तो परत आलाय

एक टिनपाट महानगर होतं
तिथं एक आय्-डी होता
हा आय्-डी कसा होता?
विद्वज्जड, विचारवंत, साक्षेपी, प्रत्युत्पन्नमति इ.इ.
त्याचा दिवस कसा जायचा?
सक्काळी सक्काळी कायप्पावर इधरका माल उधर सर्कवायचा
लंच टायमात एका काडेचिराइती संस्थळावर काही अभ्यासपूर्ण टंकायचा
काॅफी ब्रेकात दुसर्‍या एका सबगोलंकारी संस्थळी थोडा साक्षेपी पिंकायचा
परतीच्या घामट ट्रॅफिक जॅमात पाठथोपट्या प्रतिसादकांस धन्यवादायचा अन् पायखेच्या प्रतिसादकांना हेडाॅन भिडायचा.

एकदा काय झालं?
जरी सबकुछ होतं झिंगालाला तरी वांझोटं वैफल्य आलं बिचार्‍याला.

या वैफल्यानं काय झालं?
त्यास आंजावैराग्य आलं
आंजावैराग्याची लक्षणे कोणती?
तो टंकेना की पिंकेना
समस्त स्क्रीनांकडे तो पाठ फिरवू लागला.
दगडामातीच्या, हाडामासाच्या जगात २४x७ वायफायरहित जगायचं स्वप्न बघू लागला.
त्याच्या घंटो मिटल्या लॅपटाॅपची बिजाग्रं बिघडली.
त्याच्या मिनिटोमिनीट बंद चलाखफोनावर कोळीष्टकं जमली.
अनरेड कायप्पा पोष्टींनी सहस्रक ओलांडलं.

आय् डी चं हे कडकनाथ आंजावैराग्य देखून इकडे समाजमाध्यमेशांची तंतरली.
झुक्याची झोप उडाली
पिचई पेचात पडला
गेट्स गडबडला
संस्थळमालक सटपटले
"आज एकास, पण उदईक समग्र विचारवंतांस समाजमाध्यमांप्रति ऐसे शुकवैराग्य आले तर आपल्या जगड्व्याळ पोटा-पसार्‍यांचे काय?" ही कुशंका त्यांस पोखरू लागली.

समाजमाध्यमेश सत्वर मिटींगले.
दूतास रदबदलीस पाठविण्याचे मुकर्रर केले.

दूत आय् डी पावेतो पोहोचून
त्यास विनविता झाला,
"एकडाव, फक्त एकडाव अमुकअमुक सायटीवर डोळेझाक लाॅगिना.
समाधान न पाविल्यास बंद्यास बेशक बे-सीपीयु करा"

आय् डी द्रवला.
अमुकअमुक सायटीवर डोळेझाक लाॅगिनला.
डोळे उघडले तो काय?
सभोवती वरती खालती लखलख आरशांची खडी
आरशाआरशातून खुणावणारे स्वत:चेच जुने आय् डी
आय् डी दिपला पण क्षणात सावरला. (विद्वज्जडच तो!)
एकेक आरशात पाहता झाला.
...निरागस, उथळ, भावुक, रसिक, आक्रमक, तत्वज्ञ...
विस्मृतीत गाडलेले माझे इतके उत्क्रांतीटप्पे येकगठ्ठा?
आय् डी गुंग झाला
क्षणभर नोस्टाल्जिला
मग इरेस पेटून
जुन्या आय्-डींपैकी एकेकास चक्काचुरून
सांप्रतच्या अवतारास शाबूत राखण्याकामी आंजाव्यग्र झाला.
अन् नकळत जगड्व्याळ मायासुरी जाळ्यात गुंतत गेला.

ग्रहण सुटले, आंजावैराग्य सरले,
आय् डी भौ आभासी रूटीनात पुनश्च आकंठ रुतले
समाजमाध्यमेश सुटकेचा सुस्कारा सोडते जाहले.

ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी....

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आत्मचरित्र?
बाकी हा उपवास महिन्या-पंधरादिसात ठेवायला हरकत नसावी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

तुमची प्रतिभा असामान्य आहे.

परतीच्या घामट ट्रॅफिक जॅमात पाठथोपट्या प्रतिसादकांस धन्यवादायचा अन् पायखेच्या प्रतिसादकांना हेडाॅन भिडायचा.

फार्फार आवडलं. अज्जून लिहा. खच्चून लिहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

महेश मांजरेकरांस ही स्टोरी दाखवू नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मांजरेकर काय करतील नक्की?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

तुमची स्क्रिप्ट चोरतील त्यांच्या सिनेम्यासाठी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

मला वाटलं, 'तो परत आलाय' म्हणजे 'नथुराम परत आलाय', असं आमचे आव्हाडसाहेब बोलले त्याला धरुन काही लिहिलंय की काय ?

आता, परत एकदा सगळ्या स्वत:च्या आयड्या तपासल्या पाहिजेत निवांत!
कवितेची कल्पना आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सर्वांना धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

छान लिहिलंय. आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0