म्हैसूर ते पुणे बाईक वरून

नमस्कार ऐसीकर,
मी सध्या म्हैसूरला असून जुलै महिन्याच्या २ऱ्या किंवा ३ऱ्या आठवड्यात बाईकने पुण्याला येणार आहे. सोबत भाऊ असेल, तर येताना ट्रिप करत येण्याचा विचार आहे. इथल्या बऱ्याच सदस्यांनी अश्या लांबच्या ट्रिप्स केल्या आहेत, म्हणून मार्गदर्शन हवे आहे.
ठरवलेली ठिकाणे:
१. मंगलोर
२. मुरुडेश्वर- गोकर्ण
३. गोवा
४. रत्नागिरी- तारकर्ली, गणपतीपुळे
५. पुणे.

रत्नागिरी पर्यंतचा संपूर्ण प्रवास हा समुद्राच्या काठाने जाणाऱ्या रस्त्याने करायचा विचार आहे.

प्रश्न
१.वरील ठिकाणात काही बदल करावा का?
२.जुलै च्या 2ऱ्या 3ऱ्या आठवड्यात वातावरण कसे असेल? थोड्याफार पावसाची भीती नाही.
३.राहण्याची आणि खाण्याची सोय कुठे पहावी? मंगलोर, गोकर्ण, गोवा आणि रत्नागिरी येथे मुक्काम करण्याचा विचार आहे. अगदी लो बजेट ट्रिप आहे, शक्यतो एखाद्या गरीबाघरी पैसे देऊन राहायची इच्छा आहे, पण तशी सोय नसली तर हॉटेल्स ही चालतील.
Google च्या हिशोबाने ११९२ किमीचा प्रवास आहे.
गाडी- unicorn 160
काय तयारी करावी लागेल?

उत्तरांच्या अपेक्षेत,
राव पाटील

field_vote: 
0
No votes yet

जर गोकर्ण ला वस्ती करायची असेल तर झोस्टेल गोकर्ण ला करा. भाडं काहीतरी ५००-६०० होतं वर्षांपूर्वी. पण तेथून समुद्राच दृश्य भारी दिसतं. आरक्षण आधीच करायला लागतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक कोकण विडियो आहे बघा युटुबवर. ठाणे ते सावंतवाडी. खाड्यांवरच्या फेरीबोटींची माहिती कळेल. किनाय्राने जाणार म्हणून. जुलैला बोटी नसाव्यात./ नसतील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाच सल्ला देणार होते की अचरट याना विचारा. त्याना माहीती असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

कोकणात एकेका ठिकाणी राहून अनुभवयाला बरं वाटतं. बाईक/गाडीने ड्राइविंग करत जाण्याचा प्रयत्न केला नाही ये. किनाय्राकडच्या गावांत /शहरांत पेट्रोल पंपस नाहीत, ते साधारण चाळीस किमी दूर गोवा-मुंबई रस्त्यावर आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजुन उत्तरे अपेक्शित.. जुलै मध्ये पाउस कसा असेल या भागात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

जुलै मध्ये पाउस कसा असेल या भागात?

मरणाचा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुलैतला पाऊस पाहण्यासाठीच येणार असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0