीत होतं, पण कोणताही एव्हीडन्स नसताना, आणि खासकरुन किरणची पोलिटीकल बॅकग्राऊंड पाहता, आपण उघडपणे तसा आरोप करु शकत नाही याची देखिल तिला कल्पना होती. बराच विचार केल्यावर तिने एक धाडसी पण डेंजरस प्लॅन आखला....

कौशलच्या मित्रांपैकी एखाद्याशी शक्य तितकी जवळीक साधून त्याला कोणताही संशय येणार नाही याची काळजी घेत त्यांच्या उद्योगांबद्दल मिळतील तेवढे डिटेल्स मिळवावे आणि कॉन्क्रीट एव्हीडन्स मिळाला की सरळ पेपर आऊट करावं! पूर्ण विचार केल्यावर तिने सर्वात सॉफ्ट आणि अगदी इझीली अ‍ॅप्रोचेबल म्हणून धीरजला टार्गेट केलं. दोन-अडीच वर्षांपासून चॅनल रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून अनेक वेगवेग़ळ्या इव्हेंट्स कव्हर केल्याने ती स्वत: सहज ओळखली जाण्याचा धोका होता, म्हणून प्रियाने धीरजला अ‍ॅप्रोच व्हावं आणि त्याच्याशी ओळख वाढवत न्यावी आणि तिने स्वत: बॅकग्राऊंडमध्ये राहवं अशी त्यांची योजना होती.

रोहितला प्रियाची मैत्रिण रित्वीचं स्टेटमेंट आठवलं. प्रियाला अ‍ॅनिमेशन शिकण्यात फारसा इंट्रेस्ट नव्हता, पण त्या निमित्ताने धीरजला भेटण्यासाठी ती तिथे जात होती हा रित्वीचा दावा खरा होता हे आपोआपच सिद्धं होत होतं.

अ‍ॅनिमेशन शिकण्याच्या बहाण्याने प्रियाने पद्धतशीरपणे धीरजला गुंडाळण्यास सुरवात केली. तीन महिन्यांत सिस्टीमॅटीकली तिने लंच - डिनर इतकंच नव्हे तर त्याच्याबरोबर पब आणि डिस्कोमध्ये जाण्यापर्यंत मैत्री वाढवली. तो वेळोवेळी तिला गिफ्ट्सही देत होता. त्याच्या मित्रांना भेटण्याचं तिने कटाक्षाने टाळलं असलं तरी त्याला संशय येणार नाही अशा रितीने ती धीरजकडून त्यांच्याविषयी माहिती काढून घेत होती. खासकरुन कौशल आणि किरणबद्द्ल! किरणचं कर्जतला फार्महाऊस आहे आणि सुनेहा गोव्याहून मुंबईला परत आली त्या रात्री ते सर्वजण फार्महाऊसवरच होते हे तिने शोधून काढलं होतं. इव्हरीथिंग वॉज वेल ऑन ट्रॅक, पण एकदा ते दोघं मूव्हीला गेलेले असताना ते किरणच्या दृष्टीस पडले. अ‍ॅज लक वुड हॅव इट, दुसर्‍याच दिवशी तो काही कामासाठी चॅनलच्या ऑफीसमध्ये आलेला असताना तिथे प्रिया नेमकी त्याच्या समोर आली! ती एक रिपोर्टर असल्याचं कळताच त्याने धीरजकडे तिच्याबद्दल चौकशी केली. तिने अर्थातच त्याला या गोष्टीचा थांगपत्ता लागू दिला नव्हता. धीरजने चौकशी केल्यावर तिने काहीतरी मिसअंडरस्टँङींग झालं असावं आणि ती दुसरीच कोणीतरी मुलगी असावी असं म्हणत वेळ मारुन नेली. एक न्यूज रिपोर्टर आपली आयडेंटीटी लपवून धीरजला भेटते याचा किरणला संशय आला. धीरजकडून ती आडमार्गाने आपली चौकशी करत असल्याचं कळताच त्याला संभाव्यं धोक्याची जाणिव झाली. खरं काय ते काढून घेण्यासाठी त्याने तिलाच आपल्या कचाट्यात अडकवण्याचा प्लॅन आखला.

प्रिया आपल्या ग्रूपबरोबर आऊट ऑफ स्टेशन जाणार आहे हे कळल्यावर त्यांनी पुढचं पाऊल उचललं. सकाळी घरातून बाहेर पडल्यावर प्रियाने धीरजला फोन केला तेव्हा त्याने आपल्याला अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे असं सांगून तिला लंचला भेटण्याची गळ घातली. लंचनंतर गरज पडल्यास आपण तिला तिच्या मैत्रिणीच्या गावी ड्रॉप करु असं सांगण्यासही तो विसरला नाही. प्रियाने आपला बेत बदलला आणि घरी परत न जाता तिने आपलं ऑफीस गाठून स्वप्नाची भेट घेतली. नंतर तिने धीरजला फोन केला तेव्हा आपण टाऊन साईडला असून तिला त्याने तिकडेच बोलावून घेतलं. लंच घेताना ती वॉशरुमला गेल्यावर तिच्या नकळत त्याने तिच्या ज्यूसमध्ये ड्रग्ज मिसळले. ड्रग्जचा इफेक्ट होण्यास सुरवात झाल्यावर प्रियाला खूप अनइझी वाटू लागलं. धीरजने तिला रेस्टॉरंटमधून बाहेर काढून आपल्या कारमध्ये बसवलं तेव्हा ती ऑल्मोस्ट अनकॉन्शस झाली होती. तिला कारमध्ये बसवल्यावर त्याने तिचा फोन स्विच ऑफ केला आणि तो फार्महाऊसवर जाण्यास निघाला.

दरम्यान फार्महाऊसवर पोहोचलेल्या किरणने तिथल्या केअरटेकर आणि त्याच्या बायकोला त्याच्या गावी जाण्याची सूचना केली. ते फार्महाऊसमधून बाहेर पडल्याचा फोन येईपर्यंत धीरज बेशुद्धीत असलेल्या प्रियासह इथे-तिथे भटकत राहीला. ऑल क्लिअरचा सिग्नल मिळाल्यावर तो तिथे पोहोचला तेव्हा इतर चौघंजणं त्याची वाटच पाहत होते. त्यानंतर काय झालं असेल याची तुम्ही कल्पना करु शकता... प्रत्येकजण गिधाडासारखा प्रियाच्या शरीरावर तुटून पडत होता. ड्रगचा इफेक्ट उतरल्यानंतर शुद्धीवर आलेल्या प्रियाला आपण कोणत्या परिस्थितीत आहोत हे कळल्यावर.... आय कान्ट इमॅजिन! ती शुद्धीवर आलेली पाहताच प्रत्येकजण चेव आल्यासारखा परत पुढे सरसावला! अ पॅक ऑफ हंग्री अ‍ॅन्ड व्हिक्शियस वूल्व्हज्! मनसोक्तपणे तिचे लचके तोडून झाल्यावरही त्यांचं समाधान झालं नव्हतं. अमानुष मारहाण करत आणि सिगारेट्सचे चटके देत या सगळ्या प्रकरणाची पूर्ण माहिती त्यांनी तिच्याकडून काढून घेतली. अर्धमेल्या अवस्थेत अखेर तिच्या तोंडून स्वप्नाचं नाव बाहेर पडलं! धीरजला भेटायला जाण्यापूर्वी आपण तिला तशी कल्पना दिल्याचं आणि सुनेहाच्या मृत्यूपूर्वीपासूनच ती त्यांच्याबद्दल माहिती मिळवत असाल्याचंही प्रिया बोलून गेली, अ‍ॅन्ड दॅट सील्ड हर फेट!

जीवाची भीती दाखवून आणि तिचे फोटो आणि व्हिडीओ याच्या जोरावर आपण प्रियाला ब्लॅकमेल करुन गप्प करु शकतो याबद्दल किरणला खात्री होती. बट स्वप्ना वॉज मोअर दॅन हँडफुल! जी बाई प्रियाला धीरजच्या मागावर पाठवण्याचा प्लॅन करु शकते ती किती डेंजरस आहे याची त्याला चांगलीच कल्पना आली. प्रियाला धमकावून गप्पं केलं तरी तिने स्वप्नासमोर तोंड उघडल्यास ती हात धुवून आपल्या मागे लागणार हे तो समजून चुकला होता. आतापर्यंत तिने आपल्याबद्दल किती माहिती गोळा केली आहे याबद्दल त्याला काही अंदाज नव्हता. प्रियाकडूनही त्यासंदर्भात काही कळलं नव्हतं. स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी एकच उपाय त्याला दिसत होता…. प्रियाचं तोंड कायमचं बंद करणं! आणि ते देखील अशा रितीने, की स्वप्ना शुड बी फ्रेम्ड फॉर हर मर्डर! प्रियाचा खून करुन ती पळून गेली आहे अशी पोलीसांची खात्री पटली पाहिजे!

आपण फार्महाऊसमध्येच होतो हे दर्शवण्यासाठी सगळ्यांचे मोबाईल फोन्स त्यांनी तिथेच ठेवले आणि किरणच्या कारमध्ये अर्धमेल्या प्रियाचा देह टाकून रात्री दोनच्या सुमाराला त्यांनी फार्महाऊस सोडलं आणि पहाटे मढ आयलंडवरचा किरणचा बंगला गाठला. त्यांना तिथे सोडून किरणची कार ड्राईव्ह करत धीरज पुन्हा फार्महाऊसवर परतला! दुसर्‍या दिवशी रात्रीपर्यंत फार्महाऊसवर मुक्काम ठोकून कोणाचाही मोबाईल वाजला तर तो अटेंड करण्याचं काम त्याच्याकडे होतं. धीरज फार्महाऊसला निघून गेल्यावर सकाळी प्रियाच्या मोबाईलवरुन स्वप्नाला मेसेज पाठवण्यात आला. बॉम्बे - अहमदाबाद हायवेला असलेल्या मस्तान नाक्याच्या ब्रिजखाली दुपारी अडीच वाजता भेटण्याची त्यात सूचना होती आणि किरण आणि इतरांविरुद्ध डिटेल इन्फॉर्मेशन मिळवण्याचा खूप मोठा चान्स असल्याचाही त्यात उल्लेख करण्यात आला होता.

प्रियाच्या नंबरवरुन हा मेसेज आल्याने स्वप्नाला कोणताच संशय आला नाही. सकाळी रिझवानने आपली कार आणली आणि उदय आणि कौशल त्याची कार घेवून अहमदाबाद हायवेला निघाले. तिथे पोहोचण्यापूर्वी प्रियाच्या मोबाईलवरुन त्यांनी आपण धीरजबरोबर वेगळ्या कारने येत आहोत आणि तिने उदय आणि कौशलबरोबर पुढे जावं असा स्वप्नाला मेसेज केला. किरण आणि रिझवानही आपल्याबरोबर असल्याने फोनवर बोलता येणार नाही असंही त्या मेसेजमध्ये क्लीअर केलं होतं. हायवेला मस्तान नाक्यावर स्वप्नाला पिकअप करुन ते पुढे निघाले. तासाभराने चहाच्या निमित्ताने एके ठिकाणी कार थांबवून प्रियाप्रमाणेच ड्रग घातलेलं कोल्ड्रींक तिला पाजण्यात आलं, अ‍ॅन्ड शी वॉज डन फॉर!

स्वप्ना अनकॉन्शस झाल्यावर उदयने तिचा फोन स्विच ऑफ केला. तिला कारच्या मागच्या सीटवर आडवं झोपवून त्यांनी सरळ सापुतारा गाठलं. अंधार पडल्यामुळे सनराईझ पॉईंटचा एरीया अगदी सुनसान होता. तिथेच एका ठिकाणी कार थांबवून बरोबर आणलेल्या रोपने आधीच अनकॉन्शस असलेल्या स्वप्नाला त्यांनी स्ट्रँगल केलं. मात्रं तिचा जीव घेण्यापूर्वी तिलाही आपल्या वासनेची शिकार बनवण्यास त्यांनी कमी केलं नाही! ती एक्स्पायर झाल्याची खात्री होताच तिची डेडबॉडी त्यांनी व्हॅलीमध्ये टाकून दिली आणि शक्यं तितक्या घाईघाईने सापुतारा सोडून त्यांनी नासिक गाठलं. तिथे पोहोचल्यावर स्वप्ना आणि प्रिया एकत्रं होत्या हे एस्टॅब्लिश करण्यासाठी दोघींचेही मोबाईल ऑन करण्यात आले ते मढ आयलंडपर्यंत सुरु होते. मढ आयलंडला येताच प्रियाचा फोन स्विच ऑफ करण्यात आला.

उदय आणि कौशल स्वप्नाला गाठण्यासाठी निघून गेल्यावर किरण आणि रिझवान दिवसभर मढ आयलंडच्या बंगल्यातच होते. मनाला येईल तसे अर्धमेल्या प्रियाचे दोघेही लचके तोडत होते. रिझवानने तर कल्पनाही करणं अशक्यं आहे अशा अनैसर्गीक पाशवी पद्धतीने तिला रेप केलं होतं. फार्महाऊसवरुन त्यांना पिकअप करण्यासाठी आलेला धीरज आणि स्वप्नाचा काटा काढून परतलेले उदय आणि कौशल यांनी पुन्हा एकदा आपली वासना शमवून घेतल्यावर स्वप्नाची हत्या करण्यासाठी वापरलेल्या रोपनेच त्यांनी प्रियाच्या गळ्याला फास लावला. तिची डेडबॉडी मढ आयलंडवर टाकून रिझवानने आपली कार जिमसमोर पार्क केली आणि धीरजने आणलेल्या किरणच्या कारमधून त्यांनी फार्महाऊस गाठलं. वाटेत ठाण्यापर्यंत आल्यावर स्वप्नाचा फोन स्विच ऑफ करण्यात आला. फार्महाऊसवर पोहोचल्यावर तिचा लॅपटॉप, कॅमेरा आणि मोबाईल तिन्हीची विल्हेवाट लावण्यात आली. तो संपूर्ण दिवस आणि दुसर्‍या दिवशी संधाकाळपर्यंतचा वेळ त्यांनी फार्महाऊसवरच घालवला. जवळपास सर्व चॅनल्सवरुन फ्लॅश झालेल्या प्रियाच्या खुनाच्या न्यूजचा अंदाज घेत काही झालंच नाही अशा धाटात ते आपापल्या घरी परतले. फार्महाऊसचा केअरटेकर परत आल्यावर हे पाचही जण तिथेच असणं हा त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठा प्लसपॉईंट होता, त्यापेक्षाही पाचही जणांचे मोबाईल चार दिवस फार्महाऊसवरच असणं वॉज अ काँक्रीट अ‍ॅलिबी इन देअर फेव्हर!

प्रियाच्या मर्डरची इन्क्वायरी सुरु झाल्यावर तुम्हाला धीरज आणि इतरांचा संशय आला, त्याप्रमाणे तुम्ही त्यांची इन्क्वायरीही केलीत. किरणने मात्रं आपल्या बापाच्या पोलिटीकल पोझिशनचा फायदा घेत स्वत:ची इन्क्वायरी टाळली. प्रिया आणि स्वप्ना यांच्यातला संबंध उघड होताच तुम्ही तिच्या मागे लागलात. नासिकपासून मढ आयलंडला येईपर्यंत त्या दोघींचे फोन सुरु होते आणि त्यानंतर स्वप्नाचा फोन ठाण्यापर्यंत सुरु होता हे पोलिस इन्क्वायरीमध्ये क्लीअर झाल्यावर प्रियाचा खून करुन ती ठाण्याहून गायब झाली अशी पोलीसांची समजूत होणार होती, अ‍ॅन्ड दॅट एक्झॅक्टली वॉज द प्लॅन! एव्हरीबडी वॉज लेफ्ट अंडर इंप्रेशन दॅट शी इज अ‍ॅबस्काँडींग! अ लार्ज मॅनहन्ट स्टार्टेड, पण स्वप्ना तुम्हाला कधीच सापडणं शक्यं नव्हतं, कारण ती या जगातच नव्हती! प्रियाची बॉडी मढ आयलंडवर मिळाली, पण स्वप्नाची बॉडीही मिळाली नाही! मिळाली ती केवळ बोन्स! सापुतारा पोलीसांना मिळालेला तो स्केलेटन स्वप्नाचाच होता!

रोहित काही वेळ डोळे मिटून स्तब्ध बसून राहिला. प्रियाच्या खुनात किरण आणि त्याच्या मित्रांचा हात असावा हा त्याचा अंदाज खरा ठरला होता. सुनेहा आणि प्रियाचा खुनीही एकच असावा या त्याच्या तर्कही अचूक होता. किरण आणि कंपनीने व्यवस्थित प्लॅनिंग करुन, अत्यंत डोकेबाजपणे प्रियाच्या खुनात स्वप्नाचा हात असल्याचा आभास निर्माण केल्याचं त्याच्या ध्यानात आलं. केसबद्दल चर्चा करतान स्वप्नाचीही हत्या झाली असावी अशी शक्यताही त्याने व्यक्तं केली होती. पण धीरजच्या खुनापूर्वी स्वप्नाचा मोबाईल सुरु झाल्याचं आणि त्यानंतर प्रत्येक खुनात तिचा हात असल्याचं इन्क्वायरीमध्ये स्पष्टं होत गेलं होतं, पण आता स्वप्नाचाही वर्षाभरापूर्वीच खून झाल्याचं समोर आलं होतं!

स्वप्ना गायब झाल्यावर तिच्या संदर्भातल्या प्रत्येक बातमीवर मी नजर ठेवून होते. प्रियाच्या खुनात ती सस्पेक्ट असून अ‍ॅबस्काँडींग असल्याचं पोलीसांनी डिक्लेअर केल्यावर ही काहीतरी वेगळीच भानगड आहे याबद्दल माझी खात्री पटली. ती जिथे पेईंग गेस्ट म्हणून राहत होती तिथल्या ओनरचा नंबर माझ्याकडे होता, पण तो बहुतेक बदलला असावा, कारण बराच प्रयत्नं करुनही कॉल कनेक्ट होत नव्हता. तिच्याबाबतीत नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी कौशल किंवा उदय यांना गाठण्यापलीकडे माझ्यासमोर दुसरा मार्ग नव्हता. स्वप्नाच्या नाहीसं होण्यामागे त्या दोघांचा निश्चितच काहीतरी संबंध आहे याबद्दल मला खात्री होती. तिला सर्वात शेवटी भेटणारे हेच दोघंजण होते. त्यानंतरच ती कोणताही ट्रेल न ठेवता अदृष्य झाली होती. आता हे मला कसं कळलं ते पुढे येईलच, पण त्या दोघांच्याही आधी माझ्यासमोर नाव होतं ते धीरजचं! स्वप्ना आणि प्रिया या दोघींचा प्लॅन आणि प्रियाचं धीरजबरोबरचं सो कॉल्ड अफेअर याची परिणीती स्वप्ना गायब होण्यात झाली होती. स्वप्नाबद्दल तो काय बोलतो यावर माझ्या पुढच्या हालचाली डिपेंड होत्या, पण हे सगळं करताना माझी स्वत:ची आयडेंटीटी उघड करण्याची माझी तयारी नव्हती, आणि म्हणूनच मी स्वप्नाच्या नावाचा उपयोग करण्याचं ठरवलं! राजस्थानमधलं बारमेरसारखं काहीसं आडबाजूला असलेलं ठिकाण गाठून मी तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये 'स्वप्ना'चा मोबाईल आणि सिम कार्ड हरवल्याची कंप्लेंट दिली. तिथल्या कॉन्स्टेबलने दोन हजारांच्या मोबदल्यात एकही प्रश्न न विचारता मला रिपोर्ट लिहून दिला! तोच रिपोर्ट वापरुन बारमेरमध्येच मी स्वप्नाच्या नंबरचं नवीन सिमकार्ड मिळवलं आणि मुंबईला परतले.

माय गेम वॉज टू क्लोजली वॉच धीरज. त्याला रोज फॉलो करत मी त्याचं रुटीन व्यवस्थित ऑब्झर्व्ह करत होते. त्याची कॉम्प्युटर इन्स्टीट्यूट, प्लेसमेंट एजन्सी इतकंच नव्हे तर इतर चौघांबरोबर होणार्‍या त्याच्या भेटीही माझ्या नजरेतून सुटल्या नव्हत्या. सुमारे आठ - दहा दिवस त्याचं सगळं शेड्यूल नीट चेक केल्यावर अखेर एक दिवस सांताक्रूजच्या त्या पबमध्ये मी त्याला गाठलं.

'पबमध्ये धीरजला भेटलेली मुलगी कॅरोल होती तर...." तो स्वत:शीच म्हणाला.

धीरजला बोलण्यात गुंडाळणं मला अजिबात कठीण गेलं नाही. मी युकेहून आले आहे आणि फिल्म इंडस्ट्रीत चांगला चान्स मिळावा म्हणून प्रयत्नं करते आहे आणि प्रसंगी थोडंफार कॉम्प्रोमाईज करण्याचीही माझी तयारी आहे अशी मी त्याला थाप मारली. एखादी मुलगी इतक्या ओपनली बोलते म्हटल्यावर त्याने माझ्याभोवती जाळं टाकायला सुरवात केली नसती तरंच आश्चर्य होतं! फिल्म इंडस्ट्रीत आपल्या बर्‍याच ओळखी आहेत, एक-दोन टॉपचे प्रोड्युसर्स आपले अगदी खास मित्रं आहेत, माझ्या शब्दावर नक्कीच चांगली ऑफर मिळून जाईल वगैरे त्याने बरंच बोस्टींग केलं. पबमधून बाहेर पडल्यावर तो मला घरी ड्रॉप करण्याचा इतका आग्रह करत होता की त्याचा पिच्छा सोडवताना मला पुरेवाट झाली. दुसर्‍या दिवशी रात्री मी त्याला पबमध्ये भेटले, तेव्हा आपला खास मित्रं असलेला एक प्रोड्यूसर रात्री उशिरा आपल्याकडे येणार असून त्याला भेटायला मी त्याच्याबरोबर घरी यावं म्हणून तो माझ्या मागे लागला. मी देखिल काहिही करुन हा चान्स मिळवून देणासाठी त्याला गळ घातली! पोरगी फसल्याच्या आनंदात तो दोन पेग जास्तंच प्यायला आणि माझं काम अधिकच सोपं झालं! इमर्जन्सी काम आलं आहे म्हणून मी सटकले आणि सरळ त्याचं रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स गाठलं.

त्याच्या सोसायटीच्या मागच्या लेनमध्ये कार पार्क करुन मी कॉम्प्लेक्सला असलेल्या छोट्या गेटपाशी आले. वॉचमनला स्वप्नाचं नाव सांगून धीरजला भेटण्यासाठी सोसायटीत प्रवेश मिळवायचा हे मी आधीच ठरवलं होतं. पण मी मागच्या गेटपाशी आले तो तिथे वॉचमन नव्हताच! मी अलार्म बेल वाजवली आणि दोन मिनिटं वाट पाहून पुढच्या गेटकडे गेले. तिथला वॉचमनही गायब होता, पण तो बहुतेक मागच्या गेटकडे गेला असावा याची मला कल्पना आली. आय वॉज रिअली लकी! मी सी-विंगमध्ये शिरले आणि लिफ्टने सरळ सिक्स्टीन्थ फ्लोरवर आले, पण धीरजच्या फ्लॅटकडे न जाता टेरेसकडे जाणार्‍या जिन्याने वर चढून गेले. पाच मिनिटं तिथे थांबल्यावर मी फ्लॅटमध्ये शिरण्यासाठी खाली उतरणार तोच लिफ्टचा आवाज आला. फ्लोरवरचं बहुतेक कोणीतरी घरी परतलं होतं. आणखीन पाच मिनिटं वाट पाहून मी खाली उतरले आणि धीरजचा फ्लॅट गाठला. मी त्याच्या दाराचं लॅच लॉक ओपन करण्याच्या प्रयत्नात असतानाच पॅसेजच्या टोकाला असलेल्या दुसर्‍या फ्लॅटचं दार उघडल्याचा आवाज झाला. आय वॉज ऑल्मोस्ट अ सिटींग डक वेटींग टू बी शॉट! फॉर्च्युनेटली त्याचवेळेस लॅचला नेमकी की लागली आणि त्या फ्लॅटमधून बाहेर आलेल्या माणसाने मला हटकण्यापूर्वीच मी धीरजच्या फ्लॅटमध्ये शिरुन दार लावून घेतलं! आता कोणत्याही क्षणी तो माणूस ओरडा-आरडा करणार, अ‍ॅन्ड माय गेम वुड बी ओव्हर! पण तसं काहीच झालं नाही! एव्हरीथिंग वॉज नॉर्मल!

स्वप्नाच्या फोनवरुन धीरजला कॉल करुन एक महत्वाचं काम निघाल्यामुळे पबमध्ये परतणं मला शक्यं होणार नाही असं सांगून मी फोन बंद करुन टाकला. तो त्या नंबरला फोन करण्याचा प्रयत्नं करणार याबद्दल मला खात्री होती. फोन लागला नाही तर कंटाळून पबमधून निघून घरी येईल हा माझा अंदाज होता. त्याला बोलतं करण्यासाठी त्याचं घर ही सगळ्यात सुरक्षित जागा होती. अ‍ॅज एक्स्पेक्टेड तासाभरानंतर तो घरी आला तो माझ्या नावाने गलिच्छ शिव्या घालतच! त्याचवेळी त्याला खलास करावा असा मला संताप आला होता, पण मी स्वत:ला आवरलं. त्याच्याच घरात त्याच्या नकळत लपून राहणं खरंतर जवळपास अशक्यंच होतं, बट अगेन आय वॉज लकी कारण घरी आल्यावर कपडेही चेंज न करता तो तसाच बेडवर पडला! अर्थात त्यामागे दारु हे कारण होतं, पण दारुपेक्षाही त्यात जे काही होतं हा त्याचा परिणाम होता! आता ते जे काही होतं ते फॉरेन्सिक एक्स्पर्ट्सना त्याच्या ऑटॉप्सीमध्ये सापडलं असेलच, आणि त्याचे परिणामही त्यांनी तुम्हाला एक्सप्लेन केले असतील! जस्ट् फॉर युवर इन्फॉर्मेशन, इट इज ऑल्सो यूज्ड अ‍ॅज अ ट्रूथ सिरम! एखाद्या माणसाकडून सत्यं वदवून घेण्यासाठीही सायकिअ‍ॅट्रीक ट्रीटमेंटमध्ये ते वापरलं जातं.

रात्री दीडच्या सुमाराला गाढ झोपेत असलेल्या धीरजला मी जागं केलं. ड्रगच्या इफेक्टखाली असल्याने तो पटकन उठत नव्हता, पण बाटलीभर पाणी त्याच्या डोक्यावर ओतल्यावर तो धडपडत जागा झाला. डोळे उघडताक्षणी समोर प्रियाचा चेहरा दिसल्यावर त्याची जी काही हालत झाली.... यू शुड हॅव सीन हिज फेस! आठ - नऊ महिन्यांपूर्वी ज्या मुलीचा आपण ब्रूटली रेप करुन खून केला तिचा फक्तं चेहराच समोर आला तर एखाद्या माणसाचं काय होईल? ही वॉज स्टोन डेड देअर अ‍ॅन्ड देन! त्याला धड ओरडताही येत नव्हतं आणि त्या ड्रगच्या इफेक्टमुळे बेडवरुन पटकन उठताही येत नव्हतं! स्वत:चं भयानक मरण समोर दिसल्यावर.... ही स्टार्टेड बेगिंग फॉर हिज लाईफ! दॅट वॉज इट! प्रिया आणि स्वप्नाच्या खुनाबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यास तुला सोडून देईन असं खुद्दं 'प्रिया'ने त्याला सांगितल्यावर ही ओब्लाईज्ड इमिजिएटली! त्याने डिटेल्ड कन्फेशन तर दिलंच पण आपल्याबरोबर इतरांनाही त्यात इम्लिकेट केलं!

धीरजचं पूर्ण कन्फेशन मी रेकॉर्ड केलं. सुनेहाच्या खुनाबद्दलही माहिती काढून घेण्याचा माझा इरादा होता, बट इट वॉज टू लेट! द ड्रग हॅड टेकन इट्स इफेक्ट अ‍ॅन्ड ही वॉज नॉट एबल टू स्पीक एनी मोअर. तो पूर्ण पॅरॅलिटीक झाला होता! त्याला बेडरुममधून टेरेसवर नेताना आणि टेरेसच्या रेलिंगवर चढवताना मला फार प्रयास पडले. त्याला खाली फेकताच मी सॅक उचलून खाली आले. तोपर्यंत वॉचमन धावत-पळत तिकडे येतच होता. मी त्याला हटकलं आणि धीरज पडला होता त्या दिशेला बोट दाखवून इतरांना बोलावून आणण्यास पिटाळलं. त्याला माझा चेहरा दिसणं शक्यंच नव्हतं. तो पुढे धावल्यावर मी मागच्या गेटमधून आरामात बाहेर पडले. बोरीवली रेल्वे स्टेशनच्या बाहेर कार थांबवून किरणला ब्लँक कॉल केला आणि सरळ अहमदाबाद हायवेने सापुतार्‍याला जाण्यासाठी निघाले!

फ्रँकली स्पीकींग धीरजच्या सिस्टीममध्ये गेलेला ड्रगचा डोस लिथल नव्हता, बर्‍याच मेडीकल प्रोसिजर्सनंतर का होईना पण तो पॅरॅलिटीक कंडीशनमधून पुन्हा नॉर्मलला येणं शक्यं होतं. बट हिज कन्फेशन डिड हिम इन! मी त्याच्या घरात शिरले तेव्हा माझ्यापाशी ते ड्रग होतं. आय कुड हॅव इन्जेक्टेड हिम विथ दॅट! पण तसं न करता मी त्याला मुद्दामच बाल्कनीतून खाली फेकलं! अ‍ॅज पर माय प्लॅन, धीरजच्या मृत्यूची पोलीस इन्क्वायरी होणं आणि त्यात स्वप्ना इन्व्हॉल्व्ह असल्याचं पुढे येणं आवश्यक होतं! तिने त्याला कॉन्टॅक्ट केला होता हे स्वप्नाच्या नंबरवरुन मी त्याला केलेल्या फोनवरुन प्रूव्ह होणार होतं, पण त्याच्या मृत्यूच्या वेळी ती त्याच्या घरात होती हे एस्टॅब्लीश करण्यासाठी मी तिच्या नंबरवरुन त्याला एक मेसेज पाठवला आणि त्याच्या फोनवर येताच तो डिलीट करुन टाकला! स्वप्ना मुंबईत आहे आणि धीरजच्या मृत्यूशी तिचा संबंध आहे हे उघड होताच तुम्ही तिच्या मागे लागणार हे उघड होतं! इट वॉज गोईंग टू बी लाईक थ्रोईंग अ रॉक अ‍ॅट द बी हाईव्ह! तिच्या मोबाईल नंबरवरुन तुम्ही बारमेरपर्यंत ट्रेस घेणार याची मला कल्पना होती. फॉर दॅट व्हेरी रिझन, स्वप्नाच्या मोबाईल नंबरसाठी एफआयआर करताना, मोबाईल गॅलरीत तिच्या नावाचं सिमकार्ड पिकअप करताना आणि धीरजच्या बिल्डींगमध्ये शिरताना आणि तिथून बाहेर पडताना मी ओव्हरकोट, स्कार्फ आणि गॉगल असा मुद्दाम नजरेत भरण्यासारखा ऑड गेटअप केला होता! एकदा पोलीस स्वप्नाच्या मागे लागले की बिहाईन्ड द सीन्स राहून पुढच्या हालचाली करणं मला सोपं जाणार होतं! इट वॉज अ कॅल्क्युलेटेड रिस्क, अ‍ॅन्ड अ‍ॅज आय हॅड एक्स्पेक्टेड, ऑल हेल ब्रोक लूज!

रोहित अवाक् झाला! स्वप्नाचं नाव वापरुन दुसरंच कोणीतरी हे सगळं करत असेल हा त्याला संशय आला होता, पण त्यामागे एवढं प्लॅनिंग असेल याची मात्रं त्याने कल्पना केली नव्हती! 'आजपर्यंत एकही केस अनसॉल्व्हड् नाही म्हणून आपल्याला स्वत:चा अभिमान होता, पण ही कॅरोल आपल्या दहा पावलं पुढे आहे!' त्याच्या मनात आलं. त्याने पुढे वाचण्यास सुरवात केली.

सापुतार्‍याला पोहोचल्यावर मी चॅनल रिपोर्टर म्हणून तिथल्या पोलीस ऑफीसर्सची भेट घेतली. स्वप्नाचं नाव घेवून मी त्यांना भेटले तरी माझा चेहरा त्यांना दिसू नये याची मी प्रिकॉशन घेतली होती. खरंतर आठ - नऊ महिन्यांपासून अ‍ॅबस्काँडींग म्हणून डिक्लेअर केलेल्या स्वप्नाला इम्पर्सनेट करणं रिस्की होतं. तसंच ओव्हरकोट, स्कार्फ आणि गॉगल हा माझा अवतार विचित्रं आणि कदाचित संशयास्पद वाटण्याची शक्यता होती, बट आय वॉज रिअली लकी! पोलीसांना स्वप्नाची डेडबॉडी मिळाली नव्हती, पण तिथल्या फॉरेस्ट रेंजरला जंगलात एक स्केलेटन सापडला होता. त्या स्केलेटनच्या अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या, पण त्याच्या गळ्यात असलेलं लॉकेट मात्रं इतक्या दिवसांनंतरही जसंच्या तसं राहीलं होतं. ते लॉकेट मी पाहताक्षणी ओळखलं. स्वप्नाचं लॉकेट! त्या लॉकेटमध्ये एक महत्वाचं सिक्रेट दडलेलं होतं, पण सापुतारा पोलीसांना मात्रं त्याची पुसटशी चाहूलही लागलेली दिसत नव्हती. मी ते सिक्रेट त्यांना सांगण्यात पॉईंटही नव्हता, कारण त्याचं स्पष्टीकरण देणं मला जड जाणार होतं! त्यांच्याकडून त्या फॉरेस्ट रेंजर्सचा कॉन्टॅक्ट घेवून मी त्यांना भेटले आणि त्यांच्याबरोबर स्वप्नाचा स्केलेटन त्यांना सापडलेली नेमकी जागाही पाहिली.

स्वप्नाचा खून प्रत्यक्षात कौशल आणि उदय या दोघांनी केला होता हे धीरजच्या कन्फेशनवरुन क्लीअर झालं होतं. त्या दोघांनाही एकापाठोपाठ एक करुन संपवण्याच्या निश्चयानेच मी मुंबईला परतले! माय नेक्स्ट टार्गेट वॉज कौशल! धीरजप्रमाणेच चार - पाच दिवस मी त्याचं रुटीन व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं. त्याचं घर, त्याचं इस्टेट एजंटचं ऑफीस, त्याची ती इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी हे सगळं सिस्टीमॅटीकली नजरेखालून घातल्यावर एक दिवस संध्याकाळी मी त्याला त्याच्या ऑफीसमध्ये गाठलं.

मी युकेमधून आलेली एनआरआय आहे आणि भारतात रिसॉर्ट कम् अ‍ॅम्युझमेंट पार्क उभारण्यासाठी योग्यं प्रॉपर्टीच्या शोधात आहे अशी एक पुडी मी सोडून दिली. माझं ओव्हरऑल बजेट दहा मिलीयन पाऊंड्स आहे हे ऐकल्यावर त्याचे डोळे अक्षरश: पांढरे व्हायचे बाकी राहीले होते. मी त्याच्या ऑफीसमधून मी बाहेर पडताच पाच मिनिटांतच तो उत्साहाने बाहेर पडत किरणला जावून भेटला तेव्हाच मासा गळाला लागला हे मी ओळखलं. पुढचे तीन - चार दिवस त्याला तसाच झुलवत ठेवल्यावर दुसर्‍या एका प्रॉपर्टी डिलरशी माझं डील ऑल्मोस्ट फायनल होत असल्याचं मी मुद्दाम त्याच्या कानावर घातलं तेव्हा मात्रं त्याने अक्षरश: गयावया करण्यास सुरवात केली. बर्‍याच मिनतवारीनंतर मी त्याला भेटायला तयार झाले, पण तो अगदी डेस्परेटली द लीलाच्या रेस्टॉरंटमध्ये माझी वाट पाहत असताना मी हॉटेलच्या पार्कींग लॉटमध्ये माझी कार पार्क करुन तिथेच बसून राहीले होते! तो एकटाच आला आहे का इतर तिघांपैकी कोणीही तिथे आलं आहे हे समजणं माझ्या दृष्टीने आवश्यक होतं. तासाभराने हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये फोन करुन आज भेटणं शक्यं नाही असा मी त्याला मेसेज दिला. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला त्याच्याच ऑफीसबाहेरच्या पब्लिक बूथवरुन कॉल करुन मी त्याला पुन्हा लीला मध्ये बोलावलं. तिथे पोहोचल्यानंतरही कोणतीही रिस्क नाही याची पूर्ण खात्री केल्यावरच मी त्याच्यासमोर येवून बसले. दुसर्‍या दिवशी त्याच्याबरोबर प्रॉपर्टी पाहयला येण्याबद्दल त्याने विचारणा केल्यावर मी लगेच होकार दिला.

हॉटेलमधून बाहेर पडल्यावर तो सरळ आपल्या घरी निघून गेला. अर्थात मी त्याच्या मागे होतेच. अंधेरी स्टेशनपासून पाच मिनिटांवर एका गल्लीत कार पार्क करुन आरामात चालत मी त्याच्या सोसायटीच्या शेजारी असलेल्या त्या गार्डनमध्ये शिरले. गार्डनमध्ये बेंचवर झोपलेल्या म्हातार्‍या माणसाने मला पाहिलं असावं, पण त्याची फारशी पर्वा न करता मी गार्डनच्या भिंतीवर चढून वॉटर टँकवर चढले आणि आरामात शिडीने खाली उतरुन कौशलच्या बिल्डींगमध्ये शिरले. कौशलला गाढ झोप लागेपर्यंत मला त्याच्या फ्लॅटमध्ये शिरता येणार नव्हतं. अशा परिस्थितीत लपून राहण्यासाठी टेरेस वॉज अ सेफ बेट. दीड वाजता मी कौशलच्या फ्लॅटचं लॅचलॉक उघडलं आणि आत शिरले. तो फ्लॅटमध्ये असला तरी गाढ झोपेत असणार याची मला खात्री होती. हॉलमधली एकंदर परिस्थिती पाहून घरी आल्यावर त्याने आणखीन दारू ढोसली होती हे माझ्या लक्षात आलं.

डोळे उघडल्यावर समोर स्वप्नाचा चेहरा पाहून कौशलची अवस्था धीरजसारखीच झाली. 'स्वप्ना'ने त्याच्या तोंडून स्वत:च्या खुनाची पूर्ण हकीकत वदवून घेतलीच, पण सुनेहाच्या खुनाचंही कन्फेशन त्याला ओकायला भाग पाडलं. त्याने इतरांनाही सुनेहाच्या खुनात इम्प्लिकेट केलं. ड्रगच्या इफेक्टमुळे धड बोलणंही त्याला अशक्यं झाल्यानंतर आणि काही झालं तरी तो वाचणं शक्यं नाही हे लक्षात आल्यावर मी त्याच्या मोबाईलवरुन किरणला फोन लावला आणि स्पीकर ऑन करुन त्याच्यासमोर ठेवला. तो रडत-अडखळत किरणशी बोलत होता. 'किरण, मला वाचव!' एवढे शब्दं त्याने कसेबसे उच्चारल्यावर मी फोन कट् केला आणि स्वप्नाच्या नंबरवरुन त्याला तो मेसेज पाठवला –

Game over. Your time is up – Swapna.

त्याच्या मोबाईलवर किरणचे सतत फोन येत होते, पण त्याला तो फोन रिसीव्ह करण्यासाठी बोटही हलवता येत नव्हतं! मी त्याच्या फ्लॅटमधून बाहेर पडले तेव्हा पूर्वीप्रमाणेच सर्वत्रं सामसूम होती. गेलेल्या मार्गानेच वॉटर टॅकवर चढून मी त्या गार्डनमध्ये उतरले. त्या म्हातार्‍याने बहुतेक मला बाहेर पडतानाही पाहिलं असावं, पण मला त्याची पर्वा नव्हती. कौशलचा खूनही 'स्वप्ना’ने केला आहे हे कनेक्शन काँक्रीट करण्यासाठी बरोबर नेलेल्या हाय हिल्सच्या टोचं इंप्रेशन मी चिखलात उमटवलं आणि गार्डनमधून बाहेर पडून अंधेरी स्टेशनजवळच्या गल्लीत पार्क केलेली माझी कार गाठली. अगदी वॉकींग स्पीडने अंधेरी स्टेशनपर्यंत जात स्वप्नाचा मोबाईल स्विच ऑफ केला, आणि सरळ रुमवर परत येवून झोपून गेले!

रोहित स्तंभित झाला! धीरजच्या बाल्कनीत उमटलेली हाय हिल्सच्या टोची प्रिंट त्याने त्या बागेतल्या प्रिंटशी आणि रिझवानच्या बिल्डींगच्या कंपाऊंडच्या बाहेर असलेल्या मातीत उमटलेल्या प्रिंटशी मॅच करुन पाहिली होती आणि त्यावरुनच त्याने तिघांच्याही हत्येमागे स्वप्नाच असल्याचा निष्कर्ष काढला होता! रिझवानच्या बिल्डींगमधल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेल्या त्या मुलीच्या पायातल्या बुटांमुळे मात्रं त्याच्यासमोर एक प्रश्नचिन्हं उभं राहीलं होतं. आता कुठे त्या सगळ्याचा उलगडा झाला होता! प्रत्येक ठिकाणी हील्सच्या टो ची प्रिंट मुद्दाम उमटवण्यात आली होती!

माय नेक्स्ट टार्गेट वॉज उदय! त्याला घरीच गाठण्याच्या दृष्टीने दोन - तीन दिवस मी त्याला फॉलो करत होते, पण माझ्याप्रमाणेच पोलीसही त्याला फॉलो करत आहेत हे लक्षात आल्यावर मी माझा प्लॅन बदलला. त्या दिवशी दुपारभर किरण आणि रिझवानबरोबर तो मोतीमहल रेस्टॉरंटमध्ये बसला होता. आपणही आत शिरावं असा मला मोह होत होता, पण पोलीस त्याच्यावर वॉच ठेवून आहेत याची कल्पना असल्याने मी तो मोह आवरला. त्यानंतर तो ताज लॅण्ड्स एन्डला गेला. तिथून तो बाहेर पडला तेव्हाही मी त्याच्या मागे होते. माझ्या अपेक्षेप्रमाणे त्याच्या पोटात गेलेल्या त्या ड्रगचा इफेक्ट होण्यास सुरवात झाली होती. स्वप्नाच्या नंबरवरुन त्याला मेसेज पाठवल्यावर जेमतेम दोन - तीन मिनिटांतच त्याची कार त्या बसवर क्रॅश झाली! आय वॉज हॅपी फॉर वन सिंपल रिझन, त्या क्रॅशमध्ये बसमधल्या कोणालाही काही झालं नाही! त्याची कार क्रॅश होताच मी सरळ मागे फिरले आणि वेगळ्या रोडने बांद्रा स्टेशन गाठलं. बांद्रा स्टेशनला पोहोचल्यावर स्वप्नाचा फोन स्विच ऑफ करुन मी हायवेने सरळ बोरीवलीला गेले आणि तिथून किरणला ब्लँक कॉल केला.

पाचजणांपैकी तिघांचा खेळ आटपलेला होता, पण अद्याप रिझवान आणि किरण हे दोघे बाकी होते. उदयनंतर मी रिझवानला टार्गेट केलं. आय कुड हॅव टार्गेटेड किरण ऑल्सो, बट ही डिझर्व्ह्ड अ स्पेशल ट्रिटमेंट! आपल्या प्रत्येक मित्राचा मृत्यू पाहिल्यावरच सर्वात शेवटी त्याचा नंबर लागणार होता आणि त्याला येणारा मृत्यू हा इतरांपेक्षा वेदनादायक असावा अशी माझी इच्छा होती!

रिझवानला मी दोन - तीन दिवस फॉलो करत होते, पण त्याला एकट्याला गाठण्याचा काहीच मार्ग मला सापडत नव्हता. एकतर धीरज किंवा कौशल यांच्याप्रमाणे त्याला अ‍ॅप्रोच करणं शक्यं नव्हतं आणि त्याच्याबरोबर त्याची फॅमिली राहत असल्याने त्याला रात्री घरी गाठण्याचाही ऑप्शन नव्हता. अ‍ॅज लक वुड हॅव इट, त्या दिवशी सकाळीच त्याची फॅमिली आऊट ऑफ टाऊन गेली! संध्याकाळी तो आणि किरण त्या हॉटेलमध्ये गेले, तेव्हा मी बाहेर कारमध्ये त्यांची वाट पाहत बसून होते. सुमारे तीन तासांनंतर किरण रिझवानला अक्षरश: बखोटीला पकडून बाहेर आला आणि त्याला कारमध्ये कोंबून तिथून निघाला. कॉलनीच्या गेटवर रिझवानला सोडून तो निघून गेला तेव्हा रिझवानला धड उभंही राहता येत नव्हतं! कॉलनीच्या मागच्या लेनमध्ये मी कार पार्क केली आणि कोणाच्याही - खासकरुन त्याच्यावर वॉच ठेवणार्‍या पोलीसांच्या नजरेला पडणार नाही याची प्रिकॉशन घेत लांबूनच एक पूर्ण चक्कर मारली. कोणताही धोका नाही याची खात्री पटल्यावर मी पुन्हा मागच्या बाजूला आले. कंपाऊंडच्या वॉलला तिथे एक होल पडलेलं होतं. ते होल उंचीने खूपच कमी होतं, त्यामुळे खाली वाकत हाता-पायांवर रांगत अंग चोरून मी तिथून आत घुसले!

रोहितच्या नजरेसमोर क्षणार्धात ते भगदाड उभं राहिलं. स्वप्ना तिथूनच आत घुसली असणार हा त्याचा अंदाज अचूक ठरला होता. फक्तं ती स्वप्ना नसून कॅरोल असेल याची तेव्हा त्याला कल्पना नव्हती.

रिझवानच्या बिल्डींगमध्ये लिफ्टवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे हे मी आधीच पाहिलं होतं. त्यामुळे जिन्याने एक मजला चढून गेल्यावर मग मी लिफ्टने वर आले. त्याच्या घरात दाखल झाल्यानंतर माझ्यापुढे एक प्रश्नं होता तो म्हणजे नेमक्या कोणत्या पद्धतीने त्याला खलास करावं? धीरज आणि कौशल ड्रगच्या प्रभावाखाली असल्यामुळे ते कोणतीही हालचाल करण्यास असमर्थ होते. पण रिझवानचं मात्रं तसं नव्हतं. दारुच्या नशेत असला तरी शेवटी तो एक गुंड होता. अचानक उलटून तो कधीही प्रतिहल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अर्थात, त्याने अगदी हातात चाकू घेऊन पूर्ण शुद्धीत असतानाही अ‍ॅटॅक केला असता तरी तो माझ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मी त्याला खलास करु शकत होते हा भाग वेगळा. इनफॅक्ट रिझवानच नाही तर ते पाचहीजण भर दिवसा एकाच वेळी माझ्यावर चाल करुन आले असते तरी मी त्यांना भारी पडले असते! आय अ‍ॅम थर्ड डिग्री कराटे ब्लॅक बेल्ट होल्डर अ‍ॅन्ड सेवन्थ डॅन एकीडो प्रॅक्टीशनर, पण त्यामुळे निष्कारण मोठा आवाज झाला असता, पण दुसरा मार्ग नसल्याने समोर येणार्‍या सिचुएशनप्रमाणे रिअ‍ॅक्ट होण्यापलिकडे दुसरा मार्ग नव्हता.

थर्ड डिग्री कराटे ब्लॅक बेल्ट? सातव्या ग्रेडची एकीडो चॅम्पियन? माय गॉड! त्याचा श्वास क्षणभर जड झाला.

रात्रीच्या अंधारात डोळे उघडल्यावर समोर स्वप्ना आणि प्रिया दोघींचे चेहरे दिसल्यावर रिझवानची जी काही अवस्था झाली.... भर रस्त्यावर दादागिरी आणि मारामार्‍या करण्यात पटाईत असलेला नामचीन गुंड प्रत्यक्षात एवढा पुचाट आणि शेळपट निघेल याची मी कल्पनाही केली नव्हती. स्वत:चा मृत्यू समोर दिसू लागल्यावर तो अक्षरश: चळचळ कापत होता! ज्या प्रियावर अनन्वित पाशवी अत्याचार केले त्याच प्रियाकडे स्वत:च्या जीवाची भीक मागत होता! बास्टर्ड! आय टोटली लॉस्ट मायसेल्फ! मला इतका संताप आला होता, की न राहवून मी त्याला एक लाथ घातली! कदाचित त्यामुळे तो सावध होईल आणि माझ्यावर अ‍ॅटॅक करेल अशा समजुतीने मी तयारीत होते, पण त्याचा उलटाच परिणाम झाला. तो आणखीनच घाबरला आणि एकदम उठून धावत बाल्कनीत जात रेलिंगवर चढून त्याने स्वत:ला खाली झोकून दिलं!

बाल्कनीत पोहोचून मी खाली पाहिलं तोपर्यंत खाली आपटून त्याचं डोकं फुटलं होतं! नेमक्या त्याचक्षणी समोरच्या बाल्कनीत मला हालचाल जाणवली. एका मुलीची बाह्याकृतीच मला फक्तं दिसू शकली. माझ्यादृष्टीने तिथे थांबणं आता धोक्याचं होतं. मागे फिरुन बरोबर नेलेलं सगळं सामान आवरुन त्याच्या फ्लॅटमधून बाहेर पडण्यास मला दोन मिनिटं लागली. इतर फ्लॅट्सची दारं अद्यापही बंदच होती. लिफ्टची वाट पाहण्यात वेळ न घालवता एका वेळेस दोन-दोन तीन-तीन पायर्‍या उतरत मी सहा मजले उतरुन खाली आले. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात मी कॅप्चर होणार याची मला कल्पना होती, पण त्याला इलाज नव्हता. अर्थात माझा चेहरा पूर्णपणे झाकण्याची मी प्रिकॉशन घेतली होती! अंधाराचा फायदा घेत मी धावतच कंपाऊंडच्या वॉलला पडलेल्या त्या भोकाशी आले आणि हातपायांवर रांगत तिथून बाहेर पडले. पण तिथून निसटण्यापूर्वी हाय हिल्सच्या टोची एक प्रिंट मी तिथे उमटवली! एकदा माझी कार गाठल्यावर पोलीस माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत हे मला माहित होतं. कारमध्ये शिरल्यावर मी रिझवानच्या मोबाईलवर तोच मेसेज केला, आणि ठाण्याला तीन हात नाक्यापर्यंत ड्राईव्ह करुन किरणला ब्लँक कॉल केला. दरवेळेस स्वप्नाच्या मोबाईलवरुन किरणला ब्लँक कॉल करण्यामागे माझा दुहेरी हेतू होता. एक म्हणजे किरण आणि स्वप्ना दोघं मिळून हा सगळा उद्योग करत आहेत असं तुम्हाला भासवणं आणि दुसरं म्हणजे टू पुट युवर इन्व्हेस्टीगेशन ऑफ ट्रॅक अ बिट!

रिझवानच्या मृत्यूनंतर फक्तं किरणच बाकी उरला होता. स्वप्ना, प्रिया आणि सुनेहा या तिघींच्या खुनाचा आणि कित्येक मुलींची आयुष्यं उध्वस्तं करणार्‍या सेक्स रॅकेटचा कर्ताकरविता तोच होता. त्याला खलास केल्याविना माझं समाधान होणार नव्हतं! सुरवातीला इतरांप्रमाणेच किरणलाही त्याच्या घरीच गाठावं असा माझा विचार होता, पण तो कुठेही गेला तरी त्याला फॉलो करणारे पोलीस आणि बाप एमएलए असल्याने त्याच्या घरी असलेली सिक्युरीटी पाहून मी तो विचार सोडून दिला. काहीतरी करुन त्याला घरातून बाहेर काढल्याविना तो माझ्या तावडीत सापडणार नाही हे लक्षात आल्यावर मी त्या दृष्टीने प्लॅन करण्यास सुरवात केली. अर्थात तो घरातून बाहेर पडला तरी त्याला गाठणं सोपं जाणार नाही याची मला कल्पना होती. त्याच्यावर दिवसरात्रं वॉच ठेवून असलेल्या पोलीसांनाही चकवणं आवश्यक होतं. अ‍ॅज लक वुड हॅव इट, पोलीसांची काळजी करण्याची माझ्यावर वेळच आली नाही!

त्या दिवशी दुपारी स्वप्नाच्या मोबाईलवरुन किरणला फोन केला तेव्हा मी त्याच्या घरासमोरच होते. त्या फोननंतर किरण चांगलाच घाबरला असावा, कारण जेमतेम दहा मिनिटांत तो घरातून बाहेर पडला. त्याच्या घरावर वॉच ठेवून असलेले पोलीस आणि त्यांच्यामागून मी अशी सगळी वरात तिथून निघाली. तो जुन्या मुंबई - पुणे हायवेला लागताच कर्जतच्या फार्महाऊसवर जाणार हे लक्षात आल्यावर मी त्याला फोन करुन पुन्हा घाबरवलं. त्याबरोबर त्याने प्लॅन चेंज केला आणि फार्महाऊसला न जाता दुसर्‍याच रोडला लागला. त्याने गोवा हायवेला टर्न मारल्यावर तो माणगावला जाणार हे मॅप पाहून मी ओळखलं आणि पुन्हा त्याला फोन करुन धमकावलं. परंतु त्यानंतरही तो त्याच रोडने पुढे जात राहीलेला पाहून आय वॉज कन्फ्यूज्ड अ बिट! तो जेव्हा त्या हॉटेलमध्ये शिरला तेव्हा त्याचा नेमका इरादा काय आहे हे जाणून घेण्यासाठी थोडी रिस्क घेत त्याच्यापाठोपाठ मी आत शिरले. बुरख्याआड दडल्यामुळे तो मला ओळखण्याची शक्यताच नव्हती. काहीतरी ऑर्डर देवून मी वेळ काढत असतानाच अचानक किरण आणि त्याचा ड्रायव्हर समोरुन आल्यावर मी एकदम दचकलेच, पण किरणकडे निरखून पाहिल्यावर त्याची ट्रीक माझ्या लगेच लक्षात आली. ते दोघं किरणच्या कारमध्ये बसून निघून गेल्यावर पंधरा-वीस मिनिटांनी किरण एका माणसाबरोबर बाहेर पडला आणि आलेल्या रोडनेच उलट्या दिशेला निघाला. मी त्याच्या मागे होते, पण मुंबईपासून त्याला फॉलो करत असलेले ते दोघं पोलीस मात्रं त्याच्या ट्रीकला फसून किरणचे कपडे घातलेल्या त्याच्या ड्रायव्हरच्या मागे गेले असावेत, कारण ते मला दिसले नाहीत. तो हायवेने सरळ मुंबईला परत येईल असा माझा अंदाज होता, बट टू माय सरप्राईज, तो आलेल्या मार्गानेच परत मुंबई - पुणे हायवेला आला. तिथे त्याने ती कार सोडली आणि टॅक्सीने खंडाळ्याचं रिसॉर्ट गाठलं. त्याच्यापाठोपाठ रिसॉर्टमध्ये शिरण्याचा मोह टाळून मी बाहेरच कारमध्ये बसून राहीले. रिसॉर्टच्या गेटमधून त्याची टॅक्सी रिकामीच बाहेर पडल्यावर त्याने रिसॉर्टमध्ये रुम घेतली असावी हे मी ओळखलं. इट वॉज जस्ट अ पर्फेक्ट सेटअप! पोलीसांना ब्लफ करुन, कोणालाही काही न सांगता तो या रिसॉर्ट्मध्ये आला होता. ही हॅड वॉक्ड राईट इन टू माय ट्रॅप!

लोणावळा स्टेशनच्या बाहेर कार पार्क करुन मी रिक्षाने रिसॉर्टवर आले. रजिस्टरमध्ये नाव लिहिताना मी त्याचा रुम नंबर पाहून घेतला आणि मुद्दामच तिने उर्दूसारखं काहीतरी खरडून टाकलं. रुममध्ये चेक-इन केल्यावर बरोबर नेलेली वाईनची बॉटल बैराबरोबर किरणच्या रुममध्ये पाठवून दिली. दुपारपासून 'स्वप्ना' मागे लागल्याने त्याची चांगलीच पळापळ झाली होती, त्यामुळे नाही म्हटलं तरी तो थोडाफार घाबरला असणार हा माझा अंदाज होता. एवढ्या धावपळीनंतर का होईना पण तिचा पिच्छा सोडवण्यात आपण एकदाचे यशस्वी झालो या समाधानात तो थोडासा केअरलेस राहणार हे उघड होतं. वाईन हा त्याचा विकपॉईंट होता आणि त्याचाच मला फायदा होणार होता. पहाटे दोनच्या सुमाराला मी त्याच्या रुममध्ये शिरले तेव्हा तो गाढ झोपेत होता. अ‍ॅज आय हॅड एक्स्पेक्टेड, त्याने वाईनची पूर्ण बाटली संपवली होती! अ‍ॅट लास्ट, आय हॅड दॅट बास्टर्ड अ‍ॅट माय मर्सी!

रिसॉर्टमधल्या त्याच्या रुममध्ये 'स्वप्ना'चं अस्तित्वं जाणवल्यावर त्याची जी काही अवस्था झाली....

तोंडातून धड शब्दं फुटत नाही, ऊठून पळून जाणं दूरच राहिलं साधे हात - पायही नीट हलवता येत नाहीत, मदतीसाठी कोणीही येण्याची शक्यता नाही आणि एकेकाळची आपली पापं सुनेहा, प्रिया आणि स्वप्ना या तिघींच्या चेहर्‍याच्या स्वरुपात समोर दिसताहेत... माणसाच्या चेहर्‍यावर भितीच्या किती वेगवेगळ्या शेड्स दिसू शकत असतील त्या सगळ्या एकापाठोपाठ एक त्याच्या चेहर्‍यावर उमटत होत्या! अ‍ॅज इफ दॅट फकींग बास्टर्ड वॉज हॅविंग हिज अ‍ॅस रिप्ड अपार्ट...

सॉरी फॉर द चॉईसेस्ट ऑफ द वर्ड्स, बट आय विश आय कुड डिस्क्राईब इट बेटर! त्याच्या कचाट्यात सापडलेल्या निष्पाप तरुण मुलींच्या असहाय्यतेचा फायदा उठवत त्यांच्यावर अमानुष अत्याचार करणारा, पाशवी बलात्कार करुन त्यांचं आयुष्यं उध्वस्तं करणारा आणि वेळप्रसंगी त्यांचे खून पाडणारा तो नराधम स्वत:च्या जीवाची मात्रं भीक मागत होता! आणि ते देखिल कोणाकडे तर त्यानेच अनन्वित हाल करुन आणि रेप करुन हत्या केलेल्या प्रिया आणि सुनेहा यांच्याकडे आणि स्वप्नाकडे... अर्थात त्याने कितीही करुणा भाकली, तरी त्या तिघींच्या जीवाची किंमत त्याला चुकवावी लागणारच होती! इट वॉज द पेबॅक टाईम अ‍ॅन्ड ही हॅड टू पे विथ हिज लाईफ!

त्याच्या शरीरातली एकेक संवेदना हळूहळू नष्टं होत असलेली मला दिसत होती. काही मिनिटांनी त्याला स्वत:चं बोटही हलवणं अशक्यं झालं! केवळ त्याच्या श्वास सुरु असल्याने छाती वरखाली होत होती एवढंच, बाकी जिवंतपणाची दुसरी कोणतीही खूण त्याच्या शरीरावर दिसत नव्हती. आता तर साधा श्वास घेणंही त्याला कठीण जात होतं. त्याच्या डोळ्यांत अपार वेदना साकळली होती. क्षणभर.... अगदी क्षणभरच त्याला सोडून द्यावं असं मला वाटलंही, पण दुसर्‍याच क्षणी स्वप्नाचा चेहरा माझ्या नजरेसमोर उभा राहीला आणि तो विचार मी मनातून झटकून टाकला. या क्षणी त्याला कोणतीही दया दाखवणं म्हणजे स्वप्ना, प्रिया आणि सुनेहा तिघींच्या मृत्यूचा अपमान होता. नो वे इन द वर्ल्ड आय वॉज डुइंग इट! ही डिझर्व्ह्ड व्हॉट ही वॉज गेटींग!

काही वेळाने माझ्या डोळ्यांसमोर त्याने अखेरचा श्वास घेतला ....

माझ्या रुममध्ये मी परतले तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते. जेमतेम दोन-अडीच तासच मला रेस्ट मिळू शकणार होती. साडेपाच वाजता अलार्मने जाग आली, तेव्हा खरंतर मला चांगलाच थकवा जाणवत होता. पण तिथून सकाळी लवकरच बाहेर पडणं तितकंच आवश्यक होतं. तुम्ही रात्रभर किरणचा शोध घेत असणार याची मला कल्पना होती. न जाणो तुम्ही त्या रिसॉर्टमध्ये पोहोचला असतात आणि मी तिथे सापडले असते तर आय वुड हॅव बीन डन फॉर! निघण्यापूर्वी आता शेवटचं एक काम उरलं होतं. हॉटेलमागच्या गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकच्या बहाण्याने येत रात्री किरणच्या रुममधून उचललेला त्याचा मोबाईल मी ऑन केला आणि कोणाचंही लक्षं नाही असं पाहून बाल्कनीमध्ये टाकून दिला. रुम चेकआऊट करुन रिसॉर्टच्या शटल सर्विसने लोणावळा एस टी स्टँडवर येताना किरणच्या मोबाईलवर तो मेसेज केला. लोणावळा स्टँडवर पोहोचल्यावर तिथल्या रेस्टरुममध्ये चेंज करुन मी स्टेशनवर आले तो मुंबईला जाणारी ट्रेन येत होती. स्टेशनबाहेर पार्क केलेली माझी कार पिकअप केली अ‍ॅन्ड विदीन नो टाईम आय वॉज ऑन माय वे!

मुंबईला पोहोचले तेव्हा आय वॉज डेड टायर्ड! दिवसभर काहीही न करता आराम करावा या इन्टेन्शनने लवकरच लंच आटपून मी बेडवर पडले, पण खूप दमलेली असूनही बराच वेळ झाला तरी मला झोप येत नव्हती. आय फेल्ट अ बिग व्हॉईड फ्रॉम विदीन! खूप रिक्तं रिक्तं वाटत होतं आणि खूप मोकळंही! स्वप्नाचा चेहरा सारखा माझ्या नजरेसमोर उभा राहत होता. माझं सगळं प्लानिंग, कोणत्याही क्षणी काहीतरी एलिमेंट्री मिस्टेक होईल आणि आपला खेळ खलास होईल हे सततचं टेन्शन, दिवसचे दिवस त्या पाचही जणांचा केलेला पाठलाग, सततची धावपळ आणि अनेकदा कसलीही पर्वा न करता बेदरकारपणे केलेलं साहस ... सगळं काही सत्कारणी लागलं होतं. स्वप्ना, अ‍ॅन्ड फॉर दॅट मॅटर प्रिया आणि सुनेहा.... तिघींचीही निर्दयपणे हत्या करणार्‍या त्या पाचही जणांना कोणतीही दयामाया न दाखवता, तितक्याच निर्दयतेने मी खलास केलं होतं! द टेबल्स हॅड टर्न्ड! तिघींच्या तुलनेत त्या पाचजणांना आलेला मृत्यू तितका यातनामय नसला, तरी अखेरच्या क्षणी त्यांच्यापैकी प्रत्येकजण त्या तिघींपेक्षाही जास्तं हतबल आणि असहाय्य होता! आय नेव्हर थॉट, द रिव्हेंज कुड हॅव सच अ स्वीट टेस्ट! द गेम वॉज ओव्हर... वेल अ‍ॅन्ड ट्रू ली ओव्हर, वन्स अ‍ॅन्ड फॉर ऑल!

पत्रातल्या शब्दाशब्दांतून त्या पाचजणांबद्दलचा तिचा संताप आणि तिरस्कार जाणवत होता.

आय अ‍ॅम शुअर मि. प्रधान, यू विल हॅव अ लॉट्स अ‍ॅन्ड लॉट्स ऑफ क्वेश्चन्स गोईंग थ्रू युवर माईन्ड सो फार! लेट मी ट्राय टू अ‍ॅड्रेस देम वन बाय वन!

फर्स्ट ऑफ ऑल, धीरज, कौशल आणि रिझवान यांच्या घरात मी कशी घुसले? द अ‍ॅन्सर इज व्हेरी सिंपल, माझ्याकडे त्यांच्या दाराच्या लॅचलॉकच्या पास कीज होत्या! आता त्या माझ्याकडे कशा आल्या ऑर रादर, मी त्या कुठून आणि कशा बनवून घेतल्या हे विचारलंत, तर आय वुड सिंपली से, दॅट इज अ ट्रेड सिक्रेट! आय डू नॉट टेक एनी नेम्स! ओन्ली थिंग आय कॅन टेल यू इज, अ डे ऑर टू बिफोर इच वन ऑफ देम वॉज डन फॉर, मी त्यापैकी प्रत्येकाच्या घरापर्यंत गेले होते, फक्तं त्या वेळेस आत शिरण्याचं मात्रं टाळलं होतं!

कॅरोलच्या बुद्धीमत्तेची ही आणखीन एक झलक होती! धीरज, कौशल आणि रिझवान तिघांच्याही सोसायटीत आणि फ्लॅट्समध्ये ती ज्या बेमालूमपणे शिरली होती आणि त्यांची हत्या करुन आरामात निसटून गेली होती ते पाहता त्याच मार्गाने तिने आधीही सोसायटीत प्रवेश मिळवला असणार हे उघड होतं! रिझवानच्या बिल्डींगमध्ये असलेला तो सीसीटीव्ही कॅमेरा तिने त्याचवेळी पाहिला असावा! ती केवळ हुशार आणि डोकेबाजच नव्हती पण अत्यंत प्रसंगावधनी आणि कमालीची धाडसी होती याचा त्याला पुन्हा प्रत्यय आला.

धीरज, कौशल, रिझवान आणि किरण हे चौघंही पक्के बनेल आणि तसे निर्ढावलेले होते. पण अचानक नजरेसमोर सुनेहा, प्रिया आणि स्वप्ना यांचे केवळ चेहरे दिसल्यावर.... दे वेअर स्केअर्ड लाईक हेल! जस्ट इमॅजिन, तुम्ही एखाद्या व्यक्तिचा मृतदेह स्वत:च्या डोळ्यांनी पाहीलात, अ‍ॅन्ड वन फाईन डे, त्या माणसाचा फक्तं चेहराच तुमच्या डोळ्ञांसमोर प्रगट झाला तर? हा माणूस जिवंत नाही याची तुम्हाला पक्की खात्री असताना, आऊट ऑफ द ब्ल्यू, फक्तं त्याचा चेहरा समोर आला तर, नॅचरली देअर विल बी अ शॉक इफ नॉट द फिअर! त्या पाचजणांनी सुनेहा आणि प्रियाला ब्रूटली टॉर्चर करुनकेलं होतं आणि तिघींनाही रेप करुन त्यांची हत्या केली होती. इट वॉज इन देअर सबकॉन्शस माईन्ड. असं असताना त्यांच्यापैकी कोणाचाही चेहरा समोर येणं... इट वॉज अ हॉरीबल शॉक फॉर देम! एक रिझवान सोडला तर इतरांच्या सिस्टीममध्ये असलेल्या ड्रगच्या इफेक्टमुळे त्यांच्या मूव्हमेंट्सही मंदावलेल्या होत्या! आपली ही अवस्था आपणच खून केलेल्या आणि समोर प्रगट झालेल्या मुलीमुळे झाली असावी अशी त्यांची समजूत होणं हे अगदी नॅचरल होतं. दॅट रियलायझेशन वॉज लाईक कमिंग फेस टू फेस विथ द डेथ! द सडन शॉक अ‍ॅन्ड द फिअर इन देअर माईन्ड वॉज द की, अ‍ॅन्ड आय एक्सप्लॉयटेड दॅट टू मॅक्सिमम पॉसिबल इफेक्ट!

नाऊ द क्वेश्चन इज, त्या तिघींचे चेहरे त्यांच्यासमोर कसे आले? वेल..... फोटोशॉपमध्ये त्यांच्यापैकी प्रत्येकीचे फोटो एडीट करुन मी त्यांच्या चेहर्‍याचे थ्री - डायमेन्शनल होलोग्राम्स बनवले होते! आता मी ते कसे तयार केले आणि कसे प्रोजेक्ट केले याबद्दल एवढंच सांगेन, की इंटरनेटवर त्याबद्दल शेकड्याने व्हिडीओज सापडतील. त्यातलीच काही टेक्नीक्स मी वापरली. ते होलोग्राम्स जास्तीत जास्तं रिअ‍ॅलिस्टीक वाटणं अत्यावश्यक होतं! नॉट ओन्ली दॅट, होलोग्राम्स रेडी झाल्यावर ते प्रोजेक्ट करण्यासाठी आवश्यक असलेला सेटअप कमीत कमी वेळेत उभा करणं आणि त्यापेक्षाही कमी वेळेत तो डिसमेंटल करुन पॅक करणं माझ्या दृष्टीने फार महत्वाचं होतं. आय हॅड स्पेन्ट अवर्स टू फाईन ट्यून इट डाऊन टू कपल ऑफ मिनिट्स!

आय अ‍ॅम शुअर प्रत्येकाच्या डेडबॉडीजवळ आणि उदयच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या प्लेइंग कार्ड्सचा तुम्ही योग्य तो अर्थ काढलाच असेल! द सिक्वेन्स वॉज द डेड मॅन्स हॅन्ड! अर्थात याचा बिल हिकॉक आणि डेड मॅन्स हॅन्डच्या मूळ लेजंडशी काहीही संबंध नाही. प्रत्येकाच्या मृत्यूबरोबर माझ्याजवळचं एकेक कार्ड कमी होत होतं, पण त्याचबरोबर शिल्लक असलेलं प्रत्येक कार्ड माझ्या पुढच्या टार्गेट्सची जाणिवही करुन देत होतं. शेवटचं कार्ड अर्थातच डायमंड जॅक होता, विच आय रिझर्व्हड फॉर किरण!

मी त्या पाचजणांपर्यंत कशी पोहोचले?

आय अ‍ॅम शुअर यू विल बी डेस्परेट अ‍ॅन्ड अ‍ॅट द सेम टाईम इक्वली क्युरीअस टू नो व्हॉट वॉज द मोटीव्ह बिहाईंड ऑल धिस! अ‍ॅज आय सेड व्हेन वी मेट, अ क्युरीअस पोलीस ऑफीसर इज ऑल्वेज अ व्हेरी डेंजरस प्रपोझिशन! लेट मी एक्सप्लेन....

रोहित वाचता - वाचता एकदम मध्येच थांबला. त्याने ते वाक्यं पुन्हा एकदा वाचलं.

अ क्युरीअस पोलीस ऑफीसर इज ऑल्वेज अ व्हेरी डेंजरस प्रपोझिशन!

हे शब्दं.... हे वाक्यं आपण आधीही कोणाच्या तरी तोंडून ऐकलं आहे....
एक क्षणभर तो विचारात पडला.... क्षणभरच!
दुसर्‍याच क्षणी ती लिंक लागली!
या केसमध्ये त्याने आतापर्यंत एकापेक्षा एक धक्के पचवले होते, पण हा मात्रं अक्षरश: कळस होता!

प्रियाचा खून झाल्यावर स्वप्नाचं नाव पुढे आलं होतं. त्यानंतर एकेक करुन त्या पाचजणांची हत्या होईपर्यंत हे सर्व स्वप्नानेच केलं आहे असं दर्शवणारे सर्व पुरावे समोर आले होते. सापुतारा पोलीसांना सापडलेल्या सांगाड्यावरचं लॉकेट रोशनीने ओळखल्यावर वर्षाभरापूर्वीच स्वप्नाचाही खून झाल्याचं स्पष्टं झालं! नेमकी आदल्या रात्रीच कॅरोल ऑस्ट्रेलियाला निघून गेल्याचं उघडकीला आल्यामुळे संशयाची सुई तिच्याकडे वळली होती. पण प्रत्यक्षात कॅरोलचा या सगळ्याशी काही संबंधच नव्हता! त्याच रात्री ती सिडनीला गेली हा निव्वळ योगायोग होता!

त्या एका वाक्याने या सगळ्या प्रकरणाचा खरा मास्टरमाईंड समोर आला होता!

एक क्षणभर विचार करुन रोहितने आपल्या समोरची पॅसेंजर्सची लिस्ट उचलली. आदल्या रात्रीच गेलेल्या युनायटेड एअरलाईन्सच्या मुंबई – नेवार्क फ्लाईटच्या पॅसेंजर्सच्या लिस्टमध्ये बिझनेस क्लास पॅसेंजर्समध्ये त्याला ते नाव आढळून आलं! स्वप्नाच्या मागे दडून हा सगळा खेळ तिने रचला होता तर! क्षणभर तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोर तरळला. त्या मोहक चेहर्‍याआड एक अत्यंत हुशार पण तितकीच कोल्ड ब्लडेड किलर दडलेली असेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. पण हे सगळं तिने का केलं? या सगळ्याशी तिचा काय संबंध होता? काही क्षण गेल्यावर त्याने पुन्हा वाचण्यास सुरवात केली.

लाईक आय सेड अर्लीयर, सुनेहाचा खून होण्याच्या आधीपासूनच स्वप्ना त्या सेक्स रॅकेटच्या मागावर होती. वी हॅड टॉक्ड अ लॉट अबाऊट इट! या रॅकेटचा शोध घेताना प्रिकॉशन म्हणून तिने एक अनलिस्टेड नंबरही मिळवला होता. हा तिचा नंबर फक्तं माझ्याकडे आणि प्रियाकडे होता. धीरजकडून इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी प्रियाला प्लान्ट करण्याची तिची स्कीमही मला पूर्णपणे माहीत होती. ज्या दिवशी तिची आणि प्रियाची हत्या झाली, त्या दिवशी सकाळी याच नंबरवरुन तिने मला कॉल केला होता. त्या रॅकेटच्या संदर्भात महत्वाची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी दोन दिवस बाहेर जात असल्याचं तिने सांगितलं आणि ती फोन करेपर्यंत तिला फोन करु नये असंही बजावलं! आफ्टर दॅट शी कम्प्लीटली डिसअ‍ॅपिअर्ड आऊट ऑफ साईट! ऑल्मोस्ट एक वीकनंतरही तिचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही म्हटल्यावर, तिने फोन करु नये असं वॉर्न केलं असूनही मी तिला फोन करण्याचा प्रयत्नं केला, बट बोथ ऑफ हर फोन्स वेअर स्विच्ड ऑफ! तिला मी अनेक मेसेजेसही पाठवले, बट देअर वॉज नो आन्सर! तिला पाठवलेल्या एकाही इमेललाही तिने रिप्लाय केला नाही! धिस वॉज व्हेरी अनलाईक हर! जवळपास पंधरा दिवस झाले तरी तिचा काही कॉन्टॅक्ट होत नाही म्हटल्यावर, शेवटचा चान्स म्हणून मी आमचा कॉमन क्लाऊड अकाऊंट चेक केला, अ‍ॅन्ड गेस व्हॉट....

क्लाऊडवर फोटो होते... स्वप्नाचे शेवटचे फोटो!
अर्थात ते तिचे शेवटचे फोटो आहेत हे त्यावेळेस मला माहित नव्हतं....

सापुतारा पोलीसांना त्या सांगाड्यापाशी सापडलेल्या आणि छिन्न विच्छीन्न झालेला तो फोन त्याच्या नजरेसमोर तरळला. स्वप्नाचा अनलिस्टेड फोन तोच असणार! तिची हत्या केल्यावर मृतदेह दरीत फेकताना उदय आणि कौशलच्या नजरेतून हा फोन सुटला होता. बहुतेक तो तिने आपल्या कपड्यांमध्ये खुबीने दडवला असावा.

स्वप्ना हॅड अ पिक्युलियर हॅबिट. तिच्या कॅमेर्‍याने काढलेला प्रत्येक फोटो ब्ल्यूटूथने तिच्या मोबाईलवर आणि तिथून क्लाऊडमध्ये अपलोड होत असे. अ‍ॅपार्ट फ्रॉम हर कन्व्हेन्शनल कॅमेरा, तिच्याकडे एक बॉडी कॅमेरा होता. तिच्या लॉकेटच्या पेंडंटमध्ये हा कॅमेरा इतक्या बेमालूमपणे अ‍ॅडजेस्ट केलेला होता की तो कॅमेरा आहे असा कोणाला डाऊटही आला नसता! दिसायला लहानसा असला तरी प्रत्यक्षात तो अत्यंत पॉवरफुल कॅमेरा होता, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो मोशन अ‍ॅक्टीवेटेड होता. या कॅमेर्‍याचं ऑपरेशन तिच्या मोबाईलवर असलेल्या अ‍ॅपमधून कंट्रोल करता येत होतं. दोन वर्षांपूर्वी भारतात आलेली असताना तो कॅमेरा असलेलं पेंडंट मीच तिला गिफ्ट दिलं होतं, त्यामुळे त्याचं ऑपरेशन कसं चालतं याची मला पूर्ण कल्पना होती. उदय आणि कौशलने मस्तान नाक्यावर स्वप्नाला पिकअप करण्यापूर्वी स्वप्नाने कॅमेरा ऑन केला असावा, कारण त्या दोघांचे फोटो कॅमेर्‍यात कॅप्चर झालेले दिसत होते आणि तिच्या सेटअपमुळे क्लाऊडवर अपलोडही झाले होते. इतकंच नव्हे तर, चहा पिण्याच्या निमित्ताने त्यांनी स्वप्नाला ड्रग्ज घातलेलं कोल्ड्रींक दिलं त्यावेळचे त्यांचे फोटोही अपलोड झाले होते! ती अनकॉन्शस झाल्यावर उदयने तिचा फोन स्विच ऑफ केला होता त्यामुळे तिला स्ट्रँगल करतानाचे फोटो कॅमेर्‍यात कॅप्चर झाले असलेच तरी ते क्लाऊडवर मात्रं नव्हते. इन अ हाईन्डसाईट, दॅट वॉज अ ब्लेसिंग इन्डीड.... आय कुड हॅव गॉन मॅड टू सी हर बिइंग डन टू डेथ!

रोहितने टेबलच्या ड्रॉवरमध्ये असलेलं ते लॉकेट बाहेर काढून टेबलवर ठेवलं. त्या लॉकेटमध्ये दडलेलं सिक्रेट हे होतं तर! ड्रॉवरमधलं भिंग उचलून अधिकच बारकाईने सर्व बाजूंनी त्याने ते लॉकेट तपासून पाहण्यास सुरवात केली, तेव्हा नजरेतून निसटलेली एक गोष्टं त्याच्या दृष्टीस पडली. लॉकेटच्या पेंडंटमध्ये बसवलेल्या लाल रंगाच्या खड्याच्या कडेने एक अगदी बारीकशी चीर होती. पेंडंटच्या डिझाईनचाच एक भाग वाटावा इतक्या बेमालूमपणे ती चीर पाडलेली दिसत होती. नखाने त्यावर दाब देताच खड्याचा दर्शनी भाग एकदम वर उचलला गेला. हलकेच त्याने तो भाग बाजूला केला आणि पेंडंटमध्ये दडलेला लहानशा शेंगदाण्याएवढा तो कॅमेरा त्याच्या नजरेस पडला. अलगदपणे तो कॅमेरा काढून त्याने आपल्यासमोर पांढर्‍या स्वच्छ टिश्यूवर ठेवला. त्याचं ऑपरेशन कसं चालतं किंवा त्यासाठी कोणती अ‍ॅप वापरावी लागते याची त्याला अर्थातच कल्पना नव्हती! काही क्षण कॅमेर्‍याचं निरीक्षण केल्यावर त्याने पुन्हा पुढे वाचण्यास सुरवात केली.

स्वप्नाला त्या दिवशी भेटलेल्या दोन माणसांचे फोटो माझ्यासमोर होते. अ‍ॅन्ड आफ्टर दॅट शी हॅड सिंपली डिसअ‍ॅपिअर्ड विदाऊट अ ट्रेस! आय स्मेल्ड द रॅट इन्स्टंटली! सेक्स रॅकेटमध्ये इन्व्हॉल्व्ह असलेल्या ज्या पाचजणांच्या मागावर ती होती, त्यांच्यापैकीच कोणाचे तरी हे फोटोग्राफ्स असावेत असा माझा अंदाज होता. स्वप्नाचं काहीतरी बरवाईट झालं असावं आणि त्यात या दोघांचा हात असावा याबद्दल मला कोणतीच शंका नव्हती. फक्तं प्रश्नं होता तो म्हणजे त्या पाचजणांपैकी हे दोघं नेमके कोण आहेत? इंटरनेटवर त्यांच्या नावाने शोध घेण्याचा प्रयत्नं केला असता प्रत्येकाबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन मिळाली, पण किरण आणि उदय सोडून कोणाचेही फोटोग्राफ्स मिळाले नाहीत. एका प्रोफेशनल नेटवर्कींग साईटवर त्याच्या नावाचं प्रोफाईल आणि फोटो सापडला. तो फोटो पाहिल्यावर स्वप्नाच्या कॅमेर्‍यात कॅप्चर झालेल्या दोघांपैकी एकजण हा उदयच होता ही माझी खात्री झाली! मात्रं तो दुसरा फोटो किरणशी मॅच होत नव्हता.

स्वप्ना नाहीशी झाल्यावर दोन - अडीच महिन्यांनी माझ्या प्रोजेक्टमध्ये भारतातून चार सॉफ्टवेअर इंजिनिअर्स ऑनसाईट असाईनमेंटसाठी येणार असल्याबद्दल इमेल आली. त्यात एक नाव होतं उदय इनामदार! किरण आणि कौशलचा मित्रं असलेला उदय इनामदार हा देखिल एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होता फक्तं हा तोच आहे का दुसराच कोणी एवढाच प्रश्नं होता. बट द मोमेंट आय सॉ हिम, आय ऑलमोस्ट लॉस्ट मायसेल्फ! सगळ्यांसमोर त्याला अक्षरश: तुडवून काढावं आणि स्वप्नाबद्दल सत्यं ओकायला भाग पाडावं असं मला वाटत होतं. काहीतरी कारण काढून मी सरळ घरी निघून गेले. घरी पोहोचल्यानंतरही शांत होण्यास मला कितीतरी वेळ लागला! डोक्यात राख घालून काही उपयोग नव्हता. आय हॅड टू हँडल धिस विथ क्लीअर माईन्ड. प्रियाने धीरजवर केलेला प्रयोगच उदयवर करण्याचं मी ठरवलं. स्वप्नाच्या बाबतीत नेमकं काय झालं आणि त्याला कोणकोण जबाबदार आहे याचा पत्ता लावण्यासाठी सर्वप्रथम या उदयशी मैत्री करुन त्याला संशय येणार नाही अशा पद्धतीने त्याच्याकडून इतरांबद्दल मिळेल तेवढी माहिती काढून घेणं शक्यं होतं. त्यानंतर पुढे काय करायचं हे ठरवता आलं असतं!

सर्वप्रथम मी माझा गेटअप पूर्णपणे बदलला. माझी हेअरस्टाईल बदलली, डोळ्याला जाडजूड फ्रेमचे पण झिरो नंबरचे स्पेक्स वापरण्यास सुरवात केली. अनायसे विंटर सुरु असल्याने जीन्स आणि फुल स्लीव्ह्जचे टॉप्स, त्यावर जॅकेट आणि जवळपास अर्धा चेहरा झाकला जाईल असा स्कार्फही वापरण्यास सुरवात केली! माझा हा अवतार पाहून ऑफीसमध्ये अर्थातच सगळ्यांनी चौकशी केली, पण 'पर्सनल अ‍ॅन्ड मेडीकल रिझन' एवढंच सांगून मी तो विषय संपवला. सिस्टीमॅटीकली मी उदयशी मैत्री वाढवण्यास सुरवात केली. इतरांना सोडून फक्तं त्याला एकट्याला लंचला नेणं, न्यूयॉर्क - न्यूजर्सी फिरवणं मी सुरु केलं. अपेक्षेप्रमाणेच त्याने माझ्याभोवती पिंगा घालायला सुरवात केली. मला त्याच्याबरोबर पब्ज आणि डिस्कोमध्ये, इतकंच काय स्ट्रीपक्लबमध्येही चलण्याविषयीही त्याने विचारलं होतं. एकदा तर डिनर घेतल्यावर हॉटेलमधल्या आपल्या रुमवर येण्याचंही त्याने अगदी बिनदिक्कतपणे मला आमंत्रण दिलं होतं. खरंतर मनातून मला त्याची किळस येत होती, पण त्याच्याकडून इतरांबद्दल माहिती मिळेपर्यंत तरी त्याचा लाळघोटेपणा सहन करण्यावाचून मला पर्याय नव्हता. त्याला कोणताही संशय येणार नाही याची प्रिकॉशन घेत अगदी सहजपणे त्याच्या भारतातल्या मित्रांविषयी चौकशी करण्यास मी सुरवात केली. त्याचा बोस्टींग नेचर माझ्या फायद्याचा ठरला होता. भारतात आपल्या राजकारणापासून सर्व क्षेत्रात भरपूर ओळखी आहेत, मुंबईत तर आपले कॉन्टॅक्ट्स वापरुन आपण कोणतंही काम करु शकतो वगैरे त्याने भरपूर फुशारक्या मारल्या. किरण आपला खास मित्रं आहे आणि त्याचे वडील एमएलए असल्यामुळे एखाद्याला धमकावलं आणि वेळप्रसंगी हातपाय तोडले तरी आपल्याला हात लावण्याची कोणाही हिम्मत नाही असंही त्याने अगदी बिनदिक्कतपणे सांगितलं! मोबाईलमधले त्यांचे फोटोही त्याने मला दाखवले. ते पाहताच स्वप्नाच्या कॅमेर्‍यातला दुसरा फोटो कौशलचा आहे हे मी लगेच ओळखलं. माझा फोटो काढण्याचा किंवा माझ्याबरोबर सेल्फी काढण्याचाही त्याने अनेकदा प्रयत्नं केला. पण मी मात्रं काही ना काही कारण काढून दरवेळेस ते टाळत राहीले. माझ्या नकळत त्याने माझा फोटो काढलाच, तर तो कोणालाही ओळखता येवू नये यासाठी मी माझा गेटअप बदलला होता. मी स्वत:कडे नीट लक्षं दिलं, जाड फ्रेमचे स्पेक्स लावण्याऐवजी कॉन्टॅक्ट्स वापरले आणि नीट हेअरस्टाईल केली आणि नीट ड्रेसिंग केलं, तर मी एकदम वेगळी आणि अ‍ॅट्रॅक्टीव्ह दिसेन वगैरे भरपूर मस्का लावण्याचाही त्याने प्रयत्नं केला. भारतात परत येण्यापूर्वी शेवटच्या दिवसापर्यंत मी एकदा तरी त्याच्या हॉटेलमधल्या रुमवर यावं म्हणून तो पुन्हा-पुन्हा आग्रह करत होता आणि मला कधी एकदाची ही पीडा इथून जाते आहे असं झालं होतं! ब्लडी बास्टर्ड!

न्यूयॉर्कहून परतल्यानंतरही उदय जवळपास रोजच इमेल आणि कधीकधी फोन करुन माझ्याशी कॉन्टॅक्ट वाढवण्याच्या प्रयत्नात होता. अनेकदा त्याने मला व्हिडीओ कॉलसाठी आग्रह केला, पण मी त्याला अजिबात दाद दिली नाही. दोन महिन्यांनी मी माझा जॉब सोडला आणि पूर्ण तयारी करुन भारतात आले. कोणतीही हालचाल करण्यापूर्वी माझ्यापुढे सर्वात महत्वाचं टास्क होतं ते म्हणजे मुंबईच्या ट्रॅफीकमध्ये आणि नेहमीपेक्षा उलट्या दिशेने कार ड्रायव्हिंगची स्वत:ला सवया लावून घेणं आणि प्रॅक्टीस करणं! माझ्या डोक्यात जो टेन्टेटीव्ह प्लॅन रेडी होता, त्या दृष्टीने हे फार आवश्यक होतं. एकतर कायम पब्लिक ट्रान्सपोर्टवर डिपेंड राहणं शक्यंच नव्हतं, अ‍ॅन्ड आय डिड नॉट वॉन्ट टू हॅव समवन ड्राईव्ह मी अराऊंड अ‍ॅन्ड लिव्ह बिहाईंड अ ट्रेल विच कॅन बी ट्रेस्ड टू मी! यू मे नॉट बिलीव्ह, जवळपास पंधरा - वीस दिवस रोज आठ - दहा तास भर गर्दीच्या रस्त्यांवरुन आणि पीक अवर्सच्या ट्रॅफीकमध्ये मी कार ड्राईव्ह करत होते. अ‍ॅन्ड टू बी ऑनेस्ट, इट बीट मी डाऊन लाईक हेल! त्यानंतर काय झालं हे वर आलंच आहे.

आय अ‍ॅम शुअर, उदयच्या अ‍ॅक्सिडेंटनंतर मी ताजमधून बाहेर पडताना आणि परत येताना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कशी दिसले नाही हा प्रश्नं तुम्हाला पडला असेल. तो मोतीमहलमधून बाहेर पडल्यावर मला भेटण्यासाठी ताजमध्ये येणार हे लक्षात येताच मी त्याचा पाठलाग सोडून हॉटेलवर आले. हॉटेलच्या पार्कींग लॉटला कार पार्क न करता मी बाजूलाच असलेल्या लेनमध्ये रोडवर पार्क केली आणि मुख्य दरवाज्याने रिसेप्शनला न येता सर्विस एन्ट्रन्सने आत शिरले. उदय त्याची कार पार्क करुन लॉबीत येण्यापूर्वीच मी माझ्या रुममध्ये पोहोचले होते. रिसेप्शनवरुन तो आल्याबद्दल कॉल आल्यावर दहा मिनिटांनी मी आरामात खाली उतरले.

रेस्टॉरंटमध्ये बसून डिनर घेत असताना उदयच्या बोलण्याचा सगळा रोख माझ्यात झालेलं सो कॉल्ड ट्रान्स्फॉर्मेशन यावरच होता! मी विषय बदलण्याचा प्रयत्नं केला तरी त्याची गाडी पुन्हा त्याच विषयावर येत होती. मी काही दिवस भारतातच राहून मॉडेलिंगमध्ये करीअर करावं, या फिल्डमध्ये आपले भरपूर मित्रं आहेत वगैरे त्याने बोस्टींग केलं. तीच लिंक पकडून मी त्याच्या ग्रूपमधल्या मित्रांबद्दल अगदी सहजपणे चौकशी केली, तेव्हा मात्रं तो एकदम उदास झाला. आपल्या चार मित्रांपैकी दोघंजणं सडनली एक्सपायर झाल्याचं त्याने मला सांगितलं. अर्थात आपणही त्यांच्याप्रमाणेच नरकाच्या वाटेवर आहोत याची तेव्हा त्याला कल्पना नव्हती! त्याने पुरेसं 'ड्रिंक' घेतलं आहे याबद्दल खात्री झाल्यावर मी जेटलॅगचं कारण पुढे करुन डिनर आटपलं. त्याला सी-ऑफ करण्यासाठी मी मुद्दाम बाहेर गेले होते. तो निघून गेल्यावर आत येताना त्याला फॉलो करणारा पोलीसांचा माणूसही पाहिला. लॉबीत परत आल्यावर मेन एन्ट्रन्सने बाहेर न पडता पुन्हा एकदा सर्विस एन्ट्रन्सने मी बाहेर पडले, अ‍ॅन्ड देन आय स्टार्टेड फॉलॉईंग हिम!

अ‍ॅज कम्पेअर्ड टू धीरज अ‍ॅन्ड कौशल, त्याच्या ड्रिंकमध्ये मिक्स केलेला ड्रगचा डोस इतका स्ट्राँग होता की तो फारतर दहा - पंधरा मिनिटंच हालचाल करु शकला असता! अ‍ॅन्ड अ‍ॅज आय हॅड एक्स्पेक्टेड, स्वप्नाच्या नंबरवरुन त्याला मेसेज पाठवल्यावर जेमतेम दोन - तीन मिनिटांतच त्याची कार त्या बसवर क्रॅश झाली! त्यानंतर बोरीवली गाठून मी किरणला ब्लँक कॉल केला ते वर आलंच आहे. ताजमधून सर्विस एन्ट्रन्सने बाहेर पडणं सहज शक्यं झालं असलं तरी परत आत शिरणं आणि ते देखिल रात्रीच्या वेळेस कठीण होतं. मेन एन्ट्रन्सने आत शिरल्यास तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात मी कॅप्चर होणार हे उघड होतं आणि नेमकं तेच मला टाळायचं होतं. उदयच्या मृत्यूची इन्क्वायरी करण्यासाठी पोलीस माझ्याकडे येणार हे एक्स्पेक्टेड होतं, बिकॉज आय वॉज द लास्ट पर्सन टू मिट हिम! अशा सिचुएशनमध्ये, उदयचा अ‍ॅक्सिडेंट झाल्यावर रात्री उशीरा मी परत येताना सीसीटीव्हीत दिसणं वॉज इनफ टू पुट मी बिहाईंड द बार्स! त्या रात्री ताजला परत न येता मी बांद्र्यालाच एका गेस्ट हाऊसमध्ये राहीले. पार्कींग अटेंडंट्सची शिफ्ट सकाळी आठ वाजता चेंज होते आणि त्या वेळेस पार्कींग परमीट असेल तर रजिस्टर एन्ट्री न होता कार्स आत शिरतात हे मी ऑब्झर्व्ह केलं होतं. त्याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी मी बरोबर आठ वाजता तिथे पोहोचले, अ‍ॅन्ड अ‍ॅज आय एक्स्पेक्टेड रजिस्टरमध्ये एन्ट्री न होता मी कार आत आणली. एकदा पार्कींग लॉटमध्ये शिरल्यावर मेन एन्ट्रन्सचा सीसीटीव्ही कॅमेरा टाळून तिथून स्विमींग पूलवर आणि मग रुममध्ये परत येण्यास मला काहीच प्रॉब्लेम आला नाही.

त्याने मनातल्या मनात तिच्या हुशारीला दाद दिली. अत्यंत सूक्ष्म गोष्टींचा विचार करुन तिने हा प्लॅन आखलेला होता.

अ‍ॅज आय सेड अर्लीयर, उदयच्या अ‍ॅक्सिडेंच्या संदर्भात पोलीस इन्क्वायरीसाठी माझ्याकडे येणार हे मला एक्स्पेक्टेड होतं. अ‍ॅन्ड आय वॉज मेन्टली वेल प्रिपेअर्ड फॉर इट! अ‍ॅज फार अ‍ॅज आय वॉज कन्सर्न्ड, द मोस्ट क्रिटीकल अ‍ॅन्ड इक्वली डिफीकल्ट पार्ट वॉज टू अ‍ॅक्ट अप द शॉक.... त्याची डेथ झाल्यावर मला बसलेला शॉक पोलीसांना किती जेन्युईन आणि कन्व्हिन्सिंग वाटतो यावर सगळं डिपेंड होतं! तुम्ही पुन्हा माझ्याकडे इन्क्वायरीला आला नाहीत त्यावरुन आय कॅन सेफली से आय वॉज एबल टू पुल इट ऑफ!

"यू शुअरली डिझर्व्ह अ‍ॅन ऑस्कर फॉर दॅट!" तो स्वत:शीच पुटपुटला.

लास्ट बट नॉट द लिस्ट, द ड्रग! जस्ट फॉर युवर इन्फॉर्मेशन, अ‍ॅपार्ट फ्रॉम इट्स यूज इन मेडीकल फिल्ड अ‍ॅज अ‍ॅन अ‍ॅनस्थेटीक, ते ड्रग कॅपिटल पनिशमेंट देताना लिथल इंजेक्शनमध्येही वापरलं जातं! आता मी ते कुठून आणि कसं मिळवलं किंवा ते मला कोणी दिलं.... वेल, आय डू नॉट इम्प्लीकेट एनीवन अ‍ॅन्ड लिव्ह दॅट टू युवर इमॅजिनेशन अ‍ॅन्ड इन्व्हेस्टीगेशन! त्या ड्रगचं केमिकल काँपोझिशन, डोसेज, इफेक्ट्स आणि ते हँडल करताना घ्यावी लागणारी प्रिकॉशन याबद्दल एवढंच सांगेन, आफ्टर ग्रॅजुएटींग फ्रॉम हायस्कूल, आय वॉज अ‍ॅन अंडरग्रॅजुएट ट्रेनी इन फॉरेन्सिक मेडीसीन इन युनिव्हर्सिटी बिफोर आय स्विच्ड ओव्हर माय करीअर टू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. माय डॅड इज इंटरनॅशनली रेकग्नाईज्ड फॉरेन्सिक सायंटीस्ट!

फॉरेन्सिक मेडीसीनमध्ये चार वर्ष ट्रेनी.... आणि सायंटीस्टची मुलगी? गॉश! हा आणखीन एक टेरीफीक शॉक होता. नो वंडर तिला सोडीयम थिओपेन्टलबद्दल इतकी डिटेल माहिती होती!

फायनली, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट....

मी हे सगळं का केलं?
सुनेहा, प्रिया किंवा स्वप्ना यांच्याशी माझा असा काय संबंध होता ज्याच्यासाठी मी त्या पाचजणांचा जीव घ्यावा?

स्वप्ना वॉज माय सिस्टर मि. प्रधान.... माय कझिन सिस्टर! वी डिड ग्रो अप टुगेदर टिल एज ऑफ एट, बिफोर माय फॅमिली मूव्ह्ड टू स्टेट्स. अर्थात आम्ही दोघी जगाच्या दोन टोकाला गेलो तरी वी वेअर सो क्लोज टू इच अदर! मोअर दॅन सिस्टर्स, वी वेअर फ्रेंड्स.... बेस्ट ऑफ फ्रेंड्स! जवळपास दर दोन - तीन दिवसांनी स्काईपवर आमचं बोलणं होत असे. प्रत्येक पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी आम्ही एकमेकींशी शेअर करत होतो. ऑफीसमधलं काम, पर्सनल लाईफ, रिलेशनशिप्स याबद्दल अनेकदा एकमेकींना कन्सल्टही करत होतो. इट वॉज अ व्हेरी स्पेशल बाँड.... आय कॅन नॉट पुट दॅट इन वर्ड्स....

मि. प्रधान, स्वप्ना माझी कझिन होती तर तिच्या इतर कोणाही रिलेटीव्हजच्या बोलण्यात माझा उल्लेख कसा आला नाही हा प्रश्नं तुम्हाला पडला असेल. माझ्या मॉमने पंजाबी माणसाशी लव्हमॅरेज केलं अ‍ॅन्ड सो शी वॉज टर्म्ड अ‍ॅज अ ब्लॅक शिप ऑफ द फॅमिली! माय अंकल - स्वप्नाज् डॅड - वॉज अ वॉज अ प्रोग्रेसिव्ह पर्सन विथ ब्रॉड आऊटलुक, बट द ओल्ड हेड्स वुड नॉट बज! शी वॉज आऊटकास्ट फॉर द सिंपल रिझन, कट्टर शहाण्णव कुळांचा असलेला दुराभिमान.... एनी वे, आय डोन्ट वॉन्ट टू गेट इन टू इट! द फॅक्ट इज, त्यांच्याशी माझा कधीच काही संबंध आलेला नाही आणि येणारही नाही. आय डोन्ट थिंक दे इव्हन नो अबाऊट मी!

रोहित कमालीचा गंभीर झाला. त्या दोघींमध्ये अशी काही लिंक असेल हे त्याच्या कल्पनेतही बसणारं नव्हतं. अत्यंत बारकाईने आणि प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करुन तिने ही योजना आखली होती आणि तितक्याच चाणाक्षपणे कोणतीही त्रुटी राहणार नाही याची पुरेपूर दक्षता घेत परिणामकारकरित्या अंमलात आणली होती. स्वप्नाच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी तिच्याच नावाचा चलाखीने वापर करुन तिने त्याला चकवलं होतं. तो स्वप्नाच्या शोधात असताना पद्धतशीरपणे आणि कमालीच्या थंड डोक्याने तिने त्या पाचजणांना खलास केलं होतं!

मि. प्रधान, हे सगळं वाचल्यावर, मी पोलीसांकडे का गेले नाही, खासकरुन स्वप्नाच्या बॉडी कॅमेर्‍यामध्ये उदय आणि कौशल यांचे फोटो मिळालेले असतानाही मी पोलीसांना कॉन्टॅक्ट का केलं नाही असं तुम्हाला वाटणं अगदी साहजिक आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट टू कॉप्स अ‍ॅज वेल अ‍ॅज कोर्ट ऑफ लॉ, या देशातला कायदा हा सामान्य माणूस आणि सो कॉल्ड सेलेब्रेटी आणि राजकारणी यांच्यासाठी वेगवेगळा आहे असं नेहमीच दिसून आलं आहे! पैसा आणि सत्तेच्या बळावर कायदा हवा तसा वाकवता येतो हे सत्यं आहे. स्वत:जवळ लायसन्स नसताना दारुच्या नशेत कार चालवून रस्त्यावर झोपलेल्य लोकांना चिरडणारा केवळ सेलेब्रिटी सुपरस्टार आहे म्हणून कोर्टातून सुटू शकतो, त्याच्याविरुद्ध साक्ष देणार्‍या पोलीस कॉन्स्टेबलवर आपलं स्टेटमेंट बदलण्यासाठी डिपार्टमेंटमधूनच प्रेशर आणलं जातं, धमकावलं जातं, अखेर त्याच्या मृत्यू होतो आणि त्याचं स्टेटमेंट रिलायबल नाही असं कोर्टात सिद्धं केलं जातं! शेअर मार्केट फ्रॉडमध्ये अ‍ॅरेस्ट केलेला गुन्हेगार प्रेस कॉन्फरन्समध्ये थेट प्राईम मिनिस्टरलाच एक कोटी कॅश दिली म्हणून उघड आरोप करतो, त्यासंदर्भात लाय डिटेक्टर टेस्टही पास करतो, पण तरीही काही होत नाही. देशाच्या प्राईम मिनिस्टरच्या हत्येनंतर पद्धतशीरपणे एका विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करुन जिनोसाईड घडवून आणलं जातं, त्या लोकांना शोधण्यासाठी थेट व्होटर्स लिस्ट वापरली जाते, पण ज्या लोकांनी हे हत्याकांड घडवून आणलं त्यांना आजतागायत काहीही होत नाही, जस्ट बिकॉज दे वेअर रुलिंग पार्टी पॉलिटीशियन्स! एखाद्या मुलीवर ब्रूटली रेप करुन तिचा खून करणार्‍यांचं 'बच्चे है, गलती हो जाती है' असं संतापजनक समर्थन करणारे पॉलिटीशियन्स या देशात आहेत! आपली सर्व बुद्धी पणाला लावत, कायद्यातल्या लूपहोल्सचा पुरेपूर आधार घेत या लोकांना वाचवण्यासाठी एका पायावर तयार असलेले अ‍ॅटर्नी आहेत. असे कित्येक अ‍ॅटर्नीच पॉलिटीशियन्स आहेत! एका टेररिस्टला वाचवण्यासाठी भर रात्री कोर्ट उघडण्यास लावणारे अ‍ॅटर्नीही या देशात आहेत हे सगळ्या जगाने पाहीलं आहे. इन सच सिचुएशन व्हॉट कॅन वन एक्स्पेक्ट व्हेन अ पॉलिटीशियन्स सन इज इन्व्हॉल्व्ह्ड?

जस्ट फॉर सेक ऑफ अ‍ॅझम्प्शन, स्वप्ना आणि प्रियाच्या मर्डरबद्दल मी ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली असती तरीही काय झालं असतं? त्या किरणच्या पॉलिटीशियन बापाने आपली सगळी कनेक्शन्स वापरुन त्याने ही केस दाबली असती! कदाचित आणखीन पंधरा - वीस वर्षांनी हा किरणच इलेक्शन जिंकून होम मिनिस्टर किंवा फॉर दॅट मॅटर चीफ मिनिस्टरही झाला असता, हू नोज? फॉर अ‍ॅन इन्स्टन्स, अगदी कोणत्याही प्रेशरखाली न येता तुम्ही किरण आणि इतरांना अ‍ॅरेस्ट केलंत, तरी ट्रायलमध्ये त्यांना शिक्षा होईलच याची गॅरेंटी होती? कोर्टात विटनेसेस होस्टाईल होणं, त्यांनी आपलं स्टेटमेंट बदलणं हे तर झालं असतंच, पण त्यांच्या अ‍ॅटर्नीनी सुनेहा, प्रिया आणि स्वप्ना यांच्या कॅरेक्टरची अशा पद्धतीने लक्तरं काढली असती की त्यांच्या रिलेटीव्हजना जगणं अशक्यं झालं असतं! अगदी लहानातल्या लहान पॉईंटवरुनही शक्यं तितकी केस डिले केली गेली असती, आणि एवढं सगळं करुनही उपयोग झाला नाही तर मग हायकोर्ट, सुप्रिम कोर्ट आहेच! त्यातच कॅपिटल पनिशमेंट झाली तर प्रेसिडेंटकडे मर्सी पेटीशन हा आणखीन एक ऑप्शन! या सगळ्यातून पार पडून आणि अगदी मर्सी पेटीशन रिजेक्ट झाली तरी तरी विल दे एव्हर बी एक्झीक्यूटेड फॉर द क्राईम? अ‍ॅन्ड इफ इट कम्स टू दॅट, त्यावेळेस कँडल लाईट मार्च, डेथ पेनल्टी अ‍ॅबोलिशन, ह्यूमन राईट्स यांचा तमाशा सुरु झाला असता तो वेगळाच! ज्यांची हत्या झाली त्यांच्या ह्यूमन राईट्सबद्दल मात्रं कोणी एक शब्दं काढला नसता. फर्गेट ह्यूमन राईट्स, साधी सिंपथीही कोणी दाखवली नसती....

नो सर, आय अ‍ॅम नॉट टेकींग दॅट....
आय वॉज नॉट गोईंग टू लेट दोज बास्टर्ड्स गो स्कॉट फ्री आफ्टर रेप अ‍ॅन्ड मर्डर ऑफ माय सिस्टर....

दे हॅड टू बी ब्रॉट टू जस्टीस!

रोहितने दीर्घ नि:श्वास सोडला. तिचा शब्दन् शब्द कितीही तीक्ष्ण आणि कडवट असला तरी ते ठणठणीत सत्यं आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. राजकारणी आणि सेलेब्रेटी पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर कोणत्याही भानगडीतून स्वत:ची सहीसलामत सुटका करुन घेताना त्याने कितीतरी वेळा पाहिलं होतं. या केसच्या संदर्भात तर किरणने स्वत:च्या बापाच्या पोझिशनचा फायदा घेत प्रियाच्या खुनाबद्दल आपली इन्क्वायरी टाळलीच होती हे तो विसरला नव्हता. उद्या किरण खरोखरच इलेक्शन जिंकून गृहमंत्री किंवा अगदी मुख्यमंत्रीही बनण्याची तिने व्यक्तं केलेली शक्यताही पूर्णपणे नाकारता येत नव्हती!

मि. प्रधान, ऑल ओव्हर द वर्ल्ड, कोणत्याही सिव्हील सोसायटीमध्ये एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा सुनावणं ही कोर्टाची जबाबदारी आहे आणि ती शिक्षा अंमलात आणणं ही गव्हर्मेंटची! त्या दृष्टीने विचार केला तर अ‍ॅज पर लॉ ऑफ द लँड, त्या पाचजणांच्या मृत्यूला मी जबाबदार आहे ही फॅक्ट आहे, अ‍ॅन्ड आय डू नॉट डिनाय दॅट! बट अगेन, यू कॅन नॉट प्रूव्ह दॅट इन कोर्ट ऑफ लॉ! ज्या ब्रूटली प्रिया आणि सुनेहाला टॉर्चर करुन आणि तिघींनाही रेप करुन त्या पाचजणांनी त्यांची हत्या केली, दे डिझर्व्ह्ड नथिंग शॉर्ट ऑफ डेथ पेनल्टी अ‍ॅन्ड दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट आय डिश्ड आऊट टू देम! मी स्वत:ला जस्टीफाय करते आहे असं कदाचित तुम्हाला वाटत असेल, सो बी इट, आय डोन्ट माईन्ड दॅट! लाईक आय सेड, आय नेव्हर थॉट, द रिव्हेंज कुड हॅव सच अ स्वीट टेस्ट! आय विल ऑलवेज हॅव देअर ब्लड ऑन माय कॉन्शस, अ‍ॅन्ड आय हॅव टू लिव्ह विथ इट, पण स्वप्नासाठी तेवढं मी नक्कीच करु शकते! दॅट्स ऑल आय हॅव टू से!

- एस

********

कदम, देशपांडे आणि नाईक रोहितच्या केबिनमध्ये त्याच्यासमोर बसलेले होते. त्याच्यासमोरचं ते पत्रं प्रत्येकाने वाचलेलं होतं आणि कुरीयरने आलेली ती सीडीही पाहिलेली होती. गेले दोन महिने आकाशपाताळ एक करुन ज्या स्वप्नाचा आपण शोध घेत होतो, ती प्रत्यक्षात वर्षभरापूर्वीच मरण पावली होती, आणि तिच्या अस्तित्वाचा आभास निर्माण करुन सौम्याने त्या पाचजणांची हत्या केली होती हा धक्का पचवणं सर्वांनाच, खासकरुन कदमना कठीण जात होतं.

"सर.... " कदमनी काही वेळाने विचारलं, "आपण काहीच करु शकत नाही? ती अमेरीकन नागरीक असली तरी आपण आवश्यक ती प्रोसेस पार पाडून तिला भारतात आणून अ‍ॅरेस्ट करु शकत नाही? एकामागोमाग एक असे पाच खून केलेत तिने! स्वप्नाचं नाव वापरुन आपल्यला घुमव घुमव घुमवलं! तिने ज्यांना मारलं ते त्याच लायकीचे होते हे मान्यं केलं, तरी पोलीस म्हणून तिच्या या कृत्याकडे आपण दुर्लक्षं तर करु शकत नाही!"

"संजय, हा विचार मी केला नसेल असं तुला वाटतं?" तो एकेरीवर आला याचा अर्थ अत्यंत गंभीर आहे हे कदमनी ओळखलं."लेट्स लुक अ‍ॅट इट पॉईंट बाय पॉईंट -

सर्वात पहिली गोष्टं, म्हणजे सौम्या अमेरीकन सिटीझन आहे. भारत आणि अमेरीका यांच्यात १९९९ मध्ये एक्सट्रॅडीशनचा करार झालेला असला तरी कोणत्याही अमेरीकन सिटीझनला अगदी चौकशीसाठी देखिल भारतात आणणं सोपं नाही. युनियन कार्बाईडचा वॉरन अँडरसन आणि अगदी अलिकडे डेव्हीड कोलमन हेडली ही उदाहरणं त्या दृष्टीने पुरेशी आहेत!

या केसबद्दल विचार केला तर अवर हँड्स आर कम्प्लीटली एम्प्टी! फर्गेट अबाऊट काँक्रीट एव्हीडन्स, तिच्याविरुद्ध केस उभी करण्यासाठी आपल्याकडे अगदी प्रायमा फेसी एव्हीडन्सही नाही! अशा परिस्थितीत आपण कोणत्या बेसीसवर तिच्याविरुद्ध अ‍ॅरेस्ट वॉरंट काढणार? आपल्याकडे जे काही एव्हीडन्स आहेत, ते सगळे स्वप्नाविरुद्धं आहेत! त्या पाचहीजणांना ज्या नंबरवरुन फोन करण्यात आलेत किंवा मेसेज पाठवण्यात आले आहेत तो स्वप्नाचा आहे! आता स्वप्नाच्या रिलेटीव्ह्जपैकी कोणाचा डीएनए सापुतारा पोलीसांना मिळालेल्या स्केलेटनशी मॅच केला आणि तो स्वप्नाचा आहे हे आपण सिद्धं केलं तर फारतर त्या पाचजणांचे खून स्वप्नाने केलेले नाहीत एवढं क्लीअर होईल, पण त्यात सौम्याचा हात आहे हे आपण कसं प्रूव्ह करणार आहोत? एक उदय सोडला तर इतरांशी तिचा काही संबंध होता हेच सिद्धं करता येत नाही! उदयची ती फॉर्मर कलीग होती आणि ती भारतात आलेली असताना दोघं भेटले एवढ्याच गोष्टीवरुन आपण तिच्यावर काय आरोप करू शकतो? उदयच्या डेथच्या वेळेस आपण ताजमध्ये पूर्ण इन्क्वायरी केली, अगदी सीसीटीव्ही फुटेजही चेक केलं, बट अ‍ॅज स्मार्ट अ‍ॅज शी इज, तिच्याविरुद्ध आपल्या हाती काही म्हणजे काही लागलं नाही!

नाऊ फॉर द आयविटनेसेस.... धीरजचे शेजारी मालवणकर, सोसायटीचा वॉचमन शंभूनाथ, गार्डनमध्ये झोपणारा तो म्हातारा, रिझवानच्या समोर राहणारी जेनेट, खंडाळ्याच्या रिसॉर्टचा अटेंडंट जतिन आणि तो बैरा हे सगळे म्हटलं तर आयविटनेस पण यांच्यापैकी कोणीही तिचा चेहरा पाहिलेला नाही! सापुतार्‍याचे सब् इन्स्पे. शहा, ते दोघं फॉरेस्ट ऑफीसर्स, इतकंच काय सांताक्रूजच्या ज्या पबमध्ये दोन दिवस ती धीरजला भेटली त्या पबचा बारटेंडर, वेटर आणि दरवानही तिला पॉझिटीव्हली ओळखू शकणार नाहीत! इव्हन आपल्याला मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही तिने स्वत:चा चेहरा व्यवस्थित कन्सिल केला आहे!

तिने पाठवलेल्या त्या सीडीमध्ये फक्तं धीरज आणि कौशल यांचेच आवाज उमटतात, अगदी सेकंदासाठीही तिचा आवाज त्या सीडीत नाही! ज्या कुरीयरवाल्याने ते कुरीयर तिच्याकडून घेतलं, तो देखिल तिचं वर्णन करु शकणार नाही कारण बुरखा! दॅट वॉज अ मास्टरस्ट्रोक! कोणत्याही बुरखाधारी स्त्रीला बुरखा वर करण्यास सांगणं, किमान भारतात तरी शक्यंच नाही हे तिच्यासारख्या चाणाक्षं मुलीला बरोबर माहित असणार! किरणला गाठण्यासाठी तिने त्याचा बरोबर उपयोग करुन घेतला! आय अ‍ॅम शुअर लेटर कुरीयर करतानाही तिने अशीच काहीतरी ट्रीक वापरली असणार. मे बी बुरखाच, व्हू नोज?

ते लेटर हे तर तिच्या धूर्तपणाचा सर्वोत्कृष्टं उदाहरण आहे! त्या संपूर्ण लेटरमध्ये तिचं स्वत:चं कुठेही नाव नाही. अगदी शेवटी सुद्धा फक्त 'एस' एवढंच इनिशियल केलेलं आहे! आता ही 'एस' जशी सौम्या असू शकते तशीच स्वप्ना, सुनेहा किंवा फॉर दॅट मॅटर श्रद्धाही असू शकते! ते लेटर टाईप केलेलं असल्याने हँडरायटींग मॅच करण्याचा प्रश्नच येत नाही! त्यामुळे उद्या आपण केस उभी केली, तर हे लेटर बनावट आहे आणि पोलीसांनीच प्लान्ट केलेलं आहे, असं ती सहजपणे म्हणू शकते आणि कोर्ट ते नाकारू शकत नाही! तिला या केसशी लिंक करणारा अगदी एखादा सर्कमस्टेन्शियल एव्हीडन्सही आपल्याकडे नाही. तिने वापरलेला ओव्हरकोट, स्कार्फ, गॉगल, बुरखा इतकंच काय ती हील्सची सँडलही आपल्या हाताला लागलेली नाही! तिच्या फिंगरप्रिंट्स कुठेही मिळालेल्या नाहीत! आय अ‍ॅम शुअर तिने हँडग्लोव्हज् वापरले असणार, पण आपल्या हातात काहीच नाही. अ‍ॅट द मोस्ट, तिच्याविरुद्ध असलेला एकमेव एव्हीडन्स म्हणजे त्या रिसॉर्टच्या रजिस्टरमधलं तिचं हँडरायटींग! पण खरंतर, त्यालाही काही अर्थ नाही, कारण हँडरायटींग एक्सपर्ट्ससाठी त्यात काहीच नाही! ऑल हर ट्रॅक्स आर कव्हर्ड विदाऊट अ ट्रेस!

शी हॅड प्लेड हर हँड एक्स्ट्रीमली इंटेलिजंटली! वी हॅव अ‍ॅब्सोल्यूटली नथिंग अगेन्स्ट हर!"

कदम काहीच बोलले नाहीत. त्याच्या बोलण्यात तथ्यं आहे हे त्यांना कळत होतं, पण पोलीस खात्यात अनेक वर्ष काढल्यामुळे सौम्याने पाच खून करुनही आपण काही करु शकत नाही हे पचवणं त्यांना जड जात होतं.

"श्रद्धा, व्हॉट डू यू थिंक?" कदम काहीच बोलत नाहीत पाहून त्याने विचारलं.

"सर, खरं सांगायचं तर... त्या पाचजणांना तिने खलास केलं यात मला काही चुकीचं वाटत नाही! माझं मत बायस्ड असू शकेल, कारण मी स्वत: एक स्त्री आहे! सुनेहा आणि प्रिया कशातून गेल्या असतील याची मी कल्पना करु शकते सर! एक पोलीस म्हणून नाही, पण एक सामान्यं नागरीक म्हणून तिच्याजागी मी असते तर कदाचित मी देखिल तेच केलं असतं! ज्या प्रकारे त्यांनी सुनेहा आणि प्रियाचे हालहाल केले आणि त्या तिघींनाही रेप करुन त्यांचा जीव घेतला, ते पाहता त्यांचं जे काही झालं ते योग्यंच होतं असं माझं मत आहे!"

"तुम्हाला काय वाटतं साहेब?" नाईकनी विचारलं.

"वेल... आय अ‍ॅम इन अ स्प्लिट! एकतर मुळात प्रिया आणि स्वप्नाच्या खुनाची केसच केवळ सर्कमस्टॅन्शियल एव्हीडन्सवर उभी करावी लागली असती, आणि दुसरं म्हणजे या केसमध्ये पॉलिटीकल इन्टरफिअरन्स झाला असता आणि आपल्यावर अभूतपूर्व प्रेशर आलं असतं हे निश्चित! अ‍ॅज अ पोलीस ऑफीसर, तिने पाच खून करेपर्यंत आपल्याला तिचा साधा संशयही आला नाही हा आपला सरळ सरळ पराभव आहे, पण एक सिव्हिलीयन म्हणून मात्रं तिने जे काही केलं ते फारसं चुकीचं आहे असं मलाही वाटत नाही! एनी वे, आपल्यापुढचा प्रश्नं आहे तो म्हणजे आपण आता कोणता स्टँड घ्यावा आणि ही केस क्लोज करावी?"

******

कमिशनर मेहेंदळे गंभीरपणे समोर बसलेल्या रोहीतचं बोलणं ऐकत होते.

सुनेहाच्या खुनापासून सुरवात करुन इन्स्पे. देवरेंनी केलेला तपास, स्वप्ना आणि प्रियाचा प्लॅन, त्यातून झालेली प्रियाची हत्या, त्यानंतर धीरज, कौशल, उदय, रिझवान आणि किरण यांचा एकापाठोपाठ एक करण्यात आलेला खून, प्रत्येक केसची करण्यात आलेली डीटेल इन्क्वायरी आणि सरतेशेवटी सौम्याने पाठवलेली ती सीडी आणि ते पत्रं यातून उलगडलेला स्वप्नाचा खून हे सारं त्याने तपशीलवार त्यांच्यासमोर मांडलं होतं. कोणताही मुद्दा सुटणार नाही याची काळजी घेत अत्यंत बारकाईने एकेक धागा उलगडल्यावर शेवटी तो म्हणाला,

"आय मस्ट अ‍ॅडमिट सर, पंधरा वर्षांच्या माझ्या करीअरमध्ये ही एकमेव केस आहे, व्हेअर आय हॅव बीन चेकमेटेड! नेक अ‍ॅन्ड क्रॉप! नेव्हर बिफोर आय हॅव कम अ‍ॅक्रॉस अ क्राईम सो मेटीक्युलसली प्लॅन्ड अ‍ॅन्ड पर्फेक्टली एक्झीक्यूटेड! नो रिग्रेट्स व्हॉट सो एव्हर टू बी आऊटक्लास्ड बाय सच अ ब्रिलीयंट माईन्ड सर! कायद्याच्या दृष्टीने सौम्या गुन्हेगार असली, तरी आपल्याकडे तिच्याविरुद्ध कोणतीही केस नाही! अ‍ॅज अ पोलीस ऑफीसर, इट इज अ टफ पिल टू स्वॉलो, बट अ‍ॅज अ सिव्हीलीयन, आय फील, जस्टीस प्रिव्हेल्ड!"

कमिशनरसाहेब काहीच बोलले नाहीत. त्यांना रोहितचा स्वभाव आणि त्याचा दिलदारपणा पूर्णपणे ठाऊक होता. त्याने इतक्या स्पष्टं शब्दात पराभव मान्यं केला आहे याचा अर्थ आपण काही करु शकत नाही हे ते समजून चुकले. त्यांच्यापुढे आता वेगळीच समस्या उभी राहिली होती.

"हे लेटर आणि सीडी, याबद्दल किती जणांना माहित आहे?" काही वेळ विचार करुन त्यांनी विचारलं.

"संजय, श्रद्धा, नाईक अ‍ॅन्ड ऑफकोर्स आपण दोघं सर!"

"ही सीडी आणि लेटर हा एक बाँबशेल आहे रोहित!" मेहेंदळे गंभीरपणे उद्गारले, "या पाचही खुनांमध्ये स्वप्ना देशमुखचा हात आहे आणि ती फरार आहे असं आपणच जाहीर केलं आहे. आठ दिवस होत आले तरी आपण तिला अ‍ॅरेस्ट करु शकलो नाही म्हणून मिडीया आपल्या नावाने शंख करतो आहे. ते एमएलए चव्हाण, आपले सगळे कॉन्टॅक्ट्स वापरुन ही केस सीबीआयकडे सोपवण्याच्या प्रयत्नात आहेत. अशी परिस्थिती असताना वर्षभरापूर्वीच या स्वप्नाचाही खून झाला होता हे उघड झालं, तर सगळ्यात पहिला प्रश्नं उभा राहील तो म्हणजे त्या पाचजणांचे खून कोणी केले? आणि त्यामागचं कारण काय? आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असलं तरी आपण ते प्रूव्ह करु शकत नाही! हे लेटर किंवा सीडी चुकूनही मिडीयापर्यंत गेली, तर मिडीया आपली पॅन्ट उतरवेल! नॉट ओन्ली दॅट, आपल्याला ही सीडी होम मिनिस्टर पवार आणि सीएमना दाखवावी लागेल, आणि त्याचा पॉलिटीकल इम्पॅक्ट काय होईल याचा अंदाज करणं अशक्यं आहे! वी कान्ट टेक दॅट रिस्क! सीबीआय यात पडण्यापूर्वी आपल्याला ही केस क्लोज करावी लागेल, आणि ती देखील अशा पद्धतीने की एकाच वेळेस मिडीया आणि एमएलए चव्हाण, दोघांचीही कटकट कायमची बंद झाली पाहिजे! आणि त्यासाठी एकच मार्ग आहे. टेल मी वन थिंग, स्वप्नाची डेथ झाली आहे हे किती जणांना माहीत आहे?"

"अगेन, ओन्ली फाईव्ह ऑफ अस सर!"

"गुड! नाऊ लिसन केअरफुली, फर्स्ट ऑफ ऑल, डिस्ट्रॉय दॅट सीडी अ‍ॅन्ड लेटर! आणि त्यानंतर ....... "

"सर ........"

"इट शुड लूक अ‍ॅब्सोल्यूटली कन्व्हीन्सिंग....."

"शुअर सर! आय विल! डोन्ट वरी!"

"गुडलक!"

******

सिरीयल किलर स्वप्ना देशमुख हिचा अपघाती मृत्यू!

गेल्या दोन महिन्यांमध्ये आमदार भरतदादा चव्हाण यांचे चिरंजीव किरण यांच्यासह पाच जणांची हत्या करणार्‍या सिरीयल किलर स्वप्ना देशमुख (२८) हिचा अपघाती मृत्यू झाल्याचं स्पष्टं झालं आहे. मुंबई सीआयडींनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटाच्या परिसरात पहाटे साडेतीन वाजता हा भीषण अपघात झाला. पोलीसांकडून अटक टाळण्यासाठी पलायन करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेल्या गाडीवरचं स्वप्नाचं नियंत्रण सुटून तिची गाडी खोल दरीत कोसळली. अपघातात गाडी पूर्णपणे छिन्न विच्छीन्न झाली असून स्वप्नाचा जागीच मृत्यू झाला आहे. तिच्या पासपोर्टवरुन मृतदेहाची ओळख पटलेली आहे. मुंबई सीआयडी अधिक तपास करत आहेत!

******

फर्झाना बाटलीवाला न्यूज चॅनलवर स्वप्ना देशमुखच्या अपघाती मृत्यूची बातमी पाहत होती. एकेक करुन त्या पाचही जणांना जहन्नममध्ये पाठवणार्‍या स्वप्नाला तिने मनापासून दुवा दिला होता, पण आता तीच अपघातात मरण पावल्याची बातमी आली होती.

"या खुदा, उसकी पाक रुह को जन्नत नसीब हो!" स्वत:शीच पुटपुटत तिने न्यूज चॅनल बदललं.

******

रित्वी, वरदा आणि अ‍ॅना सीसीडी मध्ये बसल्या होत्या. प्रिया आणि सुनेहाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांचा न्याय करण्यात आल्याबद्दल रित्वीला आलेला तो मेसेज इंटरनेटवरुन फ्री मेसेजिंग सर्विस वापरुन पाठवण्यात आलेला असला तरी तो स्वप्नानेच पाठवला असावा अशी त्यांना खात्री वाटत होती.

******

कॅरोल आणि स्वप्निल 'स्वॅप्स' पाटील सिडनीमधल्या आपल्या अपार्टमेंटमध्ये एकमेकांच्या मिठीत गाढ झोपलेले होते! कॉलेजमध्ये असतानापासून दोघांचं अफेअर होतं. घरच्यांचा विरोध न जुमानता तिने त्याच्याशी लग्नं केलं होतं आणि व्हिसाच्या सगळ्या फॉरमॅलिटीज पूर्ण करुन दोन दिवसांपूर्वीच ती सिडनीला पोहोचली होती.

******

न्यूयॉर्कमधल्या आपल्या घराच्या बाल्कनीत बसून गरमागरम कॉफीचे घुटके घेणार्‍या सौम्याची नजर स्टेटन आयलंड आणि ब्रूकलीन यांच्या दरम्यान असलेली हडसन नदीची नॅरो खाडी आणि त्यावरच्या व्हेराझानो ब्रिजवर लागली होती. नुकतीच तिने ‘सिरीयल किलर स्वप्ना देशमुखचा अपघाती मृत्यू’ ही बातमी एका भारतीय न्यूज पोर्टलवर वाचली होती.

त्याचवेळी....

"मनात असूनही मला जे करणं शक्यं झालं नसतं ते तू करुन दाखवलंस सौम्या! आय अ‍ॅम प्राऊड ऑफ यू!"
शेजारीच झोपलेल्या आपल्या लहान मुलीला थोपटत सब् इन्स्पे. श्रद्धा देशपांडे स्वत:शीच म्हणाली.

******

समाप्त

(सर्व पात्रं, प्रसंग आणि घटना संपूर्णपणे काल्पनिक. कोणाशीही कोणताही संबंध आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा ही विनंती).

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्तच.
मास्टरमाईंड कोण होता म्हणे? फर्नांडीस?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

एव्हढे दिवस श्वास रोखून धरलेले. आता अगदी रिलॅक्स्ड वाटतंय. तीन खंडांत पसरलेलं कथानक. किती ती वळणं. कलाटण्याच कलाटण्या. इतक्या कलाटण्यांतून लाटून लाटून अखेर इकडे तिकडे फुटलेले सगळे कोन एका वर्तुळात फिट्ट बसले. मात्र हे पाहाताना पार दमछाक झाली.
मालिका आवडली. ओरिजिनल असेल तर छानच. पण स्रोत अन्य कुठेतरी असेल तरीही कथानक भारतीय वातावरणात चपखल बसले आहे.
आता पुढील मालिका कधी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पूर्णपणे ओरीजनल आहे.
भाषांतर किंवा रुपांतर नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारी लिहिता हो गुर्जी तुम्ही !!! अजून लिहा हा आग्रह .
( आणि नक्की हे कुणी केलं हे मतिमंद अशा मला कळले नाहीये . पण असो. वाचायला मजा अली )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सौम्या वर्मा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डोकं एकदम हलकं हलकं वाटतंय..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिरीयल किलर स्वप्ना देशमुख हिचा अपघाती मृत्यू!

गेल्या दोन महिन्यांमध्ये आमदार भरतदादा चव्हाण यांचे चिरंजीव किरण यांच्यासह पाच जणांची हत्या करणार्‍या सिरीयल किलर स्वप्ना देशमुख (२८) हिचा अपघाती मृत्यू झाल्याचं स्पष्टं झालं आहे. मुंबई सीआयडींनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटाच्या परिसरात पहाटे साडेतीन वाजता हा भीषण अपघात झाला. पोलीसांकडून अटक टाळण्यासाठी पलायन करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेल्या गाडीवरचं स्वप्नाचं नियंत्रण सुटून तिची गाडी खोल दरीत कोसळली. अपघातात गाडी पूर्णपणे छिन्न विच्छीन्न झाली असून स्वप्नाचा जागीच मृत्यू झाला आहे. तिच्या पासपोर्टवरुन मृतदेहाची ओळख पटलेली आहे. मुंबई सीआयडी अधिक तपास करत आहेत!

म्हणजे, मुंबई सीआयडीने आपल्या पराभवावर तथा नामुष्कीवर पांघरूण घालण्यासाठी, आपली 'पार्श्वभूमी' (एकेए 'तशरीफ़') वाचविण्यासाठी, (आणखी?) एका निष्पाप ('इनोसण्ट अण्टिल प्रूव्हन गिल्टी', रिमेंबर?) अनामिकेचा अपघात (एन्कौण्टर?) घडवून आणून बळी दिला, म्हणायचा तर! शिवाय, टू अॅड इन्सल्ट टू इन्ज्युरी ऑफ द पुअर डिपार्टेड सोल (ईमृशांदे), तिच्या मढ्यावर नकली पासपोर्टसुद्धा पेरलानीत. (आय मीन, (१) 'स्वप्ना देशमुख' या नावाचा एखादा ('हुसैन मुबारक पटेल'टैप्स) नकली पासपोर्ट बनवून घेणे, आणि (२) तो नकली पासपोर्ट, (घडवून आणलेल्या) अपघातातल्या एखाद्या मढ्यावर पेरणे, हे मुंबई सीआयडीला कितीसे अवघड असावे?)

बोले तो,

स्वत:जवळ लायसन्स नसताना दारुच्या नशेत कार चालवून रस्त्यावर झोपलेल्य लोकांना चिरडणारा केवळ सेलेब्रिटी सुपरस्टार आहे म्हणून कोर्टातून सुटू शकतो, त्याच्याविरुद्ध साक्ष देणार्‍या पोलीस कॉन्स्टेबलवर आपलं स्टेटमेंट बदलण्यासाठी डिपार्टमेंटमधूनच प्रेशर आणलं जातं, धमकावलं जातं, अखेर त्याच्या मृत्यू होतो आणि त्याचं स्टेटमेंट रिलायबल नाही असं कोर्टात सिद्धं केलं जातं! शेअर मार्केट फ्रॉडमध्ये अ‍ॅरेस्ट केलेला गुन्हेगार प्रेस कॉन्फरन्समध्ये थेट प्राईम मिनिस्टरलाच एक कोटी कॅश दिली म्हणून उघड आरोप करतो, त्यासंदर्भात लाय डिटेक्टर टेस्टही पास करतो, पण तरीही काही होत नाही. देशाच्या प्राईम मिनिस्टरच्या हत्येनंतर पद्धतशीरपणे एका विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करुन जिनोसाईड घडवून आणलं जातं, त्या लोकांना शोधण्यासाठी थेट व्होटर्स लिस्ट वापरली जाते, पण ज्या लोकांनी हे हत्याकांड घडवून आणलं त्यांना आजतागायत काहीही होत नाही, जस्ट बिकॉज दे वेअर रुलिंग पार्टी पॉलिटीशियन्स! एखाद्या मुलीवर ब्रूटली रेप करुन तिचा खून करणार्‍यांचं 'बच्चे है, गलती हो जाती है' असं संतापजनक समर्थन करणारे पॉलिटीशियन्स या देशात आहेत!

वगैरे वगैरे जे काही 'सौम्या' बरळली, त्या 'या देशात हेही घडू शकते'-छाप यादीत हे इन्क्लूड करायला विसरली म्हणायची!

ते काही नाही. याचा पर्दाफाश झालाच पाहिजे! द पब्लिक वाँट्स टू नो! किंवा, वेदर ऑर नॉट द पब्लिक केअर्स टू हूट्स, द फ्यूचर ऑफ डेमॉक्रसी डिपेंड्स अपॉन इट!

मुंबई सीआयडी अधिक तपास करत आहेत!

Yeah, right!

त्यामुळे उद्या आपण केस उभी केली, तर हे लेटर बनावट आहे आणि पोलीसांनीच प्लान्ट केलेलं आहे, असं ती सहजपणे म्हणू शकते आणि कोर्ट ते नाकारू शकत नाही!

ऑफ कोर्स! जे पोलीस खोटाखोटा एन्कौण्टर घडवून आणून त्यातील मढ्यावर बनावट पासपोर्ट प्लांट करू शकतात, त्यांना एक यःकश्चित लेटर म्हणजे किस झाड की पत्ती!

कोणत्याही बुरखाधारी स्त्रीला बुरखा वर करण्यास सांगणं, किमान भारतात तरी शक्यंच नाही हे तिच्यासारख्या चाणाक्षं मुलीला बरोबर माहित असणार! किरणला गाठण्यासाठी तिने त्याचा बरोबर उपयोग करुन घेतला!

हम्म्म्म... सटल, हं! एकदम 'मियाँ मुशर्रफ़'-क्वालिटी सटल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदल्या रात्रीच गेलेल्या युनायटेड एअरलाईन्सच्या मुंबई – नेवार्क फ्लाईटच्या पॅसेंजर्सच्या लिस्टमध्ये...

नूअर्क. (पाठभेद: न्यूअर्क.)

बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथामालिका. मजा आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0