प्रमाणभाषा व माझे पूर्वग्रह

लहानपणी माझे तीन-चार वेगवेगळ्या शहरांमध्ये शालेय शिक्षण झाले. कोल्हापूर, सातारा ,पुणे ,मुंबई इ भौगोलिकरित्या एकमेकांजवळ असणाऱ्या ठिकाणांत वावरताना , प्रत्येक जागेच्या बोलीभाषेत कमालीची तफावत आहे हे दिसले. परंतु सर्व शाळांमधील क्रमिक पाठ्यपुस्तकांत मात्र एकाच प्रकारचे मराठी वापरले आहे हे लहानपणीच कळाले. पुढे नाशिक, नागपूर, लातूर, सोलापूर इ ठिकाणचेही मित्र-मैत्रिणी होत गेले. प्रत्येकाच्या बोलीभाषेचा उच्चार व शब्दसंग्रह या दोन्हीत फरक होते सर्वजण आपापल्या मूळ गावांची माहिती अभिमानाने सांगत असत , व त्यात स्वतःच्या बोलीभाषेबद्दल ‘अस्मिता’ व्यक्त करणे आणि इतरांच्या बोलीभाषेची टिंगल करणे हा महत्वाचा भाग होता. त्यात आणि ग्रामीण-शहरी भाषा असा फरक होताच. इतरांच्या भाषेची टिंगल करताना , स्वतःची भाषा व पर्यायाने ती बोलणारा स्वतःचा घोळका जास्त वरचढ असल्याची भावना मुलांमध्ये असे. व ती स्पर्धा लावल्यासारखी एकमेकांना पटवून द्यायचा प्रयत्न नकळतपणे करत .
पुण्यात शालेय जीवनातील(!)शेवटची वर्षे गेली. स्वतःची भाषा ‘’शुद्ध’’ म्हणून वरचढ मानलेली , व इतरांची ‘’अशुद्ध’’म्हणून थट्टा करण्यास पात्र .व इतर लोक पुण्याच्या भाषेचीही टिंगल विविध कारणांमुळे करतात हे ही माहित असे. त्या काळी क्रमिक पाठ्यपुस्तकांत असलेला सर्व मजकूर सत्य व निःपक्षपाती असतो अशी माझी भोळी श्रद्धा होती , व त्यामुळे त्यात वापरलेली प्रमाणभाषाच विचार व्यक्त करण्यास योग्य आहे अशी निरागस भाबडी समजूत होती. स्थलकालापरत्वे नवनवीन व्यक्ती भेटत गेल्या . त्यातील बऱ्याच जणांची भाषा समृध्द , अवजड व अभिजनवादी असे , पण त्यांचे विचार मात्र खूपच दैनंदिन व निरुपयोगी असत . याउलट विचारप्रवृत्त व्यक्ती साध्यासरळ भाषेतसुद्धा अतिशय रंजक पद्धतीने जटील व तीव्र विचार मांडताना आढळत.
. पुढे युवावस्थेत ललित साहित्याची आवड निर्माण होत गेली. यात पाठ्यपुस्तकां-प्रमाणे अधिकृत अशी प्रमाण लेखी भाषा नव्हती. ग्रामीण व शहरी दोन्ही भाषांत लिहिलेले दर्जेदार ललित साहित्य वाचताना सर्व प्रकारच्या बोलीभाषांची मजा कळत गेली , तरी उराशी ‘’अस्मिता’’ वगैरे खुळचट कल्पना बाळगलेल्या होत्याच. वय वाढता वाढता अभिरुची बदलत गेली व वैचारिक साहित्य वाचनात जास्त रस वाटू लागला. यात सुरुवातीलाच वाचलेले कुरुंदकर, टिकेकर इ लेखकांचे प्रगल्भ विचार अतिशय अवजड भाषेत मांडलेले आहेत असे वाटे , व ते कष्ट घेऊन वाचून समजल्यावर त्या प्रकारच्या भाषेची गरज ध्यानात येत असे. परत कधीतरी जुनी पुस्तके वाचताना लक्षात आले की , पूर्वी जी.ए. , गौरी देशपांडे , दुर्गा भागवत , महेश एलकुंचवार इ लेखकांची ललित म्हणून वाचलेली पुस्तके , खरेतर सर्वांना आकलन होण्यासाठी कथास्वरुपात मांडलेली प्रगल्भ वैचारिक पुस्तकेच होती. ती वाचून स्वतः विचार करण्यास प्रवृत्त नाही का झालो!
. त्यापूर्वी असे वाटे की , प्रमाणभाषा ही मूळची व म्हणून श्रेष्ठ व इतर बोलीभाषा या केवळ त्यांतील विविधता व म्हणून कनिष्ठ . असे का वाटले असावे जा विचार करताना लक्षात आले की , इतर प्रकारच्या प्रमाण- परिमाणांची अगदी साधी सोपी उदाहरणे कायम नजरेसमोर होतीच की , तरी कसे नाही कळाले ! जसे वजन करण्याच्या वस्तु ( व व्यक्ती ) वेगवेगळ्या ओबडधोबड प्रमाणात निसर्गात आहेतच की ; पण माणसाने केवळ सोयीसाठी निरनिराळी प्रमाणे वापरत सध्याचे किलो/पौंडाचे वजन अधिकृत प्रमाण मांडले आहे. विकल्या जाणाऱ्या वस्तु मुद्दाम मोजून , कापून , भर घालून प्रमाणांच्या ठराविक पटींत बसवल्या जातात . पण प्रत्यक्ष वापरताना खरी मजा त्या पदार्थांच्या विविध गुणधर्मांमुळे अनुभवायला मिळते , वजनामुळे नाही ; तसेच शब्दांचे !
प्रमाणभाषेची आवश्यकता काय हे लक्षात यावयास लागले. निरीक्षण-विचार करण्याची वेगळी गरजच नव्हती याच्या उत्तरासाठी खरेतर , इतके सर्व दैनंदिन आयुष्यात दिसतच होते लख्खं. प्रत्येक प्रदेशांतील भौगोलिकता , संस्कृती, आचार , अर्थकारण इ मुळे त्या त्या बोलीभाषांमध्ये ठराविक प्रकारची समानता व विविधता आहे. पण छपाईचे तंत्र विकसित झाल्यावर सर्वाना समजेल अशी एकंच प्रमाणभाषा असण्याची गरज भासली असावी कदाचित. सर्व बोलीभाषांतील शब्द – उच्चार – कल्पनांची साम्यस्थळे शोधून , त्यात संस्कृतसारख्या भाषांतील शब्दांची भर घालून पुस्तकलेखनासाठी प्रमाणभाषा बनली का ? देवनागरी लिपी त्याआधी अस्तित्वात असली तरी आता त्या लिपीत मराठीच्या सर्व बोलीभाषांचे टंकलेखन चालू झाले. ललित-वैचारिक साहित्य कोणी कशा भाषेत छापावे व वाचावे हा ज्याचा त्याचा प्रश्न , पण चारचौघात ठराविक शब्दांचे उच्चार चुकले व योग्य करता आले म्हणून कमी-जास्तपणा वाटायला नको. नवीन शिकलेल्या शब्दांचे योग्य उच्चार जमल्याबद्दल विनाकारण श्रेष्ठत्व नको अथवा योग्य उच्चार करणाऱ्यांची शिष्ट म्हणून थट्टाही नको.
पण हे खाजगी सोय- फायद्यांसाठी होणारे भाषिक राजकारण चालूच राहणार. . . एकाच भाषेच्या अनेक बोलीभाषा व त्यांत सतत पडत राहणारी इतर भाषांच्या शब्दांची भर , ही साहित्य व आयुष्यातील विविधता वाढवत राहते , त्यातील सौंदर्यानुभव घेणे व वाढवत राहणे हे महत्वाचे ! आता जमेल तेव्हा मूक-बधीरांची भाषाही शिकून घ्यावी म्हणतो . ते आपली थट्टा कशी करतात हे तरी कळेल !
( या लेखनाला कसलाही आधार पुरावा नाही . प्रमाणभाषेच्या विकासाबाबत अधिक वा अधिकृत माहिती असल्यास कृपया पुरवावी )

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वैखरीः भाषा आणि भाषाव्यवहार हे मा. अशोक केळकर यांचे पुस्तक मुळातून वाचण्यासारखे आहे. त्यातील पृ. क्र. 62-63 येथे देण्याचा प्रयत्न करते. .jpg file केली आहे. अजून कळलं नाही कुठून कसं करू ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संदर्भ महाजालावरचेच जोडता येतात असं दिसतं. कोणी सांगेल का संगणकावरील एखादी फाइल कशी जोडायची

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संदर्भ महाजालावरचेच जोडता येतात असं दिसतं.

हो. फेसबुक, गूगल फोटोज किंवा फ्लिकरसारख्या फोटो शेअरिंग साईटवरून प्रतिमा इथे एम्बेड देता येतात. इथे फाईल चढवणं शक्य नाही. अधिक माहिती -
इथे फोटो कसे चढवावेत?

(आणि वर faq म्हणून दुवा दिसेल तिथे हा आणि असे इतर काही धागे सापडतील.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी स्वतः अगदीच टेक्नोमंद आहे म्हणून मी ही पुढे वर्णिलेली automated पद्धत वापरतो.

प्रथम गूगलमध्ये स्वतःचा एक ब्लॉग सुरू करा आणि त्या ब्लॉगमध्ये एक New Post सुरू करा. ’ऐसी’कडे पाठवायचे चित्र तेथे चढवा, ज्यासाठी तेथेच Insert image ही लिंक आहे. चित्र चढल्यावर पान save करा. Saved पानातील चित्रावर राइट क्लिकने Copy image address निवडा. आता चित्राचा URL तुमच्या क्लिपबोर्डावर येऊन बसला आहे.

पुढील HTML Code मी आपल्यापाशी तयार ठेवलेले आहे.

तयार कोड

ह्या कोडिंगमध्ये चित्राची रुंदी ५०० पिक्सेल्स, चित्र आणि आणि शीर्षक मध्यावर येणे आणि शीर्षक इटॅलिक्समध्ये येणे हे घातलेले आहे. २ अथवा अधिक चित्रे घालायची असल्यास पहिले चित्र घालून त्याचे पूर्ण कोडिंग कॉपी करून खाली चिकटवा आणि केवळ URL बदला आणि वर्णन बदला. चित्राची रुंदी ५०० पिक्सेल्सपेक्षा इच्छेनुसार कमीअधिक करणे तुमच्या हातामध्ये आहे. चित्राच्या उंचीची चिन्ता नको, ती आपोआप जुळविली जाईल.

ह्या ब्लॉगवर कितीहि चित्रे चढविता येतील. पुढेमागे एखादे चित्र कोठे आहे हे शोधायची वेळ आली तर सोपे जावे म्हणून मी प्रत्येक महिन्यासाठी वेगळी New Post उघडून तिला त्या महिन्याचे नाव देतो.

सवय झाली की ह्या मार्गाने कितीहि चित्रे वेगाने लेखामध्ये घालता येतात. पानाच्या डाव्या/उजव्या बाजूस चित्र चिकटविणे, टेबलमार्गे अनेक चित्रे चिकटवणे असले प्रकार मी टेक्नोमंद असल्यामुळे सहसा टाळतोच पण त्याचेहि असे कोडिंग एकदाच करून जवळ ठेवून देता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१) चित्रांसाठी ब्लॉगर उत्तम. ( पण त्या पुस्तकातले फोटो कॉपीराइटमध्ये येतील.)
२) पीडीएफ :- jumpshare dot comसाइटवर चढवून मिळालेली लिंक कुणालाही (इथे/वाटसप/इमेल)पाठवता येते. संदेशात पाठवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तकाच्या एखाद्या पानामुळे प्रताधिकाराचं उल्लंघन होत नाही. ज्यातून व्यक्तींचा आर्थिक फायदा होत नाही, अशा एक-दोन पानं, मोजक्या मजकुराविषयी प्रताधिकार सैल असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण " no part of this book ~~~~~without permission of the author/publisher. " यामुळे सर्वच धरतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यात साहित्य संमेलन होते त्यावेळी दूरदर्शन चे नीतीन केळकर आपल्या भाषणात म्हणाले होते की महाराष्ट्रात अनेक बोली आहेत म्हणून सर्वांना एकच अर्थ पोचावा यासाठी बातम्यात प्रमाण बोली भाषा वापरावी लागते. मुद्दा कनिष्ठ श्रेष्ठत्वाचा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

चांगले लेखन.

चारचौघात ठराविक शब्दांचे उच्चार चुकले व योग्य करता आले म्हणून कमी-जास्तपणा वाटायला नको. नवीन शिकलेल्या शब्दांचे योग्य उच्चार जमल्याबद्दल विनाकारण श्रेष्ठत्व नको अथवा योग्य उच्चार करणाऱ्यांची शिष्ट म्हणून थट्टाही नको.

अगदी बरोबर. पण गंमत अशी की हे मराठीबाबत आग्रहाने प्रतिपादन करणारे काही जण इंग्लिश भाषेबाबत मात्र कमालीचे आग्रही असतात आणि इंग्रजापेक्षा अधिक इंग्रज अथवा अमेरीकनापेक्षा अधिक अमेरीकन होत "त्यांच्याच" प्रमाणे उच्चार झालेच पाहिजे अशा अर्थाने कुत्सित मनोवृत्ती बाळगून असतात. एका भाषेकरता एक नियम दुसरी करता दुसरा.... Smile

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या ऑफिसातल्या एकाला माझे काही उच्चार समजत नाहीत. मग तो अमेरिकी इसम ऑफिसातल्या ब्रिटिश इसमाची साक्ष काढतो, "तू कसा उच्चार करतोस?" ब्रिटिश उच्चार माझ्या उच्चारापेक्षा निराळा असेल तर, "बघ, तो कसं बोलतो!" मग मी त्याला म्हणते, "त्याला विचार कलर, ओडर या शब्दांची स्पेलिंगं काय ते!"

आणि मग आम्ही विषय बदलतो. पुढच्या वेळेस आणखी एखादा शब्द अमेरिकी मित्राला समजत नाही. मग आम्ही हीच कवायत पुन्हा करतो. एकमेकांना चिडवत राहतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'नूअर्क'(किंवा 'न्यूअर्क')ला 'नेवार्क' (किंवा 'सान होसे'ला 'सॅन जोस') म्हटलेले खपवून घ्यावे???

(यावर, 'पण मग "ते" नाही का 'लोस आंखलेस'ला 'लॉस अँजेलिस' म्हणत (नि 'सेंट लुईस'मधल्या शेवटच्या 'स'चा उच्चार करत)?'-छाप कौंटरआर्ग्युमेंट केल्यास एक (बोलाचीच) कियांटी माझ्याकडून लागू म्हणून खात्यावर मांडून ठेवावी. नि खात्याची सेटलमेंट गेला बाजार या जन्मात तरी होणार नसल्याकारणाने, वाट पाहत बसावी. आगाऊ धन्यवाद.)

..........

उत्तरकॅलिफोर्नियाछापच. उगाच जास्त पैसे घालून इतालियनछापाच्या भानगडीत (बोलाचीच झाली तरी) आपण पडत नाही. कोकणस्थ नसलो तरीही. (तसाही प्राइस डिफरन्शियलच्या मानाने क्वालिटी डिफरन्शियल तितकाही मोठा नसतो, असे निरीक्षण आहे. असो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागच्या वेळेस आम्ही प्राॅबेबिलिटी या शब्दावरून कवायत केली. त्याआधी बिस्किट म्हणजे नक्की काय जिन्नस, असा विषय होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...दुबईवरून स्मगलिंगच्या मालातून यायचे, सोन्याचे असायचे ते. (तो दावूद इब्राहीम जेव्हा बच्चा होता त्या काळात.)

यावरून पुन्हा वाद नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'नूअर्क'(किंवा 'न्यूअर्क')ला 'नेवार्क'

लोस आंखलेस'ला 'लॉस अँजेलिस'

धन्यवाद, नबा! माहितीत भर पडली. नाहीतर आम्ही देसी, नको तेच उच्चार करायचो. या उच्चारांचा हिंदी -इंग्रजी वा मराठी-इंग्रजी मिश्रित अर्थ घेतला तर आणखीनच मजा येईल. चला, आम्हा देसींना आणखी एक खेळणं मिळालं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मराठीच्या अनेक बोली आहेत त्यापैकी "शुद्ध भाषा नावाची" एक पुणेरी बोली आहे - पु ल देशपांडे

या वाक्यात सगळं सार आहे.

१. ही पुणेरी बोलीभाषा आहे

२. पुणे हे मराठीचे सांस्कृतिक माहेरघर (खरंतर ऐतिहासिक मराठी सत्तेचं हेडक्वार्टर) असल्यामुळे पुणेरी बोलीच शुद्ध भाषा म्हणून मान्यता पावली आहे.

अवांतर: तसंच कोल्हापुरी भाषा ही ग्रामीण मराठीची प्रमाण भाषा बनली आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उज्ज्वला यांच्या विनंतीनुसार अशोक केळकरांच्या 'वैखरी'मधून पान ६२ आणि ६३ जोडत आहे. (मोठ्या आकारासाठी प्रतिमेवर क्लिक करावे)

Vaikhari page 62 (2)

Vaikhari page 63

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0