पहिली ट्रेक

५ वर्षापूर्वी नुकताच कॉलेजातून निघून नोकरीला लागलो होतो वीकएंड ला घरी म्हणजे अलिबाग ला जात असे. जाताना अचानक विचार आला काय आयुष्य झालंय. कंपनी-रूम-कंपनी-रूम कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे. मुंबईला जाताना भरपूर वेळा कर्नाळा किल्ल्याचा उंच सुळका दिसायचा पण कधी तिथे जायचा संबध आला नव्हता. आणि ठरवलं आज त्या उंचीवर जायचं म्हणजे जायचं. पाण्याची बाटली होतीच पटकन एस्टी स्टँड मधून बिस्कीट चा एक पुडा घेतला.गाड्या कर्नाळा थांबा घेत नव्हत्या शेवटी एक लोकल बस मिळाली आणि पक्षी अभयारण्य तिकीट फाडले कंडक्टर बाई विचारायला लागली एकटाच? मी म्हणलो नाही, मित्र पुढे गेलेत.
९:३० च्या सुमारास फी भरून अभयारण्यत प्रवेश घेतला.
थंडी असल्याने जंगल एकदम मस्त वाटत होत पण आतमध्ये आजिबात पक्षी वैगेरे नव्हते परंतु पक्षी निरीक्षण साठी सोय चांगली होती एका ठिकाणी लाकडाची माची होती वरून छप्पर होत. त्यात जाऊन पोटपूजा केली आणि घरी फोन करून आज येत नाही असं सांगितल.
११ च्या सुमारास चढाईला सुरवात केली. यापूर्वी फक्त रायगड आणि कुलाबा हे दोनच किल्ले बघितले होते. पायथ्याशी माझ्यामुळे एका जोद्यपयची तपस्या भंग झाली होती पण मला पर्वा नव्हती.
किल्यावर जायची पायवाट माहित नसल्याने मळलेल्या वाटेने जात होतो.
ऊन वाढत होत आणि मी चढत होतो
दीडेक तासानी किल्ल्याजवळ पोहोचलो तिथे देवीचं लहान मंदिर आहे.पुढे जाळी लावलेल्या पाण्याच्या टाक्या होत्या आजूबाजूला मधमाश्याचे मोठे मोठे पोळे होते. सर्व बाजूला शांतता होती आणि मधोमध सुळका होता त्या सुळक्याची सावली आत माचीवर पडली होती तिथे जाऊन लगेच आडवा झालो. गडावर बघायला फार काही नाही.३ च्या सुमारास उतरायला सुरवात केली.दोन वर्षांनी आईसोबत मुंबईला जाताना तिला सांगितलं कि मी त्या सुळक्याच्या सावलीत झोपलेलो आणि पुरावा म्हणून फोटो दाखवले तेव्हा भरपूर रागावली होती.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चला इकडे भटकंती विषयक लेख येऊ लागले.
अगोदरचा गुळवणींचा लेख ललित म्हणता येईल. याअगोदर अमचा एक क्षीण प्रयत्न झालेला. बरेच वर्षांपूर्वी राही (?) अमेरिकेतले दीर्घ प्रवासवर्णन, त्या अगोदर रुषिकेश( रु टाईप होत नाही) याचे लोथाल.

खरंच कर्नाळा भटकंतीचा आनंद घ्यायचा असल्यास (आणि स्वस्तात) तर कोकणरेल्वेच्या रसायनी स्टेशनहून ( मागची वाट) चांगली मजेदार वाट आहे. उतरताना नेहमीच्या गेटकडे कर्नाळा स्टॉपकडे उतरता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आचरट बाबा , आता एवीतेवी भटक्याने सुरुवात केली आहेच , तर तुम्ही लिहायला लागा तुमच्या ट्रेक स्टोर्या .. आवडतील समद्यांना ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरे चा मायबोली होण्याकडे प्रवास सुरु !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मायबोली वर सुद्धा आहे मी. फक्त तुमच्या खवचट प्रतिक्रिया वाचण्यासाठी येथे लिहिले.
http://aisiakshare.com/comment/166526#comment-166526

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

**ऐसी अक्षरे चा मायबोली होण्याकडे प्रवास सुरु !!**

- म्हणजे काय ओ?

अमुक एक विषयाचे वाचकवर्ग वाढले की तिकडे लेख दिले जातात. मी तिन्ही ठिकाणी आहे पाच वर्षं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भटक्या कुत्रा , अजून दारेसलामात आहात कि आलात परत ? कर्नाळ्याच्या सफारीची स्टोरी जरा मोठी करून सांगा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो अजून इकडेच आहे. भेटू पुन्हा तेव्हा सांगतो विस्ताराने ☺

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0